परदेशात अडकलेले भारतीय

Submitted by अतरंगी on 11 April, 2020 - 14:46

महाराष्ट्रात लॉक डाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.

करोनाग्रस्त रुग्णांची वाढणारी संख्या पाहता केंद्र आणि बाकी राज्य सरकारे लवकरच असे निर्णय घेण्याची शक्यता आहे. करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी हे गरजेचे आहेच. कठोर पावले उचलल्याशिवाय हा आजार कंट्रोल मधे येणे अशक्यप्राय आहे.

या लॉक डाऊनमधे बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेमुळे माझ्यासारखे अनेक भारतीय परदेशात अडकलेले आहेत. मंध्यतरी दुबईतील विमानतळावर अडकलेल्या काही भारतीयांचे हाल वर्णन करणारी बातमी वाचनात आली. जवळ जवळ प्रत्येक देश दुसर्‍या देशात अडकलेल्या त्यांच्या नागरीकांसाठी विमानसेवा उपलब्ध करुन देत आहे. पण भारताकडून असे काही प्रयत्न होत असल्याचे ऐकिवात नाही.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी एका २० ते २५ दिवसांच्या कामासाठी कतार मधे आलो होतो. आधी ८ दिवस विमानतळे बंद ठेवण्याची घोषणा झाली तेव्हा आम्ही ३० तारखेच्या दरम्यान भारतात परतता येईल या आशेवर होतो. पण त्यानंतर अचानक २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली गेली. आता परत लॉक डाऊन वाढविण्यात येईल अशी चर्चा चालू आहे. आता हा लॉक डाउन कधी संपणार आणि त्यानंतर आम्ही home quarantine संपवून किंवा सरकारने ठरवून दिलेला under observation period संपवून घरी कधी पोचणार? हा फार मोठा प्रश्न आहे. ज्यांच्या घरी लहान मुले, वृद्ध पालक आहेत त्यांना तर स्वतःला लागण झालेली नाही, हे नक्की होई पर्यंत लगेच घरी जाणे सुद्धा शक्य नाही. बाहेर कुठेतरी राहणे किंवा हॉटेलवर काही दिवस काढून मग घरी जाणे असे करावे लागणार आहे.

हा सर्व विचार करुन जास्तच वैताग येत आहे.

माझ्यासारखेच माझ्या कंपनीचे अंदाजे १०० जण असेच अडकून पडले आहेत. ईकडून कतार एअरवेजची सेवा चालू होती पण भारतातील विमानतळे बंद झाल्यामुळे त्यांनी सेवा बंद केली आहे.

असे अनेक जण अनेक देशात वेगवेगळ्या कारणांनिमित्त अडकून पडले असायची शक्यता आहे. बरेच विमान सेवा चालू होण्याची वाट पहात आहेत. अशा सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास भारत सरकार कडून त्यांच्यासाठी काहीतरी सोय व्हायची शक्यता आहे.

आम्ही आमच्या कंपनी तर्फे भारतीय दुतावासाशी संपर्क केला आहे. अजून काय करता येईल याविषयी चर्चा चालू आहे. Ministry of External Affairs सोबत कसा संपर्क करता येईल, वृत्तपत्रांमधून लेख प्रकाशित करता येतील का? या बाबत प्रयत्नशील आहोत.

वेगवेगळ्या देशात अडकलेल्या नागरीकांना सोशल मीडियाचा वापर करुन एकत्र कसे आणता येईल याचा विचार करत आहोत. त्यासाठी काही कल्पना हव्या आहेत. काय करता येईल, कसे करता येईल, कोणी, कुठे असे प्रयत्न चालू केले आहेत का?

वेगवेगळ्या देशातील नागरीकांना संपर्क कसा करावा, भारतीय सरकारसोबत संपर्क कसा करावा, काय केल्याने भारत सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी विमानसेवा चालू करेल? शक्य तितक्या कल्पना सुचवा.

धन्यवाद

ता.कः- एक अपील होईल असा हॅशटॅग सुचवा. अस्तित्वात असल्यास सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी ज्यांना आणले त्यामुळे इथे गोंधळ माजला. त्यावर काही उपाय योजना दूर. त्यात पुन्हा नव्याने पिडा आणायची कशाला? पीएम केअर मध्ये पैसे भरल्याची परतफेड का? इथे गरीब, मजुरांना कोंडून, उपासमारीत मरत सोडले आहे आणि ह्यांचे इतके लाड कशाला? तिक्कडेच रहा, जगलात तर या म्हणावं.>>>>>

फिल्मी,

तुमचा ऊद्वेग समजू शकतो. देशा बाहेरुन आलेल्या लोकांमुळे हा आजार पसरला. पण त्यावर लोकांना येऊ न देणे हा उपाय नाही.
त्यांच्या टेस्ट करणे, त्यांना quarantine मधे ठेवणे हा आहे.

गावागावातून, जिल्ह्यातून, राज्यातून जे स्थलांतरीत परत येत आहेत त्यांना विरोध होत आहे.

कामा निमित्त, पोटापाण्यासाठी जे जेदेशा, राज्य, देश सोडून बाहेर गेले होते ते शेवटी त्यांच्या घरी येणारच. किती दिवस बाहेर राहणार?

आता जे जे ईकडून येत आहेत त्या सर्वांना टेस्ट करणे कंपलसरी केले आहे. जे पॉजिटिव्ह आहेत त्यांना भारतात आणले जाणार नाही. प्रत्येकाकडून फोन नंबर, पत्ता बाकी माहिती भरुन घेतली जात आहे. त्यांना १५ दिवस सरकारी दवाखान्यात किंवा सरकारने ठरवून दिलेल्य ठिकाणी रहावे लागणार आहे. फ्लाईट्स पुर्ण बंद व्हायच्या आधी जे जे परत गेले त्यांच्यावर सरकारचे पुर्ण लक्ष आहे. त्यांच्या घरी पोलिस अधून मधून चक्कर मारत आहेत.

पुर्ण देश, वाहतूक, दळणवळण, उत्पादन किती दिवस बंद ठेवणार? आज ना उद्या चालू करावेच लागणार.

अतरंगी, तुम्हांला शुभेच्छा! लवकरात लवकर तुम्ही तुमच्या घरी जाल!

इथे अडकलेल्या भरतीय लोकांबद्दल मागे एकदा लिहिले होते. ते अजूनही इथेच आहेत.. जरा स्वस्तातल्या हॉटेलमध्ये मूव्ह झाले आहेत. सगळीकडे संचारबंदी आहे पण शहरातील त्या भागात जाऊ शकणारा मराठी माणूस त्यांना अधूनमधून भेटू शकतो आणि काही खाद्यपदार्थ पण नेऊन देतो.
दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियातुन भारतात अजून तरी विमान नाही... इंडियन high commission च्या फेसबुक पेजवर अडकलेली अनेक लोकं माहिती विचारतात.... ते वाचून खुप वाईट वाटतं आणि हतबल पण वाटत....
हे वाईट दिवस लवकर संपोत....

21 मे ते 28 मे दरम्यान ऑस्ट्रेलियातुन भारतात विमानसेवा उपलब्ध करून दिली आहे अस high commissioner of India यांच्या फेसबुक पेजवर समजलं.
नेहमीप्रमाणे मेसेज अगदीच त्रोटक आहे... पण एक लक्षात आले की या flights फ्री ऑफ चार्ज नसून AUD 1700 ते AUD4500 अश्या रेंजमध्ये किंमती आहेत. जयचे एअर इंडिया चे बुकिंग आधीपासूनच होते त्यांना 850 AUD इतके तिकिट आहे.
वर कोणीतरी म्हणाले तसं या flights भारत सरकारने फुकट उपलब्ध करून दिलेल्या नाहीत!

वत्सला,
क्रुपया गैरसमज करुन घेवु नका पण आस्ट्रेलिया टुरला गेलेले लोक , टुर कॅन्सलही होत नाहिये.रिफण्डही मिळत नाहिये, जाउ दे जे होइल ते होइल अस म्हणून प्रोसीड झाले असतिल तर त्यानी आजुबाजुला काय चालु आहे हे माहित असताना आगित उठुन फुफाट्यात पडण्यासारख झालय ते. त्यात भारत सरकारची किवा कुठल्याही सरकारची काय चुक असु शकेल.
ज्येष्ठ नागरिक म्हणुन वाइट वाटणे समजु शकते आणि तिथले नागरिक त्याना मदत करत आहे हे पण छानच आहे.
फ्रि ऑफ चार्ज का असतिल या फ्लाईट?

100

या लोकांना सरकारने फ्री द्याव्यात असे नाही पण ज्या कंपनीतून बुकिंग करून ते तिकडे गेले त्या कंपनीने सरकारशी डील करून त्यांना परत आणणे बरोबर होईल. कदाचित टोटल फुकट नाही पण त्या कंपनीची जबाबदारी आहे त्यात. कदाचित ऑस्ट्रेलियन सरकारला व्हिसा काढताना तसे सांगावेही लागले असेल.

फुकट नाहीत हे वत्सलाना बहुदा माहीत असावे. मागच्या पानावर एका पोस्टचा असा अर्थ निघत आहे की पी एम केअर फ़ंडाचा पैसा वापरून अडकलेल्याना भारतात आणत आहेत. ते तसे नाही एवढेच.. नेहमीच्या भाड्याच्या अडीच पट/ तिप्पट भाडे आहे. फुकट आणणे परवडणार नाही, आणू नये आणि तशी कुणाची अपेक्षा पण नसेल.

Hi All

Hi All
नवीन Submitted by रुन्मेश२ on 14 May, 2020 - 15:31

>>> मायबोलीवर स्वागत .....

जे जे अडकले आहेत त्या सगळ्यांनी काळजी घ्या. हे सर्व लवकर संपावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

लोकहो, भारत सरकारने इतर देशात अडकलेल्या लोकांना सरकारी खर्चाने परत घेऊन जावे असे मला अजिबात म्हणायचे नव्हते! लंपन यांनी दिलेले स्पष्टीकरण बरोबर आहे.
फक्त टुरिस्टच अडकले आहेत असे नाही तर बरेचसे वृद्ध आई वडील देखील आहेत... माझ्या ओळखीत चार कुटुंबातील कोणीतरी (आई /वडील) भारतात मृत्यू पावले आहे. अशा लोकांची अवस्था बिकट आहे. काही भारतीय टुरिस्टस जानेवारी end किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला आले होते ते अडकून पडले आहेत. मी सुरुवातीला दिलेल्या उदाहरणातले टुरिस्ट कपल मात्र मार्च 11 ला भारतातून निघाले होते.

बाहेर देशात अडकलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिक/PR ना ऑस्ट्रेलियन सरकारने फी आकारून परत आणले होते. पण 14 दिवसाचे जे विलगीकरण करावे लागते ते मात्र सरकारी खर्चाने होते आहे.

सध्या जी मोठी हॉटेल्स बंद पडली आहेत ती वापरली जाताहेत. विलगीकरण असलेल्या लोकांना हॉटेल्स बाहेर सोडा पण रूम बाहेर येण्याची देखील परवानगी नाही..... त्यांना तीन वेळा जेवण दिले जाते (prepacked food). याउपर त्यांना काही जेवण किंवा स्नॅक्स दुकानातुन मागवायचे असतील तर तशी पण काहीतरी सोय आहे. आपापल्या खर्चाने ते मागवू शकतात. Details माहीत नाहीत मला.

परदेशातून भारतात मुंबई एअरपोर्ट वर परतलेल्या लोकांना आपापल्या शहरात जाऊन home quarantine ची परवानगी आहे की मुंबई मधेच हॉटेल मध्ये वगैरे qurantine नंतर घरी जाऊ देत आहेत?

काही स्पेसिफिक केसेस मधील oci होल्डर्सना भारतात यायला परवानगी दिली आहे. भारतीय नागरिकांची लहान मुले आणि वृद्ध यांना परवानगी आहे.

पण OCI ना का भारतात यायचे असेल? काय करतील इथे येऊन? काही support system पण नसणार, लोकल लोकांचं आधीच झालं थोडं .... परिस्थिती आहे .

ही मार्चमधली केस आहे. एका भारतीय महिलेची अमेरिकेत जन्मलेली म्हणून अमेरिकन नागरिक असलेली मुलगी. ट्रॅव्हल बॅनमध्ये तिला व्हिसा नाकारला गेला आणि ती दु बईत अडकली. आईने न्यायालयात जाऊन आदेश मिळवला
https://www.deccanherald.com/national/west/bombay-hc-asks-immigration-bu...

OCI लोकांना का भारतात यायचं आहे याची काही कारणं:
1. कुटुंबातील मृत्यू
2. वृद्ध आई वडीलांना प्रवासात आणि नंतर विलगीकरणात सोबत
3. वृद्ध आई वडिलांना परत घेऊन जाण्यासाठी (आई वडील देखील इतर देशाचे नागरिक/रहिवासी असतील(
4. आई वडीलांना भेटण्यासाठी (terminally आजारी)
5. याशिवाय काही OCI धारक भारतातच रहातात पण एखाद्या प्रोजेक्ट/बिझीनेस ट्रीपसाठी इतर देशात जाऊन येऊन असतात. ते आपल्या कुटुंबाकडे परतू इच्छित असतील

ही मला सुचलेली काही करणं.
सध्या OCI ना केवळ खास कारणासाठीच भारतात जाता येत आहे.

तुमचा ऊद्वेग समजू शकतो. देशा बाहेरुन आलेल्या लोकांमुळे हा आजार पसरला.

>> एक्झाक्टली. चिडचिड यामुळे होतेय की अनेक गोरगरिबांना कोरोना झाला किंवा त्यांना आज जे सहन करावे लागते आहे त्यात त्यांच्या अज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे. आणि हे अज्ञान त्यांनी स्वतःहून मागून घेतलेले नाही.

याऊलट भारताबाहेरून येणाऱ्यांना (सुशिक्षित) या रोगाची व्याप्ती, सोशल डिस्टनसिंगची अटळ गरज, रोगाचा धोका, मृत्युदर वगैरे सगळं अगदी नीट माहिती असूनही आपल्याकडे लॉकडाऊन व्हायच्या आधी हे चू** लोक येऊन थोडे दिवस गप घरी बसायचे सोडून मोकाट फिरले आणि सगळ्यांना कोरोनाची लागण करून दिली. त्यामुळे सरसकटीकरण टाळायचं म्हटलं तरी या लोकांना पिडा म्हटल्याने मला तितका त्रास होत नाहीये.

मी स्वतः OCI वर आजारी आईला भेटून आलो.. (त्यावेळी OCI वाल्याना भारतात जाणे शक्य होते...)
पण वर वत्सलाने दिलेली कारणे बरोबर आहेत.

Pages