परदेशात अडकलेले भारतीय

Submitted by अतरंगी on 11 April, 2020 - 14:46

महाराष्ट्रात लॉक डाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.

करोनाग्रस्त रुग्णांची वाढणारी संख्या पाहता केंद्र आणि बाकी राज्य सरकारे लवकरच असे निर्णय घेण्याची शक्यता आहे. करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी हे गरजेचे आहेच. कठोर पावले उचलल्याशिवाय हा आजार कंट्रोल मधे येणे अशक्यप्राय आहे.

या लॉक डाऊनमधे बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेमुळे माझ्यासारखे अनेक भारतीय परदेशात अडकलेले आहेत. मंध्यतरी दुबईतील विमानतळावर अडकलेल्या काही भारतीयांचे हाल वर्णन करणारी बातमी वाचनात आली. जवळ जवळ प्रत्येक देश दुसर्‍या देशात अडकलेल्या त्यांच्या नागरीकांसाठी विमानसेवा उपलब्ध करुन देत आहे. पण भारताकडून असे काही प्रयत्न होत असल्याचे ऐकिवात नाही.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी एका २० ते २५ दिवसांच्या कामासाठी कतार मधे आलो होतो. आधी ८ दिवस विमानतळे बंद ठेवण्याची घोषणा झाली तेव्हा आम्ही ३० तारखेच्या दरम्यान भारतात परतता येईल या आशेवर होतो. पण त्यानंतर अचानक २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली गेली. आता परत लॉक डाऊन वाढविण्यात येईल अशी चर्चा चालू आहे. आता हा लॉक डाउन कधी संपणार आणि त्यानंतर आम्ही home quarantine संपवून किंवा सरकारने ठरवून दिलेला under observation period संपवून घरी कधी पोचणार? हा फार मोठा प्रश्न आहे. ज्यांच्या घरी लहान मुले, वृद्ध पालक आहेत त्यांना तर स्वतःला लागण झालेली नाही, हे नक्की होई पर्यंत लगेच घरी जाणे सुद्धा शक्य नाही. बाहेर कुठेतरी राहणे किंवा हॉटेलवर काही दिवस काढून मग घरी जाणे असे करावे लागणार आहे.

हा सर्व विचार करुन जास्तच वैताग येत आहे.

माझ्यासारखेच माझ्या कंपनीचे अंदाजे १०० जण असेच अडकून पडले आहेत. ईकडून कतार एअरवेजची सेवा चालू होती पण भारतातील विमानतळे बंद झाल्यामुळे त्यांनी सेवा बंद केली आहे.

असे अनेक जण अनेक देशात वेगवेगळ्या कारणांनिमित्त अडकून पडले असायची शक्यता आहे. बरेच विमान सेवा चालू होण्याची वाट पहात आहेत. अशा सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास भारत सरकार कडून त्यांच्यासाठी काहीतरी सोय व्हायची शक्यता आहे.

आम्ही आमच्या कंपनी तर्फे भारतीय दुतावासाशी संपर्क केला आहे. अजून काय करता येईल याविषयी चर्चा चालू आहे. Ministry of External Affairs सोबत कसा संपर्क करता येईल, वृत्तपत्रांमधून लेख प्रकाशित करता येतील का? या बाबत प्रयत्नशील आहोत.

वेगवेगळ्या देशात अडकलेल्या नागरीकांना सोशल मीडियाचा वापर करुन एकत्र कसे आणता येईल याचा विचार करत आहोत. त्यासाठी काही कल्पना हव्या आहेत. काय करता येईल, कसे करता येईल, कोणी, कुठे असे प्रयत्न चालू केले आहेत का?

वेगवेगळ्या देशातील नागरीकांना संपर्क कसा करावा, भारतीय सरकारसोबत संपर्क कसा करावा, काय केल्याने भारत सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी विमानसेवा चालू करेल? शक्य तितक्या कल्पना सुचवा.

धन्यवाद

ता.कः- एक अपील होईल असा हॅशटॅग सुचवा. अस्तित्वात असल्यास सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मला वाटलं अतरंगींना तिकीट मिळालं..... Happy

अजून नाही.

एका कलिगची बायको वारली होती. लाॅक डाउन चालू झाले त्या सुमारास.

आमच्या पुर्ण टिम मधे आता पर्यंत तोच एक आहे ज्याला जायला परवानगी मिळाली.

सगळ्यांना बरं वाटलं. त्याचं घरी जाणं गरजेचं होतं

अतरंगी, तुम्हांला आणि तुमच्यासारख्या अनेकांना लवकरच घरी परतायला मिळो.

पियू, तुमच्या पोस्टमागील उद्वेग लक्षात आला तरी तुमची पोस्ट अत्यंत फालतू आहे हे नमूद करते. भारताबाहेरुन येणार्‍या लोकांनी (म्हणजे बिझनेस ट्रिप्सवर, फिरायला गेलेले भारतीय की एनआराय?) कोरोना आणला म्हणताय मग हे आलेच नसते तर भारतात कोरोना आलाच नसता?

आई वडील आणि दहा वर्षांचा थोरला मुलगा भारतीय नागरिक. दोन वर्षांची मुलगी अमेरीकन नागरीक. व्हिसा संपत आल्याने कुटुंबाला भारतात परत यावं लागणार आहे. पण छोटी OCI. तिचा व्हिसा करणं ह्या परिस्थितीत अवघड.
माझ्या जवळच्या नात्यात हे कुटुंब आहे. आता लहान मुलांना परवानगी मिळाली असेल, तर त्यांना जरा सोपं होईल.

पियू, तुमच्या पोस्टमागील उद्वेग लक्षात आला तरी तुमची पोस्ट अत्यंत फालतू आहे हे नमूद करते. भारताबाहेरुन येणार्‍या लोकांनी (म्हणजे बिझनेस ट्रिप्सवर, फिरायला गेलेले भारतीय की एनआराय?) कोरोना आणला म्हणताय मग हे आलेच नसते तर भारतात कोरोना आलाच नसता?
->>> तुम्हाला कोरोना कसा पसरतो माहित आहे का? भारताबाहेरून लोक आलेच नसते तर कोरोना भारतात कसा आला असता?
बाकी पियू यांची पोस्ट टोकाची आहे पण मुद्दा बरोबर आहे .

एका व्यक्तिने त्यांचा भारतात जाण्याचा अनुभव इथे लिहिला आहे: <<<<<
@ वर्षा - लिंक साठी धन्यवाद. खूप उपयोगाची माहिती आहे.

भारताबाहेरुन येणार्‍या लोकांनी (म्हणजे बिझनेस ट्रिप्सवर, फिरायला गेलेले भारतीय की एनआराय?) कोरोना आणला म्हणताय मग हे आलेच नसते तर भारतात कोरोना आलाच नसता?>> कोरोनावर टाळ्या थळ्यांनातर याहून फालतू काही वाचल्याचं स्मरणात नाही.

>> तुम्हाला कोरोना कसा पसरतो माहित आहे का? भारताबाहेरून लोक आलेच नसते तर कोरोना भारतात कसा आला असता?>> नाही बाबा. मला काहीच कल्पना नाही. पण सांगू नका. भरपूर उलट सुलट वाचलं आहे. नव्याने ऐकायची गरज नाही.

अरे मला वाटलं अतरंगींना तिकीट मिळालं...... +११११
अतरंगी, तुम्हांला आणि तुमच्यासारख्या अनेकांना लवकरच घरी परतायला मिळो........आमेंन

पियू भारतीय लोक जे भारताबाहेर फिरायला गेले होते त्यांच्यामुळे कोरोना भारतात पसरला या विधानाला फारसा अर्थ नाही. भले त्यांच्या नकळत कोरोना ते घेऊन आले असं म्हणलं तरी आज त्यांच्यामुळे कोरोना पसरत नाहीये शिवाय आज जे भारताबाहेर अडकले आहेत त्यांनी तर भारतात कोरोना पसरवणं शक्य नाही. So it's a misplaced blame.
जर वुहान शहरातील आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली असती तर त्या वेळी कोरोना रोखता आला असता. ती वेळ निघून गेली आहे.

मार्च महिन्यात भारतात परतणार्‍यांचं / येणार्‍यांचं स्क्रीनिंग खर्‍या अर्थाने सुरू झालं. (सरकार जानेवारीपासून करत अ सल्याचा दावा करीत असलं तरी). त्यातही मोजक्या देशातून येणा र्‍यांचं स्क्रीनिंग होत होतं. महाराष्ट्रात सुरुवातीच्या निम्म्याहून अधिक केसेस दुबईहून आलेल्या असताना युएईचं नाव कितीतरी दिवस स्क्रीनिंगच्या यादीत नव्हतं.

स्क्रीनिंगमध्ये लक्षणे मिळालेल्यांचं सरकारी क्वारंटाइन , टेस्टिंग. इतरांचं सेल्फ क्वारंटाइन.
लोक हेही पाळत नाहीत असं दिसलं तेव्हा हातावर शिक्के मारायला सुरुवात केली गेली. असे शिक्के मारलेले लोकही दूर पल्ल्याच्या गाड्यांत , भारतांतर्गत उडणार्‍या विमानांत मिळाले. त्यांची घरं मुंबई बाहेर, महाराष्ट्राबाहेरही होती. त्यांनी तो प्रवास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने (ट्रेन, बस) केला. रेंटल कारने केला तर त्या कारचा ड्रायव्हर, त्या कारने नंतर प्रवास करणे, त्यांचे काँटॅक्स्ट्स अशी साखळी तपासावी लागली.

केरळमध्ये एका कुटुंबाने स्क्रीनिंग हुकवलं आणि कुठे कुठे फिरून आले.

मुंबईत एका परतोनि आलेल्याच्या डोमेस्टिक एडला संसर्ग झाला. ती राहते त्या वस्तीत काँटॅक्ट ट्रेसिंग कर्मकठीण होतं. स्लम्समधली ही पहिली केस.

बंगलोरमधल्या पहिल्या केसने बंगलोर ते हैद्राबाद बस प्रवास केला.

मध्य प्रदेशमध्ये दुबईहून परतलेल्या एका माणसाने आपली ट्रॅव्हल हिस्टरी लपवली. आईच्या तेराव्याचं हजारभर लोकांना गावजेवण घातलं. तो पॉझिटिव्ह निघाल्यावर २६०००+ लोकांना क्वारंटाइन करावं लागलं.

दिल्लीत तबलीगी जमातच्या संमेलनाला अनेक परदेशी प्रतिनिधी आले होते.
हैद्राबादला विमानातून उतरलेल्या एका विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या अनेक सहप्रवाशांनी लँडिंग च्या तास- दोन तास आधी ताप कमी करणा र्‍या गोळ्या घेतल्या.
जयपूरमधल्या पहिल्या केसेस फॉरेन टुरिस्ट्स होते.

किमान मार्च च्या पहिल्या तारखेपासून परदेशातुन येणार्‍या सगळ्यांचं सक्तीने क्वारंटाइन केलं असतं तर पुढल्या अनेक गोष्टी टळल्या असत्या. १३० करोड लोकांवर निर्बंध लादण्यापेक्षा काही हजार किंवा अगदी लाखभर लोकांवर निर्बंध लादणं अधिक सोपं होतं.

भारतात लॉकडाउनसाठी ४ तासांची पूर्वसूचना मिळाली. तेच परदेशातून फ्लाइट्स बंद करायला ७२ तासांची पूर्वसूचना दिली गेली.

भारतात सुरुवातीच्या काळात कोरोना पसरण्यास परदेशातून आलेले लोक सरसकट जबाबदार होते असं मी म्हणणार नाही. पण त्यांच्यामुळेकरवी हा आजार पसरला. या वाक्यात दोषारोप किंवा स्टिग्मॅटायझेशन नाही. व्यवस्थेतली पहिली त्रुटी तीच होती.

>>>ही मार्चमधली केस आहे. एका भारतीय महिलेची अमेरिकेत जन्मलेली म्हणून अमेरिकन नागरिक असलेली मुलगी. ट्रॅव्हल बॅनमध्ये तिला व्हिसा नाकारला गेला आणि ती दु बईत अडकली. आईने न्यायालयात जाऊन आदेश मिळवला

हे अजूनही होतंय का? मला परवा माझी शेजारीण अशा केसेस होतात हे सांगत होती. किती स्ट्रेसफुल असेल ही परिस्थिती! सगळ्यांना सुखरूप परत यायला मिळो.
@अतरंगी,
किती तास फास्टिंग करताय तुम्ही? काय फरक जाणवला?

The main reason for increasing Corona cases in India is lack of screening for Middle East, Europe and American flights in early stage. India earlier concentrated screening of China, Korea, Japan flights only. They woke up when group of Italian tourists tested positive and they were travelling in Delhi, Jaipur etc.

लोकांच्या बेजबाबदारपणाच श्रेय आपण सरसकट सरकारवर टाकून मोकळे होऊ शकत नाही. बंगलोरच्या अनेक complex मधे भरपूर लोकं भारतात आली, ज्यांच्या हातावर शिक्के मारलेले असताना शेजाऱ्यांना अशी माणसं इथे-तिथे फिरताना दिसत होते. काय करणार अश्या लोकांचं? नागरिक म्हणून भारतीय भारतात किती आणि काय शिस्तीच पालन करतात ते इथे सगळ्यांना माहीत आहे. सपोर्ट सिस्टिम नसताना self home quarantine कसं पार पाडाव? अर्थात तोवर अजून lockdown आलेला नव्हता त्यामुळे हे लोकं doorstep होम डिलीव्हरी drop वर राहू शकले असते. मार्च च्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना भारतात सगळ्यांना कळलेला होता तरीही 13 का 15 मार्च पर्यंत leisure foreign ट्रिप ला जाणाऱ्या लोकांना काय म्हणायचं? इथे मी मुद्दाम कार्यालयीन प्रवास म्हणत नाहीये, अश्या ठिकाणी कंपनीची जबाबदारी होती policy करायची. जे लोक व्यक्तिगत पातळीवर जबाबदार पणे वागू शकत नाहीत तीच मंडळी कंपनीत जबाबदारी आणि निर्णायक पदावर असतात, ते तिथे पण योग्य पॉलिसी वेळेत करत नाहीत.
सगळ्यात सोपं सरकारवर आरोप करणं आहे! किती जण 13 मार्च च पहिल्यांदा foreign trip असलेले पूर्ण ट्रिप cancel करून घरी बसले असते?
अतरंगी, सॉरी आपल्या अत्यंत महत्त्वाच्या धाग्यावर अवांतर होतंय. आपल्याला लवकरात लवकर घरी यायला मिळो ही सदिच्छा. तोपर्यंत आपण स्वतः ला सांभाळत आहातच, तरी hang in there.

मला फक्त एक कळत नाही की या चर्चेचा फायदा काय आहे?

दोष सरकरचा, लोकांचा, दोघांचा, कोणाचाही असला तरी आता चर्चा करुन / सिद्ध करुन फायदा काय आहे ?

सुरुवातीच्या काळात सरकार आणि जनता, दोन्ही गाफिल राहिले असे मला वाटते. कोणालाच त्याचे गांभिर्य योग्य वेळेस कळले नाही. त्यात हा आजार लगेच लक्षणं दाखवत नसल्याने अजूनच घोळ झाला. वेळच्या वेळी योग्य पावले उचलली गेली नाहीत. यात फक्त भारतच नाही तर अनेक देश येऊ शकतील.

पण आता जे आहे ते आहे. ते तुम्ही बदलू शकत नाही. पुर्ण देश, देशाच्या सीमा अनंतकाळासाठी बंद करुन ठेऊ शकत नाही.

जे लोक येत आहेत, यायला तयार आहेत, ते भारतात कुठेही/ स्वतःच्या घरी कुठेही quarantine व्हायला तयार आहेत.

त्यांना फक्त स्वतःच्या घरी पोचायचे आहे. स्वतःच्या कुटुंबाकडे परतायचे आहे. त्यांना येऊ न देणे हे चूक आहे असे मला वाटते.

आज ना ऊद्या ते करावेच लागणार आहे. कसे करायचे आहे यावर विचार व्हायला हवा.

आमच्या घरी पण लहान मुले, सिनिअर सिटीझन्स आहेत. आम्ही त्यांचा जीव कशाला धोक्यात घालू? सरकारने सांगो अथवा न सांगो मी तरी १५ ते २० दिवस हॉटेल मधे मग नंतर घरी जाऊन परत ८ ते १० दिवस isolation मधे राहणार होतोच.

आमच्या घरी पण लहान मुले, सिनिअर सिटीझन्स आहेत. आम्ही त्यांचा जीव कशाला धोक्यात घालू? सरकारने सांगो अथवा न सांगो मी तरी १५ ते २० दिवस हॉटेल मधे मग नंतर घरी जाऊन परत ८ ते १० दिवस isolation मधे राहणार होतोच. --- आपले बरोबर आहे. जेव्हा घरी परत याल तेव्हा चॉईस आणि शक्य असेल तर हॉटेलपेक्षा घरीच एका वेगळ्या खोलीत quarantine /self isolation करा.

कित्येक देश आहेत ज्यांनी देशाच्या सीमा बंद ठेवून आतले व्यवहार पूर्ववत सुरू केले आहेत. आपले व्यवहार अजून तितके पूर्ववत सुरू झाले नाहीत.

माझ्या पोस्टमध्ये बेजबाबदार वागणार्‍या लोकांची उदाहरणंही आहेत. सरकारने पाउले उचलायला उशीर केला , त्यात त्रुटी राहिल्या हे ढळढळीत सत्य दिसत असताना सरकारला डिफेंड करणं हे राष्ट्रीय कर्तव्य असल्यासार ख्या पोस्ट्सचं नवल वाटणं बंद झालंय.

भारतात हा आजार परदेशातून येणार्‍या लोकांकरवी पसरायला सुरुवात झाली हा मुद्दा होता. ( इतकी साधी गोष्ट कोणाला माहीत नसावी याचं नवल मात्र वाटलं नाही. थाळ्या वाजवून , १४ तास जनता कर्फ्यू पाळून किंवा विजेवर चालणारे दिवे बंद करून ज्योती पाजळून कोरोना नष्ट होईल असं मानणारे आणि तसली स्पष्टीकरणं एकमेकांच्या माथी मारणारे शिक्षित लोक इथे भरपूर आहेत)

आताही भारतांतर्गत विमानवाहतूक सुरू होते आहे . विमानाने प्रवास करणार्‍यांना क्वारंटाइनची गरज नाही, असं संबंधित मंत्र्यांनी सांगून टाकलं आहे. थोड्या वेळाचा प्रवास हा त्यांचा निकष आहे.
कोरोनाला
तिथे सरका रे पाउल

आमच्या घरी पण लहान मुले, सिनिअर सिटीझन्स आहेत. आम्ही त्यांचा जीव कशाला धोक्यात घालू? >> मान्य. पण ह्याच जबाबदारीने परदेशातून येणारे सगळेच वागतील? याआधी पासपोर्ट वाल्यांनीच घाण केली आणि रेशनकार्ड वाले आयुष्यातून उठायची वेळ आली की. खरेतर आत्ता परदेशात अडकलेल्यांची देखील धड सोय होईल असे दिसत नाही. करायची तितकी जाहिरात करून झाली आहे. नवीन काही दिसत नाही किंवा एखादा इव्हेंट स्फुरत नाही तोवर अवघड वाटते. असो. मायबाप सरकार करेलच सुरळीत सर्व काही अशी आशा ठेवण्यावाचून गत्यंतर नाही.

भारत सरकारने नवीन नोटीफिकेशन आणुन १८ वर्षाखालील OCI मुले आणि काही अत्यावश्यक कारणासाठी भारतात येण्यासाठी सुट दिली आहे.

तसेच भारतात बेजबाबदार लोकाची कमी नाही. चिंचवड़ मध्ये ताडी वाल्या च्या दुकानातुन संक्रमण चालु झाले आणि १३ मे ला पहिला रुग्ण महणुन ताडी विकणारी महिला होती. २५ ता पर्यन्त ८० लोकाना , आजच्या तारखेला १०७ लोकाना ह्या भागात करोना झाला आहे आणि नंबर वाढत आहे. चहाच्या टपर्या बंद आहेत पण दारुची दुकाने चालु आहेत!

https://www.esakal.com/pimpri-chinchwad/corona-patient-increase-day-day-...

https://www.esakal.com/pimpri-chinchwad/corona-infected-patients-found-a...

माझ्या पोस्टमधली तुम्हाला हवी ती वाक्य उचलून विपर्यास केल्याबद्दल धन्यवाद.

कोरोना परदेशातून आलेल्या लोकांनी पसरवला नाही तर परदेशातून आलेल्या बेजबाबदार लोकांनी पसरवला. भारताबाहेर कोरोनाचे इतके थैमान चालू असताना भारतात परत आल्यावर मुद्दाम स्क्रिनिंग चुकवणे, सोशल डिस्टनसिंग न पाळणे वगैरे करणाऱ्यांचे गुन्हे अक्षम्य आहेत. आणि बाहेरून परत आलेली जनता ही बहुतकरून सुशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडून जास्त जबाबदार वागणुकीची अपेक्षा होती. त्यामुळे सरसकट पीडा नाही म्हणणार पण त्यातले बेजबाबदार लोक पीडा नाहीतर किडा.. काहीही म्हटलं तरी कमीच.

काही दिवसांपूर्वी मी इथे अडकलेल्या मुबंईच्या टुरिस्टस बद्दल लिहिलं होतं. त्यांना 18 तारखेच्या फ्लाईटमध्ये जागा उपलब्ध झाली आहे! ते दिल्लीत जाऊन 7 दिवस विलगीकरणात रहातील मग तिथून मुंबईत जाऊन 7 दिवस घरीच विलगीकरणात रहातील.

हो .आमच्याही एक नातेवाईक बाई 17 मार्चला परत यूएस मध्ये जायच्या होत्या त्या अडकल्या होत्या. त्यांना 19 जूनच्या पहाटे (18 च्या मध्यरात्रीनंतर) मुंबई नुआर्क अशी थेट फ्लाईट मिळाली आहे. वंदे भारतमचा तिसऱ्या सत्रात.

मला किती दिवस इथे लिहायचं होतं पण राहिलच होतं. अतरंगी, तुम्ही ठीक आहात का?

आमचा एक फॅमिली फ्रेंड जो क्रूजवर काम करतो, एप्रिलमध्ये ते कोजूमलला होते मग मे मध्ये तो सुरूवातीला मायामीला क्रूजवर अडकला होता. मला वाटलं की हे विमानाने परत जातील. त्याने मला वाटतं मे च्या दुसर्या आठवड्यात
Way to India anthem of the seas
अशी अपडेट टाकली. पुढे दोनेक आठवड्यांनी ते जिब्राल्टरला होते. मग ग्रीसला आले तेव्हा Next port Mumbaiiiiiii असं तो म्हणाला. त्याची शेवटची पोस्ट Suez canal ... Way to India होती पण अजून मुक्कामी पोहोचल्याची पोस्ट नाही.
मी त्याला हा सर्व प्रवास , आता त्याला adventure म्हणावं का हा प्रश्नच आहे पण document करायला सांगितला आहे. नुकताच त्यांचा लग्नाचा पहिला वादि झालाय. ती देशात आणि हा पाण्यावर. आशा करते की ते सूखरूप मुक्कामी पोहोचावेत.

आमच्या इथे containment zone म्हणून seal केलेल्या बिल्डिंग मधून रहिवासी पोलीस राऊंडला यायच्या आधी गावभर फिरून येत आहेत. शेजारच्या बिल्डींगमधील रहिवाश्यांनी तक्रार केल्यावर त्यांच्यावर भडकताहेत. आता काय बोलायचे यांना?

घरी येण्याबाबत काही नवी बातमी मिळाली का?>>>>>

काल रात्री भारतात परतलो.

सुदैवाने मुंबईला वंदे भारतची जी पहिलीच फ्लाईट आली त्यातच नंबर लागला. Happy

Pages