परदेशात अडकलेले भारतीय

Submitted by अतरंगी on 11 April, 2020 - 14:46

महाराष्ट्रात लॉक डाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.

करोनाग्रस्त रुग्णांची वाढणारी संख्या पाहता केंद्र आणि बाकी राज्य सरकारे लवकरच असे निर्णय घेण्याची शक्यता आहे. करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी हे गरजेचे आहेच. कठोर पावले उचलल्याशिवाय हा आजार कंट्रोल मधे येणे अशक्यप्राय आहे.

या लॉक डाऊनमधे बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेमुळे माझ्यासारखे अनेक भारतीय परदेशात अडकलेले आहेत. मंध्यतरी दुबईतील विमानतळावर अडकलेल्या काही भारतीयांचे हाल वर्णन करणारी बातमी वाचनात आली. जवळ जवळ प्रत्येक देश दुसर्‍या देशात अडकलेल्या त्यांच्या नागरीकांसाठी विमानसेवा उपलब्ध करुन देत आहे. पण भारताकडून असे काही प्रयत्न होत असल्याचे ऐकिवात नाही.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी एका २० ते २५ दिवसांच्या कामासाठी कतार मधे आलो होतो. आधी ८ दिवस विमानतळे बंद ठेवण्याची घोषणा झाली तेव्हा आम्ही ३० तारखेच्या दरम्यान भारतात परतता येईल या आशेवर होतो. पण त्यानंतर अचानक २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली गेली. आता परत लॉक डाऊन वाढविण्यात येईल अशी चर्चा चालू आहे. आता हा लॉक डाउन कधी संपणार आणि त्यानंतर आम्ही home quarantine संपवून किंवा सरकारने ठरवून दिलेला under observation period संपवून घरी कधी पोचणार? हा फार मोठा प्रश्न आहे. ज्यांच्या घरी लहान मुले, वृद्ध पालक आहेत त्यांना तर स्वतःला लागण झालेली नाही, हे नक्की होई पर्यंत लगेच घरी जाणे सुद्धा शक्य नाही. बाहेर कुठेतरी राहणे किंवा हॉटेलवर काही दिवस काढून मग घरी जाणे असे करावे लागणार आहे.

हा सर्व विचार करुन जास्तच वैताग येत आहे.

माझ्यासारखेच माझ्या कंपनीचे अंदाजे १०० जण असेच अडकून पडले आहेत. ईकडून कतार एअरवेजची सेवा चालू होती पण भारतातील विमानतळे बंद झाल्यामुळे त्यांनी सेवा बंद केली आहे.

असे अनेक जण अनेक देशात वेगवेगळ्या कारणांनिमित्त अडकून पडले असायची शक्यता आहे. बरेच विमान सेवा चालू होण्याची वाट पहात आहेत. अशा सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास भारत सरकार कडून त्यांच्यासाठी काहीतरी सोय व्हायची शक्यता आहे.

आम्ही आमच्या कंपनी तर्फे भारतीय दुतावासाशी संपर्क केला आहे. अजून काय करता येईल याविषयी चर्चा चालू आहे. Ministry of External Affairs सोबत कसा संपर्क करता येईल, वृत्तपत्रांमधून लेख प्रकाशित करता येतील का? या बाबत प्रयत्नशील आहोत.

वेगवेगळ्या देशात अडकलेल्या नागरीकांना सोशल मीडियाचा वापर करुन एकत्र कसे आणता येईल याचा विचार करत आहोत. त्यासाठी काही कल्पना हव्या आहेत. काय करता येईल, कसे करता येईल, कोणी, कुठे असे प्रयत्न चालू केले आहेत का?

वेगवेगळ्या देशातील नागरीकांना संपर्क कसा करावा, भारतीय सरकारसोबत संपर्क कसा करावा, काय केल्याने भारत सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी विमानसेवा चालू करेल? शक्य तितक्या कल्पना सुचवा.

धन्यवाद

ता.कः- एक अपील होईल असा हॅशटॅग सुचवा. अस्तित्वात असल्यास सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे हाच सल्ला देणार आहे तिथे थांबा..
पण तुमची स्थितीही अवघड आहे. या काळात घरात थांबणे जिथे लोकांना जड जातेय तिथे घरापासून लांब आणखी अवघड आहे. त्यात परदेश असेल तर चिण्ता आणखी जास्त.

प्रवास करणे हे कमी धोकादायक नाही हे मत माझे बनले आहे.
रोजच्या बातम्या,मोठ मोठे संशोधक,स्वयं घोषित विद्वान ह्यांचे रोजचे विचार ऐकून घरातल्या घरात एका भागातून दुसऱ्या भागात जाताना सुद्धा corona chi भीती वाटते आहे.
तिथे हजारो किलोमीटर अंतर पार करून भारतात येणे आणि परत देशांतर्गत प्रवास करणे हे खूपच धोकादायक आहे.
आता फक्त एकच व्यक्ती धोक्याच्या छायें खाली आहे.
पण ती प्रवास करून घरी आली की त्या व्यक्तीचे कुटुंब,शेजारी सर्व danger zone madhae येतील

ज्येष्ठ नागरिकांना किंवा आजारी लोकांना मदत करण्यासाठी फेसबुकवर caremongers India म्हणुन काही स्वयंसेवी लोकांचा ग्रुप आहे. कोणाला काही मदत लागल्यास तेथे सांगू शकता. ग्रुपचे एवढेच म्हणणे आहे की pay forward the help you receive.

अरे बापरे अतरंगी, अवघड झालंय खरं. पण घरचे सुखरुप असतील, तुम्हीही आहात तिथे सुखरुप असाल तर प्रवास टाळावा. प्रोजेक्ट वाढले असे समजा. बेटर सेफ ( इव्हन ईफ बोअर्ड) दॅन सॉरी.

वत्सला, त्या अडकलेल्या जोडप्याचा अनुभव भयंकरच. तरीही निदान सुखरुप हॉटेलात राहु शकले.

हो सुनिधी! नक्कीच.
आत्ताच त्यांच्याशी बोलले. ते आता जरा स्वस्त अशा हॉटेलमध्ये shift झाले आहेत. 1 मे शिवाय त्यांना भारतात जाता येणार नाही असे वाटते आहे.... दरम्यान ऑस्ट्रेलियन सरकार पाकिस्तान मध्ये अडकलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिक/PR साठी विमानसेवा सुरू करणार आहे असे वाचले... त्याप्रमाणे भारतातही विमानसेवा दिली तर कदाचित या दांपत्याला भारतात जाता येईल....

भारतात कुठेही परत यायचे असेल तर एक वेळ चालेल पण मुंबईत यायचं असेल तर दहा वेळा विचार करावा. मुंबईत दर सात आठ गृहसंकुलांच्या आगेमागे अथवा सभोवार एक मोठी झोपडपट्टी असते. आताशा कित्येक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाले आहे पण दाटीवाटीने उभ्या केलेल्या बहुमजली इमारतींमुळे लोकसंख्येची घनता आणि बजबजपुरी अधिकच वाढली आहे. सद्यस्थितीत कोणीच सुरक्षित नाही.

गुन्हे नोंदवले च नाहीत तर गुन्हेगारी कमी होते त्याच प्रमाणे टेस्ट केल्याचं नाहीत तर बाधित लोकांची संख्या सुद्धा कमी होते.
त्या मुळे मुंबई मध्ये जास्त बाधित लोकांची संख्या दिसत आहे.
बाकी पूर्वेच्या राज्यात विलक्षण रित्या बाधित लोकांची संख्या कमी आहे.
ते सत्य आहे की भास हे समजायला मार्ग नाही.

वत्सला, वाचून अगदी त्या ट्रॅव्हल कंपनीचा राग आला. हे सगळे अगदी नजरेसमोर असताना त्यांनी तिकिट कॅन्सल करायला द्यायला हवी होती. इथे या मनस्तापाबद्दल sue तरी करता येईल कोर्टात. भारतात ते तरी करता येईल कि नाही काय माहित. दोघे लवकर सुखरुप त्यांच्या घरी पोहोचोत.

भारताने प्रतिबंधित उपाय खूप उत्तम रित्या केले आहेत.
प्रचंड लोकसंख्या आणि साधनांची कमतरता असून सुद्धा corona chi sath देशात मोठ्या प्रमाणात पसरून दिली नाही.
तीच अमेरिका श्रीमंत असून,साधनांची विपुलता असून पूर्ण पण कुचकामी ठरला आहे .
जगातील सर्वात जास्त बाधित लोकांची संख्या न्यूयॉर्क मध्ये आहे.
पुढे भयंकर परिस्थिती अमेरिकेत निर्माण होवू शकते.
प्रचंड व्यर्थ अभिमान आणि फाजील आत्मविश्वास त्यांना नडला आहे.
त्या मानाने चीन नी उत्तम पने हा प्रश्न हाताळला.
Austriliya,ब्रिटन,अमेरिका, इटली,फ्रान्स,सर्व अतिशय शहाणे देश जगा समोर मूर्ख ठरले.

अतरंगी.. तुमची परिस्थीती समजू शकते! .. काळ कठिण आहे!

मनोधैर्य आजिबात खचू देऊ नका! फक्त सुरक्षित रहा! सध्या तेच महत्वाचे आहे सगळ्यांसाठी!

माझ्या मैत्रिणीचे यजमानही असेच एकटे अडकले आहेत भारताबाहेर! सगळे कुटुंब इकडे! पण पर्याय नाही Sad

अतरंगी.. तुमची परिस्थीती समजू शकते! .. काळ कठिण आहे!

मनोधैर्य आजिबात खचू देऊ नका! फक्त सुरक्षित रहा! सध्या तेच महत्वाचे आहे सगळ्यांसाठी! +1

परदेशात अडकलेल्याना परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत अश्या अनधिकृत बातम्या आहेत.
सरकार सर्व बाजू तपासून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईलच.
आशा करूयात की आपण लवकरच घरी परतू शकाल .

परवा ईथल्या एका मित्राचे वडील वृद्धापकाळाने वारले. शेवटचे दर्शन पण बिचार्‍याच्या नशिबात नाही आले. त्यांच्या भावाने आणि कॉलेजमधील मुलाने अंत्यसंस्कार केले.

एका कलिगची बायको मागच्या आठवड्यात वारली. सुन्न होऊन बसलेला आहे. कोणाशी बोलत नाही. रुममधे स्वतःला कोंडून घेऊन बसला आहे.

Submitted by अतरंगी on 14 April, 2020 - 12:53>>
वाचून खूप वाईट वाटलं.
पण एक सांगू का, रागावू नका, पण अशा दुःखद बातम्या इथे लिहिल्या तर जे जे वाचक आपल्या आप्तेष्टांपासून दूर आहेत ( परदेशात स्थायिक झालेले, माझ्यासारखे महाराष्ट्राच्या बाहेर स्थायिक झालेले, ज्यांची मुलं-नातवंडं परगावी/परदेशी आहेत असे ज्येष्ठ वाचक, इत्यादी) त्यांच्या मनात आधीच असलेल्या anxiety मधे भर पडेल.
हल्ली आपल्याला (मध्यमवर्ग-उच्च मध्यमवर्गाला) सवय झालेली होती, हवं तिथे सहज जाऊ शकण्याची, हवी ती वस्तू बाजारात मिळण्याची. आता सध्याची परिस्थिती आपली पिढी तरी प्रथमच अनुभवते आहे. त्यामुळे आपण सगळेच थोडे अस्वस्थ, थोडे अगतिक आहोत.
घडणाऱ्या दुःखद घटनांना आपला इलाज नाही. पण अशी घटना आपल्या बाबतीत घडेल की काय अशा anxiety ने काहीच होणार नाही.
तुम्ही आहात तिथे स्वतःची आणि इतरांची काळजी घेत रहा

वावे,

हो. ते ही आहेच.

लॉक डाऊन वाढले या वैतागात येऊन दोन पोस्ट टाकल्या.

सद्य परिस्थितीत आपल्या हातात सकारात्मक आणि ईन डोअर राहणे सोडून काहीच नाही.

शांत राहा,
देवाचे नामस्मरण करा
सर्व काही चांगले होईल
स्वतः वर विश्वास ठेवा

अतरंगी, तुमचा पहिला प्रतिसाद मी वाचला होता, पण त्यावेळी काही लिहिणे शक्य नव्हते वेळेअभावी. पण खूप वाईट वाटले. लॉक डाउन वाढवल्यामुळे तुमची मनस्थिती काय झाली असावी हा विचारही करवत नाही. फक्त एक सांगेन काळजी घ्या अन नैराश्य येऊ देऊ नका. अगदी काही वाटले तर इकडे लिहू शकता. तुमच्या कुटुंबाशी वेळ मिळेल तसे बोलत रहा. त्यांनाही उभारी द्या अन त्यांच्याशी बोलून स्वतःलाही शक्य होईल तितके आंनदी ठेवायचा प्रयत्न करा.
तुम्ही वर लिहिलेल्या दोन्ही घटना दुर्दैवी आहेत. त्यामुळे अजून खचून जायला होते. पण आता यावर काही ईलाज नाहीचे. तरी शक्य होईल तितके काहीतरी सकारात्मक वाचायचा प्रयत्न करा. झाला तर थोडाफार फायदा नक्की होईल.
काळजी घ्या. अन सकारात्मक रहा.

VB + 1

सकारात्मक विचार महत्वाचे.... फोर्स्ड बॅचलर लाईफ मिळाली आहे काही दिवस... मेक मोस्ट ऑफ इट ...

अतरंगी,
वाईट वाटले वाचून. तुम्ही दूर असलात तरी कुटुंबियांच्या संपर्कात असालच. वर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे सकारात्मक रहाणे आणि एकमेकाला / आजूबाजूच्या गरजूंना धीर देणे / सांत्वन करणे , ते एकटे नाहीत हे पटवणे महत्वाचे आहे.
माझेही कुटुंब दूरवरच्या शहरांमध्ये एकएकटे विखुरलेले / अडकलेले आहे सद्या आणि थोडीफार वाणसामानाची चणचण/ खाण्यापिण्याची आबाळ सर्वत्र आहेच. रोज एकदा तरी व्हिडिओ काॅल करून आम्ही गप्पा मारतो, आहे त्या परिस्थितीवर विनोद करून एकमेकाचं मनोधैर्य कायम राहिल असं बघतो. सगळीकडेच अख्खे कुटुंब एका छपराखाली आहे अशी परिस्थिती नाही Happy

कालच मेक्सिको टीम कडून कळाले कि, Indian consulate ने मिटीन्ग घेतली कोणाला परत जाण्यासाठी मदत हवी आहे का म्हणून, स्पेशली तिकडच्या विद्यार्थ्याना

राजेंद्र देवी, VB, च्रप्स, चंद्रा सदिच्छांबद्दल आभार.

अथेना,

मेक्सिको मधील दुतावास पुढाकार घेतोय ही चांगली गोष्ट आहे.
आम्ही भारतीय दुतावासासोबत संपर्कात आहोत. पण अजून तरी काही झालेले नाही.

Nakki sare surlit hoil.Arthat तुम्हालाही हे माहीत आहेच.

Pages