खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमृता-अमित,
काय एकेक पदार्थ आहेत... सगळेच आवडतात...

मिनलजी, तो उभा कुकर आहे का?.....
Ho..puttu patra mhantat tyala

सगळ्याच गोष्टी अफलातून! मलापण झंपीसारखा प्रश्न पडलाय. इतके इनग्रिडीयन्टस् लाते कहासे हो. रसगुल्ले एकदम रसरशीत दिसतात. रेसीपी प्लिजच

सगळं खाऊ जे इथे पोस्ट होत आहेत ते घरात सहज उपलब्ध असणाऱ्या किराणा मालापासून केलेले दिसतात. मला असं वाटत नाही कोणी वेगळी काही shopping करून पदार्थ करत आहेत. भाज्या, दूध, दही इत्यादी गोष्टी भारतात मिळत आहेत. ब्रेड रोज मिळतोय. मंडळी डोकं वापरून करत आहेत, शोधून शोधून पदार्थ:)
आता BB वर हल्दीराम / बिस्किटं वगैरे आऊट of stock झालेत, त्यामुळे लवकरच दिवाळी items आणि cookies पण येतील असं वाटतयं.

मीनल, ओके.

Meenal puttu chhan distoy..kadhi khalla nahi..puttu n muddo donhi asech round astat na..

Dhanudi..amchyakade pan goregaon la biscuits pan nahi milat..pan baryach thikani society chya gatevar delivery milte...

श्रवु ,पुटृ हे असं पुटृ पात्रात किंवा नारळाच्या करवंटी मध्ये,पोकळ बांबू यात करता येत. आणि हा केरळमध्ये प्रामुख्याने खाल्ला जातो .आणि Muddo हे फणसाच्या पानात उकडून केलं जातं muddo मंगलोर साइडला खाल्ला जातो. दोन्ही च्या पाककृतीत बराचं फरक आहे

सगळं खाऊ जे इथे पोस्ट होत आहेत ते घरात सहज उपलब्ध असणाऱ्या किराणा मालापासून केलेले दिसतात. मला असं वाटत नाही कोणी वेगळी काही shopping करून पदार्थ करत आहेत. भाज्या, दूध, दही इत्यादी गोष्टी भारतात मिळत आहेत. ब्रेड रोज मिळतोय. मंडळी डोकं वापरून करत आहेत, शोधून शोधून पदार्थ Happy ~~ +१२३४५६

पुट्टु करी भारीच वाटतीये..पहिल्यांदा पाहिली..
Shraddha चिली पोटॉटो परवाच बनवला होता.. सही दिसतीये डिश..

चुनवडे म्हणजे चण्याच्या डाळीचे वडे का. चिली पोटॅटो पहिल्यांदा बघितले. तूनळीवर शोधते रेसीपी. चकली उचलून खावीशी वाटतेय. पुट्टू पात्र मस्त आहे. ते वर ताटात आहेत तेच पुट्टू का.

.

चंपा ,चूनवड्या म्हणजे चनाडाळीचे वडे नाहीत.विदर्भात चून म्हणजे बेसन.(कांदा+लसूण +अद्रक पेस्ट)+तिखट+हळद+ धणेपूड+जिरेपूड+मीठ या फोडणीत पाणी टाकायचे व उकळी येवू द्यायचे.बेसन घेवून त्यामध्ये वरील घटक पदार्थ टाकायचे व भज्यांसाठी पीठ बनवतो तसे बनवून घ्यावे व उकळी आलेल्या पाण्यात तेलात भजे सोडतो तसे सोडून द्यावेत. वड्या पाण्यावर तरंगायला लागल्या की चूनवड्या तयार.( यात खोबरे सुध्दा टाकतात ) याला पाटोड्यांचे सोपे व्हर्जन म्हणू शकता.

धन्यवाद सुर्यगंगा. तुम्ही तर रेसिपीच सांगून टाकलीत. अनेक आभार.
IMG-20200423-WA0012.jpg
परत केक. सगळं साहित्य घरात होतं पण खायला माणसं नव्हती. आता दोन भाचे आहेत तर प्रयोग करायला हुरूप आला आहे. कसाही झाला तरी वाया जाणार नाही याची खात्री आहे.

यम्मी दिसतोय केक, चंपा! मला अजिबात जमत नाही केक, मी कधीच नाही केला, खरं तर काल वाढदिवस होता लेकाचा. पण मग शेवयांची खिर, पनीर ची मिक्स भाजी पोळ्या असाच बेत केला.

Dhanudi..amchyakade pan goregaon la biscuits pan nahi milat..pan baryach thikani society chya gatevar delivery milte...>>>>>> हो समजू शकते

बाकी पदार्थ पण भारीच दिसताएत, चकली, चिली पोटॅटो तोंपासु आहेत. धिरडी, कलि्गडाची घावन करून बघणारे, पुट्टू बद्दल वाचलंय बरंच. मला रसगुल्लयांची रेसिपी हवी होती आधीच्या पानावर केले आहेत कोणीतरी

Pages