चीन शी व्यापार करावा की नाही ?

Submitted by नितीनचंद्र on 19 April, 2020 - 02:52

चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.

आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.

शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.

मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.

तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.

तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.

चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.

पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.

आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.

मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

भारत मधील माहित नाही
पण महाराष्ट्र मधील रस्त्यांची अवस्था bjp aani सेनेच्या राज्यातच सुधारली

पुणे मुंबई exp way,aani mumbai मधील पुल ही ठळक उदाहरणे.
गावातून सुध्दा चांगले रस्ते झाले bjp chya काळातच.
आणि वीज निर्मिती bjp chya काळातच वाढली.
लोड शेदिंग नष्ट झाले.
हे खरे आहे .

We don't have any other option!!!

@अज्ञातवासी
हे आपले मानसिक अवलंबित्व दर्शवते.आहे.

उद्या चीनने युद्ध सुरू केले तर आपण (भारताने) काय त्यांच्याकडे भीक मागायला जायचे का? अहो आमचे धंदे बुडत आहेत तुम्हला हवा तर अरुणाचल प्रदेश घ्या पण आम्हाला कच्चा माल द्या

ही वस्तुस्थिती होऊ शकते.

भारताने आपली अण्वस्त्र भारित अग्नी आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्रे अरुणाचल प्रदेशात तैनात केलेली आहेत ती काही दिवाळीसाठी वाजवायचे फटाके नाहीत.

अमेरिकेकडून आपण चिनी पाणबुडीविरुद्ध सर्वात अत्याधुनिक हारपून क्षेपणास्त्रे विकत घेतो आहे. ते उगाचच नव्हे. अगदी ताजी बातमी आहे.
https://www.google.com/amp/s/www.livemint.com/news/india/us-clears-sale-...

आपला अहं दुखावला आहे म्हणून अशी विधाने करीत आहात

क्षमस्व

मी निनाद बेडेकरांचे ते व्याख्यान यु-टुब वर ऐकले आहे. महाराजांनी असे का केले ह्याचीही माहीती त्यांनी तिथे सांगितली आहे. पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळी इंग्रजांनी सिद्दी जौहरला लांब पल्ल्याच्या तोफा देऊन मदत केली होती. परंतु इंग्रजांनी त्याआधी महाराजांशी अनाक्रमणाचा तह केला होता. परंतु पन्ह्याळ्याची एकंदरीत परिस्थिती व सिध्दी जौहरची एकुण व्यवस्था पाहता इंग्रजांना असे वाटले कि इथुन पुढे शिवपर्वाचा अस्त नक्कीच होणार त्यामूळे विश्वासघातली फिरंग्यांनी सिद्धीला साथ दिली. ह्याचे उट्टे महाराजांनी सूरतेला इंग्रजांची वखार लुटुन व ह्या प्रसंगात स्वतःच्या सोयीचा व्यवहार करुन काढले.

डॉ. खरे एक सांगू?
मुद्दाम मुद्दे भरकटत ठेवणं सोडा. तुमच्याकडे कुणी बी.कॉम मध्ये अर्थशास्त्र विषय घेतलेली व्यक्ती आहे का? जाऊदे, १० वीला अर्थशास्त्र शिकले असालच ना? आयात, निर्यात असा काही व्यापार असतो हे माहिती आहे ना?
लगेच इथे युद्ध सुरू झालं ते काय होईल, तिथे बॉम्ब पडला तर काय होईल, आम्हाला काही भीक लागली आहे का? अशी ट्याव ट्याव ट्याव करणं तरी बंद करा. टाळ्या खायला ही वाक्ये पुरेशी असतात. जर तरच्या मताला वर्तमानकाळात किंमत नसते.
आणि विरोधी मताला 'मानसिक अक्षमता' म्हणून हिणवण्याने कुणाचा अहंकार दुखावला आहे, हे लगेच कळतं.
जाऊदेत. मला माफ करा सर, तुमच्या विरोधी मत मांडले.
_/\_

आपल्याला इंग्रजी सुभाषिताच अर्थ समजत नसल्याने आपण स्वतःवर मानसिक व्यंगत्व ओढवून घेतले त्याला मी काय करणार?
You चा अर्थ श्री अज्ञातवासी असा नसून कुणीही असा होतो हे आपल्यास समजले नाही
यासाठीच मी क्षमस्व लिहिलेले होते.
त्यामुळे आपण माझ्या एकंदर क्षमता आणि ज्ञानावर घसरलात त्याला मी काय करणार?

अमेरिका चीनला घाबरते हे कुणी सांगितलं तुम्हाला?
https://www.google.com/amp/s/tfipost.com/2020/04/we-cannot-let-china-des...
हे युरोपीय देशांची स्थिती आहे.
https://www.google.com/amp/s/amp.theguardian.com/world/2020/apr/19/trump...
https://www.google.com/amp/s/www.theweek.in/news/world/2020/03/24/20-tri...
चिन विरुद्ध आंतर राष्ट्रीय न्यायालयात केस दाखल केली आहे.
https://www.ejiltalk.org/taking-china-to-the-international-court-of-just...

अती विनाशकारी हत्यार एका पेक्षा जास्त देशात अस्तित्वात आहेत.
त्यांना रोखण्याचे सामर्थ कोणत्याच देशात नाही.
अती विनाशकारी हत्यारांचा वापर जर कोणत्या देशाने भावनेच्या भरात येवून केला तर होनर्या विनाशापासून स्वतच्या देशाला वाचवणे कोणत्याच देशाला शक्य नाही.
आणि दीर्घ परिणाम जे होतील ते पृथ्वीला निर्मनुष्य करू शकतात.
त्या मुळे इथे संयम महत्वाचा आहे.
कोण कोणाला घाबरते हे महत्त्वाचे नाही.

माझ्याकडे चीनी बनाव टीची फोनशिवाय एकही वस्तू नाही या भ्रमात राहणार्‍यांना
१. इलेक्ट्रॉनिक गुड्सचे कम्पोनंन्ट्स, २. चारचाकी वाहनांचे भाग - अगदी टायरही ३. औषधांचे API चीनमधून येतात आणि यासाठी आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत या ची जाणीव करून देण्यासाठी त्या बातम्यांच्या लिंक्स दिल्या होत्या.

कोरोनामुळे सगळ्या एकंदरितच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा नव्याने विचार करायची गरज अख्ख्या जगाला वाटते आहे.
अमेरिकेने क्रूड ऑइल मध्ये स्वयंपूर्णता मिळवली तसंच काही होऊ शकेल. तसंही प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीज गेल्या एक दोन वर्षांत वाढतच आहेत.

आपण उत्पादन करण्यापेक्षा स्वस्त मिळतो म्हणून इम्पोर्ट करण्यात फायदा आहे, हा विचार बाजूला सारावा लागेल.

चीनने त्यांच्या इकॉनॉमीज ऑफ स्केल आणि डंपिंग पॉलिसीने भारतातले अनेक उद्योग गेल्या काही वर्षांत जवळपास मारून टाकले आहेत, हेही उघड आहे. त्यावर उपाय शोधण्याचे या निमित्ताने अधिक जोमाने प्रयत्न होतील.

चीनलाही जगाचा विश्वास पुन्हा मिळ वण्यासाठी पावले उचलावी लागतील कारण चीनी निर्यात बंद होणे त्यांनाही परवडणारे नाही. फक्त जागतिक महासत्ता होण्यासाठी नव्हे , तर त्यांच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे म्हणून.

काही गैरसमज --
माझ्या हातात असलेला फोन चीनी आहे.
त्याची केवळ जुळणी चीन मध्ये झाली आहे.
त्याचा प्रोसेसर स्नॅप ड्रॅगन 835, RAM, GPU, gorilla glass, oled panel हे सर्व अमेरिकन कंपनीचे मलेशिया मध्ये बनलेले आहे. बाकी सटर फटर भाग चीन मध्ये बनलेले आहेत.
त्याचे तंत्रज्ञान चिनी नाही

त्यावर असलेले गुगल आणि अँड्रॉइडचे सॉफ्टवेअर पण चिनी नाही. तेंव्हा ही जुळणी करणारा कारखाना भारतात हलवला तर थोडा महाग असेल पण भारतात जुळणी झालेला फोन मला वापरणे अशक्य नाही.
चीन जवळअशी कोणतीही क्रिटिकल टेक्नॉलॉजी नाही ज्या वाचून तुमचे अडेल.

मानसिक अवलंबित्व काढून टाका

<सध्या माझ्याकडे फक्त वापरात असलेला मोबाईल चिनी बनावटीचा आहे. बाकी बहुतेक गोष्टी टीव्ही फ्रीज म्युझिक सिस्टीम इ चिनी नाहीत.>
तुमचं मूळ वाक्य हे आहे. यातल्या 'बहुतेक' गो ष्टींतले कंपोनंट्स चीनी बनावटीचे असतात, हेच तुम्हाला सांगतोय. ती वस्तुस्थिती आहे.

मानसिक अवलंबित्व वगैरे जजमेंटल टर्म्स वापरू नका सांगण्यात अर्थ नाही. माझ्या पोस्टमधला अर्धाच भाग घेऊन पुन्हा लेबल लावायला उतावीळ झालात. मी आंतरराष्ट्रीय व्यापारा बद्दल जे लिहिलं ते वाचायचं टाळलंत.
असो. आणखी विशेषणं आणि पर्सनल कमेंट्स वाचायची इच्छा नाही, म्हणून थांबतोय.

अमेरिका असू नाहीतर चीन दोन्ही भारतासाठी धोकादायक च
त्या मध्ये डावे उजवे करता येणार नाही.
भारत स्वत स्वयंपूर्ण होणे ,बलवान होणे गरजेचे आहे.

हुआवेच्या आक्रमणाला अमेरिका(युएस) घाबरली असे माझे मत झाले. हुआवेला गूगल प्रॉडक्टस वापरण्यावर बंदी ( काही कारण दाखवून ) आणल्यावर त्यांनी नोकियाची सिंबिअन ४०/६० घेऊन काम सुरू केले. जर चाईनिज कंपन्यांनी गूगल अन्ड्राइडला टाळले तर मोठी गोची होऊ शकेल .
कांपोनंटस बनवतातच आणि नोकियाचे पडून राहिलेले पेटंटवाले सॉफ्टवेर लायसनने वापरू शकतील. नोकिया ती संधी अजिबात सोडणार नाही. सामान्य माणसास फोनच्या आतले काही कळत नाही. हवे असलेले काम त्यातून होते का नाही आणि किंमत महत्त्वाची. त्यावर आंब्याचे, खजुराचे किंवा खाल्लेल्या सफरचंदाच्या चित्र असो.

चूक वाटल्यास मत सांगा.

चूक वाटल्यास मत सांगा.
>>>>
टेकनिकल मध्येच लोचा आहे. हुआवेने ऑलरेडी hongmeng os वर शिफ्ट केले आहे, जी त्यांची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्यावर आता ते android सारखीच ओपन सोर्स ठेवण्यासाठी प्रयत्न करतायेत.
जर उद्या चिनी सरकारने नोटिफिकेशन काढलं, की सर्व चायनीज फोन कंपन्यांनी hongmeng वर शिफ्ट व्हाव, तर गुगल तोंडघशी पडेल. (आणि हे नक्की होईल.)
हुआवेचा स्वतःचा किरिन प्रोसेसर आहे, जो sd ला मस्त टक्कर देतो.
नोकिया आणि हुआवेचा काही संबंध असेल, असं वाटत नाही, आणि नोकियाशी कुणीही डील करणार नाही. कारण नोकियाच प्रीमियम खूप जास्त आहे.
They will prefer samsung to deal with!!!
सिंबियन किंवा त्यावर बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आता कुणीही वापरू शकता नाही. अँड्रॉइड इज वे अहेड. येस. KaiOs हा एक पर्याय!

Micromax ही chinese funded कंपनी आहे, भारतीय नाही. बहुतांश श्रीमंत देश त्यांच्या मूलभूत गरजांसाठी (सकाळी उठल्यावर toilet पेपर पासून ते जेवण-खाण प्रत्येक गोष्ट) जेवढे चीनवर अवलंबून आहेत तेवढे आपण नाही. सर्वसामान्य लोकांनी मनात आणलं तर आपल्याला चायनीज उत्पादनांशिवाय राहणे सहजशक्य आहे. आपण ग्राहक आहोत हे विसरता कामा नये. आपला पैसा खूप महत्त्वाचा आहे. एखादी गोष्ट चायनीज made दहा रुपयाची आणि भारतीय किंवा इतर आशियाई देशांत made 12 रु ची असेल तर आपण फक्त 2 रुपायनसाठी आपल्याला मारायचा प्रयन्त केलेल्या देशाचा फायदा करणार का? चायनीज खेळणी, दिव्याची माळ ह्यामधे फार काही profit मार्जिन नसतं मुख्य प्रॉफिट मार्जिन Tv, pc, phone अश्या hi-tech गोष्टींमध्ये असतं. आपण पुढच्या वेळेस अशी गोष्ट घरासाठी / business साठी विकत घेताना नॉन-chinese पर्यायांचा विचार करायला काय हरकत आहे. सगळ्यांनी फक्त आपल्यापुरता जरी विचार केला की माझ्या घरात स्वस्त म्हणून chinese उत्पादन नको. तरी पूर्ण 130 कोटी एकत्र आले की फरक पडेल.
काही प्रगत देशांनी already त्यांच्या मालाच्या production facilities चायनाबाहेर नेण्यासाठी stimulus जाहीर केलं आहे. बरेच देश त्याच मार्गावर आहेत. काय सांगा एखाद वर्षानी तुम्हाला हवा असलेला ग्रेट ब्रँड भाताततच production करत असेल.

आपण जे चायनीज म्हणून खातो ते काही चायनीज नसतं, सोया sauce आणि व्हिनेगर घातलेल्या गोष्टी भारतीय चवीसाठी बनवलेल्या असतात. मेनुकार्ड वर हॉटेल व्यावसायिक त्याला north-east Indian cuisine नाहीतर far east वर्ल्ड cuisine म्हणू शकतात. ज्या भारतात असलेल्या मोठं मोठ्या हॉटेल / चेन आहेत ज्यांच्या नावात चायना किंवा chinese संबंधित काही आहे त्यांना नाव बदलायला सांगायचं. किती छोट्या छोट्या गोष्टी खूप फरक पडेल.

चीन सोबत व्यापार करावा अथवा नाही या बाबत विचार करतांना भारताने काही अत्यावश्यक सामग्री चीन मधून आयात केली आहे. चीन सोबत व्यापाराला विरोध करणारे covid-19 टेस्ट किट, apron, मास्क साठी लागणारी जिन्नसे, व्हेंटिलेटर्स... चीन मधून आलेली असेल तर वापरतील का?

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/covid-19-c...

https://www.hindustantimes.com/india-news/covid-19-india-gets-650-000-te...

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/three-lakh...

मी-अनु आयडी ने वर काय उदाहरण दिले आहे ते apt आहे. काहीतरी सुरुवात करणं महत्त्वचे आहे आणि खारीचा वाटा पण महत्त्वाचा.

बाकी राहता राहीला प्रश्न chinese मेडिकल उत्पादनांचा ते काम नागरिकांचं नाही, हे काम सरकारचे आणि आत्ता सरकारने पूर्ण देशासाठी जो काही निर्णय घेतलाय तो मी पाळायला हवा. मला खात्री आहे की लवकरच ह्या सगळ्या गोष्टी पण नॉन-china made मिळतील.

ज्या कोणाकडे सध्या chinese वस्तू आहेत त्या इथे कोणीच फेकून द्या म्हणत नाही तर नवीन वस्तू विकत घेताना थोडा विचार करा. भारतीय किंवा नॉन-chinese quality पर्याय फक्त थोडे महाग आहेत म्हणून डावलू नका. भारतीय पर्याय तर महाग नसतीलच. आपण आपल्याला जमेल तेवढेच करू शकतो पण सगळ्यांनीच एकत्र आपापल्या ला जमेल तेवढे केले तर आपोआप देशाची वैचारीक बैठक बदलेल. सगळेच भारतीय जर made इन india अथवा not-made-in-china वस्तू विकत घ्यायला लागले तर आपोआप chinese वस्तूची मागणी संपेल आणि मग आयात करायची गरज नाही, चीनशी व्यापार करायची गरज नाही. मी एक रुपयाची जरी वस्तू विकत घेत असले तरी ग्राहक म्हणून माझा एक रुपया सुद्धा महत्त्वाचा आहे. तो एक रूपया चायना मालाला देणार नाही हे मी ठरवू शकते.

<<बाकी राहता राहीला प्रश्न chinese मेडिकल उत्पादनांचा ते काम नागरिकांचं नाही, हे काम सरकारचे आणि आत्ता सरकारने पूर्ण देशासाठी जो काही निर्णय घेतलाय तो मी पाळायला हवा. मला खात्री आहे की लवकरच ह्या सगळ्या गोष्टी पण नॉन-china made मिळतील. >>

----- हे काम सरकारचे आणि आत्ता सरकारने पूर्ण देशासाठी जो काही निर्णय घेतलाय तो मी पाळायला हवा असा सूर असेल तर विषयच सांपला...
जिवनावश्यक गोष्ट आहे आणि कुणीही नाकारणार नाही... आणि ते योग्य आहे.

<< तो एक रूपया चायना मालाला देणार नाही हे मी ठरवू शकते. >>
------- चायना माल आणायला सरकार परवानगी देते, त्यांच्या परवानगिनेच तो माल देशात येतो... मग सरकारने देशासाठी घेतलेल्या महत्वाच्या निर्णया विरुद्ध जाणे हे तुमच्याच वरिल विधानाशी विसंगत वाटते.

म्हणजे आज जिवनावश्यक अशा टेस्ट किटस, मेडिकल सप्लाईज "आज" चालतील पण नंतर आम्हाला चीनचा १ रुपयाचाही माल नको...

नवतालचे मजबूत कुलूप (रु. १२०) आणि तेव्हढेच मजबूत कुलूप चीन मधून आलेले (किंमत रु. ६०)... कुठला पर्याय स्विकारणार ? बहुतांश सामान्य जनांची पसंती रुपये ६० च्या वस्तूला मिळते आणि मला त्यांच्या कृत्याचे काही आश्चर्य वाटणार नाही.

Chinese माल लोकं खरेदी करतात म्हणून मागणी आहे म्हणून सरकार chinese माल आयातीला परवानगी देत असेल. लोकांनी chinese माल खरेदी बंद केली प्रत्यक्ष मार्केट किंवा इ-commerce तर आपोआप हे सगळं पुढचं चक्र बंद पडेल.
मी फक्त माझ्या हातात काय आहे तेच करु शकते. Chinese वस्तू न घेणे. बाकीची जबाबदारी माझी नाही.

नवतालचे मजबूत कुलूप (रु. १२०) आणि तेव्हढेच मजबूत कुलूप चीन मधून आलेले (किंमत रु. ६०)... कुठला पर्याय स्विकारणार ? --Made-in-China म्हणजे Quality असे म्हणणे आहे?! लोकं quality साठी chinese वस्तू घेतात?! ऐकावे ते नवलच!

<< मी फक्त माझ्या हातात काय आहे तेच करु शकते. Chinese वस्तू न घेणे. बाकीची जबाबदारी माझी नाही. >>

------ मान्य आहे...

covid-19 टेस्ट किट चायनाची आहे म्हणून "आज" टेस्ट नाकारणार नाही कारण आत्ता सरकारने पूर्ण देशासाठी तो निर्णय घेतला आहे आणि म्हणून तो पाळायचा. अशा प्रसंगात चीन मधे तयार झालेल्या वस्तूंचा लाभ उचलणे आपली नागरिक म्हणून जबबदारी बनते.

उद्या या संकटातून निवारण झाल्यावर, आपण चीन मधे तयार झालेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकू. लोक वस्तू खरेदी करणार नाही, आणि ते काय
इ-commerceचे चक्र बंद पडेल. छान अफलातून लॉजिक.

< Chinese माल लोकं खरेदी करतात म्हणून मागणी आहे म्हणून सरकार chinese माल आयातीला परवानगी देत असेल.<
WTO, FTA, RCEP यांबद्दल माहिती करून घ्यायची गरज आहे. कोरोनामुळे या सगळ्यांवरही परिणाम होईलच.

<< नवतालचे मजबूत कुलूप (रु. १२०) आणि तेव्हढेच मजबूत कुलूप चीन मधून आलेले (किंमत रु. ६०)... कुठला पर्याय स्विकारणार ? --Made-in-China म्हणजे Quality असे म्हणणे आहे?! लोकं quality साठी chinese वस्तू घेतात?! ऐकावे ते नवलच! >>

------- होय, निव्वळ आकारमान आणि त्या अनुशंघाने सामान्य माणसाला पटणारी मजबूती आणि म्हणून Quality... प्रत्येकाच्या Quality च्या व्याख्या वेगळ्या असणार ( हे नवल नसावे असे मानतो). customer is defining the quality of product and cost is part...

covid-19 टेस्ट किट चायनाची आहे म्हणून "आज" टेस्ट नाकारणार नाही कारण आत्ता सरकारने पूर्ण देशासाठी तो निर्णय घेतला आहे आणि म्हणून तो पाळायचा. अशा प्रसंगात चीन मधे तयार झालेल्या वस्तूंचा लाभ उचलणे आपली नागरिक म्हणून जबबदारी बनते. ---

असं नाही. माणूस आजारी पडला की कडू असलं तरी औषध खातो, दुखलं तरी इंजेक्शन घेतो, शरीराची चिरफाड होणार असते तरी आवश्यक म्हणून सर्जरी पण करुन घेतो. पण एकदा आजारातून उठला की healthy राहण्यासाठी तो परत औषधे, इंजेक्शने आणि सर्जरी करत नाही तर नीट चौरस आहार खाणे, व्यायाम/योगा करुन शरीर आणि प्रतिकारशक्ती सुधारणे, प्राणायामाने मनशक्ती वाढवणे असे परत आजारी पडू नये म्हणून प्रयत्न करतो.

थोडक्यात माणूस त्याची lifestyle बदलतो आणि प्रतिकारशक्ती वाढवतो. तेच करायचंय, आपली lifestyle बदलायची आहे, प्रतिकारशक्ती तयार / सुधार करायची आहे.

आपल्याला काय जमणार chinese products शी टक्कर घ्यायला असा negative विचार काढून टाकायचा प्रयत्न करायला हवा. Negative विचारांमुळे chinese products भविष्यात विकत घेण्याची negative कृती होऊ शकते. China शिवाय तरणोपाय नाही हे जर feeling मनांत असेल तर, आपण वैयक्तिक विचार करायचा आणि देशाची काळजी घ्यायला able आणि competant मंडळी आहेत.

@अज्ञातवासी, धन्यवाद.
>> नोकिया आणि हुआवेचा काही संबंध असेल, असं वाटत नाही, आणि नोकियाशी कुणीही डील करणार नाही. >>> मी ती बातमी दोन आठवड्यपूर्वी वाचली. शोधतो. एकूण हुआवेने ओएस बदलणे हे घाबरण्यासारखं आहेच.

लोक नेटवर प्राइस ट्यागनेच सर्च करतात ना? १२०/६० चा फरक हा पुरेसा आधार आहे. आणि आशावादी ,आदर्शवादी राहणे आणि व्यवहारी राहणे वेगळेच.

अर्थात कुणी कम्युनिस्ट चष्माच घातला असेल तर प्रश्नच संपला.>>
इथल्या बर्याच मंडळींचे डोळेच आहेत तसे, चष्मे घालायची गरज्च नाही.

Pages