खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गहू चिक

फोटो upload करण्याचा पहिला प्रयत्न...फोटो चुकून दोनदा upload झाला

ओल्या खोबऱ्याच्या तळलेल्या निवऱ्या.
उरलेल्या पिठाचे भटोरे केले होते अन सोबत छोले.

पण फोटो फक्त निवर्यांचा घेतला.

IMG_20200415_202431.jpg

daabeli, Paani Puri, Sev Puri.... Jabri disat aahet.
lite mode on:
@Ve Ma, kamit kami sugandh tari gheta yeyil ashi tari vyavastha kara Happy
lite mode off:

VB, फलाफल ही अरबी डिश आहे. फलाफल हे काबुली चण्यापासुन बनवतात आणी हमस चटणीसारखे असते. श्रेया मस्त केलेस, तुझी पाककृती पण लिही.
https://www.indianhealthyrecipes.com/falafel-recipe-chickpea-falafel/

करंज्या आणि समोसे कसले खुसखुशीत दिसतायत! दाबेली आणि इतर चाट आयटेम, हमस आणि फलाफल पण मस्त!
कढी आणि समोसे असे कॉम्बो पहिल्यांदाच बघितले.

सामोसे awesome. मला पण करायचे आहेत, बघूया कधी मूड लागतोय. काल दाबेली करायला फारच मेहनत झाली. आज उसळ-पोळी-आंबे-frozen fries.

दाबेली, शेवपुरी, करंजी मस्तच.
@अथेना धन्यवाद Happy

श्रेया फलाफल मस्त.. तुमची रेसिपी टाका.

@shraddha कढी सामोसो कातील फोटो, मला पण करु वाटलेत सामोसे.

@स्वाती धन्यवाद. Happy

मठरी रेसिपि
एक कप मैदा, दोन चमचे तीळ, दोन चमचे ओवा हातावर चोळून, 1 चमचा कलोंजी असेल तर, 1 दीड चमचा मीठ, 4 चमचे कडकडीत तेलाचे मोहन, असं सगळा घट्ट मळून घ्या. अर्धा तास ठेवा. अर्ध्या तासाने पुन्हा थोडा तेल लावून मळा.
या पिठाच्या दोन पोळ्या लाटून घ्या, एका एका पोळीला रोल करून बोट्या बनवून घ्या. 1 बोटी साधारण 1 पुरी साठी लागते तेव्हडी असेल. पुरी प्रमाणे लाटून मग दुमडून त्रिकोण करा. झालेला त्रिकोण थोडा दाबून वरून काट्या चमच्याने टोचून घ्या. तेल मध्यम आचेवर तापवून घ्या. मध्यम आचेवरच तळा.
(वरील फोटो पिवळा दिसतोय कारण मी खाऱ्या शंकरपाळी साठी पीठ मळला होता म्हणून हळद घातली होती, पारंपरिक मठरी/निमकी मध्ये हळद नसते!)

ShitalKrishna,
मठरीच्या पाकृसाठी खूप खूप धन्यवाद.

वाॉव.. सामोसे अॉसम...
करंज्या आणि समोसे कसले खुसखुशीत दिसतायत! दाबेली आणि इतर चाट आयटेम, हमस आणि फलाफल पण मस्त! ~~+ १२३४५६७
मठरी रेसिपि - बेस्ट.

क्रीम आँफ वेज सूप
साहित्य-
अमूल फ्रेश क्रीम
२ कप दूध
मिक्स हर्बस
चिली फ्लेक्स
ओरेगानो
सगळ्या भाज्या खूप बारीक चौकोनी चिरून :
लाल, पिवळी, हिरवी ढब्बू मिरची - प्रत्येकी अर्धी (मिरच्या आकारानुसार, सर्विंगनूसार)
मशरूम - ३/४
ब्रोकोली - ४/५ फ्लोरेट्स
कांदा - १ आणि
स्वीट कॉर्न - आवडीनुसार
बटर १ चमचा
१/२ चमचा मैदा.

बटरमधे थोडा मैदा व गार्लिक पावडर घालून परतावे. 
दूध घालून मिक्स करा आणि फ्रेश क्रीम टाका. उकळी आली की मिक्स हर्बस, चिली फ्लेक्स आणि ओरेगानो पावडर व भाज्या घालून ढवळून घ्या. अजून एक उकळी आली की कंन्सिसटन्सी बघा त्या नुसार क्रीम घाला.
मीठ चवीनुसार, पण हर्बस मधे असत तेव्हा लागत नाही.
आवडत असल्यास चीज पण घालू शकतो.

ऋ भाऊ खुश असतील , धाग्याने हजारी पार केली
>>>>>
हो पण खुश होऊन थांबायचे नाहीये..
तिथे मोदींनी लॉकडाऊन केलेल्या धाग्याचे २००० झाले.. राजकीय चर्चेसमोर खवय्ये मागे नाही राहिले पाहिजे. तर कंबर कसा, पदर खोचा, कॉलर वर करा आणि हातात चमचा झारी तवा काविलता जे सापडेल ते घेऊन दिवसाला दरडोई चार पक्वान फोटोसकट काढा Happy

@ आजचा मेनू आमच्याकडे आता ब्रेडपकोडा केलेला.. पण लोकं अशी तुटून पडली की छानसा फोटो काढायचा राहिला Sad
एवढा छान झालेला.. त्यामुळे फोटो न काढता आल्याचे दुख जास्तच झाले..

Pages