©राक्षसमंदिर - ५

Submitted by अज्ञातवासी on 12 April, 2020 - 06:48

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

प्रथम भाग -
https://www.maayboli.com/node/74084

द्वितीय भाग -
https://www.maayboli.com/node/74090#new

तृतीय भाग -
https://www.maayboli.com/node/74100

चतुर्थ भाग -
https://www.maayboli.com/node/74111

राक्षसमंदिराच्या आजूबाजूने पडक्या भिंतीच कुंपण एकेकाळी त्या मंदिराच्या भव्यतेची साक्ष देत होत्या. त्या कुंपणाच्या मधोमध आत जायला जागा होती.
दोघांनी आत प्रवेश केला.
तेवढ्यात सळसळत एक नाग त्यांच्यासमोर आला, व त्याने मल्लापावर झेप घेतली, मात्र अधिरराजाने तो नाग पकडला.
मल्लापा जागच्या जागी थिजून राहिला.
"मल्लराज, हे राक्षसमंदिर म्हणजे एका मायेने बनवलेल्या वास्तूचा उत्तम नमुना. मोहिनीअस्त्र विफल गेलं तरीही ठिकठिकाणी अशा योजना असतीलच."
एव्हाना त्या नागाने अधीराजाला विळखा घालायला सुरुवात केली, व तो त्याला चावण्याचा प्रयत्न करू लागला.
अधिरराजाने त्याचा तोंडात एक बोट दिले. तो नाग कडकडून अधिरराजाला चावला.
मात्र अधीरराज निश्चल होता.
मल्लपाच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त आश्चर्य पसरले.
"घाबरू नका मल्लराज. हा नाग निसर्गतः इथे निर्माण झालेला नाही, तो एका योजनेचा भाग म्हणून इथे निर्माण केलेला आहे. या सृष्टीत प्रत्येक जीविताच्या निर्माणाचा अधिकार ब्रह्मदेवाला आहे. त्याव्यतिरिक्त कुणी काही जीवित निर्माण करत असेल, तर तो फक्त आभास म्हणायचा."
अधिरराजाने त्याच्या तोंडातून बोट काढला. त्याच्या तोंडाच्या बाजूची वेटोळी आपल्या हाताभोवती बनवली. त्या नागाच्या शेपटीने आधीच त्याच्या दुसऱ्या हाताला विळखा घातला होता...
...आणि जोर लावून एखादा दोरा तोडावा तसाच त्याने नाग मधोमध तोडला...
मल्लापा पूर्णपणे भांबावून गेला. ते दृश्य बघून त्याची भीतीने गाळण उडाली.
...मात्र पुढच्याच क्षणी त्या नागाची राख झाली...
"मल्लराज, हे राक्षसमंदिर एका महान निर्मात्याने एका महान वस्तूच्या रक्षणासाठी बनवलंय, त्यामुळे इथे जे काही बघायला मिळेल, ते अपूर्व असेल."
दोघेही मंदिराच्या पायऱ्याजवळ आले. मल्लापाने पायरीवर पहिलं पाऊल ठेवलं, आणि दुसऱ्या पायरीवर दुसरं पाऊल ठेवलं पण त्याला पहिलं पाऊल उचलतात येईना...
"मल्लराज थांबा." अधिरराजाने आवाज दिला. त्याने एक विभूती काढून चहुबाजूला फेकली.
"विमुक्तास्त्र मल्लराज, चला."
मल्लापा पायऱ्या चढू लागला, व ते मंदिराच्या द्वारासमोर पोहोचले.
तिथे तीन दारे होती. प्रत्येक द्वारावर वेगवेगळी चिन्हे होती.
एका दारावर अतिशय विक्राळ असा राक्षस चितारला होता. दुसऱ्या दारावर विष्णूची प्रतिमा चितारली होती. तिसऱ्या दारावर एका सुंदर गर्भवती स्त्रीचं चित्र होतं.
"मल्लराज, काय निवडाल? काय तर्क चालतो."
मल्लापाने विचार केला, आणि म्हणाला.
"तिसरा दरवाजा."
"का मल्लराज?"
"कारण हे राक्षसमंदिर असलं, तरीही इथला राक्षस बाकीच्या राक्षसासारखा नाही. किंबहुना त्याला इतर राक्षसानी फसवल्यामुळे तो या कचाट्यात फसला, त्यामुळे पहिला दरवाजा नाही.
या मंदिराची उत्पत्ती शुक्राचार्यनी केली, ते विष्णूला मंदिराच्या मार्गावर स्थान देणं शक्य नाही, म्हणून दुसरा दरवाजाही नाही.
प्रत्येक मानवाला आपल्या गतकाळातील चांगल्या आठवणी सतावत असतात. त्यामुळे तो चित्ररूपाने त्यांना साठवून ठेवतो. हीच आठवण मित्राने कायम आपल्या मार्गावर कोरली असेल."
"जबरदस्त मल्लराज! तुमची बुद्धिमत्ता खरंच अगाध आहे, पण..."
अधिरराज पुढे झाला. त्याने विष्णूचे चित्र असलेला दरवाजा उघडला. त्याचबरोबर आजूबाजूच्या दोन्ही दरवाजांसमोर ज्वाळा उठल्या, व ते दरवाजे जळून खाक झाले.
"ज्या राक्षसांनी मित्राचा घात केला, त्यांच्या आकृतीला मित्र कधीही त्याच्या मंदिरात स्थान देणं शक्य नाही, हे तुम्ही बरोबर ओळखलंत."
"मात्र माणूस कटू आठवणी फक्त टाळायचं बघतो. स्त्रीरुपात असणारा गर्भ आज मित्राला छळतोय, हीच त्याची सगळ्यात कटू आठवण आहे, आणि या आठवणीला तो कदापि मंदिरात स्थान देणार नाही."
"मल्लराज, कधीकधी ज्ञानापेक्षा सत्यावर जास्त विश्वास ठेवावा लागतो. आणि सत्य हेच आहे की बळीमहाराजांपासून विष्णू प्रत्येक राक्षसमंदिराचा द्वारपाल म्हणून उभा आहे." अधिरराज हसत म्हणाला.
मल्लराज पूर्णपणे ओशाळला.
दोघांनीही आत प्रवेश केला. आत विशाल गर्भगृह होतं, आणि त्या गर्भगृहाच्या टोकाला एक भव्य द्वार होतं.
"माझ्या मते आता आपली परीक्षा संपली असेल अधिरराज."
"मल्लराज, शूर पुरुष जसं युद्ध संपलं तरी आपली शस्त्रे पाजून ठेवतात, तसं आपणही जागृत राहणं उत्तम."
"आता हेच बघा, या मंदिराची उत्तम रचना बघा. आपण सरळ त्या टोकाला जाऊन ते द्वार उघडू शकतो, पण ते इतकं सहजशक्य असेल?
आता आपल्या पायाखाली बघा, या आकृत्या अनेक राक्षसांच्या आहेत. त्या आकृत्या अशा एकसंध दगडात घडवलेल्या असल्या तरी अनेक आकृत्या घडवून कुशलतेने एकसंध वाटतील अशा जोडलेल्या आहेत.
यात एका बाजूला राक्षसांची चित्रे असून, दुसऱ्या बाजूला देवतांची चित्रे आहेत. आता आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय मल्लराज."
अधिरराज मल्लापाकडे वळला.
"तुम्ही देवमार्गाने जाणं पसंत कराल की राक्षसमार्गाने?"

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शूर पुरुष जसं युद्ध संपलं तरी आपली शस्त्रे पाजून पारजुन ठेवतात
असे हवे ना ?
--------
अधीरराज बाबत आता शंका येऊ लागलीय थोड़ी थोड़ी ... एवढ्या सफाइने मंदिरातील सर्व वावर आणि सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे नुसत्या आजोबांच्या ऐकिव कथा आणि ग्रंथसंदर्भ ह्यावरून अशक्य वाटते. म्हणजेच त्याची ही १लीच मंदिरफेरी नसावी बहुतेक !

भारी...
अधीर राज ला इतकं कसं माहिती? प्रश्न पडलाय.

कथेचा वेग बुलेट ट्रेन सारखा आहे . मायबोलीवर इतकी वेगवान कथा इतक्या पटापट भाग मी तरी पाहिले नाहीत .
परत परत सगळे भाग वाचतोय कुठे काही हिंट मिळते का याकरिता . अधीरराज काळा आहे यात काहीतरी हिंट असावी असे वाटत आहे .

अज्ञानराज - आता हे परत म्हणू नका कि अपने किरदार मे रहो Happy झाले असतील वाद एका धाग्यावर याचा अर्थ असा तर नाही ना प्रत्येक धाग्यावर त्याच भूमिकेत राहायला हवे .
उत्तम कलाकृती ला दाद उत्तम वाचक म्हणून देऊ दे की मला .

@ पाफा - धन्यवाद!
@निल्सन - धन्यवाद!
@ अजय चव्हाण - धन्यवाद!
@अज्ञानी - हे दोन्ही शब्द समान अर्थाने वापरता येऊ शकतात. 'परजून' आणि 'पाजून'. धन्यवाद!
@नौटंकी - धन्यवाद!
@धनुडी - धन्यवाद!
@पद्म - धन्यवाद!
@मामी - धन्यवाद!
@किल्ली - धन्यवाद!
@मी अनु - धन्यवाद! विदूषक ही जी एची सर्वोत्कृष्ट कथा असं माझं प्रांजळ मत आहे.
@कटप्पा - तुम्ही अज्ञानीना अज्ञानराज म्हणालात का? आणि आपलं भांडण झालेलं मलातरी आठवत नाही.
तुमचे रुन्मेष या आयडीने अपेक्षित असलेले प्रतिसाद कट्टपा या आयडीने यायला लागले, म्हणून मी तसं म्हटलो. Lol
कट्टपाचा वावर वेगळा आहे.
आणि....
सगळ्यात महत्वाचं...
ऐतिहासिक...
शेवटचा भाग पोस्ट केला आहे....