परदेशात अडकलेले भारतीय

Submitted by अतरंगी on 11 April, 2020 - 14:46

महाराष्ट्रात लॉक डाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.

करोनाग्रस्त रुग्णांची वाढणारी संख्या पाहता केंद्र आणि बाकी राज्य सरकारे लवकरच असे निर्णय घेण्याची शक्यता आहे. करोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी हे गरजेचे आहेच. कठोर पावले उचलल्याशिवाय हा आजार कंट्रोल मधे येणे अशक्यप्राय आहे.

या लॉक डाऊनमधे बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेमुळे माझ्यासारखे अनेक भारतीय परदेशात अडकलेले आहेत. मंध्यतरी दुबईतील विमानतळावर अडकलेल्या काही भारतीयांचे हाल वर्णन करणारी बातमी वाचनात आली. जवळ जवळ प्रत्येक देश दुसर्‍या देशात अडकलेल्या त्यांच्या नागरीकांसाठी विमानसेवा उपलब्ध करुन देत आहे. पण भारताकडून असे काही प्रयत्न होत असल्याचे ऐकिवात नाही.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी एका २० ते २५ दिवसांच्या कामासाठी कतार मधे आलो होतो. आधी ८ दिवस विमानतळे बंद ठेवण्याची घोषणा झाली तेव्हा आम्ही ३० तारखेच्या दरम्यान भारतात परतता येईल या आशेवर होतो. पण त्यानंतर अचानक २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली गेली. आता परत लॉक डाऊन वाढविण्यात येईल अशी चर्चा चालू आहे. आता हा लॉक डाउन कधी संपणार आणि त्यानंतर आम्ही home quarantine संपवून किंवा सरकारने ठरवून दिलेला under observation period संपवून घरी कधी पोचणार? हा फार मोठा प्रश्न आहे. ज्यांच्या घरी लहान मुले, वृद्ध पालक आहेत त्यांना तर स्वतःला लागण झालेली नाही, हे नक्की होई पर्यंत लगेच घरी जाणे सुद्धा शक्य नाही. बाहेर कुठेतरी राहणे किंवा हॉटेलवर काही दिवस काढून मग घरी जाणे असे करावे लागणार आहे.

हा सर्व विचार करुन जास्तच वैताग येत आहे.

माझ्यासारखेच माझ्या कंपनीचे अंदाजे १०० जण असेच अडकून पडले आहेत. ईकडून कतार एअरवेजची सेवा चालू होती पण भारतातील विमानतळे बंद झाल्यामुळे त्यांनी सेवा बंद केली आहे.

असे अनेक जण अनेक देशात वेगवेगळ्या कारणांनिमित्त अडकून पडले असायची शक्यता आहे. बरेच विमान सेवा चालू होण्याची वाट पहात आहेत. अशा सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास भारत सरकार कडून त्यांच्यासाठी काहीतरी सोय व्हायची शक्यता आहे.

आम्ही आमच्या कंपनी तर्फे भारतीय दुतावासाशी संपर्क केला आहे. अजून काय करता येईल याविषयी चर्चा चालू आहे. Ministry of External Affairs सोबत कसा संपर्क करता येईल, वृत्तपत्रांमधून लेख प्रकाशित करता येतील का? या बाबत प्रयत्नशील आहोत.

वेगवेगळ्या देशात अडकलेल्या नागरीकांना सोशल मीडियाचा वापर करुन एकत्र कसे आणता येईल याचा विचार करत आहोत. त्यासाठी काही कल्पना हव्या आहेत. काय करता येईल, कसे करता येईल, कोणी, कुठे असे प्रयत्न चालू केले आहेत का?

वेगवेगळ्या देशातील नागरीकांना संपर्क कसा करावा, भारतीय सरकारसोबत संपर्क कसा करावा, काय केल्याने भारत सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी विमानसेवा चालू करेल? शक्य तितक्या कल्पना सुचवा.

धन्यवाद

ता.कः- एक अपील होईल असा हॅशटॅग सुचवा. अस्तित्वात असल्यास सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिथे आहेत तिथे काळजी घ्या, मोबाइल सिम क्रेडिट कार्डने सुरु रहातात , त्यामुळे व्हाट्सप व्हिडिओ कॉल वगैरे करून कॉन्टेक्ट मध्ये रहा
हे प्रकरण लवकर संपेल असे वाटत नाही

कंपनीच्या कामासाठी आहात ना, मग ते काळजी घेतीलच तुमची, चिंता करू नका. भारतापेक्षा तुम्ही कतारमध्ये जास्त सुरक्षित आहात. लॉकडाऊन लवकर संपेल असे मलातरी वाटत नाही, त्यामुळे आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणे अधिक सोईस्कर पडेल.

धन्यवाद ब्लॅककॅट, च्रप्स, उपाशी बोका आणि बोकलत.

सगळे देश त्यांच्या नागरीकांसाठी प्रयत्न तरत आहेत, विमानसेवा देत आहेत. भारतीय सरकार अजूनही असा काही विचार नाही असेच म्हणत आहे.

MEA: Decision to bring Indians stranded abroad will be taken after reviewing COVID-19 situation: Govt - The Economic Times

https://m.economictimes.com/news/politics-and-nation/decision-to-bring-i...

मला एक कळत नाही, जगभरात सगळे देश सांगत आहेत की ही समस्या गंभीर आहे त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथेच राहा, तर मग प्रवास करण्याचा इतका अट्टाहास का करायचा?

इथे जिल्हा बंदी,गाव बंदी ,घर बंदी आहे तुम्ही घरी पोचावे म्हणून किती तरी नियम तोडावे लागतील जे करोडो लोक किती तरी दिवस पाळत आहे.
परत त्या मध्ये कोण्ही बाधित असेल तर परत देश संकटात सापडेल.
Lockdown ajun वाढवावे लागेल.

अतरंगी, काम संपल्यावर कुटुंबापासून दूर रहाणं अवघड असतं. त्यातही जेव्हा घरातल्या लोकांना अशा परिस्थितीत मदतीची गरज असते आणि तुम्ही idle असूनही काहीही करू शकत नाही, तेव्हा तर खूपच मानसिक ताण असणार. तुम्ही ज्या परिस्थितीत अडकला आहात त्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, पण prashant255 ची पोस्ट वाचल्यावर कळेल की तुम्ही आहात तिथेच थांबणं तुमच्या कुटुंबासाठी आणि देशासाठी खरोखर गरजेचं आहे.

आणि दुसरं एक कारण, तुम्ही परदेशातून आल्यावर लोक फार वैताग आणतात. Lol माझा नवरा युरोप आणि तिथून यूएस करून लॉक डाउनच्या जस्ट 2 दिवस आधी परत आला. तीन आठवडे एका बेडरूममध्ये किंचितही कन्सेशन न घेता एकटा राहिला. अगदी त्याचं जेवण सुद्धा बेडरूमच्या दारात ठेवलं जायचं. बाथरूम आणि टेरेस बेडरूमला attached आहे, त्यामुळे बाहेर यायचं काहीच कारण नव्हतं. पण तरीही सोसायटी ने मला वाळीत टाकलं होतं. मी दिसले की भयंकर प्राणी दिसल्यासारखे बघायचे. जर मी ही घरात कोंडून घेणं अपेक्षित असेल तर एसेनशिअल्स खरेदी कोण करणार? थोडक्यात काय तर आहे तिथेच मजेत रहा.

अरेरे, मीरा!
आमच्या सोसायटी मध्ये फॅमिली मधे एक मेंबर जरी सेल्फ quarantine असला तरी ते पूर्ण घर self quarantine measures अंतर्गत केलं होतं. सोसायटीनी covid taskforce केलाय. काही पदाधिकारी, काही स्वयंसेवक आहेत. ते सगळे government टास्कफोर्स ला attach आहेत. सेल्फ quarantine घरातल्या कोणाला बाहेर येणं allowed नव्हते. टास्कफोर्स members tyanna essentials आणून देणं, केर उचलणं, emergency हेल्प पुरविणे. रोज त्यांच्या contact मध्ये राहून symptoms आलेत का बघणं असं सगळं करत होते. पूर्ण सोसायटीला फ्लॅट number सांगितलं होता आणि त्यांच्या माईन दार बाहेर सेल्फ quarantine चा board होता. सगळ्या फॅमिलीज नी quarantine बाहेर आल्यावर सोसायटीचे heaetfelt आभार मानले. तीन का चार जण परदेशातून आले होते मार्च च्या पहिल्या आठवड्यात आणि आता दोन आठवडे कोणी सेल्फ quarantine नाहीये.
एका आजोबांना कारणाशिवाय सर्दी-खोकला असे symptoms होते तर ते पण सेल्फ quarantine होते. त्यांची मुलं इथे नाहीत, फक्त आजी-आजोबा. सोसायटी टास्कफोर्स नी पूर्ण मदत केली. गव्हर्नमेंट च्या सल्ल्याने त्यांच्यावर देखरेख चालली होती.
शिवाय सतत सरकार लोकांची यादी पण जाहीर करत होतं कोण-कोण self quarantine मध्ये आहे. नाव, गाव, फूल-फळ सगळं. Lockdown मुळे उत्साही लोकांना काही काम नव्हते त्यामुळे आपापल्या अपार्टमेंट मध्ये कोण आहे self qyarantine बघितल्यावर शेजारच्या अपार्टमेंट ची पण scrutiny Happy

सोसायटी मध्ये फॅमिली मधे एक मेंबर जरी सेल्फ quarantine असला तरी ते पूर्ण घर self quarantine measures अंतर्गत केलं होतं. >>>> जर घर मोठं असेल आणि ती व्यक्ती स्ट्रिक्टली एका रुममध्ये रहात असेल तर खर तर याची आवश्यकता आहे का? त्या व्यक्तीला कुटुंबाची काळजी असतेच की. त्याने 22 दिवसात एकदाही बाहेर पाऊल सुद्धा ठेवलं नाही. आम्ही एकमेकांशी कॉल किंवा व्हिडीओ चॅट वर बोलायचो. बाकी आम्ही संपर्क टाळण्यासाठी आणि योग्य काळजी घेण्यासाठी जे काही केलं तो एका स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

मीरा,
शक्य असल्यास इथे वेगळा धागा काढून शेअर कराचं.

जर घर मोठं असेल आणि ती व्यक्ती स्ट्रिक्टली एका रुममध्ये रहात असेल तर खर तर याची आवश्यकता आहे का? ---हो.
बाकीचे लोकं त्यामुळे निर्धास्त होते. मदतीला लोकं आहेत त्यामुळे quarantine वाल्यांचे पण काही अडले नाही.

मीरा Sad

परदेशात अडकलेल्या कितीतरी भारतीयांना लॉकडाउनच्या आधी स्पेशल विमाने पाठवून आणलं की परत. इराणमध्ये तर पुण्या चे तंत्रज्ञही गेले होते तिथल्या भारतीयांच्या टेस्ट्स करायला.
मग जगभरात भारत सरकारच परत आणायला काही करत नाही, असं कसं म्हणता येईल?

अतरंगी, आहात तिथेच रहाणे योग्य होईल.

राजसी,
तुमच्या सोसायटीने सगळे फार चांगल्या प्रकारे , योजनाबद्ध पद्ध्तीने हाताळले, कौतुक वाटते. मात्र बरेचदा असे काही प्लॅनिंग नसते. कुठल्याही प्रकारचा सपोर्ट न देता, एक मेंबर सेल्फ quarantine मधे आहे, कुटुंबीय योग्य ती काळजी घेत आहेत तरी वाळीत टाकल्यासारखे वागवणे होते.

मीरा, तुमचा अनुभव जरूर लिहा.

मुंबई मनपानेही अशा परदेशातून आलेल्या आणि घरी क्वारंटा इनम ध्ये असलेल्या लोकांची वॉर्डनिहाय यादी बनवली होती. मनपा आणि पोलिस त्यांचा फॉलो अप ठेवायचे. ही यादी संबंधित सोसायटीजच्या सेक्रेटरींना , नगरसेवकांनाही दिली जात असावी. आमच्या वॉर्डाची यादी व्हॉ ट्स अ‍ॅप्वर व्हायरल झाली होती.

हो तर, पुणे मनपा ने सुद्धा अशा नागरिकांची यादी मेंटेन केली होती. माझ्या नवऱ्याला कम्पनी HR आणि पुणे मनपा यांच्याकडून दर आठवड्याला (3 आठवडे), तब्येतीची चौकशी करायला कॉल्स येत होते. त्याच्या व्यतिरिक्त घरात अजून कोणी कुंटुंबीय आणि मदतनीस असतील तर त्यांचीही चौकशी होत होती. आम्ही तो घरी पोचल्याच्या दिवसापासून मेड आणि ड्रायव्हरला सुट्टी दिली होतीच.
नन्तर मनपाने सोसायटीमध्ये एक दिवसासाठी छोटासा बूथ ठेवला होता आणि प्रत्येक फ्लॅटमधून एक जणाने बूथवर जाऊन घरच्या माणसांची, त्यांच्या तब्येतीची आणि ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती देणे बंधनकारक होतं. माझा नवरा परत येऊन 3 आठवडे झाले होते, पण तो US हुन आला कळल्यावर मला सगळ्यांपेक्षा जास्तच लांब उभं राहायला लावलं. Happy

समाजाची वृत्ती अशा काळातच समजुन येते
मी आणि माझी पत्नी डॉक्टर आहोत हे पाहून आमच्या सोसायटीतील लोक चार हात लांब राहत होते आणि आमच्याकडे संशयानेच पाहत होते की आमच्यामुळे हा रोग आमच्या इमारतीत येईल का?

एका दीड शहाण्या सदस्याने मला तशी गर्भित धमकीपण दिली.

परंतु माझी समाजातील पत आणि मी ज्यांचे घर भाड्याने घेतलेले आहे ते मुंबई महापालिकेत बऱ्यापैकी पदावर आहेत यामुळे मला सहजासहजी हात लावणे त्यांना शक्य झाले नसते. या मुळे प्रकरण फार पुढे गेले नाही.
मधल्या काळात सोसायटीच्या काही समंजस सदस्यांना मी केवळ इमर्जन्सी सोनोग्राफी करतो. येथे बाळाची हालचाल होत नाही. रक्तस्त्राव होतो आहे पोटात प्रचंड दुखते आहे अशा रुग्णांचे काय करायचे? उद्या अशी परिस्थिती तुमच्या नातेवाईक आली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? शिवाय
माझी पत्नी फोनवरच बहुतांश सल्ला देते. ती दवाखान्यात जात नाही. अपघात जखम होणे इ साठी लागणारी शुश्रूषा मीच देतो असे हळूहळू सांगितल्यावर आता परिस्थिती बऱ्यापैकी निवळली आहे.शिवाय इथल्या आमदार आणि नगरसेवक यांच्यातर्फे सोसायटीत निर्जंतुकी करणाचे फवारे मारण्यात मी सोसायटीच्या सेक्रेटरीला मदतही केली.

परंतु आता नवीन घर तयार होईपर्यंत इथे राहणे भाग आहे म्हणून राहतो आहे.
पण सोसायटीत कुणाशी संपर्क ठेवावा अशी इच्छाच राहिलेली नाही.

अवघड आहे...

अलीकडे घडत असलेला प्रसंग:
एका ट्रॅव्हल कंपनीने 9 जणांची ऑस्ट्रेलिया ट्रीप organise करून दिली होती... त्या कंपनीने पैसे परत करायला नकार दिला... त्यामुळे ठरल्याप्रमाणे 11 मार्चला ते मुंबई हुन केन्स (Queensland) ला आले... मग सिडनीला गेले. सगळीकडे तो पर्यंत बरीच restrictions आली होती. फार काही एन्जॉय करता आले नाहीच आणि त्या ट्रॅव्हल कंपनीने काहीच तजवीज केली नाही... 20 ला मेलबर्न ला आले आणि अडकले.. त्या ट्रॅव्हल कंपनीने यांना वाऱ्यावर सोडले आहे अक्षरशः Indian consulate ने देखील मदत करण्यास असमर्थता दर्शवली. भारतातील लॉक down उठल्यावर काही तरी करता येईल असं म्हणाले. दरम्यान त्या 9 जणांपैकी 2 जण अमेरिकन (भारतीय) होते ते अमेरिकेत जाऊ शकले 4 जण गुजराती आहेत ते financially better आहेत so they are living in the city since then. This couple and one more person got affected as they couldn't afford accommodation so they were seeking help but now they have no other alternative than to stay at the hotel in the heart of Melbourne...
त्यांच्याबद्दल फेसबुकवर माहिती समजली आणि काही लोक त्यांना विनाशुल्क त्यांच्या घरी राहू देण्यास तयार होते पण इथलं लॉक डाऊन तोपर्यंत वाढलं होतं आणि घरात रहाणाऱ्या कुटुंबाशिवाय बाहेरून एकही जण आलेलं चालणार नव्हतं... नियम मोडणाऱ्या लोकांना बराच मोठा दंड आणि प्रसंगी कारावास अशी शिक्षा अजूनही आहे... बऱ्याच लोकांनी त्यांना आर्थिक मदत हवी आहे का असे विचारले... पण ते म्हणाले की सध्या नको.. आता 16 एप्रिल ला एअर इंडिया ची विमानसेवा सुरू होणार आहे तेव्हा ते परत जातील... एका रिटायर्ड जोडप्याला होणारा त्रास बघून वाईट वाटतेय.. आणि काही मदत करता येत नाही म्हणून जास्तच वाईट वाटले...

इतर दुःखद प्रसंग:

इथे स्थायिक झालेल्या दोन परिचितांच्या भारतातील घरात मागच्या 7-8 दिवसात दोन मृत्यू झाले.. एकांच्या मातोश्री गेल्या आणि दुसऱ्यांचे वडील गेले. भारतात जाणे शक्य नव्हतेच......

मी आणि माझी पत्नी डॉक्टर आहोत हे पाहून आमच्या सोसायटीतील लोक चार हात लांब राहत होते --- seriously! बंगलोरमध्ये तर डॉक्टर कॉम्प्लेक्स मधे राहत असला की लोकांची किती सोय होते. रहिवासी भरपूर कौतुक पण करतात अडीनडीला मदतीला पडला म्हणून. कित्येक वर्षे मुलाची paedi आमच्या सोसायटी मधे होती तर किती सोय होती आम्हाला. क्लिनिकमध्ये तासनतास घालवायची सवय मोडली होती. सोसायटीत खूप आजी-आजोबा एकेकटे राहतात. परवा एक 90दीच्या आजींना काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि lockdown. सोसायटी मधील डॉक्टर नी मदत केली आणि काम झालं. मला असं दिसतंय बंगलोरमध्ये सगळ्या सोसायतमधे लोक एकमेकांशी खूप चांगले वागतात. आता सध्या BB चे डिलीव्हरी slot एकाला मिळाली की ती सगळ्यांना msg करुन सांगते की पटकन ऑर्डर करा, स्लॉट open झालेत.

ते इतर वेळी

आता सिचुएशन वेगळी आहे
आमच्या एका स्टाफ लाही त्रास झाला, लॉक डाउन मध्ये अडकली होती, तर शेजारचे तिला जॉब ला येऊ देइनात
काशिबाशी एक दिवस आली
अन दुसरयाच दिवशी तिकडे करोनाची केस सापडली
मग लोकांची तोड़ें बंद झाली , ही गेली किंवा न गेली तरी व्हायचे ते होणारच , हे कळून चुकले

आमच्याकडे पण साने गुरुजी झिन्दाबाद सुरु आहे.

दवाखान्यातुन आले की आत येणार तर दारातली व बाथरूमची पायपोसणी बाजूला गोल सुरळी करून बंद केलेली असतात, डायरेक्ट फरशिवरुन चालत बाथरूम , आंघोळ करेस्तोवर फर्शी पुसून घेतात , मग पाइपोसनी सरळ होतात , मग ठेवा पाय

साने गुरुजींची आई , जमिनिची धूळ पायाला लागणार नाही ह्याची दक्षता घेत होती

आमच्यात आमच्या पायाची धूळ जमिनिला पाइपोसणीला लागणार नाही , ह्याची खबरदारी घ्यावी लागते

Proud

माझ्या मित्राची आई वडिलांच्या सोसायटीत एकटी राहते. त्यांचा एक मुलगा कॅनडा मध्ये आहे आणि दुसरा अमेरिकेत आहे. त्यांना मधुमेह आहे आणि दुर्दैवाने खुप गंभीर असा मूत्र मार्गाचा जंतुसंसर्ग झाला.
त्यांच्या सुरुवातीच्या तपासण्या होईपर्यंत लॉक डाऊन झाले. मग त्याच्यावर घरून उपचार करणे अशक्य झाले
कारण त्यांची घरी राहून शुश्रूषा कोण करणार ? शेवटी त्यांच्या मनाविरुद्धच त्यांना रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांच्या जेवणापासून सर्व सोय करता आली शिवाय वैद्यकीय तपासण्या आणि रक्तातील साखर नियंत्रण पण सोपे झाले. दिवसात दोन वेळेस (सकाळी आणि संध्याकाळी) माझी पत्नी मित्राशी आणि त्याच्या भावाशी तासभर रोजचा अहवाल देणे म्हणून फोनवर बोलत असे. शिवाय रोज सकाळ संध्याकाळ फोन होण्यापूर्वी त्यांना उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून माहिती घेत असे. आम्ही त्यांना रुग्णालयात एकदाच भेटायला गेलो कारण चुकून सुद्धा त्यांना कोव्हिडचा संसर्ग होऊ नये अशी इच्छा होती.
सुदैवाने 5 दिवसांनी त्या घरी आल्या. परंतु आजही त्यांच्या दोन्ही मुलांना इच्छा असून इथे येणें शक्य नाही.
आईला तिकडची थंडी अजिबात मानवत नाही त्यामुळे त्या तिथे कायमचे स्थायिक होण्यास तयार नाहीत. तिथल्या उन्हाळ्यात एक दोन महिने राहून परतच येतात.

तिकडे असणाऱ्या परदेशस्थ भारतीयांची स्थिती सुद्धा आजारी नसतानाही अडकल्यासारखी झालेली आहे.

आजमितीला असे अनेक वरिष्ठ नागरिक एकटे राहतात त्यांची काळजी कोण घेईल ही चिंता वाटते.

दोन्ही मुळे परदेशात काम करत आहेत.
आई वडिलांची सेवा करायला नोकर ठेवू शकतील एवढी त्यांची ताकत नक्कीच आहे.
जातील महिन्याला ३० हजार रुपये.

लॉक डाऊन होण्यापूर्वी त्यांच्या कडे काम करणाऱ्या सेविका होत्या परंतु लॉक डाऊन झाल्यावर लोकल बंद झाल्याने त्या सेविकांना येणे अशक्य झाले.
येथे मुलांना किंवा त्या बाईंना पैसे वाचवण्याची गरज नाही. त्या बाईंचे यजमान गेले असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. आणि ती सर्व मंडळी दिलदार आहेत, कृपण नाहीत.

Pages