कोरोनामुळे झालेली सक्तीची स्थानबध्दता/वानप्रस्थ किंवा सब्बॅटिकलचे भविष्यकालीन परिणाम…

Submitted by अ'निरु'द्ध on 28 March, 2020 - 00:13

कोरोनामुळे झालेली सक्तीची स्थानबध्दता/वानप्रस्थ किंवा सब्बॅटिकलचे भविष्यकालीन परिणाम…

मित्रांनो,
रविवारचा एक दिवसाचा लाॅकडाऊन बऱ्याच जणांनी एंजाॅय केला..
कडकडीत लाॅकडाऊन मुळे अनुभवलेली शांतता, पक्षांचे आवाज याबाबत बरेच जण सोशल माध्यमांवरतीही भरभरुन व्यक्त झाले.

पण त्यानंतर जाहीर केलेल्या तीन आठवड्याच्या सक्तीच्या लाॅकडाऊनचे मात्र लोकांच्या मनावर वेगवेगळे परिणाम झाले.
जीवनावश्यक वस्तूंची चिंता, वाणसामानाची चिंता, नोकरीधंद्यातल्या टारगेट्सची, जबाबदारीची चिंता, फक्त घरातच दिवस कसे काढायची याची चिंता… हे सगळं कोरोनावरच्या अन्य धाग्यांवर आलेलं आहे..

तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जुन्या छंदाची आळवणी सुरु केली असेल.. असलेल्या छंदाला जास्त वेळ द्यायला लागला असाल.. (तसं असेल तर इथे नक्की द्या)

मात्र लाॅकडाऊनचे काही दिवस झाल्यावर कदाचित काही जणांना ही शांतता, हे अव्यग्र असणं आता आवडू लागलं असेल..

कदाचित काही जणांना याची आधीपासूनच आस असेल पण इच्छा असूनही ते शक्य झालं नसेल…
आणि काही जणांना गेल्या काही वर्षांत भयानक वेगाने वाढलेल्या कार्यव्यग्रतेच्या दुष्टचक्रात हा विचार करायलाही उसंत मिळालेली नसेल..
मी नेहमी विचार करतो (कदाचित चुकीचाही असेल) की बँकेतली एक मोठी जबाबदारी सांभाळणारा एखादा कॅशियर जेव्हा सुट्टी घेऊन फिरायला जातो तेव्हा त्याच्यावर बँकेच्या कामाची, कॅशची अशी कोणतीही जबाबदारी नसते.. तो त्याची सुट्टी, आऊटींग पुर्णपणे एंजाॅय करु शकतो…

पण स्वतःचा व्यवसाय असणारे, सल्लागार/कन्सल्टंट म्हणून काम करणारे, काॅर्पोरेट मधे कामाला असणारे किंवा अधिकारपदावरचे लोकं, (हल्ली बहुतांश सरकारी कर्मचारी आणि कदाचित शिक्षकही यातच आले) आणि लहानमोठे आंत्रप्रुनर हे जरी सुट्टीवर गेले तरी स्पर्धात्मक वातावरण म्हणा, परिस्थितीचा रेटा म्हणा किंवा जबाबदारीचं पद म्हणा.. त्यांना कामापासून असं १०० टक्के मुक्त रहाणं, अलिप्त रहाणं शक्य होत नाही… आणि मग ती सुट्टीही पुर्णांशाने सुट्टी रहात नाही.

पण ह्या लाॅकडाऊन मधे डाॅक्टर्स, पोलिस आणि काही व्यवसाय सोडता तसंच आत्ताही "वर्क फ्राॅम होम" करणारे वगळता (यात हातावर पोट असलेले, रोजंदारीवर काम करणारे गृहीत धरलेले नाहीत) अन्य लोकं त्यांच्या कामाच्या जबाबदारीतून पुर्णांशाने मुक्त होते/आहेत..

आणि त्यांना हे पूर्णपणे मोकळं असण्याची, Unwinding होऊ लागल्याची सुखद जाणीवही व्हायला लागली असेल..

आमच्या वरच्याच मजल्यावर एक पंचेचाळीशीतले चार्टर्ड अकाउंटंट रहातात. अधूनमधून बाल्कनीत बसून जुनी फिल्मी गाणी, भावगीतं गात असायचे. आमच्या बाल्कनीत त्यांचा आवाज पोहोचतो. त्यांचा आवाजही छान, सुरेल आहे.
हल्ली मात्र दिवसातून तीन वेळा तरी त्यांच्या गाण्याचा आनंद मिळतो. आणि सध्याच्या या शांततेमुळे आवाज जास्तच सुस्पष्ट येतो.. जास्त वेळही गातात आणि जास्त तल्लीनतेनेही..
साहजिकच मजाही जास्त येते..
त्यांना गाणं आवडतंय हे सांगायला, काँम्प्लिमेंट द्यायला फोन केला होता.. खूप आनंदात होते.
म्हणाले - अहो गाणं हे माझं पॅशन. अजून जास्त गायचं होतं, जास्त शिकायचं होतं.. पण कामाच्या धबडग्यात कधी जमलंच नाही.. आणि हे असं विमुक्तपणे तर नाहीच नाही..
आपल्या इथे जवळच एक गाणं शिकवणारे बुवा आहेत. गेली दोन वर्ष जायचं जायचं म्हणतोय.. पण जमलंच नाही.. आता मात्र लाॅकडाऊन संपला की आधी त्यांच्याकडे शिकायला जाणार आहे..
आणि माझ्या कामाचे तास खरं तर एखादा आख्खा दिवस कमी करणार आहे.. माझे यंग पार्टनर्स, असोसिएट्स बघतील काय ते..

थोडक्यात जशी वाघाला रक्ताची चटक लागते तशी ह्या सब्बॅटिकलची लोकांना सवय लागायला लागलीय..

माझ्या ओळखीतल्या ज्यांना ज्यांना काही छंद आहेत त्यापैकी कोणीच कुरकुरत नाहीये.
कसलाच छंद नसलेले आणि एरवी फक्त काम एके काम करणारेच ह्या लाॅकडाऊन मुळे जास्त त्रासलेयत..
कारण सध्या त्यांना करायला काहीच काम नाही. आणि छंदात गुंतून राहतील अशी त्यांची जडणघडणच नाही.

परदेशात दोन, तीन वर्ष काम करुन पैसे साठवायचे आणि मग एखादी मोठी सुट्टी घेऊन किंवा असलेला जाॅबही सोडून काही दिवस आयुष्य मनाप्रमाणे जगण्याचा ट्रेंड आहे.
अर्थात तिथली लाईफस्टाईल वेगळी आणि तिथल्या लोकांमधे हे असं जगणाऱ्यांची लाईफस्टाईल/त्याचे निकष हे अजूनच वेगळे...

पण आपल्याकडे ज्या लोकांनी उर्वरित आयुष्यासाठी पुरेसे पैसे कमावलेले आहेत आणि गरज नसताना अतिरेकी कार्यमग्न आयुष्य घालवताहेत अशा लोकांना (कदाचित खूप कमीही असतील But Not Negligible..) ही अव्यग्रतेची चटक लागली म्हणा किंवा गोडी कळली म्हणा.. असे लोकं ह्या अनुभवानंतर कदाचित पुर्णपणे किंवा अंशतः निवृत व्हायचा विचार करतील किंवा असलेल्या छंदासाठी कामातून जास्त वेळ काढतील…
एखाद्या व्यक्तीकडे फार काही पैसे नसतीलही परंतु कदाचित कमी गरजा असलेलं आयुष्य निवडून कामाचा अतिरिक्त ताण टाळण्याचा आणि ही अव्यग्रतेमधली मजा घेण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करेल..

तर मायबोलीकरांचे यावर काय विचार आहेत हे जाणून घ्यायला, तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्यांचे अनुभव इथे वाचायला आवडतील ..

की बाँबस्फोटानंतरही मुंबई दुसऱ्या दिवशी काही झालंच नाही अशा तऱ्हेने कामाला लागते तसंच कोरोना नंतरही होणार….???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा अनुभव,

मी काम एके काम वाला. वर्षातून दोन वेळा सप्ताहांताला जोडून २-३ दिवस सुट्टी घेऊन फॅमिली ला वेळ देणारा.

खुप दिवसांपासून एक ब्रेक घेण्याची इच्छा होती फक्त स्वतःसाठी. सुदैवाने ही संधी मिळाली आहे. एन्जाॅय करतो आहे. पण कामातील व्यग्रता कमी करणार हे नक्की.

आम्हा IT वाल्यांना काही फरक पडलाच नाही. जे काम डेस्क वर बसून करायचं ते घरी करावं लागतंय.
Wfh असलं की जास्त जबाबदारीने काम करावं लागतं. बॉस ला वाटू शकतं ह्याचं काम slow चालूये कारण हा घरी tp करत बसलाय. प्रत्यक्षात तसं नसतं.
Vpn, internet speed आणि बररेच issues येतात

आयटी कंपन्या टाइम ट्रॅकिंग आणि स्क्रीनशॉट मॉनिटरसारखी सॉफ्टवेअर्स वापरून घरून काम करणार्‍यांवर नजर ठेवुन आहेत असं वाचलं.

आम्हा IT वाल्यांना काही फरक पडलाच नाही. जे काम डेस्क वर बसून करायचं ते घरी करावं लागतंय.
Wfh असलं की जास्त जबाबदारीने काम करावं लागतं>>>>>>

सहमत.

आयटी कंपन्या टाइम ट्रॅकिंग आणि स्क्रीनशॉट मॉनिटरसारखी सॉफ्टवेअर्स वापरून घरून काम करणार्‍यांवर नजर ठेवुन आहेत असं वाचलं>>>>>

आमच्या लपटॉपमध्ये माय बडी गेल्या वर्षीच घातले गेले. किती तास कुठल्या स्क्रीनवर (exel, sap, outlook etc) काम केले, किती तास एकाच स्क्रीनवर खोळंबले, किती तास लॅपटॉपपासून दूर राहिले वगैरे सगळं डेटा आम्हाला दिसतो. फक्त याचा उपयोग करून हंटर उचलायला अजून सुरवात झालेली नाहीय. पण सॉफ्टवेअर आहे म्हणजे काहीतरी विचारही केलेला असणारच.

मायबोली ऑफिसात बॅन आहे, ही सोशल मीडिया साईट आहे असे त्यांच्या सॉफ्टवेअरने रिपोर्ट केले Happy Happy नाहीतर माझा मायबोली वेळही कळला असता.

छान धागा, आवडला.

मी गेला आठवडाभर घरून का होईना पण कामातच असल्यामुळे अजून छंद वगैरे पर्यंत पोचले नाही.

पण महत्वाचा बदल म्हणजे आधी बाई एकदा येऊन पूर्व दिवसाचा सैपाक करायची. मी दिवसात दोन किंवा तीन वेळा ते एकदा शिजवलेले अन्न खायचे.

आता मात्र दोन्ही वेळेस ताजे अन्न खातेय. 'दीर्घायुष्याची रहस्ये' मध्ये जेवताना मांडी घालून व जेवल्यावर वज्रसनात बसा असे वाचले होते. पण ऑफिसात खुर्ची व रात्री घरी आल्यावर सोफा हे आसन होते. आता मात्र मांडी व वज्रासन दोन्ही करतेय. दोन्हीही जमत नाहीयेत, शरीर कडक झालेय. पण 21 दिवसात पडेल फरक Happy Happy

माझ्या मते कोणतीही गोष्ट सक्तीने करायला लागली तर त्यात मजा रहात नाही. रोजच्या कामापासून दूर राहून छंद जोपासणे हे त्यातच येइल ! आणि छंद घरात बसून जोपासण्यासारखे असतील तर ते शक्य आहेत . पण ज्याचे स्वप्न जगप्रवासाचे आहे , सायक्लिंग करायचे आहे , किंवा मित्रांमधे गप्पांचे फड जमवण्याचे आहे त्याच्या साठी या सु ट्टीचा काही उपयोग नाही ना !

मी पूर्वी तीनेक वर्षे वफह केलंय, इथेही आठवड्यातून एक दिवस करतेय आणि आता रोजच. फरक हा की आता सगळेच घरात आले आहेत. शिवाय माझं काम दुसर्याकडून काम करून घेणे हे आहे त्यामुळे तो भाग प्रत्यक्ष कामाच्या जागी असलं तर पटकन होतो तो घरून दुनियाभरचे काॅन्फ काॅल करावे लागले की कामाचा पसाराच जास्त असं वाटतं त्यामुळे इकडे तिकडे मोकळा वेळ आहे म्हणून “वेका”पणा करणारे लोकं पाहिले की मला आश्चर्य वाटतं. तर ते असो.
आम्हाला तसंही काम करण्यासाठी घरी मदतनीस वगैरे इतरवेळीही नसतात त्यामुळे ते वाढीव आहे असं म्हणणार नाही पण काय पंधरा दिवसांनी एकदा सफाई करून जायची तिला बोलावता येईल का याची अजून कल्पना नाही म्हणून जरा हातासरशी कामं वेगळी करायची एक स्कीम राबवतेय. मुलांना स्क्रीन टाइम अर्नकरण्ासाठी टेबल पुसणे, डीश वाॅशर रिकामी करणे असे छोटे चोअर्स देतो. जेवणॅ दोन वेळा वेगळी करायची झाली तर कुठचंतरी एक सिंपल सॅंडवीच टाइप करून वेळ आणि श्रम वाचवते. जीम बंद आणि प्रवासाचा वाचलेला दीड पावणे दोन तास हाच काय तो जादा टाइम पण त्या बदल्यात मुलांना ब्रेकमधला वेळ द्यायचा प्रयत्न करते मग संध्याकाळी एकत्र वाॅक. मी माॅर्निंग पर्सन आहे त्यामुळे माझं माझं हापिस काम लवकर सकाळी सुरू करून चार पर्यंत रिकामं व्हायचा प्रयत्न असतो.
इथे भारतासारखा लाॅक डाऊन नाही अजून पण सोशल डिस्टंसिंग नाॅर्म्स आहेत.
मला बरेच दिवस दुपारी भरपेट (किंवा आपलं मराठी साधं पण ताजं जेवण) आणि रात्री हलका आहार असं करायचं होतं. मागचा आठवडा योग्य नियोजन करून ते करता आलं. आय एफ बोंबलंय पण कॅलरीज आटोक्यात ठेवता आल्या. छंद म्हणजे नवं काहीतरी करायचं म्हणून एक रंगवण्यासाठी एक पुस्तक घेतलं होतं ते संध्याकाळी लवकर जेवणं करता आल्यामुळे निदान अर्धातास सलग रॅगवता आलं मजा येते हे करायला हे कळलं. मी शाळेपासून ढ आहे. या कामाच म्हणून काय म्हणतात ते कौतुक वाटलं Wink
विकेंडला आता मुलांच्या ॲक्टिविटीजची गडबडनाहीं. सो खरा मोकळा वेळ मिळेल तेव्हा अजून काही गोष्टी डोक्यात आहेत त्या करेन. मला मुळात आवडीच्यावाटणार्ागोष्टी या बाहेर जाऊन करता येण्याच्या असल्यामुळे हे घरात बसून वैताग येऊ शकेल. नशीब आम्ही वाॅकला जाऊ शकतो पण हवामान रोजच साथ देत नाही. बघुया.
अजून मुलांच्या आॅनलाईन शाळा सुरू व्हायच्या आहेत पण काही ॲक्टिवीटीज आॅनलाईन येतील मग कुणी झुम मिटिंग, कुणी अजून काहीतरी, हा नवा नाच, त्याचे पेरेंट्स अकौंट आणि मुख्य ते मुलांकडून वेळच्या वेळी करून घेणे म्हणजे रात्र थोडी सोंगं फार अशी गत होणार आहे. अर्र उगाच लिहिलं इथे असं झालंय.
मला वाटतं इथे अपेक्षित उत्तरातलॅ सर्वात चूक उत्तर हेच असेल. Happy

वेका हरकत नाही. तुम्ही तुमचे प्रश्र्न फार सुसंबद्ध लिहून काढले आहेत.
त्याची उत्तरेही लवकरच शोधाल. शुभेच्छा

इतके दिवस फक्त प्राणी पिंजर्यात राहात होते, आता मनुष्यपण राहायला लागला. हाच काय तो फरक. मला तर हा आयुष्याचा कमी झालेला वेग खूपच आवडला आहे. पक्षांचे आवाज ऐकू येत आहेत, बॅकग्राउंडमधला व्हाइट नॉइज आणि कलकलाट कमी झाला आहे, छंद जोपासायला वेळ मिळू लागला आहे, मित्र आणि नातेवाईक यांच्याशी बोलणे होत आहे, अश्या अनेक चांगल्या गोष्टी वाटत आहेत.पण त्याचबरोबर हातावर पोट असणार्यांचे किती हाल होत आहेत, ते पण जाणवत आहे. निवृत्त झाल्यानंतर माझा वेळ वाचन, बागकाम, ऑनलाइन शिक्षण, व्यायाम, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग शिकणे, संगीत आणि वाद्य वाजवायला शिकणे, जमेल तितकी आणि अवडेल तशी समाजसेवा, पर्सनल फायनान्स आणि त्याचा थोडाफार अभ्यास यात मजेत जातो. करोनामुळे घरात अडकून बसावे लागले, तर अश्याच काही अ‍ॅक्टिव्हीटीज तुम्हाला पण करता येतील.

मला तर वाटते की आयुष्यभर सतत प्रगती आणि भरतीचा समुद्र बघाणार्यांना आता ओहोटी बघावी लागणार आहे. टारगेट पूर्ण करायचे आहे, पुढचे प्रमोशन कधी मिळणार, पगार किती वाढणार, बोनस किती मिळणार, पुढची ट्रीप कधी आणि कुठे काढायची, पैसे स्टॉक मार्केट मध्ये गुंतवायचे की रिअल इस्टेटमध्ये अश्या गोष्टींचा सतत विचार करणार्या लोकांना आता सक्तीचे स्लोडाउन करावे लागणार आहे. जागतिक मंदी येणार का, आली तर किती टिकणार, नोकरी टिकणार की जाणार, टिकली तर पगार कमी होणार का? याचा विचार करता करता, मग आपल्याला आयुष्यात नक्की काय पाहिजे, आपल्या गरजा किती आणि इच्छा किती (needs and wants) याचा विचार करायची वेळ येणार आहे. माझे १-२ मित्र स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा विचार करत आहेत.

<< पण स्वतःचा व्यवसाय असणारे, सल्लागार/कन्सल्टंट म्हणून काम करणारे, काॅर्पोरेट मधे कामाला असणारे किंवा अधिकारपदावरचे लोकं, (हल्ली बहुतांश सरकारी कर्मचारी आणि कदाचित शिक्षकही यातच आले) आणि लहानमोठे आंत्रप्रुनर हे जरी सुट्टीवर गेले तरी स्पर्धात्मक वातावरण म्हणा, परिस्थितीचा रेटा म्हणा किंवा जबाबदारीचं पद म्हणा.. त्यांना कामापासून असं १०० टक्के मुक्त रहाणं, अलिप्त रहाणं शक्य होत नाही… आणि मग ती सुट्टीही पुर्णांशाने सुट्टी रहात नाही. >>

आशा आहे की अश्या लोकांना समजेल (यात आय.टी.वाले पण आले) की आपल्यामुळे कुणाचेही काहीही अडत नाही, कंपनी बंद पडत नाही, काम सुरूच राहाते. आपल्याकडे आयुष्यात जो काही थोडाफार वेळ शिल्लक आहे. त्या वेळाचा सदुपयोग करून, आनंदात राहायला शिकूया.

मी काम एके काम वाला. वर्षातून दोन वेळा सप्ताहांताला जोडून >>>>२-३ दिवस सुट्टी घेऊन फॅमिली ला वेळ देणारा.

खुप दिवसांपासून एक ब्रेक घेण्याची इच्छा होती फक्त स्वतःसाठी. सुदैवाने ही संधी मिळाली आहे. एन्जाॅय करतो आहे. पण कामातील व्यग्रता कमी करणार हे नक्की.<<<

@ पाथफाईंडर, पहिल्यावहिल्या प्रतिसादाबद्दल आभार..
ह्या धाग्याचं प्रयोजन हेच आहे की ज्यांना अशा ब्रेकची इच्छा होती पण कार्यबाहुल्यामुळे ब्रेक घेणं जमत नव्हतं किंवा कामाच्या नादात ब्रेक घेणं सुचतही नव्हतं आणि आता ही संधी मिळालीय/उद्भवलीय (अर्थात याला मी सुसंधी म्हणणार नाही पण Blessings in Disguise म्हणा किंवा प्राप्त परिस्थितीचा सकारात्मक विचार म्हणा) त्याचा आपल्या आयुष्यावर किंवा Work-Life Balance वर काय सुपरिणाम होउ शकतो यावर चर्चा व्हावी, मत-मतांतरं कळावीत यासाठी आहे..
हा कालखंड तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी फलदायी ठरो या शुभेच्छा..

>>>आम्हा IT वाल्यांना काही फरक पडलाच नाही. जे काम डेस्क वर बसून करायचं ते घरी करावं लागतंय.
Wfh असलं की जास्त जबाबदारीने काम करावं लागतं.<<<

@ किल्ली, हो म्हणून तर आय.टी. वाले आणि वर्क फ्राॅम होम करणारे यामधून वगळले आहेत..
कारण ह्या रिकामपणाच्या किंवा निवांतपणाच्या अनुभुति त्यांना येऊच शकणार नाहीत..
तुम्ही लोकं एरवी पेक्षाही जास्त बिझी असणार..
नेट स्पिड नाही, तांत्रिक अडचणी हे सुद्धा आणि आई/बाबा घरीच आहेत म्हणून मुलांच्या मागण्या/जबाबदाऱ्या आणि इतर घरगुती मदत नाही (Domestic Help) हे सुद्धा..
त्यामुळे अशा लोकांबद्दल सहानुभूती.. (To be precise 'Empathy')

>>>आयटी कंपन्या टाइम ट्रॅकिंग आणि स्क्रीनशॉट मॉनिटरसारखी सॉफ्टवेअर्स वापरून घरून काम करणार्‍यांवर नजर ठेवुन आहेत असं वाचलं.<<<

@ भरत, पण WFH करणाऱ्यांसाठी आय.टी. कंपन्या हे पूर्वीपासूनच करतायत असं बऱ्याच जणांनी आधीही लिहिलं होतं.
आता असं व्हिजीलन्स खाली काम करण्याचे काय परिणाम होत असतील ते अजूनच वेगळं...
कदाचित काही चुकार लोकांसाठी ते आवश्यकही असेल..
आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना ते कदाचित आवडतही असेल.. (हॅरी पॉटर सिरीज मधे ती हर्मायनी नाही का परिक्षा रद्द झाल्यावर नाराज होते.. Happy )
अर्थात कोणीतरी असं कायम वाॅच करतंय हे फिलींगही वाईटच rather disturbing..
आपल्या प्रतिसादाबद्दल अर्थातच धन्यवाद..

@ साधना,
आपले दोन्ही प्रतिसाद छानच..
या प्रकारामुळे जे WFH चं प्रमाण वाढलंय आणि ज्यांनी ते कायम टाळलं असेल त्यांनाही आता ते करायला लागल्यामुळे त्याबाबत असलेला बागुलबुवा दूर होणार असेल, आता करायलाच लागल्यामुळे त्याचे फायदे-तोटे लक्षात येणार असतील (कर्मचारी आणि मॅनेजमेंट दोघांनाही) आणि यातून काही उभयपक्षी सोईचं सोल्युशन निर्माण होणार असेल... तर तो ही प्राप्त परिस्थितीचा सुपरिणाम असंच म्हणायला पाहिजे..

>>>माझ्या मते कोणतीही गोष्ट सक्तीने करायला लागली तर त्यात मजा रहात नाही. रोजच्या कामापासून दूर राहून छंद जोपासणे हे त्यातच येइल ! आणि छंद घरात बसून जोपासण्यासारखे असतील तर ते शक्य आहेत . पण ज्याचे स्वप्न जगप्रवासाचे आहे , सायक्लिंग करायचे आहे , किंवा मित्रांमधे गप्पांचे फड जमवण्याचे आहे त्याच्या साठी या सु ट्टीचा काही उपयोग नाही ना !<<<

@ पशुपत,
अगदी बरोबर... ज्यांचे छंद घरबसल्या पूर्ण होणार नाहीत, ज्यासाठी बाहेरच जावं लागतं त्यांना ह्या सक्तीच्या सुट्टीचा काहीच उपयोग नाही..

पण सध्याच्या परिस्थितीत कामापासून दूर राहिल्यामुळे कधी कधी त्या कामाच्या अपरिहार्यतेच उगाचच मनावर असलेलं जोखड जर आपण दूर करु शकलो तर ही परिस्थिती सुधारल्यावर नंतर कधीतरी सुट्टी घेऊन आपण आपले आऊटडोअर छंद जोपासू शकतो..
ह्या सुट्टीत आपण आधी केलेला जगप्रवास, सायकलिंग टुर ह्याचे फोटो पहाणं, आठवणी ताज्या करणं हे नक्कीच करु शकतो..
बऱ्याच वेळा आपण असंही म्हणतो :
अरे काय टुर्स केल्या पूर्वी.. पण सालं आता जमतंच नाही रे कामामुळे..
हा "पण" जरी या सुट्टीत मनातून काढता आला तरी बरंच चांगलं..
मुळात ही सुट्टी फक्त छंद पुरे करण्यासाठी नाहीये..
तर आपले छंद, आपला जुना ' आत्ताएवढा व्यग्र नसलेला काळ ', तेव्हांच कौटुंबिक आयुष्य, तेव्हाचं मित्रांसोबतचं आयुष्य हे आठवण्यासाठी मिळालेला वेळ आहे.. जो बऱ्याच जणांना मिळतच नाही..
आणि हा मिळालेला वेळ, सिंहावलोकनाची संधी आपल्याला नवे विचार देईल, नवीन उर्जा देईल ठामपणे पावलं रोवून पुढील निवडलेलं आयुष्य जगायला, नोकरी व्यवसायातली नवीन आव्हानं पेलायला आणि आपल्या छंदानाही पुरेसा वेळ देणं शिकायला..
And that too With a Good Work-Life Balance..
आपल्या अशा सर्वच गोष्टींसाठी ही सुट्टी लाभदायक ठरो ह्या शुभेच्छा..

मुख्य म्हणजे मृत्युचा घाला कधीही आणि आपल्यातल्या कोणावरही पडू शकतो ही जाणीव अजुन हळूहळू रुजते आहे. भविष्य सध्यातरी अंधःकारमय दिसते आहे. त्यामुळे एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देता येतोय याचाच आनंद आहे. मुलगी, नवरा, मी - अ प्रायव्हेट सेलिब्रेशन एव्ह्रीडे. आजचा दिवस सुखरुप पार पाडलास म्हणुन देवाचे आभार.
बाकी स्तोत्रवाचन चालू.
न्यू यॉर्क मध्ये परिस्थिती फार गंभीर आहेच. बातम्या ऐकून, लोकांचे स्वतःच्या मनःस्थितीचे, केलेले वर्णन, डॉक्टर, नर्सेसने केले वर्णन ऐकून काटा येतो अंगावर.

@ वेका,
हरकत नाही. व्यक्त होणं महत्वाचं..
प्रत्येकजण यातून आपापल्या परीने मार्ग काढतोय.
जे करतोय त्या प्रत्येकातून जे मिळतय त्याच विशिष्ट मोजमाप असेलच असं नाही..
पण ती प्रत्येक गोष्ट किंवा त्याचा एकूणात परिणाम निश्चितच आपल्याला काहीतरी देऊन जाईल...

@ उपाशी बोका,
आपला संपूर्ण प्रतिसाद अतिशय सुंदर...
मनःपूर्वक धन्यवाद...

सामो,
विषण्ण करणारा प्रतिसाद..
स्वतःची, कुटुंबियांची काळजी घ्या.. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
(हे सांगणं कदाचित सोप असेल पण तरीही अतिशय आवश्यक आहे )
आणि मन सैरभैर झालं तर मायबोलीकरांना जरुर हाक द्या.
नक्की मदत करतील..
Please Take Care..

पेशंट झिरो - ५७ वर्षाची बाई आहे. १ डिसेंबरला चीनमध्ये, वुहानमध्ये, ती आयडेंटीफाय झालेली होती.
https://www.businesstoday.in/latest/trends/57-year-old-wuhan-lady-identi...
_______________
एक सकारात्मक बातमी -
https://thehill.com/blogs/blog-briefing-room/news/490079-columbia-sports...
' कोलंबिया' स्पोर्टसवेअरच्या 'टिम बॉयल' नावाच्या सीईओ ने स्वतचा वार्षिक पगार $१०,००० ने कापला. जोपर्यंत स्टोअर्स बंद असतील तोपर्यंत सर्व नोकरदारांना पगार मिळेल असे त्याने जाहीर केले.
____________
नकारात्मक बातमी -
जर्मनीच्या फायनॅन्स मिनिस्टरने आत्महत्या केली. - Worried over How to Cope with Coronavirus Fallout, Finance Minister of Germany's Hesse State Kills Self
https://www.news18.com/news/world/german-minister-commits-suicide-after-...

>>>Please Take Care..>>> धन्यवाद निरु. सकाळी मनस्थिती सैर्भैर झालेली थोडी. पण इन जनरल अजुन तरी अंगाशी आलेले नसल्याने असेल पण ठीक आहे.
वेका म्हणतात तसे उगाच भीती प्रकट करण्यात अर्थ नाही. त्याने साध्य तर काही होणार नाही, तोटाच आहे.

माझं काय झालं कामाचं प्रेशर नेहमीच असतं हपिसे बंद व्हायच्या आधीच्या शुक्रवारी मी रजा घेतली होती चक्क व घरी थांबले होते. मला काय माहीत आता बरेच दिवस येणे होणार च नाही. मग एक दिवसाचा कर्फ्यु झाला. व मग २१ दिवसाचा लॉकडाउन. तत्पुर्वी २५ ची सुट्टी एंजॉय करायची असे ठरवले होते. सांगलीला जायचा प्लॅन होता पण ते फंक्षनच कॅन्सल झाले. अडीच वर्शात रिटायरमेंट आहेच. त्या कडे पायरी पायरीने जात होते. पण लॉक डाउन मुळे गडगडत एकदम डोहात जाउन पडल्यावा णी झाले.

बाळंतपणाच्या व चाइल्ड रेजिन्ग च्या रजे नंतर बिझनेस सुरू झाला त्यामुळे सततच कामावर. नवरा गेल्यानंतरही एक दिवस ऑफिस बंद ठेवले होते. व पहिली मीटिंग त्याच्या दु:खवट्याचीच अ‍ॅरेंज केली. भरभरून लोक आले होते. त्यानंतर मुंबईला शिफ्ट होउन कार्पोरेट मध्ये सर्वाइव व थ्राइव होण्या च्या लेव्हल परेन्त पडेल ते काम केले. मागील वर्शात पण चाळीस रजा हातात ठेवुन संपवले. फक्त कुत्र्याच्या आजार पणात व लेकीला पुण्याहोन नेणे सोडणे ह्यासाठीच रजा घेतलेल्या. ह्या वर्कोहो लिक पणा मुळे नातेवाइक दुरावले. त्यात मी काय काम करते ते समजवुन
सांग ता येणे शक्य नसते. त्यामुळे इतके काय नोकरी नोकरी!!! असे स्निगर्स झेलले आहेत.

तर त्यामुळे आता २१ दिवसांच्या सक्तीच्या घर बस ण्यात पहिले हा विचार आला की रिटायर्मेंट आता सुरुच झाली आहे असे समजून विचार चालू केला. व रिटायरमेम्त मध्ये काय काय करायचे आहे त्याचा विचार केला.

सध्याच्या लायनीतलेच काहीतरी,

पण पॅशन म्हटलेत तर फूड डिलिव्हरी. परफेक्ट वेफर्स बनवले. खिमा पराठे बनवले. इतर चार रेसीपीज बरोबर माझ्या फूड ट्रक किंवा डिलिव्हरी सर्विस मध्ये चालून जाईल अश्या रेसी पी फिक्स केल्या आहेत. ही एक पॅशन.

दुसरी म्हणजे पिंटरेस्ट वर लहान मुलींचे कप्डे फ्रॉक्स झबली टोप्या. ह्याचे पॅटर्न उपलब्ध आहेत. तर हे लॉकडाउन संपले की शिवणाचे क्लासेस घेइन प्रॉपर शिंपी किंवा कुठुन तरी. मला नाजुक हात शिव णीचे काम येते. पण कपडा मजबूत व टिकाउ हवा असेल तर मशीन शिवण आवश्यक आहे. म्हणून एक इन्वेस्ट मेंट म्हणून चागले शिवणाचे मशीन घेइन. व कपडे विकायचा काही एक मार्ग शोधला पाहिजे. काही प्रमाणाट डोनेट पण करेन. आदिवासी लोकांसाठी काम कर णार्‍या संस्था आहेत तिथे दुपटी टोपड्या व झबली लागतात ती देइन. व

सध्या परिस्थितीनुसार मास्क शिवायचे शिकून घेइन.

अमा,
छान विचार आणि सुंदर प्रतिसाद..

अमा, मस्तच योजना.
आम्ही पुण्यात बसून काही मदत करू शकत असल्यास नक्की सांगा.

अमा, वर्क फ्राॅम होम मिळालं हे चांगलंच झालं पण रिटायरमेंटच्या Mock Trial च्या अनुभवाला मात्र मुकायला लागलं..
पण निदान त्याबाबत विचार करुन झाला, एक थोडीशी दिशा मिळाली हे ही नसे थोडके..
आपल्या WFH ला शुभेच्छा...

Pages