राजा राणीची गं जोडी

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 09:32

WhatsApp Image 2020-02-07 at 20.15.48.jpegकलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो Happy
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
सो, चला, करूया चर्चा या मालिकेवर Happy
फोटो : इन्स्टाग्राम

Group content visibility: 
Use group defaults

कालच्या प्रिकॅप वरून रंज्या ला संजू च्या खऱ्या बर्थ डेट विषयी कळलं का काय असा डाऊट येतोय, बघू आज काय होते ते.

कोरोना मुळे शूटिंग बंद झालं तर ह्या लाडक्या सिरीयल ला मुकणार आपण थोडे दिवस.

कालच्या प्रिकॅप वरून रंज्या ला संजू च्या खऱ्या बर्थ डेट विषयी कळलं का काय असा डाऊट येतोय, बघू आज काय होते ते>>>> वेगळंच असेल काहीतरी, लटका राग वाटला फौजदारांचा.

नसेल समजलं, प्रोमो जेव्हा हायलाईट करून दाखवतात तेव्हा actually काहीतरी फार शुल्लक निघते. मी पण बघितला तो प्रोमो, पण मला वाटतं संजूने आतातरी फसवू नये त्याला, समोर सांगू शकत नसली तर आजकाल technology एवढी पुढे गेलीय, msg थ्रू तरी सांगावं.

कोरोना मुळे शूटिंग बंद झालं तर ह्या लाडक्या सिरीयल ला मुकणार आपण थोडे दिवस.>>>> होना माझ्या मनात पण तेच आल..... न्युज मध्ये वाचल्या वर. .

संजू च्या चेहरया वर टेंन्शन दिसत होत.......
वाईट वाटत होत...... त्या दातार मँडम ने हिच्या कडे क्लास लावावा
पंजाबराव... कल्याणी...आणी मालकीण बाई कसे बोलले..प्रत्येका चे expression मस्त असतात

कोरोना मुळे शूटिंग बंद झालं तर ह्या लाडक्या सिरीयल ला मुकणार आपण थोडे दिवस.>>>>>हाय का आता, मी रात्री चा दिस करून सगळा बॅकलॉग भरून काढला, आन आता शूटिंग च बंद हुतय होय? .पन असूदे असुदे सगळ्यांनीच काळजी घ्यायला पाहिजे.
तर काल आणि परवाचा एपिसोड , हायला मी पंजाबराव ला पन मिस करत होते मला त्याची स्टाईल लइ आवडती. तो आपल्या रंज्याला किती घाबरतो, लइ मज्जा आली राव बघताना. पन संजीचं खोटं आता लइच गोष्टी करायला लावणार असं दिसतय. कल्याणी बरोबर सुनावते पंजाबराव ला. बिचारी संजी तिला बापामुळे खोटं बोलायला लागतात. मोनी पन खुप दिवसांनी दिसली परवाच्या एपिसोड मध्ये. लाल स्वेटर मध्ये रंजा किती चिकणा दिसत होता

लाल स्वेटर मध्ये रंजा किती चिकणा दिसत होता >>अगदी अगदी.

कालच सर्वात आवडलेलं म्हणजे सगळं "जिथल्या तिथे आसन मष्ट हाये" आणि रंज्या चा मुड सुधारण्या साठी ती लास्ट ला आपण हुन त्याच्या जवळ जाते ते. खूपच नॅचरल अभिनय केला दोघांनी. ती जवळ आल्यावर बर वाटल्याच रंज्याने ही मस्त express केलं.
धनुडी भाषा मस्त शिकली आहेस हो वाचताना ही संजी रंज्या डोळ्यासमोर दिसतात

हो मालकीण बाई मस्तच.

म्हणजे खर तर तिला नोकर असल्या सारख कल्यानी म्हणायचंय पण रंज्या च्या भीतीने डेअरिंग होत नाहीये म्हणून मालकीन बाई

कालच सर्वात आवडलेलं म्हणजे सगळं "जिथल्या तिथे आसन मष्ट हाये" आणि रंज्या चा मुड सुधारण्या साठी ती लास्ट ला आपण हुन त्याच्या जवळ जाते ते. खूपच नॅचरल अभिनय केला दोघांनी. ती जवळ आल्यावर बर वाटल्याच रंज्याने ही मस्त express केलं.
>>>>>>>एकदम सेंट परसेंट एग्री आहे बघ मी सुद्धा. छोटे छोटे सिन किती लक्षात रहाण्यासारखे करतात. पायपावरून सुजीत येतो तो पन सगळा सीन टॉप झालाय, कुणाचेच बोलणं खोटं, कृत्रिम वाटत नाही, त्या आईसाहेबांचे डायलॉग जरा जड असत्यात पन चालतय ते.

धनुडी भाषा मस्त शिकली आहेस हो वाचताना ही संजी रंज्या डोळ्यासमोर दिसतात>>>>ह्या साठी ठांकू बरंका

एक इचारु? सगळ्या सिरीयल मधनं होळीच्या भोवती फिरून तांब्यातून कायतरी ओतत जातात, ते काय असतंय पानी कि तेल? आन कशापायी हि रसम करतात कुनी सांगल का?

पाणी असतंय ग ते.

मला वाटतय पाण्यामुळे आग तिथल्या तिथे सीमित रहावी म्हणून फिरवत असतील आणि नेवैद्य दाखवताना आपण त्याभोवती गोल पाणी फिरवतो ते पण असू शकेल

मलाबी तसंच वाटलं पन, जीवझालायेडापिसा मधे ती मंगल त्याच्या घरासमोर ते तांब्यमधलं पाणी ओतते का मग आणि म्हणते ना कि घराचीच होळी पेटवते, म्हनून माझ्या डोक्याचा पार इस्कोट झाला कि नक्की काय असतय ह्या तांब्यात?
पन तू म्हंनतीस तसंच आसंल, आग जिथल्या तिथं राहनं मस्टए

कालच सर्वात आवडलेलं म्हणजे सगळं "जिथल्या तिथे आसन मष्ट हाये" आणि रंज्या चा मुड सुधारण्या साठी ती लास्ट ला आपण हुन त्याच्या जवळ जाते ते. खूपच नॅचरल अभिनय केला दोघांनी. ती जवळ आल्यावर बर वाटल्याच रंज्याने ही मस्त express केलं.>>>>>>>>>>>
खुप छान केला तो...... यकदम....बेश्ट म बेश्ट....
संजि ते म्हणते ना...... फौजदार रागवल्या वर एकदम चिकने दिसतात..... पण क्रांती त शांती चा अँटीट्डुड चा स्वँग लय भारी आहे.......

फौजदारांनी मस्त दाखवले unexpected expression..

सुजित आणी संजी चे सिन पण छान असतात..

असे खुप सारे सिन आहे त की जे सारखे बघावे वाटतात... कंटाळा येत नाय.....
धनुडी.......तुम्ही खुप छान बोलायला लागलात..... आमी अजुन इंचीमिंची च आहोत....

खुप छान केला तो...... यकदम....बेश्ट म बेश्ट....
संजि ते म्हणते ना...... फौजदार रागवल्या वर एकदम चिकने दिसतात..... पण क्रांती त शांती चा अँटीट्डुड चा स्वँग लय भारी आहे.......>>>> हा, आन मोनीचे डायलॉग पन भारीच असतात, ती "क्या खबर" किती मस्त म्हनते ना, शिरा हानायला आलेली असते संजी च्या आई कडं. आन कल्यानीपन चांगली हुलपट्टी देते फौजदारांना, जरा पटंल असं कारन सांगते त्या आधारकार्ड चं, स्वरी साठी कार्ड करायचं म्हणजे. पन बाबो माझ्याच पोटात डबरं पडल्यालं.

धनुडी.......तुम्ही खुप छान बोलायला लागलात..... आमी अजुन इंचीमिंची च आहोत....>>>>> अगं मर्दाने बोलतीस की छान, हे काय इंचिमींची होय गं?

सगळ्या सिरीयल मधनं होळीच्या भोवती फिरून तांब्यातून कायतरी ओतत जातात, ते काय असतंय पानी कि तेल? आन कशापायी हि रसम करतात कुनी सांगल का?>>> आमच्या कोल्हापुरात आहे ही पद्धत, होळीला नैवेद्य अन नारळ ठेवून पूजा करून, एका तांब्यात पाणी घेऊन, थोड्या थोड्या पाण्याची धार सोडत होळीला ५ फेरे मारायचे

आमच्या कोल्हापुरात आहे ही पद्धत, होळीला नैवेद्य अन नारळ ठेवून पूजा करून, एका तांब्यात पाणी घेऊन, थोड्या थोड्या पाण्याची धार सोडत होळीला ५ फेरे मारायचे>>>>> असं हाय व्हय, हि नविनच इन्फर्मेशन मिळाली. थँक्यू बरं का. आज लवकर घरी आल्यानं राजारानीचा संसार फर्ष्टहँड बघितला. म्हंजी सुरवात गेली माझी पन संजी सुजीत ला मनवत असताना पासून बघितलं.

आमच्या कोल्हापुरात आहे ही पद्धत, होळीला नैवेद्य अन नारळ ठेवून पूजा करून, एका तांब्यात पाणी घेऊन, थोड्या थोड्या पाण्याची धार सोडत होळीला ५ फेरे मारायचे....... आम्च्या कडेही आहे हि पद्धत

आमच्याकडेही आहे ही पद्धत , पाण्याचा ताब्या घेवुन ३ प्रदक्षिणा घालायच्या, कुमारिकानी १, ज्याने होळीचि पुजा केली आणि पेटवली त्याने पण एक प्रदक्षिणा.
याला होळीला' रिन्गण घालणे' म्हणतात, ज्याने आग त्या रिन्गणाच्या आत राहावी.

सुचेता, प्राजक्ता लइ ब्येस पद्धत आहे बघा तुमच्या कोल्हापूरची. होळीची. कलर्स वरच्या सगळ्या मालिकांमध्ये हे दाखवलं, होळीच्या प्रिकॅप मध्ये, फक्त स्वामिनी मध्ये नाही बघितलं, पण बाळूमामा, जीवझालायेडापिसा मध्ये पण होळी भोवती रिंगण दाखवलं.

अन मी नव्हते म्हणत कि लटका राग असंल फौजदारांचा? संजी उपाशी राहाते म्हनून चिडले फौजदार, सुजीतला आणून उभं करतात तिच्या म्होरं. त्या आधीचा बदाम आणि दुध प्यायला लावण्याचा प्रसंग पण भारीच घेतलाय,

धनुडी ,भारीच लिवतेस ..

कालचे हायेस्ट पॉईंट्स .. 1) राजश्री चा नं संजू च्या बाबांनी डेंजर ढाले पाटील म्हणून सेव्ह केलाय.☺
2) संजू लास्ट ला रंज्याला म्हणते ,तुमच्या दिलाच्या जेलात आम्ही ऑल रेडी कैद झालोय.

अगं तुम्ही समद्या पन लिवता कि फर्मास, उगीच माझी शिफारस कशाला ( येस्स्स, हा शिफारस शब्द वापरायचा होता, वापरला नव्हं बराबर?)
माझ्या डोस्क्यातच राहात न्हाइ, ७ वाजता लावायचं अत्ता पन थोडं लेटंच लावलं, बेबी मावशी त्या डेंजर ढाले पाटील शी बोलत असते तेव्हा. (मला नव्हतं दिसलं डेंजर ढाले पाटील हे नाव, ममो नजर लइच शार्प हाय बघ तुझी)
मला त्या राजश्री चं वाईट वाटतं कधी कधी, तिचं कुंकू तिच्या मागे कधीच उभं राहात नाही असं ती बोलते ना तेव्हा.
पंजाब राव लइच बेरका दाखवलाय ना , राजश्री शी तोच पंगा घेउ शकतो. संजीला म्हनतो ना, युवर डॅड्डी इज हियर डोंट फियर

संजू लास्ट ला रंज्याला म्हणते ,तुमच्या दिलाच्या जेलात आम्ही ऑल रेडी कैद झालोय.>>>>>>++११११११११ हो लईच भारी होता डायलॉग

प्रत्येक सिन लक्षात रहाण्या सारखे आहेत.... एकदम मस्त
फौजदार मध्ये मध्ये कविता ओवी मस्त म्हणतात...
फोन वर ईतके बदाम पाठवता.... त्यातले दोन तिन तुम्ही खा....

चार बदाम अजुन द्या... लईच ईसरायला लागलेत..

संजु ला तो सुजीत काय बोलतो कऴल नाही... बाहेर....समजल नाही...देन तिन वेळा पाहील

प्रत्येक सिन लक्षात रहाण्या सारखे आहेत.... एकदम मस्त
फौजदार मध्ये मध्ये कविता ओवी मस्त म्हणतात...
फोन वर ईतके बदाम पाठवता.... त्यातले दोन तिन तुम्ही खा....

चार बदाम अजुन द्या... लईच ईसरायला लागलेत..

संजु ला तो सुजीत काय बोलतो कऴल नाही... बाहेर....समजल नाही...देन तिन वेळा पाहील

Pages