राजा राणीची गं जोडी

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 09:32

WhatsApp Image 2020-02-07 at 20.15.48.jpegकलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो Happy
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
सो, चला, करूया चर्चा या मालिकेवर Happy
फोटो : इन्स्टाग्राम

Group content visibility: 
Use group defaults

सध्या मी जीव झाला येडापिसा ही मालिका बघायचे थांबवले आहे आणि त्या जागी वरील मालिका बघणे सुरु केले आहे. आत्ता तरी चांगली पकड घेतली आहे मालिकेने.

यातली नायिका अठरा वर्षाची नसते जेव्हा तो तिच्या गावात येतो तिच्या बहिणीला लग्नाआधी भेटायला. साडे सतरा वर्षाची असते. लग्न सहा महिन्यांनी लागले असेल तर ठिक. नायकाचा मोठा भाऊ अजय पुरकर पन्नाशीचा वाटतो आणि त्याची बायको तिशीच्या आतली वाटते. नायिकेचे वडील उगीच अति चिडतात ते खोटे वाटते. ते किल्ला मध्ये होते आणि प्राईमवर ब्रीद मध्ये पण आहेत. नायकाचे ओठ काळे आहेत सिगारेट पीत असल्यासारखे.

@चंपा..
अजय पूरकर यांचे हे दुसरे लग्न दाखवले आहे, त्यांची पहिली बायको मरण पावते म्हणून ते राजश्रीशी लग्न करतात.
नायिकेचे वडील तसेच दाखवले आहेत पण, खोट्या मानमरातबात अडकलेले, बडा घर पोकळ वासा ताईप्स...
आपलं अपयश लपवण्यासाठी खोटं बोलणारे आणि घरच्यांवर डाफरणारे.. सो ती चिडचिड त्यांचा मूळ स्वभावच वाटतो.
हिरो कदाचित सिगारेट ओढत असेल किंवा नसेलही कारण त्याचे दात स्वच्छ आणि शुभ्र आहेत, सिगारेट ओढणाऱ्यांच्या दातांवर डाग असतात ना, तसे नाहीत..
Anyway, पण तो दिसतो छान आणि अभिनय पण सहज करतो हे नक्की !!!
त्याचं हसणं पण मस्त आहे, अगदी डोळयांपर्यंत पोचतं त्याचं हसू Happy

मी पण बघते ही मालिका मस्त आहे सगळंच. ते गाव ती भाषा, संवाद आणि सगळे कलाकार ही.

माझे पहिले भाग बघितले गेले नाहीयेत , वाटलं नव्हतं छान असेल म्हणून. मध्ये लग्नाचा एपिसोड बघितला तेव्हा पकड घेतली सिरियलने. आता रोज बघते मस्तच आहे

Miss झालेले पहिले भाग आता voot वर बघतेय , ते पण छानच वाटतायत.

हो, मी पण कालचा पाहिला एपिसोड, सात वाजता चं मिस होतो, रात्री रिपीट टेलिकास्ट बघितला, नायक छानच आहे, आणि सगळ्यांची acting छान आहे. जीव झाला येडापिसा मध्ये फार पिळताएत सद्ध्या म्हणून कंटाळा येतोय बघायचा. मी पण voot वरच बघते जीझायेपि

मनिमोहोर, सेम पिंच... मीपण आधी पहिली नाही मालिका, आत्ता आत्ता पाहायला लागले. त्यामुळे पहिले काही भाग voot वर बघते आता, तो नायक मस्तच आहे हे मात्र १००% टक्के खरं Happy
गार्गी फुलेंच काम पण आवडलं मला, साधी पण खमकी मावशी ...
तुपारे मध्ये डोक्यात जायची कधीमधी पण इथे छान करतीये काम !!

मी बघत नाही, पण नायिका उगाच अठराच्या आतली दाखवली, कायद्याने गुन्हा आहेना असं लग्न दाखवणं. तो नायक मलाही आवडला मात्र काही प्रोमोज बघताना, सहज करतो एकदम.

मला बरेचदा नायकच आवडतात, नायिका सो सो वाटतात काही अपवाद वगळता.

मनिमोहोर, सेम पिंच... मीपण आधी पहिली नाही मालिका, आत्ता आत्ता पाहायला लागले. त्यामुळे पहिले काही भाग voot वर बघते आता, तो नायक मस्तच आहे हे मात्र १००% टक्के खरं Happy
गार्गी फुलेंच काम पण आवडलं मला, साधी पण खमकी मावशी ...>>>>>>> मी काल रतीब लावल्या सारखे बरेच एपिसोड व्हूटवर पाहिले, आणि मलापण चक्क ती मावशी आवडली. मी एकच एपिसोड बघून तिला जज करत होते. थँक्यू मीनाक्षी. आता मी हि सिरीयल बघणार, रिपीट टेलिकास्ट उशिरा असतं तेव्हा

मनिमोहोर, सेम पिंच... मीपण आधी पहिली नाही मालिका, आत्ता आत्ता पाहायला लागले. त्यामुळे पहिले काही भाग voot वर बघते आता, तो नायक मस्तच आहे हे मात्र १००% टक्के खरं Happy
गार्गी फुलेंच काम पण आवडलं मला, साधी पण खमकी मावशी ...>>>>>>> मी काल रतीब लावल्या सारखे बरेच एपिसोड व्हूटवर पाहिले, आणि मलापण चक्क ती मावशी आवडली. मी एकच एपिसोड बघून तिला जज करत होते. थँक्यू मीनाक्षी. आता मी हि सिरीयल बघणार, रिपीट टेलिकास्ट उशिरा असतं तेव्हा

कालचा भाग पण छान होता.

हीरो विचारतो निघायचं का तर ती म्हणते इतक्यातच ?

इतकं बरं दिगदर्शन सुद्धा दुर्मिळ झालंय हल्ली

मला हिरो आवडतो, हिरॉईन नाही आवडत म्हणून बघत नाही पण इतर कास्ट चांगले दिसतायेत अभिनयात. बापमाणूस मधली नायिका इथे खलनायिका दिसतेय, हिरोची वहीनी बहुतेक.

हो, मस्त होता कालचा भाग.. त्या दोघांची लाजरीबुजरी सुरुवात पण छान दाखवल्ये !

छान आहे ही. आम्ही पण बघतोय सध्या. हेरो थोडा पुस्तकी वाटतो मला बोलताना पण दिसतो छान. मावशी पण गोड. गोखले काम चांगल करताहेत पण त्यांचे पात्र अजुन नीट एस्ट्याब्लिश नाही होत आहे, होप पुधे स्कोप असेल .

कालचा भाग बरा होता.
पण ते पाणी देण्यावरून दत्तू काका आणि संजीवनीला बोलणं जरा अती वाटलं, आणि ती राजश्री बसली आहेच काड्या टाकायला..!
मावशी बाई जरा सेन्सिबल वाटल्या घरातल्यांमध्ये...

हो आता नायिकेला अगदी गुणाची बाय माझी करतील . जे जे उदात्त सुन्दर ते ते सगळं तिला बहाल .

ती मुलगी आणि तो हीरो मात्र बरी acting करतायत

मला आवडली मालिका! चिन्मय मान्डलेकर च लिखाण आहे त्यामुळे अजुनतरी लाउड आणि अतर्क्य नाही वाटत. हिरोच स्माइल खुप छान आहे, मोकळ वैगरे, हिरोईन मटेरियल नाही आहे नायिका पण अ‍ॅक्टिन्ग छान आहे तिची, मी पण लग्नाच्या एपिसोडच्या दरम्यानच अचानक बघायला सुरवात केली आणि आवडायला लागली

मी एक प्रोमो बघितला त्यात हिरोची आई मुद्दामून ग्लास पाडवून फोडते आणि नायिकेच्या आईला साफ करायला लावते, नायिकेला मदत करु देत नाही, शुंभागी संगवईचा रोल इतका व्हिलनिश आहे का, मला ती मोठी सून व्हिलन वाटली.

बांदलांकडे मांडव परतनीला आलेल्या मुलीच्या नवऱ्याकडून काम करून घ्यायची रीत असते त्याअंतर्गत विको वज्रदंती-एक कढून काम करून घेतले जाते आणि हि गोष्ट ती मोठी जाऊबाई तिखट मीट लावून सासूला शुभांगी गोखले ला सांगते मग ती परंपरा, प्रतिष्ठा , ढाले पाटील घराण्याची इज्जत वैग्रे वैग्रे मिट्टीत मिळाली म्हणून टीट फॉर टयाट करण्यासाठी ते दुधाचा ग्लास पाडते आणि काचा विको वज्रदंती-दोन च्या आईला उचलायला लावते.

असं आहे होय, thank u अजनबी.

विको वज्रदंती Lol , कोलगेट स्माईलची सवय आहे पण एकदम विको वज्रदंती. एवढे दाखवतात का ते दोघे दात.

हो ती हल्ली विको वज्रदंतीची ऍड आलिया करतेय ना (भले ती त्यात तिचे चिमणीएवढे तोंड जराही उघडत नाही) त्यामुळे तीच डोक्यात आली.
बाकी ते दोघे कोणत्याही ब्रँड च्या टूथपेस्ट साठी योग्य आहेत, एस्पेशली हिरो.

हिरो आवडला मला. खूप सुंदर हसतो.

हिरोईन तशी सामान्यच आहे पण संवाद व्यवस्थित म्हणते, गावरान वाटते. केश व वेशभूषा भूमिकेशी सुसंगत आहे.

विको वज्रदंती Happy
हाहाहा.. सॉलिड ...
तो सुजीत पण चांगला आहे दिसायला, कोण आहे तो नट ?

मी इथे वाचून बघितली थोडा वेळ, तो हिरोचा लहान भाऊ आला तिथून, मला तो फार आवडला. जास्त तो आणि गार्गी फुले हे दोघे आवडले, हिरोची personality आणि डोळे छान आहेत. बाकी अंदाज जास्त बघितल्यावर येईल. फक्त तो वयाने जास्त मोठा वाटला, फार अंतर दाखवलं आहे का दोघांत. ती अजून 18 ची नाही हे माहीतेय.

फक्त तो वयाने जास्त मोठा वाटला, फार अंतर दाखवलं आहे का दोघांत.>> हो! तो २८ आणी ती जेमतेम १८
अन्जु! गौरी नाही गार्गी फुले

मी पण रतीब लावल्या सारखे बरेच एपिसोड व्हूटवर पाहिले, ...मला आवडली मालिका!...हिरोची personality, acting छान आहे. ... शिवानी सोनार चि पण acting छान आहे.. भाषा, संवाद मस्त वाटतात ...

मी पण रविवारी बघितले काही भाग. हिरोचे ओठ कधी कधीच काळे वाटतात. शुगोचा आवाज बोलता बोलता कोणी कमी करतंय की काय असं वाटलं. मला ती आवाजावरून उदास वाटते. तो कोण सुजीत धाकटा मुलगा आहे का, खूपच बडबड करत होता तो, बोर झालं. एवढ्या मोठ्या घरात दोनच नोकर, स्वयंपाकघरातही तेच. मावशी तिथेच मुक्कामी असते का. पोहे अंमळ कमीच वाटले एवढ्या लोकांसाठी आणि केवढी हळद टाकलेली. संजिवनी जर यांच्या बरोबरीची नसते तर हे लग्न का जमवतात तिच्या बहिणीशी. अजय पुरकर नेहमी गुरकावत असतो आणि त्याची बायको नेहमी फिस्कारत असते. घरातच जर अनैतिक कामं होतात तर घरातला पोलीस काय करतो Uhoh

संजिवनी जर यांच्या बरोबरीची नसते तर हे लग्न का जमवतात तिच्या बहिणीशी. >>>>>>>> वरात पाहुणे घरात आलेले असतात... आणी बहीण पळुन जाते.....सो.... हिरो म्हणतो.. मी हिच्याशी करतो...

Pages