राजा राणीची गं जोडी

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 09:32

WhatsApp Image 2020-02-07 at 20.15.48.jpegकलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो Happy
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
सो, चला, करूया चर्चा या मालिकेवर Happy
फोटो : इन्स्टाग्राम

Group content visibility: 
Use group defaults

संजु ला तो सुजीत काय बोलतो कऴल नाही... बाहेर....समजल नाही...देन तिन वेळा पाहील>>>>> कधीचं हवय? संजी सुजीत ला पुरणपोळी न खाता जातो तेव्हा थांबवते ते कि नंतर रंजा सुजीत ला पकडून आनतो तवा? फौजदार जेव्हा पकडून आणतात तेव्हा म्हणतात की आता झिंजा उपटा पाहिजे तर एकमेकांच्या पण बोलून सोडवा, संजी म्हनते मी सांगितलं होतं सुजीतभावजींना कि माझा पन भूकहडताल आहे तर ते म्हनले तूमी जावा तिकडं कडेकडेनं, आता बोलल्यावर मागे कसं हटणार?
मग सुजीत म्हणतो कि जरा फिल्मी वाटेल पन बेबी मावशी नंतर ह्या वहिनी द लिटील ने इमोशनल केलं, तर रंजा म्हनतो संजू करतेच असं इमोशनल मधेमधे. आणि म्हनतो आता जर पुढच्या पाच सेकंदात जर तू जेवलीस नाहीस तर मी अरेस्ट करत असतो

संजी सुजीत ला पुरणपोळी न खाता जातो तेव्हा थांबवते >>>> ईथे.... बाहेर बोलतो तेव्हा.....दोन काही तरी शब्द बोलतो.... फ्रेडशिप का.काय

संजी सुजीत ला पुरणपोळी न खाता जातो तेव्हा थांबवते >>>> ईथे.... बाहेर बोलतो तेव्हा.....दोन काही तरी शब्द बोलतो.... फ्रेडशिप का.काय>>>> संजी म्हणते इतका तन्का बरा न्हाइ सुजीत भावजी, मला पन ताठा करता येतोय, माझा पण भूकहडताल, तर सुजीत म्हणतो तुम्ही फ्रि इंडियाच्या शिटीजन हायसा करा कायपन," अन नंतर म्हणतो सुटा कडकडनं

तुम्ही फ्रि इंडियाच्या शिटीजन हायसा करा कायपन,">>>>> हा हो च... काय सनजल च नाही . मला दोन तिन वेऴा पाहिल..मागे जावुन..... खुप खुप धन्यवाद...

बहुधा पुढच्या भागाच शुटीन्ग झाल नाहिये त्यामूले आज "ढ्गात लावा की बॉयलर' वाला भाग रिपिट होता.अर्थात बघितला.
सन्जु आणि रणज्याला काहि दिवस तरी मिस करणार

मला पण हे फ्री इंडिया च्या कळलं नव्हतं. थँक्यू हो.

ही सिरीयल एवढी खास नसेल म्हणून बऱ्याच लोकांनी
पहिल्यापासून पाहिली नाहीये. आता नवीन शूटिंग बंद असल्याने अस randam दाखवण्या ऐवजी सुरवाती पासून दाखवा रोज एक एक भाग , जास्त मजा येईल.

हो ममो, मी सुद्धा त्यातलीच आहे. अजिबात बघणार नाही असं ठरवलंच होतं, आई शप्पथ, पन ह्या धाग्यावर आले अन कुतूहलापोटी एक एपिसोड बघितला. जादूच झाली ना राव, सुरवातीला मला बेबी मावशीचे टोन आवडला नव्हता,. मी तसं लिहीलं बी. पन मला हिथंच समजावलं तुम्ही सगळ्यांनी. मग जे धडाक्यात सूरू केलं व्हूट वर बघायला, अगागागागागागा आता माजा लेक मला म्हंतो आई तुला येडंच लागलय , ह्याच भाषेत बोलती ना मी, आफिसात पन हायेत माझ्या सारखी येडी. अत्ता घरातच बसलोय पन हि सिरीयल रिपीट टेलिकास्ट बघायला म्हंजे नेकी और पुछ पुछ होतय

हो ना खुप मिस क रतोय.......
मी प ण खुप वेळा पाहिली... आधी..... एक पण एपिसोड पाहिला नव्हता..................... आणी....मग एकदा पाहिली.... आणी बाबो ...रतीबच लावला ना............ सिली वुमन सारख बघुन च टाकले सगळे.....

अजुन एक असा शब्द कळला नाही आहे..... दुध देते ना तेव्हा काय तरि ती बोलते.... ते पण समजल नाही...

काय नाय गं, "ओ स्टॉप" म्हनती, अन "पिछे मुड " पन म्हनती, फौजदार दुध प्यायला टंगळमंगळ करतात तर छान दम बी देती त्यास्नी. त्यांचे बदाम वाढवती अन तुमी फौजदार कशे झाले असं पन इचारती डायरेक्ट. तर फौजदार म्हनतात तेव्हा जास्त डिस्ट्रॅक्शन नव्हतं आता आपल्या बेडरुममध्ये खुप डिस्ट्रॅक्शन हाय तुझाच चेहरा सारखा दिसतोय म्हनून इसरायलोय

काय नाय गं, "ओ स्टॉप" म्हनती, अन "पिछे मुड " पन म्हनती, फौजदार दुध प्यायला टंगळमंगळ करतात तर छान दम बी देती त्यास्नी. त्यांचे बदाम वाढवती अन तुमी फौजदार कशे झाले असं पन इचारती डायरेक्ट. तर फौजदार म्हनतात तेव्हा जास्त डिस्ट्रॅक्शन नव्हतं आता आपल्या बेडरुममध्ये खुप डिस्ट्रॅक्शन हाय तुझाच चेहरा सारखा दिसतोय म्हनून इसरायलोय >>>>>>>>>>>>>>>>>>>>>> वा ग मर्दाने.... काय लिहिलस एकदम...अख्खा सिन उभा राहिला...

मग आवडाय्ला पण लागे ल दुध ... त्यानतर रन्ज्या ला गालाला हात लावुन काय तरी बोलते.... ते समजल नाहि.....

मग आवडाय्ला पण लागे ल दुध ... त्यानतर रन्ज्या ला गालाला हात लावुन काय तरी बोलते.... ते समजल नाहि.....>>>>प्याल तर व्हाल ना फौजदार

Missing संजू आणि रणजित...
पहिल्यापासून सगळे भाग पुन्यांदा दाखवायला पाहिजे राव.!!! Happy

Missing संजू आणि रणजित...
पहिल्यापासून सगळे भाग पुन्यांदा दाखवायला पाहिजे राव.!!!>>>>हा लईच मिसींग संजू आणि फौजदार, अन बेबी मावशीपन

आज खुप आठवण आली राजा राणीची. मागची सगळी पान वाचून काढली आणि वाटलं आईशप्पथ हि माझीच भाषा? कसला वेड लावलेलं ह्या सिरीयल ने भाषाच पार बदलली होती. मला आवडायची पण ती भाषा त्याचा लहेजा, आणि सिरीयल मध्ये काम करणारे सर्व. कधी सुरू होईल काय माहित?
इथे चर्चा करायला पण खुप मजा यायची.

Happy दाखवतात का टिव्ही वर? माझा डब्बा बंदच पडला. आन आता लॉकडाउनमधी कोन येनार दुरूस्त करायला?. नेटफ्लिक्स आणि बाकीच्या नेटवरच्या सिरीयल मुळे आपल्या ह्या शिरेल ला पार इसरले बघ मी . व्हूटवर पन नाही बघितलं. आता जरा बघती आधी आधीचे भाग.

मी बी आहे तुझ्या लायनीत मर्दाने.... >>> मर्दाने Happy किती दिसांनी ऐकली हाक अबोल.

टीव्ही वर नाही दाखवत ,voot वर आहेत>>>मी बघीन आता.

मर्दाने Happy किती दिसांनी ऐकली हाक अबोल.>>>>>>>>>>>>>>>>>>>> हो ना.... मला पण बर वाट्ल.... .... आवड्ते एपिसोड बघते... मस्त वाटत... मनीमोहर बोलली तस..

मलाही फार आठवण येत्ये बघा या मालिकेची, बऱ्याच दिवसात एपिसोडस पाहिले नाहियेत, उद्या रिपीट बघायला पाहिजे voot वर Happy

आजपासून राजा राणीचे रिपीट टेलिकास्ट सुरू झाले हो... संध्याकाळी ६ ते ७ Happy
नक्की पहा आपल्या संजू आणि डॅशिंग फौजदार ची लव्हस्टोरी !!

अगं माझ्या साळकाया माळकायांनो , राजा रानीची जोडी परत चालू हुनार. मी वुटवरंच बघीन . कारण तवापान्स टाटा स्काय नं रामच म्हंटलय माझ्या कडे. चला चला कलर्स मराठी लावा. जाहिरात येते म्हने राजा रानीची

व्हूटवर एक दोन एपिसोड बघितले, संजू च्या पत्रिकेत ला दोष, म्हणजे अमावस्येचा जन्म! त्या आईसाहेब संजूवर चिडून काय करणार आहेत? राजश्री पण आगीत तेल ओतायचं काम करते. आता नानांना बोलवून एक" शांत" करायची ठरवताएत.पण इथे आहे आपल्या रंजाची एन्ट्री! असं ठणकावून सांगतो आई साहेबांना कि संजू ची काही शांतबिंत होणार नाही. खुप आवडला मला फौजदारांचा स्टँड. आणि एवढ्या दिवसात प्रेम जराही कमी नाही झालं ते तसंच फ्रेश आहे. Happy

Pages