राजा राणीची गं जोडी

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 09:32

WhatsApp Image 2020-02-07 at 20.15.48.jpegकलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो Happy
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
सो, चला, करूया चर्चा या मालिकेवर Happy
फोटो : इन्स्टाग्राम

Group content visibility: 
Use group defaults

मला जाउबाइच्या साड्या आणि दागिने पण आवडतात. ठ्सकेबाज आहेत जाउबाइ पण , एवढी गोड सन्जु पण खोटे आबाडे वर गजरा त्यामूले उगाच काकु बाइ दिसते.

एवढी गोड सन्जु पण खोटे आबाडे वर गजरा त्यामूले उगाच काकु बाइ दिसते. >>>> हो ना तिला असा लुक दिला काय माहित.... ..मोठी दाखवली आहे की केस सोडुन.

गार्गी फुलेच पण छान आहे काम ..

अजून नवी नवरी आहे म्हणून कदाचित साडी नेसत असेल.

तशी जाऊ बाई पण केस मोकळे सोडले तरी साडीतच दिसते . तेव्हा खानदानी परंपरा असू शकते ढाले पाटलांची... साडी नेसण्याची.

नायिका underage ही स्टोरीलाईन मला एन्जॉय करता येत नाहीये Sad म्हणून मी बघणं बंद केलंय. रंज्यावर human trafficking ची पण केस होणार underage लग्नाबरोबर!

अहो... आप ल्या गण्या मन्या भिगोर्या...... झाल्यात...... तुम्ही कुठे चाललत तुरमसिग होवुन..... Happy

न गाठ ना भेट.... फुक्टचा डब्याचा थाट.... :))))

न गाठ ना भेट.... फुक्टचा डब्याचा थाट.... :))))>>>>> बेस्टम ब्येष्ट. दोघांची चूकामूक खरी वाटली. नाही तर सिरीयल मध्ये आपल्याला दिसत असलेली व्यक्ती तिथेच समोर असलेल्यांना दिसत नाही.
संजी रणजीत ला गोष्ट पण काय भारी सांगते, आधीच्या सीनचं बोलायलेय मी. मी जरा लेटच बघतीय ना वूटच्या पाया पडत.

संजी रणजीत ला गोष्ट पण काय भारी सांगते, आधीच्या सीनचं बोलायलेय मी >>>>. हो खुप छान केला सिन तो... तो म्हणतो तु घर आहे माझ... ... खुप मस्त वाट्ल...

बघत नाही पण इथे वाचून तिच्या बाबांनी खोटं सर्टिफिकेट तयार करून सज्ञान दाखवली तिला असं समजलं पण ती बिनधास्त असतेना तशी, आधी प्रोमोज बघितले त्यावरून वाटतं मग ती काय ते खरं रणजीतला का नाही सांगत, लग्न सहा महिने उशिरा झालं असतना. साखरपुडा करून ठेवायचा. बाबांच्या खोटेपणात तिचीही साथ आहे, कारण काही असो, घाबरलेली असुदे पण तीही चुकीची आहे, उद्या शिक्षा मात्र रणजीतला होईल. मला न बघता रणजीतची काळजी वाटतेय फार, ती सज्ञान नाहीये हा प्रोमो बघितल्यापासून. तेव्हापासून मलाही स्टोरीचा हा बेस नको होता, तो एकतर पोलीस ऑफिसर आणि पलीकडच्या पार्टीने इतके बेकायदेशीर वागावं.

इथे येऊन वाचायला मात्र मला आवडतं. भाषेबद्दल, अभिनयाबद्दल छान लिहिता तुम्ही सर्व.

पण ती अंडरएज आहे हे घरच्यांना माहित नसतं का? तो पत्रिकेचा काय संदर्भ लागला नाही.>>>>नाही , लपवून ठेवलय ते. संजू च्या वडलांनी तिचं खोटं birth certificate करून आणलं. लग्नाच्या वेळी तिची आई म्हणते कि साखरपुडा करून ठेउ लग्न नंतर करू पण हा बाप ऐकत नाही कोणाचं. सांगू देत नाही. बरंच इमोशनल ब्लॅकमेल करतो. त्यावेळेस संजी घाबरलेली , दबावाखाली दाखवली आहे पण नंतर तेवढी नाही.
पत्रिकेचं म्हणजे, संजी तिची पत्रिका बेबी मावशीला दाखवते सहजच, बेबी मावशी ती बघत नाही पण राजेश्री च्या हातात हिची पत्रिका पडते. आणि त्याचवेळी संजीची बहिण साजीरी संजीला आठवण करून देते कि तिची खरी जन्मतारीख त्या पत्रिकेवर आहे. म्हणून मग संजी टेन्शन मध्ये आहे, पत्रिका परत मिळवते ती

कालचा संजु आणी सुजीत मधले सिन पण छान लिहिले ... मस्त जुगलबंदी....वहिनी the little... वहिनी the second...
जास्त राघु सारख बोलु नका.... रियालिटी चेक पण असु द्या

दुसर्या ची कुसळ काढण्या पेक्षा स्वताची उसळ सांभाळा..

हो मस्त झाला कालचा भाग ही.

माझं पण रडून झालंय मी पण येतेय घरी ..खूप आवडलं हे.
काल रंज्या नसून ही कंटाळा नाही आला.

संजू स्मार्ट - भोळी, समंजस - अल्लड अशी जरा रिऍलिस्टिक दाखवली आहे. छान develop होतय तिचं कॅरॅक्टर

माझं पण रडून झालंय मी पण येतेय घरी ..खूप आवडलं हे.>>>>>>>मला पण....

वांड म्हणजे.... छान...हे मीहीत नव्हत....ञानात भर पडली

रणजीत ला गोष्ट सांगताना नाही का संजी म्हणते, राजा दिसायला? अगागागागागा नुस्ता वांड, असला हँडसम असला हँडसम Happy
तर दुसऱ्यांदा ऐकला हा वांड शब्द, अता सुजीत च्या तोंडी त्याच अर्थान असल

रणजीत ला गोष्ट सांगताना नाही का संजी म्हणते, राजा दिसायला? अगागागागागा नुस्ता वांड, असला हँडसम असला हँडसम Happy >>>>>>>>>>>>> अरे हो विसरले....... खर सागु तर तेव्हा कळा ला नव्हता शब्द .... Happy

मला तरी कुठं माहित होता? मी पण असेच अंदाजात आंबे पाडले. Lol बाकी माझी भाषाच पूर्ण पणे बदलून गेलीये ह्या राजा राणी पायी. कुणी काही विचारलं तर हो ऐवजी हां निघतय तोंडातून.
हां, चालतंय की, किंवा बेस्टम बेस्ट Happy तोंडातच बसलय. अडगी हा शब्द सुद्धा आयुक्षात पयल्यांदा ऐकला. नाहीतर मी एकदम सपष्ट लिहीणारी अन बोलणारी. पण हि भाषा गोड वाटते ऐकायला.

ओके आता कळलं पत्रिकेचं.
सुजीत कोणाचा मुलगा? मस्त होते त्याचे , संजूचे आणी त्याचे वहिनीचे संवाद. पोह्यात खडा Proud

सुजीत कोणाचा मुलगा?>> फौजदारा साहेबान्चा सख्खा लहान भाउ, त्याच आणि आइसाहेबान्च पटत नाही , त्याची पण अ‍ॅक्टिन्ग भारि झालिये.
भाषा तर काय भारी आहे राव, एकच नबर.
सन्जुच्या कॅरेक्टर बद्दल अगदी अगदी! मस्त डेव्हलेप होतय तिच पात्र, बाकि फौजदार साहेब बाइक वर कायच्या कायच हॅन्डसम दिसतात.
शिवानीचा अभिनय फार भारी.

धनुडी , माज बी अगदी शेम टू शेम जालंय बग>>>>>हा ना मग, आपलं चांगलं गुळपिठ जमंल. काल काय झाल्तं कोनी सांगल का मला, माझं स्टार्टींगच्या सुरवातीचं गेलं की राव. संजी आणि फौजदार बोलत असतात सुजीत बद्दल तिथपान्स बघितलं.

बाकि फौजदार साहेब बाइक वर कायच्या कायच हॅन्डसम दिसतात.>>>>>> बाबो........... इथ तर समदेच... फौजदारा चे फँन आहेत राव.......आमी बी ह्या च्याशी टोटल अँग्री आहे बगा....

सुजीत बोलतो रंजीत.... तु लकी आहेस..वहीनी यकदम बेश्ट.... कायच्या काय वांड पव्हे बनवले ... डबा भर घेवुन..विकायला बसशील तर जास्त कमवशील. . ट्रासफर घे आणी जा दुर... घर मोठ आहे पण ईथे आँक्सीजन नाही आहे...

बाकि फौजदार साहेब बाइक वर कायच्या कायच हॅन्डसम दिसतात.>>>>>> बाबो........... इथ तर समदेच... फौजदारा चे फँन आहेत राव.......आमी बी ह्या च्याशी टोटल अँग्री आहे बगा....>>>>>>चक्कीत जाळ, प्रश्न च न्हाई, हँडसम नंबर १ . Happy
पन आमची संजी पन इंचीमिंची नाहीये , लई हुशार, लइच डोकेबाज.

अबोल, थँक्यू बरं का अपडेट साठी.

चक्कीत जाळ, प्रश्न च न्हाई, हँडसम नंबर १ . Happy
पन आमची संजी पन इंचीमिंची नाहीये , लई हुशार, लइच डोकेबाज.>>>>>>>>>> मर्दाने.... भारीच जमलय... बघा तुम्हाला. Happy

इंचीमिंची : हा शब्द पण ञानात भर आहे

ममो, अबोल Happy थँक्यू बरं का तुम्हा दोघींना. माझ्याबरोबर रहाल तर अशी नवनव्या शब्दांची लड लावीन ना! बघाल तुम्ही Happy
जोकिंग राहू दे मला एक सांगा ह्या सिरीयल मध्ये जी गावं घेतली आहेत ती खरी आहेत का? म्हंजे पानबुंदा, आंबेगाव, बागमळा , हि गावांची नावं आणि ह्या सगळ्यांची आडनावं, ढाले पाटील, बांदल पहिल्यांदा च ऐकली. पंजाबराव हे नाव पण त्याला एकदम फिट्ट बसलय.

Pages