इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

रिलायन्स व टीसी एस ५२ वीक लो फिगर ला आहेत घ्यावेत का अजून?! आज तर लोअर सर्किट लागले. भीतिदायक परिस्स्थिती.

चांगलाच रिकव्हर झाला क्रॅश.
७% unbooked profit आहे आजच्या सिपवर.

पण परत खाली जाऊ शकते मार्केट. आजची सिप ही वर्थ रिस्क टेकिंग होती असे मला वाटते.

याची देही याची डोळा एकदा तरी लोअर सर्किट बघायची इच्छा होती. आज पूर्ण झाली.
>>>>
मी मात्र सपशेल गंडलो, +1300 वर सर्किट लागलं आणि डायरेक्ट -२९०० पर्यंत प्रवास बघितला, शेवटी बरीच देवाण घेवाण करून ५२ रूपे प्रॉफिट कमावला.
पण एक आनंद आहे, कमीत कमी आज बऱ्याच लोकांना झोप तरी लागेल... Happy

मला उद्या पण सुट्टी घ्यावी लागणार असे दिसते.

शुक्रवारी मार्केटने त्यादिवशीच्या लो पासून जवळ जवळ १८ ते १९% वर हाय केला आणि क्लोज दिला.

पण स्टॉक्सच्या फ्युचर आणि ऑप्शन मधे शुक्रवारी किंवा मागच्या आठवड्यात काही नविन पोजिशन बिल्ड नाही झाल्या. उलट ओपन ईंटरेस्ट कमी झाले आहेत. कॅश डिलिव्हरी मधे थोडी फार वाढ झाली आहे पण ती लाँग साईडला मूव्ह देण्याईतकी मोठी वाटत नाहीये.

शुक्रवारची मूव्ह फक्त रिटेलर्सचे स्टॉप लॉस ऊडविण्यासाठी किंवा त्यांना लाँग साईडला ट्रॅप करण्यासाठी झाली असे वाटते आहे.

नक्की काय ते कळेपर्यंत ट्रेड न करणे उत्तम.....

उद्यासाठी माझी स्ट्रॅटेजी.

1. ओपनला निफ्टी जराजरी रेड दिसला, तर टाटा मोटर्स त्याक्षणी सेल करणे, आणि ऑटो स्क्वेर ऑफ ची वाट बघत बसणे.
ग्रीन दिसला तर त्याक्षणी बाय करून १ रुपया जरी अप गेला तरी विकणे.

2. रेड निफ्टी मध्ये ग्रासीम सेल करणे, आणि auto square off पर्यंत थांबणे

उद्या पहिली १५ मिनिटे मार्केट मूड बघून शॉर्ट मूव्ह असेल तर निफ्टी बिअर स्प्रेड कॉल घेणार. जास्त खाली गेले तर पोर्टफोलिओमध्ये थोडे सिप करणार.
लॉंग मूव्ह दिसली तर ट्रेड घेणार नाही इतक्यात.

बाकी SBI Cards प्रीमियम वर लिस्ट होईल की डिस्काउंट वर यावर जाणकारांचे काय मत?

माझा उद्या शॉर्ट करण्याकडे कल राहील. शॉर्टचा सेटअप बनला तरच सेल करेन. जर बाय करायचं झालं तर क्वांटीटी कमी ठेवेन.

Watchlist for 16.03.2020
1. SBIN(L)
SBIN 16.03.20.JPG
2. TATASTEEL(L)
TATASTEEL 16.03.20.JPG
3. AMARAJABAT(S)
AMARAJABAT 16.03.20.JPG
4. UPL(S)UPL 16.03.20.JPG

सगळे चार्ट सारखेच दिसताहेत, ओढून ताणून कसेतरी वरचे चार पोस्ट केलेत. उद्या श्यक्यतो बघ्याचीच भूमिका राहील.

3 ग्रीन आणि 1 रेड?
किती धाडसी आहात हो तुम्ही! इसे बोलते जिगरा!!!
किती तो आशावाद!!!!! Lol

उद्या ग्रीन ओपन झाला तर मी फक्त TAMO आणि तेही १ रुपयावर खेळेन!

माझी सेलिंग लिस्ट

GRASIM
ZEEL
TATA MOTORS
TATA STEEL
SBI

आज चार्ट बघताना वाटत होतं चायनीज माणसं बघतोय. सगळेच सारखे दिसत होते. कोरोनाचा कहर बघा. आपल्याकडे म्हण आहे ना जशी खाण तशी माती. चीनमध्ये उगम झाला म्हणून सगळ्याच गोष्टी चिनी लोकांसारख्या करायला लागलाय.

Pages