राजा राणीची गं जोडी

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 09:32

WhatsApp Image 2020-02-07 at 20.15.48.jpegकलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो Happy
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
सो, चला, करूया चर्चा या मालिकेवर Happy
फोटो : इन्स्टाग्राम

Group content visibility: 
Use group defaults

मुळात स्वराशी लग्न का केलं म्हणजे ठरवलं. तिचे वडील मोठेपणा करत असतात आणि त्यांच्याबद्दल खरं काय ते सांगणारे लोकही लग्नाआधी आलेले असतात ते मी बघितलं होतं पण पुढे त्यांनी खरं खोटं तपासलं की नाही ते माहित नाही.

हिरोच्या वडिलांनी स्वरा च्या शिक्षणासाठी तिच्या बाबांना पैसे दिलेले असतात आणि त्याची परतफेड म्हणून त्यांच्या एका मुलीला हिरोला द्यायचं कबूल करून घेतलेलं असत.

स्वरा शिकलेली, सुंदर असते त्यामुळे तीच रणजित साठी ठरवतात ,पण तीच तिसऱ्याच मुलावर प्रेम असल्याने ती लग्नाच्या आदल्या दिवशो पळून जाते.

नवरी मुलगी पळून गेल्याने दोन्ही घरात हाहाकार उडतो.पण अचानक हिरोला साक्षात्कार होतो की संजू त्याला आवडतेय. म्हणून तो ठरलेल्या मुहूर्तावर हे लग्न लावून देण्याचा प्रस्ताव शु गो कडे मांडतो . रादर आग्रह च धरतो त्यामुळे तोला मोलाची नसून ही संजू सून म्हणून घरात येते. मावशी आणि स्वतः हीरो सोडून कोणालाच हे पसंत नसत.
अशी आहे थोडक्यात स्टोरी.

Btw संजू ची हिरवी आणि कालची पिवळी दोन्ही साड्या खूपच डिसेंट होत्या. नाहीतर जनरली सिरीयल मध्ये दाखवतात श्रीमंती पण कपडे अगदीच फालतू . बेळगाव सिल्क , अति झगझगीत वैगेरे

पण ह्या सगळ्यात मेख आहेना एक की संजू सज्ञान नाहीये. ते कोणालाच माहिती नाहीये, हल्ली लग्न रजिस्टर करावं लागतं ना कम्पल्सरी, तिथे खोटी दाखवली का कागदपत्रे. जाउदे मी फार logical बोलतेय पण सहा महिने कठीण करून ठेवतील आणि उगाच त्या हिरोवर शेकेल. त्यापेक्षा सहा महिने मालिका पुढे नेलेली बरी. बघत नाही मी पण प्रोमोजमध्ये समजतं.

बाबा नी बर्थ डेट बदललेलं सर्टिफिकेट manage केलय संजू च्या . सो लीगली ती 18 ची आहे.
बाबा फारच पोचलेले दाखवलेत

अच्छा असं झालंय का, thank u हेमाताई. हो ते बाबा फार विचित्र वाटले, सतत धाक दाखवत असतात संजूला.

Btw संजू ची हिरवी आणि कालची पिवळी दोन्ही साड्या खूपच डिसेंट होत्या. नाहीतर जनरली सिरीयल मध्ये दाखवतात श्रीमंती पण कपडे अगदीच फालतू . बेळगाव सिल्क , अति झगझगीत वैगेरे

Submitted by मनीमोहोर on 18 February, 2020 - 14:30>>>> बेळगावी सिल्क फालतू का वाटते तुम्हाला? जरी नसेल आवडत तरी फालतू म्हणणे नाही आवडले Angry
आवड - नावड प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते, म्हणून काही लगेच फालतू म्हणायचे नसते.

बेळगावी झगझगीत सिल्क वाईट असं नव्हे पण श्रीमंती दाखवायची असेल तर कपड्यात का काटकसर ? नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा अस नको दाखवायला हे सांगण्याचा उद्देश होता. त्या अर्थाने फालतू लिहिलं होतं.

हे ह्या वरच माझं लास्ट लिहिणं

हिरॉइन चे बाबा जरा अतीच दाखवलेत, सतत पुढेपुढे आणि खोट्या बाता मारणारे...!
Btw संजू आणि रणजीत ची जोडी फार क्युट दाखवली आहे, त्यांचे सीन्स मस्त असतात एकदम Happy

Btw संजू आणि रणजीत ची जोडी फार क्युट दाखवली आहे, त्यांचे सीन्स मस्त असतात एकदम Happy>>>>> हो अत्ता बघतेय, संजू त्या रणजीत च्या मैत्रिणीला बोलण्यात गुंतवून हळूच घास भरवते

बेळगावी झगझगीत सिल्क वाईट असं नव्हे पण श्रीमंती दाखवायची असेल तर कपड्यात का काटकसर ? नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा अस नको दाखवायला हे सांगण्याचा उद्देश होता. त्या अर्थाने फालतू लिहिलं होतं.>>>>>सहमत ममो

जीव झाला येडापिसा आणि ह्या सिरीयलची भाषा जरा सारखी आहे, खुळ्या डोस्क्याची आणि लडतर हे शब्द राजा राणीची जोडी मध्ये पण ऐकले काल परवा.

कालचा भाग ही खूप सुंदर रीतीने घेतला होता. नवपरिणीत जोडी आणि मिळालेला एकांत ... कालचा भाग मर्यादा न ओलांडता छोट्या पडद्यावर रंगतदार करणं खूप अवघड होतं खर तर पण दोघांचे ही फ्रेश चेहरे, उत्तम अभिनय, पोषक संवाद , चांगला सेट, चांगले कपडे ह्या सगळ्या मुळे मस्तच झाला.

संजू रूढार्थाने बघितलं तर सुंदर नाहीये पण चेहरा खूप बोलका आहे तिचा. अभिनय छान करतेय खूप.

संजूच्या कालच्या साड्या ही छान होत्या. साडी नेसलेली , केसांचा अंबाडा घालून त्यावर गजरा घातलेली संजू फारच गोड दिसते.

कालचा भाग ही खूप सुंदर रीतीने घेतला होता. नवपरिणीत जोडी आणि मिळालेला एकांत ... कालचा भाग मर्यादा न ओलांडता छोट्या पडद्यावर रंगतदार करणं खूप अवघड होतं खर तर पण दोघांचे ही फ्रेश चेहरे, उत्तम अभिनय, पोषक संवाद , चांगला सेट, चांगले कपडे ह्या सगळ्या मुळे मस्तच झाला.

संजू रूढार्थाने बघितलं तर सुंदर नाहीये पण चेहरा खूप बोलका आहे तिचा. अभिनय छान करतेय खूप.>>>>>>>>>> +++++++++++++++१११११११११
संवाद खर च छान लिहिलेत..... कोणी लिहिलेत...... भाषेचा लहेजा खुप छान कॅरी करतात दोघे ही.... आणी ईतर कलाकार...

ही सिरियल बघत नाही.पण इथल्या पोस्ट नेहमी वाचते.त्यावरून नवी जोडी खूपच छान आहे,अस कळत.त्यावरून सहज वाटून गेल की संजू तुपारे मध्ये ईशा असती तर अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली असती का?म्हणजे लिहिणार्याने आव्हानात्मक सीन लिहिले असते.
आश्चर्य आहे,कलर्सला असे अभिनय येणारे नवीव चेहरे मिळतात,झीमला का मिळत नाहीत?

आज सासूबाईंचा रिपीट न बघता मी याचा बघितला, ईतका कंटाळा आलाय आसवारीच्या लाडे लाडे बोलण्याचा आणि तिकडे ती राधिका Angry

कालचा भाग ही खूप सुंदर रीतीने घेतला होता. नवपरिणीत जोडी आणि मिळालेला एकांत ... कालचा भाग मर्यादा न ओलांडता छोट्या पडद्यावर रंगतदार करणं खूप अवघड होतं खर तर पण दोघांचे ही फ्रेश चेहरे, उत्तम अभिनय, पोषक संवाद , चांगला सेट, चांगले कपडे ह्या सगळ्या मुळे मस्तच झाला.
>> +100% सहमत मनिमोहोर तुमच्या पोस्टशी.
संजू आणि रणजीत साकारणारे दोघेही कलाकार नवीन असूनही नवखे वाटत नाहीत, सहज करतात अभिनय अगदी!! हिरोवर तर मी फिदा आहे, त्याचं हसणं सुरेख आहे, पर्सनॅलिटी मस्तच आहे त्याची..
आणि संजूचे डोळे खूप बोलके आहेत ! नुसतं सौंदर्य काय उपयोगाचं?? तुपारे ची गायत्री सुंदर आहे पण अभिनयाचं काय करायचं?? त्यातून सुबोध भावे समोर तर ती अगदी चिल्ली पिल्ली वाटते..,
त्यामानाने संजूचा चेहरा स्मार्ट आहे आणि अभिनयही मस्त करते, त्यामुळे अजून छान दिसते ती... Happy

होय प्रत्येक एपिसोड गणीक अजून आवडत जाताएत, अजून काल आणि आजचा एपि बघायचाय.जरा माणसांसारखे डायलॉग ऐकून आणि नॅचरल अॅक्टिंग बघून बरं वाटतंय Happy

जरा माणसांसारखे डायलॉग ऐकून आणि नॅचरल अॅक्टिंग बघून बरं वाटतंय Happy >> अगदी अगदी

सिरीयल मध्ये जनरली हिरॉईन पहाटे उठून , अंघोळ (ती ही केस धुवून ) करून फ़ुलं तयार होऊन गाढ झोपलेल्या हीरो ला उठवायला येते. इथे मात्र संजू केस ही नीट न बांधलेली , रात्रीच्या कपड्यात च दाखवली आहे.

मला पण आवडते आहे. शुभांगी गोखले एकदम वेगळ्या भुमिकेत आहेत त्यामुळे मालिका बघणं सध्यातरी मस्ट आहे Happy

कालचा भाग ही खूप सुंदर रीतीने घेतला होता. नवपरिणीत जोडी आणि मिळालेला एकांत ... कालचा भाग मर्यादा न ओलांडता छोट्या पडद्यावर रंगतदार करणं खूप अवघड होतं खर तर पण दोघांचे ही फ्रेश चेहरे, उत्तम अभिनय, पोषक संवाद , चांगला सेट, चांगले कपडे ह्या सगळ्या मुळे मस्तच >>>>>>>>>>खरंच, बघितला अत्ताच हा आणि पुढचा एपिसोड, कोणीही प्रेमात पडेल असा आहे रणजीत ढालेपाटील! किती छान घेतलाय अख्खा सीन. बाकीच्या सिरीयल च्या डायरेक्टर, रायटर्स नी जरा ह्याची ट्युशन लावा की. पिक्चर पेक्षा ही भारी आहे हे

संजू रूढार्थाने बघितलं तर सुंदर नाहीये पण चेहरा खूप बोलका आहे तिचा. अभिनय छान करतेय खूप.>>>>

खूप खूप सहमत गं... मला खूप आवडली ती मुलगी. भारतीय मतांनुसार जे हिरोइन मटेरियल असते त्यातले तिच्यात काहीही नाही पण तरीही खूप छान वाटते ती. मला ती जोडी व तो हिरो खूप आवडला. हिरोला सिनेमात पण चान्स मिळायला हवा. सणसणीत उंच, तगडा देखणा व मुख्य म्हणजे अभिनयाची जाण आहे.

मला सगळे भाग बघायला मिळत नाहीत, गावी असताना एक दोन भाग बघितले आणि आवडले. आता नेटवर फॉलो करेन. काल पोलीस driving लायसेन्स विचारताना दाखवलंय... Happy

साधना, voot वर बघा सगळे भाग. मला पण आवडते ही सिरीयल. मला हिरोइनच्या बाबांचे कामही खूप आवडले. असतात अशी माणसे.

Pages