दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विचारा की त्यांना. तुम्हाला जमत नसेल फडण२० किंवा प्रवीण दरेकराना सांगा विचारायला.

नवीन Submitted by भरत. on 15 January, 2020 - 12:09 >>>

ते विचारतीलच... पण इथे सिलेक्टीव्हली फुदकणार्या दुतोन्डी फुरोगाम्यांना विचारयचं काम मी करतोय.

भाजपाने कमी आमदार असतानाही अनेक राज्यात सत्ता स्थापन करुन दाखवली. मात्र १०५ जण निवडुण येउनही फडणविस फेल गेले. नेता हा हुशार हवा चांगल्या स्थितीमध्ये कुणीही चालुन जाते मात्र वाईट स्थितीत पक्षाच्या नेत्याचा कस लागतो. महाराष्ट्रातील साधारण नेत्रुत्व क्षमतेने एक मोठे राज्य हातचे जाउन फक्त हात चोळत बसायची पाळी भाजपवर आली.

कडक गांजा मारणारी व्यक्ति अशी विधाने करु शकतात.

Submitted by प्रसाद... on 15 January, 2020 - 13:05 >>>

प्रसादभौ , मला तसं वाटत नाही. ती व्यक्ती नॉर्मलीच तशी वागते , It is his natural behavior.

>>> आता हे व्रुत्तपत्रांत आलं म्हणुन नवाब मलिक एक्शन झाली पाहिजे वगैरे बोलत आहेत पण त्यासाठी अट काय? तर त्या मार खाणार्यांनी पोलीसांकडे जावं .. >>>

मारहाणीचे इतके बेशरम समर्थन हाडाचे गांधीवादी असलेले भरत मयेकरच करू शकतात.

>>> महाराष्ट्रातील साधारण नेत्रुत्व क्षमतेने एक मोठे राज्य हातचे जाउन फक्त हात चोळत बसायची पाळी भाजपवर आली. >>>

महाराष्ट्रातील असाधारण नेतृत्व, चाणक्य वगैरे असलेले आयुष्यभर हात चोळत का बसले?

सत्ताधारी पक्षाचे समर्थक कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असल्याचं चित्र भाजपच्या बाबतीतच दिसू शकतं.
स्वत.च्या पक्षाच्या सरकारच्या कामगिरीबाबत बोलण्यासारखं काही नसल्याने कुठे प्रश्र्न विचारायला मिळतोय का ते बघतात.

कोटावर प्रश्न घेऊन नाचत होते, ते राजकोटची बातमी आल्यावर गप बसले.

देशातील सर्वात जुन्या पक्षाला केंद्रात आणि राज्यात ५० ची संख्या पार करता आली नाही.
त्यांनी शहाणपण शिकवू च नये.
दोन्ही यादव (लालू,मुलायम),,, मायावती,इथे वंचित सर्व निवडणुकी मध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात हरले त्यांनी फडणीस ना वर टीका करूच नये

तो मूर्ख केजरी निर्भया च्या बलात्कारी लोकांना वाचवायला निघाला आहे आणि इथे अती हुशार त्या मूर्ख केजरी चे गुणगान गात आहेत.

भारत चष्मा काढा
आणि बिनकामाचे पक्ष आणि नेते ह्यांचे गुणगान थांबवा.
नाही तर भविष्यात तुमच्या वर पण पश्र्चाताप करायची वेळ येईल

दिल्लीत फडणविस- तिवारी जोडगळी काय चमत्कार करते ते बघणे मनोरंजक असेल. परंतु खरा सामना केजरीवाल वि. मोदी यांच्यातच असेल.

तुमच्या पक्षाने बलात्कारी सेनगरला वाचवायला काय काय केलं ते दिसेना होय?
तो चिन्मयानंद की कोण, तोही तुमच्याच पक्षाचा.

भरत
तुमचे काय मत आहे .
बलात्कार करून अमानवीय पद्धतीने ठार मारलेल्या आरोपींना वाचवले पाहिजे.
हो किंवा नाही एवढेच उत्तर ध्या.

>>> कोटावर प्रश्न घेऊन नाचत होते, ते राजकोटची बातमी आल्यावर गप बसले. >>>

योगेश सोमणची आणि मलिकच्या भावाची बातमी आल्यावर तुम्ही व तुमचे विचारजंत साथीदार गप्प बसले तसंच का?

>>> भरत
तुमचे काय मत आहे .
बलात्कार करून अमानवीय पद्धतीने ठार मारलेल्या आरोपींना वाचवले पाहिजे.
हो किंवा नाही एवढेच उत्तर ध्या. >>>

आरोपी शांतताप्रेमी पंथाचे असतील तर वाचवलंच पाहिजे. सहिष्णु धर्माचे असतील तर अजिबात वाचवायचं नाही.

- भरत मयेकर

स्पष्ट लिहा.
तुमची गत किशोर सम्रितेसारखी व्हायला हवी आहे का तेही सांगा.

परंतु खरा सामना केजरीवाल वि. मोदी यांच्यातच असेल.
Submitted by सचिन पगारे on 15 January, 2020 - 13:52 >>>

मला तर हा धागा निघाल्यापासुन श्री सचिन पगारे व श्री राहुल गांधी यान्च्यातच खरा सामना चालु झालेला दिसतोय आणि त्यात श्री पगारे यांची सरशी होतेय असे सध्या तरी दिसत आहे.

पुरोगामी, माझ्या नावाने लिहिलेली पोस्ट डिलीट करा .

Submitted by भरत. on 15 January, 2020 - 14:04

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी !

राष्ट्रीय जावई श्री रॉबरट वड्रा यांनी ईडी पुढे म्हटलेय की त्यांनी ज्या जमीनी घेतल्या त्यासाठी पैसा कुठुन आला हे त्यांना आता आठवत नाही व त्या जमीनी त्यांनी गूगल वर पाहून पसंत केल्या होत्या !

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/robert-vad...

काय "सिलेक्टीव" मेमरी आहे ! गूगल मॅप आठवणीत आहे, पण पैसा कुठुन आला ते विसरला. कॉन्ग्रेसवाल्यांचं आणि त्यांच्या चेल्यांचं सगळंच सिलेक्टीव असतं असं दिसतंय ....

आपले नागरिकत्व भारताचे आहे हे सुद्धा बरेच कॉंग्रेसी विसरतात आणि पाकिस्तान, चीन अशा भारताच्या शत्रूंना पाठिंबा देतात.

नवाब मलिक च्या भावाने आपल्या मराठी बांधवांना (मग ते कोणत्याही पक्षाचे कोणत्याही जातीचे असू ध्या,)मारहाण केली आहे
त्याचे कसले समर्धण करताय.

आपले नागरिकत्व भारताचे आहे हे सुद्धा बरेच कॉंग्रेसी विसरतात आणि पाकिस्तान, चीन अशा भारताच्या शत्रूंना पाठिंबा देतात.

हा एकदम योग्य निष्कर्ष.
शेख चिल्ली सारखे ज्या फांदी वर बसले आहेत तीच फांदी तोडायला निघालेत.

Pages