दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>> अभाविप गु़डांबाबात सरकार मवाळच काय ,दयाळू आहे.
दिल्ली पोलीस आणि अभाविप यांची युती झाली आहे.
अभाविप वाल्यांनी tweet केलेलेच फोटो दिल्ली पोलीस पुरावा म्हणून दाखवतात. >>>

गुंड डाव्या संघटनांचे होते. विद्यापीठात रस्त्यावर सर्वांदेखत चेन काढून मुतणारा टग्या कन्हैयाकुमार त्यांच्या बाजूने आला यातच सर्व काही आले.

कन्हैयाकुमार व त्याच्या टोळक्याने कोणाच्याही अध्यातमध्यात नसणाऱ्या मकरंद परांजपे नावाच्या प्राध्यापकांना खूप त्रास दिला होता. त्यांनी गांधीवादी मार्गाने विरोध करून विद्यार्थ्यांचे पाय धरल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/fyi/story/jnu-profess...

३ महिन्यांपूर्वी उमेश कदम हे प्राध्यापक गंभीर आजारी असताना ज. ने. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या खोलीत तपासणीसाठी डॉक्टरांना जाऊ दिले नव्हते व ऍंम्ब्युलन्स सुद्धा अडवून ठेवली होती.

https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/delhi-news/jnu-students-block-...

एकंदरीत नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांचे टगे अत्यंत माजलेले गुंड आहेत.

पुरोगामी भाऊ असं काही म्हणू नका. ते टगे इथल्या चाटू पिलावळीचे रोल मॉडेल आहेत, म्हणूनच फ्लीप केलेला एक फोटो कुणीतरी टाकल्यावर लगेच समूह गान सुरू झाले ...

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), अलिगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU), आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ (JMIU)

ह्या विद्यापीठांमधला शैक्षणिक पॅटर्न बघितला, तर असे दिसून येते की, विद्यापीठात प्रवेश मिळाल्यावर किती वर्षांत शिक्षण पूर्ण करायचे, ह्याला कुठलेच बंधन नाही, १६-१७व्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेऊन, वयाची ४०-४५ वर्षे झाली, तरी तुम्हाला शिक्षण चालू ठेवता येते. आणि शैक्षणिक शुल्क आणि हॉस्टेल शुल्क बघितले, तर २००-३०० रुपयांत जेवणखाण, रहाणे, शिकणे, हे आरामात होते... वरती अभ्यास करायची कुठलीच सक्ती नाही... म्हणजेच थोडक्यात, शिक्षणाच्या नावाखाली, वर्षानुवर्षे अन्न आणि निवारा पुरवणारी संस्था, असे स्वरूप ह्या विद्यापीठांना आलेले आहे...

जर करदात्यांच्या पैशांवर फुकटात आयुष्य घालवता येत असेल, तर अश्या ठिकाणी समाजविघातक तत्वे शिरली नाहीत, तरच नवल... आणि गेल्या काही महिन्यांत समोर आलेल्या बातम्या आणि फोटो बघितले, तर आपापल्या लैंगिक गरजा पुरवण्याचीसुद्धा सगळी सोय हे विद्यार्थी विद्यार्थिनीच परस्पर आणि उघडउघड लावून घेत असल्याने, 'विद्यार्थी' ह्या कॅटेगरीतून बाहेर यायची कुठलीच गरज उरत नाही...

ह्या अश्याच युनिव्हर्सिटीजचे कँपस आणि हॉस्टेल्स, मग स्युडो-लिबरल्स, स्युडो-सेक्युलर्स आणि टुकडे गँग तयार करण्याचे कारखाने बनतात आणि ह्याच समाजविघातक शक्तींना हाताशी धरून डावे, अर्बन नक्षल्स आणि काँग्रेसी, आपापला अजेंडा राबवून घेतात...

एकीकडे CAA आणि NRC भारतात राबवले जायला लागल्यावर डावी आणि काँग्रेसी इकोसिस्टिम संपून जाईल ह्या भीतीने डावे, अर्बन नक्षल्स आणि काँग्रेस, ह्या युनिव्हर्सिटीजमधल्या ह्या समाजविघातक शक्तींना आणि विकल्या गेलेल्या प्रसारमाध्यमांना हाताशी धरून देशभरात गोंधळ आणि अशांतता माजवायचे प्रयत्न जीवतोडून करत आहेत, आणि दुसरीकडे ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षणच घ्यावे, त्यांना समाजविघातक कृत्ये करताच येऊ नयेत, म्हणून प्रवेशाच्या नियमांत बदल करणे आणि जवळजवळ फुकट असलेल्या हॉस्टेल फॅसिलिटीजच्या फीज थोड्या वाढवणे, हे सरकारने सुरू केल्याने, ऐशोआरामात जगणारे विद्यार्थी बिथरले आहेत...

त्यामुळे वरवर पाहता हे आंदोलन CAA विरोधी दिसत असले, तरी त्यामागे आपले अस्तित्वच संपण्याची भीती निर्माण झालेली डावी आणि काँग्रेसी इकोसिस्टिम आणि आपली आयुष्यभराची ऐय्याशी बंद होताना दिसत असल्याने बिथरलेले विद्यार्थी, हे आपापली उद्दिष्ट साध्य करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे वास्तव आहे.

आज के शिवाजी : नरेंद्र मोदी))))) पुस्तक मनोरंजक असेल. पुढे मागे शालेय अभ्यासक्रमातही कंपलसरी होईल.

दरम्यान, पेरियार वसतिगृहात आणि सर्व्हर रूममध्ये तोडफोड करणाऱ्या संशयितांची नावे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली. त्यानंतर साबरमती आणि पेरियार वसतिगृहात घुसून हल्ला करणाऱ्या टोळक्यातील एका मुलीची ओळख पटली आहे. एका व्हिडीओमध्ये साबरमती वसतिगृहात एक मुलगी हातात काठ्या असलेल्या दोन सहकाऱ्यांसह धमक्या देत आहे. चौकडी शर्ट घातलेल्या या मुलीने स्वतःचा चेहरा निळ्या रंगाच्या स्कार्फने बांधलेला होता. ही मुलगी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. तिचे नाव कळू शकले नाही. मात्र, ती अभाविपची (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) सदस्य असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण, ती घरी नव्हती. तिचा फोन बंद असून, पोलिसांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/jnu-violence-police-identify-m...

ब्लॅक कॅट
ह्यांना एकाच डोळ्यांनी दिसते त्या मुळे त्यांना दुसरी बाजू दिसत नाही.

JNU मध्ये अश्या हिंसक माऱ्यामाऱ्या पहिल्यापासूनच होतात. वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या पक्षांशी जोडलेल्या आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे तिथे वर्चस्व आहे. सध्या राजकारणी लोक आपापली पोळी भाजून घेत आहे. मीडिया टीआरपी वाढवत आहे. सेलिब्रिटी सवंग लोकप्रियता मिळवत आहेत. आणि हा सगळा धुरळा दिल्ली निवडणूक झाल्यावर आपोआप खाली बसेल. आणि पुन्हा दुसऱ्या कुठल्या निवडणुका आल्या की पुन्हा उडेल.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=788710718207707&id=455685484...

मी काय म्हणतो
ते दिल्ली असे शुद्ध लिहा ना, वाचताना त्रास होतोय...आशुचँप...... ते मुद्दाम तसं लिहीताय खालच्या ओळी बघा.

सत्तेचे सम्राट विरुध्द लोकल नेता हा संग्राम मनोरंजक होणार आहे.पण शेवटी मोदीच जिंकतील.कारण दिल्लीची कायदा सुव्यवस्था ही केंद्रसरकारच्या अखत्यारीत येते. आणी दिल्लितली कायदा सुव्यवस्था ही नावाजण्यासारखी आहे.

करिन काडीरे

हा JNU चा इतिहास म्हणता येणार नाही पण थोडीफार माहिती मिळते त्यातून बऱ्याचश्या गोष्टी समजतात. अजुन कुणाकडे याबद्दल माहिती असेल तर वाचायला आवडेल. लिंक पहा. https://jagatapahara.blogspot.com/2020/01/blog-post_11.html

काय लोकांना जेलसी असते यार, एका ओळीच्या वर जिलेबी पाडु न शकणारी विठु नायकीण गेले कित्येक वर्षे लेख लिहिणार्या अभ्यासु वरिष्ठ पत्रकारांना एकेरी नावाने उल्लेखते !

@ मी-माझा, या लोकांचे डोळे पूर्ण झापडबंद आहेत. तिकडे तो नवाब मलिक , मोदीं ना लाथ घालुन हुसकावुन द्या असे म्हणतो, आधी या घरभेद्यांनाच हाकलले पाहीजे.

तिकडे तो नवाब मलिक , मोदीं ना लाथ घालुन हुसकावुन द्या असे म्हणतो, आधी या घरभेद्यांनाच हाकलले पाहीजे.>>>>+१००००.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणे देशहितासाठी अत्यावश्यक आहे.
जेएनयू ला टाळे ठोकले पाहिजे आणि कन्हैया कुमारच्या टुकडे टुकडे टोळीला अंधारकोठडीत टाकले पाहिजे

भाजपाने राष्ट्रपती पुरस्कार दिलेला काश्मिरी पोलीस अतिरेकी निघाला, त्याला पकडले का ?

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसह जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्याच पोलीस उपअधिक्षकाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या या पोलीस उपअधिक्षकाला राष्ट्रपती पदक पुरस्कारानेही गौरवण्यात आलेलं आहे. देविंदर सिंह असं या पोलीस अधिक्षकाचं नाव असून ते एअरपोर्ट सिक्युरीटीसाठी तैनात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्यासाठी देविंदर सिंह मदत करत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांनी कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंडच्या मीर बाजार परिसरात दहशतवाद्यांसोबत कारने जात असताना देविंदर सिंह यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यासोबत सैय्यद नवीद मुश्ताक उर्फ नवीद बाबू आणि आसिफ राथर या दोन दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आलीये. पोलीस उपअधिक्षक देविंदर सिंह यांना गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पुरस्काराने गौवरविण्यात आलं होतं. त्यावेळी ते जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एन्ट्री हायजॅकिंग पथकात कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली होती. याआधी 2001मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर देविंदर सिंह यांचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी ते पोलीस निरीक्षक असताना स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये सामील होते. अँटी टेरर ऑपरेशननंतर त्यांचे प्रमोशन झाले. त्यानंतर त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी नाविद हा हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर असून राथर हा तीन वर्षांपूर्वीच दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सिंह यांना अटक केल्यानंतर तात्काळ त्यांच्या घरी छापा मारण्यात आला असता त्यांच्या घरी ५ ग्रेनेड आणि ३ एके ४७ सापडल्या आहेत. अटक केलेल्या पोलीस उपअधिक्षकाकडे कसून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/top-jammu-kashmir-police-offic...

भाजपाने राष्ट्रपती पुरस्कार दिलेला काश्मिरी पोलीस अतिरेकी निघाला, त्याला पकडले का ?
Submitted by BLACKCAT on 13 January, 2020 - 16:23
>><<

तुम्ही बातम्या इथे कॉपी-पेस्ट करण्याआधी स्वत: वाचता का ?
राष्ट्रपती पदक त्या पोलिसाला का दिले गेले ह्याचा स्पष्ट उल्लेख वरिल बातमीत आहे व तो पकडला गेला आहे की नाही ह्याचा देखील.

सध्या ट्विटरवर काँग्रेस थयथयाट करत आहे की केजरीवाल संघी आहेत व मोदींसाठी काम करतात. 2017 मध्येही काँग्रेस हेच बोलत होती. दिल्ली काँग्रेस अधिकृत ट्विट-
https://www.twitter.com/incdelhi/status/853876965014552577?lang=en
मग आता पगारेंचं केजरी विरुद्ध मोदी निवडणुकीचे स्वप्न कसं पूर्ण होणार?

खरे तर दिल्ली हे पूर्ण राज्य नाही.
बाकीच्या राज्यांच्या राज्य सरकारनं जेवढे अधिकार आहेत तेवढे दिल्ली सरकार ला नाही.
पूर्ण राज्य सिटी स्टेट आहे.
त्या मुळे समस्या पण शहरी च आहेत.
उदा.
वाढती लोकसंख्या आणि प्रचंड गर्दी.
सार्वजनिक वाहतुकीचे तीन तेरा.
अनधिकृत बांधकाम आणि त्या मधून आग
लागण्या सारख्या घटना आणि होणारी मनुष्य हानी
वाढती गुन्हेगारी.
आणि सर्वात महत्त्वाची समस्या प्रचंड प्रदुषण
धोक्याच्या पातळी पेक्षा किती तरी जास्त प्रदुषण.
.एवढ्या समस्या आ वासून उभ्या आहेत.
कसले केजरी आणि मोदी करताय .
सर्व पक्षांनी मिळून शहर वाचवायला प्राधान्य द्या.
नाही तर इथे शहर होत असे सांगायची वेळ येईल.
आणि फक्त बकाल वस्ती असलेलं ठिकाण हीच देशाच्या राजधानीची ओळख जगात निर्माण होईल.

https://lokmat.news18.com/national/upsc-ies-2019-result-18-jnu-students-...

जे एन यु - यु पी एस सी टॉपर
काना कुमार सारख्या प्रवृत्ती चा सर्वांना तिटकारा आहे .
Jnu la badnam kanha kumar sarkhi mandali karat आहेत..
जे गुणी आहेत त्यांच्या विषयी तक्रार असण्याचा प्रश्न च नाही

नवीन Submitted by BLACKCAT on 13 January, 2020 - 16:23 >>
बी सी , मला तुमचं दु:ख समजतं व मी तुमच्या दु:खात सामील आहे. या देशाला फितुरीचा शाप प्राचीन काळापसुन आहे. अगदी हल्लीचच उदाहरण घ्यायच तर एका जाणत्या नेत्याने म्हणे एका कुख्यात दहशत्वाद्याला स्वतःबरोबर विमानातुन नेले ! त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे देशाच्या एका राष्ट्रीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने, जो पंतप्रधान पदी होता, त्याने भोपाळ वायुकांडाला जबाबदार पांढरपेशा दहशत्वाद्याला अनधिक्रुतरित्या स्वतः हेलीकोप्टर मधुन त्याच्या देशात जाण्यासाठी सोडले.

Pages