दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

India lost $1.3bn due to 4,196 hours of no internet
India was the third worst-hit economy worldwide after crisis-hit Iraq and Sudan thanks to state-imposed shut downs across Jammu & Kashmir, Arunachal Pradesh, Assam, Meghalaya, Rajasthan, UP and other regions, shows the report. An average of 8.4 million internet users were impacted across the multiple incidents, it said.

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/economy/finance/india-lost-1-3...

शांतता हवी की इंटरनेट.
चीन सारख्या देशात व्हॉटसअप ,फेस बुक वर बंदी आहे कायम स्वरुपी.
दुबई आणि इतर काही देशात व्हॉट्स ऍप calling var bandi aahe.
सर्वोच्च न्यायालय म्हणतेय तर काश्मीर मध्ये नेट चालू करा.
पण व्हॉटसअप,फेसबुक, यू ट्यूब,बाकी सर्व ऍप सरकारी सोडून बंद करा .
जो पर्यंत कश्मिरी लोकांचा हिंदुस्थान विरोध पूर्ण नष्ट होत नाही तो पर्यंत.
त्याच बरोबर tv channels sudha band kara.

India lost $1.3bn ... गरीबी वाधली की शांतता आपोआप ढासळते. सध्या सुरु असलेली आंदोलने त्याचेच द्योतक आहे.

>>> गरीबी वाधली की शांतता आपोआप ढासळते. सध्या सुरु असलेली आंदोलने त्याचेच द्योतक आहे. >>>

म्हणून तर माबोवर विदूषकभक्तांचा थयथयाट वाढला आहे.

मायबोली ही अमेरिकेतील सोशल साइट आहे. तिथे काय चालल्ते ह्याच्याशी भारतातील गरीबांना घेने देणे नसते, रोजगार धंदा बुडाला की चोर्‍या मार्‍या इथपासुन ते दंगली जाळपोळ इथपर्यंत गोष्टी घडु शकतात. म्हणुनच जगभरातील लोक / नेते अर्थव्यव्सस्था सांभाळन्याचा कसोशीने प्रयत्न करतात. गरीबी तुमच्यापसुन कोसो दुर असल्याने तुम्हाला हिंदु मुस्लिम, कश्मीर असे प्रश्न जास्त महत्वाचे वाटतात.

{जो पर्यंत कश्मिरी लोकांचा हिंदुस्थान विरोध पूर्ण नष्ट होत नाही तो पर्यंत.
त्याच बरोबर tv channels sudha band kara.}
काश्मीर हे भारताची वसाहतच आहे म्हणजे.

>>> मायबोली ही अमेरिकेतील सोशल साइट आहे. तिथे काय चालल्ते ह्याच्याशी भारतातील गरीबांना घेने देणे नसते, >>>

संकेतस्थळाची नोंदणी अमेरिकेत असली तरी बहुसंख्य सदस्य भारतात आहेत. ते अचानक गरीब झाल्याने माबोवर थयथयाट सुरू आहे.

रोजगार धंदा बुडाला की चोर्‍या मार्‍या इथपासुन ते दंगली जाळपोळ इथपर्यंत गोष्टी घडु शकतात. म्हणुनच जगभरातील लोक / नेते अर्थव्यव्सस्था सांभाळन्याचा कसोशीने प्रयत्न करतात. गरीबी तुमच्यापसुन कोसो दुर असल्याने तुम्हाला हिंदु मुस्लिम, कश्मीर असे प्रश्न जास्त महत्वाचे वाटतात.))))))) अगदी सहमत...इथले बरेचसे आयडी तर काश्मिरी पंडितांचाच विचार करत बसतात. पायाखाली काय जळतय इकडे लक्षच नसत.

>>> इथले बरेचसे आयडी तर काश्मिरी पंडितांचाच विचार करत बसतात. पायाखाली काय जळतय इकडे लक्षच नसत. >>>

आणि उरलेले अफजल सारख्या अतिरेक्यांचा विचार करीत बसतात.

India lost $1.3bn ... गरीबी वाधली की शांतता आपोआप ढासळते. सध्या सुरु असलेली आंदोलने त्याचेच द्योतक आहे.
नवीन Submitted by रेवा२ on 10 January, 2020 - 16:37
<<

गरीबी वाधली ??
राष्ट्रीय विदुषकाच्या आज्जीने १९७१ साली "गरिबी हटाव"चा नारा दिला होता तरीही "गरीबी वाधली" कमालच आहे !
---
आजपर्यंत देशात गरिब राहिला असेल तर
१९७१ ते मे. २०१४; अधली मधली काही वर्षे सोडून, पूर्ण वेळ कॉंग्रेसी सरकार देशावर राज्यावर राज्य करत होती तरीही पाकिस्तान प्रेमी, अर्बन नक्षली व तुकडे गॅंग "गरिबी" च्या नावाने हिंसक आंदोलने करत असतील तर त्यांनी ती आंदोलने राष्ट्रीय जोकरच्या घरी करावी.

Budget 2020: Niti Aayog shocker; Poverty, hunger and income inequality up in 22 to 25 States and UTs
Forget GDP growth rate for the moment. Niti Aayog's SDG Index 2019, released on December 27, 2019, says that more Indians have fallen into poverty, hunger and income inequality in the past two years. This is after a remarkable reduction in poverty between 2005-06 and 2015-16

https://www.businesstoday.in/union-budget-2020/news/budget-2020-niti-aay...

माझ्या मते ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आज एक देश गरीब नसेल तरी, भविष्यात चुकिच्या धोरणांमुळे तो देश गरीबीत धकलला जाउ शकतो. उदा. कोल्हापुर. तो जिल्हा आज श्रीमंत आहे पण उद्या साखर उद्योग आणि तिथले लहान सहान उदुओग बंद पडले तर तो गरीबीच्या खाइत जाउ शकतो.

आणि उरलेले अफजल सारख्या अतिरेक्यांचा विचार करीत बसतात.
नवीन Submitted by पुरोगामी on 10 January, 2020 - 17:24
<<

पार्श्वभागावर तेल लावलेल्या बांबुचे फटके पडल्यानंतर "हर घरसे अफजल निकलेगा" ह्या घोषणा जे.एन.ऊ.तील अफजल प्रेमी गॅंगने द्यायच्या बंद केल्या आहेत असे ऐकले.

लिंका डकवुन काही फायदा नाही.बेरोजगारी, गरीबी त्यामुळे वाढलेले गुन्ह्यांचे प्रमाण, अराजकता, उपासमार हे इश्यु बाजुला राहीलेत आणी पोट भरलेल्या लोकांचे इश्यु देशात चर्चेत आहेत.गरीबी कुणीही हटवु शकत नाही त्याची कारणे वेगळी आहेत.पोट भरलेल्यांचे फ्रिज तुडुंब भरुन वाहत आहेत तर गरीब हा अतिगरीब व मध्ममवर्गिय गरीबात ढकलला जात आहे.आता तर ते परदेशी नागरिकही आणायच घाटतय.'घरच झाल थोड नि व्याह्यानी धाडलय घोड' असा प्रकार चालु आहे.

India lost $1.3bn due to 4,196 hours of no internet

Joke of Century))))))) खरच विनोदच झालाय अर्थव्यवस्थेचा युनिस तुमच्याशी सहमत.

>>ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मोदी ऊभे राहीलेत का मु.मं पदासाठी? अरे वा! माहित नव्हते. चालू देत... अजून एक करमणूक. फक्त या वेळी चाणक्याचे नाव जरा नविन शोधा हो.. पवारांना पण कंटाळ आलाय या पब्लिसिटी चा.

मी काय म्हणतो
ते दिल्ली असे शुद्ध लिहा ना, वाचताना त्रास होतोय

अहो निवडणुका म्हटले तर मोदीच मुख्य प्रचारक असतात भाजपचे..बघा च तुम्ही कशा प्रचारसभा दाणुन सोडतील..केजरीवाल विरुध्द मनोज तिवारी असा सामना म्हणण्यात काही अर्थ नाही. सामना केजरीवाल वि. मोदीच असणार आहे. ताकाला जाउन भांड लपवण्यात काय अर्थ आहे..तिवारींना निवडणुकांची डेट आधीच माहित होती त्यामुळे ते पुर्ण तयारीत असतील.केजरीवाल ल इतर पक्षांना डेटची पुर्वकल्पना नव्हती..येथेच भाजपाने मोठी बाजी मारलिय.

पगारे Biggrin उपरोधाचा प्रयत्न चांगला जमलाय, अभिनंदन!

आता माझे २ पैसे.
१. भाजप ही निवडणुक फार जोर करुन लढवत नाहीये. स्टँडर्ड प्रोसेस म्हणून प्रचार सुरु आहे इतकंच. तरी पण जिंकले तर फायदा आहेच. पण हरले तरी केजरीवाल जिंकले (काँग्रेस हरली) तरी भाजपच्या पथ्यावरच पडेल. केजरीवाल दिल्लीत पुन्हा ५ वर्ष अडकून राहतील. जिथे जिथे भाजप ३ नंबरवर आणि काँग्रेस- आप लढत असेल तिथे उजवे मतदार आपकडे जाणार असा माझा अंदाज आहे.
२. ही निवडणुक मोदी बनाम केजरी अशी भाजप-आप दोघेही होऊ देणारच नाहीत. (सॉरी पगारेजी!). केजरीवाल सध्या स्वतःला एक रिजनल लीडर म्हणून प्रोजेक्ट करत आहेत. आपण मोदींचे स्पर्धक नाही असं म्हणत स्थानिक मुद्द्यांवरच ही निवडणुक लढवली जाणार आहे. आणि एका स्थानिक मुद्द्यांवरच्या छोट्या निवडणुकीशी मोदींना काय घेणं ही भाजपची भूमिका दिसते आहे. त्यातून ३७० च्या वेळी केजरीवाल मोदींसोबत उभे राहिले होते हे मोदीही विसरु शकत नाहीत. आताच्या दिल्लीत चाललेल्या प्रकारातूनही केजरीवालनी अंग काढून घेतलंय. अन्यथा ते आणि 'आप'वाले भरपूर आक्रस्ताळेपणा, उपास आणि काय काय कॉमेडी प्रकार करु शकले असते.
३. देशाच्या राजकारणात सध्या महत्वाचे बदल होत आहेत. सध्या भाजप विरुध्द पॉलिटिकल इस्लाम असा सामना दिसतो आहे. कॅब-काश्मिर बद्दलच्या आंदोलनात मुस्लिम धार्मिक घोषणा देण्याबद्दल कुरकुर करणार्‍या थरुरसारख्या काँग्रेसी नेत्याला ज्या प्रकारे गप्प करण्यात आलं त्यातून हा बदल अधोरेखित झाला. यात केजरीवाल व त्यांचा पक्ष कुठे फिट होणार याचे पत्ते आत्ता उघड न करता केजरीवाल 'सध्या' सेंटर/राईट ऑफ सेंटर भूमिका घेत आहेत. याचा त्यांना 'कदाचित' फायदा होईल. उघड उघड कॅब समर्थन न केल्यामुळे मुस्लिम मतदार सोबत राहतीलच. पण पॉलिटिकल इस्लामपासूनही अंतर ठेवल्यामुळे हिंदू मतदारही सोबत येऊ शकतील.

>>आता माझे २ पैसे.

घ्या! तुम्ही आत्ताच सगळं लिहील्यावर, आप च्या विजया नंतर लिहायला पगारें कडे काहीच शिल्लक राहिलं नाही...

घ्या! तुम्ही आत्ताच सगळं लिहील्यावर, आप च्या विजया नंतर लिहायला पगारें कडे काहीच शिल्लक राहिलं नाही...))))))) तुम्ही तर आप जिंकणार असे म्हणुन लढाईआधीच हात पाय गाळलेत.
सनव मँडमचे ते मत आहे. मतमतांतर तर असायचीच.

अमित शहांनी प्रचारसभेत नेहमीप्रमाणे म्हणजे ज्या राज्यात निवडणुक आहे तिथल्या नेत्याने काय केले हा प्रश्न विचारला..
केजरीवालांनी त्यांना केलेल्या विकासकामांची लिस्टच पाठवुन दिलीय.

सत्तेचे सम्राट विरुध्द लोकल नेता हा संग्राम मनोरंजक होणार आहे.पण शेवटी मोदीच जिंकतील.कारण दिल्लीची कायदा सुव्यवस्था ही केंद्रसरकारच्या अखत्यारीत येते. आणी दिल्लितली कायदा सुव्यवस्था ही नावाजण्यासारखी आहे.

Pages