दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दिल्लीत शहरात भाजपाचा मुख्यमंत्री कशाला हवा ? आप ला आणि इतरत्र व स्वतःच्याच पक्षात अपयशी ठरलेल्या त्यांच्या एकांड्या केजरीवाल ला दिल्लीत गुंतवुन ठेवणेच भाजपच्या हिताचं आहे. उगाच किड्यांच्या डब्याचं झाकण उघडुन सध्या रोजगार हमी योजनेवर असलेल्या नौटंकीवाल्यांना भाजपने बेरोजगार करु नये असे माझे मत आहे.

तुमच्या मताला कोण विचारतय..शहांनी जोरदार प्रचार सुरु केलाय. मोदी ही आता प्रचारात जोमाने उतरतील।..जि.प मध्ये भाजपचे मोठे नेत्रुत्व उतरले असते तर फरक पडला असता..

खरतर दिल्लित भाजपला प्रतिस्पर्धिच नाही आहे . मोदींचा करिश्माच एवढा मोठा आहे की दिल्ली ते काबिज करणारच.
फक्त किती बहुमत येतय ते बघायच.. मला तर वाटतेय ७० पैकी ७० सिटा जिंकतील.

महाराष्ट्रातील आधुनिक चाणक्य संजय राऊत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर दुसरे चाणक्य शरद पवारांना बसवणार)))))) अहो ते पक्ष महाराष्ट्रात पावरफुल आहेत.. मोदी मात्र वैश्विक नेते कि विश्वगुरु आहेत. विश्वगुरु विरुध्द लोकल नेता केजरीवाल यांची लढत पाहणे रंगतदार असेल. केजरीवाल कसे हारतात ते पाहणे मनोरंजक असेल।

फक्त किती बहुमत येतय ते बघायच.. मला तर वाटतेय ७० पैकी ७० सिटा जिंकतील.

नवीन Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 22:33 >>>

होईल होईल, निकाल भाजपच्या बाजुने आले तर भाजपचं अभिनन्दन करायला विसरु नकोस. केजरु जिन्कला तर मी वर लिहिलेल्या कारणामुळे भाजपचं अभिनन्दन करेन.

भाजप दिल्ली हरण शक्यच नाही. सार देश मोदींच्या बाजुने आहोत हे लोकसभा निवडणुकीत दिसलेच. दिल्ली तर त्यांचे होमग्राउंड तेथे ते सेन्चुरी मारणारच .केजरीवाल झिरोवर आउट.

डायरेक्ट १८० डिग्री टर्न ? आधीच मुर्ख असलेल्याचा केमिकल लोचा झालाय की काय? ७० ला मुर्खांच्या दुनियेत सेन्चुरी म्हणतात हे आजच कळलंय Lol

ABVP loses all seats in Sanskrit University of Varanasi
The student wing of the Congress, the National Students' Union of India (NSUI) registered a victory on all the four seats in the students' union elections in Sampurnanand Sanskrit Vishwavidyalaya in Varanasi.

वाराणसीत तोंड काळे

.केजरीवाल झिरोवर आउट.

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 22:44 >>>

बहुतेक केजरु ७० पैकी १०० जागा घेउन जिन्केल आणी भाजपला -३० जागा मिळतील ( हे वाक्य त्या जगप्रसिद्ध विदुषकाच्या "७ में से १० नौजवान" च्या धर्तीवर वाचावे )

डायरेक्ट १८० डिग्री टर्न ? आधीच मुर्ख असलेल्याचा केमिकल लोचा झालाय की काय? ७० ला मुर्खांच्या दुनियेत सेन्चुरी म्हणतात हे आजच कळलंय Lol))))))) अहो मोदींना हलक्यात घेउ नका. तुम्ही असाल केजरीवालांचे पाठीराखे जिंकणे म्हणजेच सेन्चुरी राजकारणाच्या भाषेत..तुमचा केजरीवाल फक्त दिल्लीपुरता आहे त्याला हरवण हे मोदींसारख्या नेत्याच्या हातचा मळ.

पगारे साहेब
तुम्ही खरच स्वतःच्या बुद्धीने लिहिता आहात की आपला बोलविता धनी दुसराच आहे?

https://www.youtube.com/watch?v=XPny5hFx7W0

हो गई है पीर पर्वत सी पिघीलनी चाहिये
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिये

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नही
मेरी कोशिश है कि ये सुरत बदलनी चाहिये

पगारे साहेब
तुम्ही खरच स्वतःच्या बुद्धीने लिहिता आहात की आपला बोलविता धनी दुसराच आहे?))))) का खरे साहेब असे का वाटले तुम्हाला?

दिल्ली त अनेक समस्या आहेत..
प्रदुषण.
अनधिकृत वस्त्या.
पाण्याची समस्या.
कायदा आणि सुव्यवस्था.
स्त्रिया विषयी जास्त गुन्हे दिल्ली मध्ये होतात.
मध्ये आग लागली तेव्हा टीव्ही वर तेथील अंधाधुंद कारभार बघायला मिळाला.
फुकट सेवा देण्याचा वाईट मार्ग केजरीवाल वापरू लागला आहे,अशा मुळे शहराची वाट लागते.
पण आपल्या कडे मतदान हे जाती,धर्म,प्रांत,पैसे घेवून,फुकट मिळवण्यासाठी केले जाते .
त्या मुळे केजरी बाजी मारेल.
परिपक्व पना दिसला मतदार मध्ये तर bjp baji marel

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता.
--

भाजपाच्या किमान तीन जागा तरी आलेल्या. त्याला तुम्ही धोबीपछाड म्हणत असाल , तर शंभर वर्षे जुन्या कॉंग्रेस पक्षाला तुम्ही काय म्हणाल ? राष्ट्रीय विदुषकाला दिल्लीतील जनतेने बक्षिस म्हणून "बदक" दिलेला त्या निवडणुकीत.

केजरीवाल वि. मोदी असा सामना कसा होऊ शकेल ? आप वि भाजपा होईल ना? उगाच मोदींना राज्यस्तरावर आणुन त्यांचा स्तर खालावु नका. येणार तर भाजपाच. आता तर २००० कोटींची पार्टी झालीये

>>> I do not think BJP will win and form government in Delhi though I would like them to. At most they will win 25 seats and will be an effective opposition. >>>

माझा अंदाज -

आआप - ४५ च्या आसपास
भाजप - १५ च्या आसपास
कॉंग्रेस - ३ च्या आसपास
इतर - ५ च्या आसपास

१. भाजपा जिंकले तर....... मी हा धागा काढुन अगोदरच बोललो होतो की भाजपा जिंकणार
२. भाजपा हरले तर........ मी सरकास्टिक धागा काढला पण इथल्या भाजपा(सॉरी मोदी) भक्तांना कळलेच नाही.

करिन काडीरे (चिभीमे-पभीमे, पतढुंव, ताटातले वांगे)

राहुल गांधी दिल्लीला राहत असून तिथे हरतात कसे?

Submitted by बोकलत on 10 January, 2020 - 10:31

जस वडनगर मोदींच जन्मगाव असून त्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा MLA निवडून आला तसं!

Submitted by सुबोध खरे on 9 January, 2020 - 23:22 >>>

तुम्हाला यांचे बोलविते धनी माहीत नाहीत? आधी त्यांनी न्युझिलन्ड हल्ल्यावर धागा काढुन सामान्य मुस्लीम (त्यांच्या मते मुस्लीमांत सामान्य व असामान्य असे दोन भाग आहेत. त्यातील असामान्य लोक दहशत्वादी कारवाया करतात) कसे निरागस आहेत व व्हाईट सुप्रिमीस्ट कसे नालायक पणा करत आहेत हे सांगीतले. अर्थात कुराणातील सुप्रीमिस्ट विचारसरणीकडे दुर्लक्ष केले तर त्यांना चालते, कारण कुराण त्यांनी कधी वाचलेलेच नाही. असो, त्यानंतर असामान्य अशा मुस्लीम दहशत्वाद्यांनी न्युझीलन्ड हल्ल्याचा निषेध म्हणुन श्रीलंकेत जीवितहानी घडवली तेव्हा हे महाशय धागा काढणे सोडा, त्यावर प्रतीसाद देण्याच्याही मनस्थितीत नव्हते !. मग त्यानंतर इतर विषयांवरही (म्हणजे लिंचींग वगैरे) त्यांची सिले़क्टीव टिव्टिव उघडी पाडल्यावर अचानक ते विजन्वासात गेले व धागा काढण्याचा भार आयक्यु नावाच्या गोष्टीशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या इसामावर टाकुन मध्ये मध्ये प्रतिसाद टाकायचं काम करत आहेत. प्रतिसादांत मुस्लीम दहशत्वादासंबंधीत विषयावर त्यांना काही लॉजिकल प्रश्न विचारले तर ते कसे पाठीला पाय लावुन पळतात याची एक झलक मी तुम्हाला लवकरच नक्की दाखवु शकेन.

Pages