OCI करून घेणे गरजेचे आहे का?

Submitted by sneha1 on 17 October, 2019 - 15:04

नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. OCI करून घेणे गरजेचे आहे का? त्याचे काय फायदे / तोटे असतात? भारतीय नागरिकत्व नसताना तुम्हाला भारतातली प्रॉपर्टी विकायची असेल तर त्याची गरज असते का?
धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

OCI करून घेणे गरजेचे आहे का? - दर वेळी भारतात जाताना व्हिसा काढण्यापेक्षा हे लाईफलाँग ओसीआय असणं नक्कीच सोयीचं असतं. मला वाटतं, मतदान आणी शेतजमीन विकत घेणं ह्या दोन गोष्टी सोडल्या, तर OCI holder आणी भारतीय नागरिकत्वात काही फरक नाहीये. प्रॉपर्टी विकण्यासाठी (किंवा कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी) पॅनकार्डाची गरज आहे. व्हिसा स्टॅटस ने काही फरक पडत नसावा.

मी उलट प्रश्न विचारतो कि 'OCI न करण्याचे काही कारण आहे का ?' , वेळ नाही हे कारण नसेल तर न करण्यामधे काहीच तोटा नाही. In general direction तीच दिसते आहे सगळ्या immigration policy चीही त्यामूळे करून घ्या. process किचकट आहे पण होउन जाते.

OCI असलेल्या मुलांचं शिक्षण भारतात काही काळ करायचं असल्यास तिप्पट फी भरावी लागते असं ऐकलं आहे किंवा एकंदर खुप महाग शिक्षण असते हे खरं आहे का....? आणि usa ची ल citizenship असलेल्या मुलांना भारतात असलेली वाड वडिलांच्या जमिनी मध्ये देखील काही हक्क सांगता येत नाही हे कितपत खरं आहे...

शाळा/कॉलेज फीस्ट्रक्चर भारतीय व अभारतीय मुलांसाठी वेगवेगळे असते हे फॉर्म्सवर बघितले आहे. त्यामुळे भारतीय मुलांच्या तुलनेत अभारतीय मुलांची फी जास्त वाटणार. तुम्ही जरी तुम्हाला भारतीय समजत असला तरी मुलाकडे यूएस पासपोर्ट असला की ऑफिशियली तो परदेशीच ठरला जाणार ना?

परदेशी मुलांसाठी वेगळे फी स्ट्रक्चर बहुतेक सगळ्या देशात असावे.

OCI चा कोटा पण वेगळा असतो, मैत्रिणीच्या मुलीला त्या कोट्यात admission मिळाली आहे इंजिनिअरिंग ला. बंगलोरला बारावी पर्यंत शिक्षण झाल्यावर पुण्यात admission घेतली तेव्हा कळले. कारण मला कोणीतरी सांगितलं होतं की दहावी-बारावी नंतर ऍडमिशन domicile असेल तरच पुण्यात मिळते. काय खरं काय खोटं ते जात्यात गेलं की कळेल नक्की. बाकी मला कितीही महाराष्ट्रात शिक्षण व्हावं हौस असली तरी ज्यांचं शिक्षण आहे त्यांचा बंगलोर आँखों का तारा आहे Happy

OCI करुन घेणे केव्हाही चांगले. कधी अचानक भारतात जायचे असल्यास सोपे पडते. जर काही कारणासाठी भारतात दिर्घ काळ राहायचे असल्यास/ नोकरी करायची असल्यास काही प्रोब्लेम येत नाही. वडिलोपार्जित मालमत्तेचे पैसे परदेशात कायद्याने (जो काही कर आहे तो भरुन) घेउन जाण्यास काही अडचण येत नाही.

OCI / परदेशी नागरिकाना काही ठिकाणी फी जास्त आहे. खाजगी कॉलेज पण सरकारी युनिवरसिटी मध्ये इंजिनिअरिंग ला तिप्पट तर रिजनल इंजिनिअरिंग मध्ये दुप्पट फी असते पण admission मिळण्यासाठी काही त्रास होत नाही. तसेच मेडिकल खाजगी कॉलेज मध्ये ५०% फी जास्त आहे आणि ५ वर्षाची फी एकत्र भरावी लगते. डेंटल ला २०% फी जास्त आहे. पण प्रवेश अगदी सहज मिळतो.

OCI च्या मुलाची प्रवेश प्रक्रिया एवढी सोपी आहे की काही भारतातले पालक आपल्या मुलाचा OCI असलेल्या ना दत्तक देतात आणि admission प्रॉसेस झाल्यावर त्या मुलाचे परत दत्तक पत्र करातात.

वेलोर सारख्या खाजगी युनि मध्ये फार काही फरक नाही. या विद्यालयात बांगलादेश, चायना सारख्या देशातुन मुले येतात. काही चायनीझ प्रोफेसर/ counselor पण आहेत .

राजसी, महाराष्ट्रात शिक्षण हवे असल्यास तिथल father's domicile ( mother's domicile पण चालत असावे) काढुन घ्यावे. ४० वर्षा पुर्वी तरी चालत असावे. वडिल कर्णाटकाम्धुन असल्यामुळे माझ्याकडे दोन्ही राज्याचे domicile होते. त्यामुळे दोन्ही राज्यात प्रवेष मिळु शकतो.

परदेशी मुलांसाठी वेगळे फी स्ट्रक्चर बहुतेक सगळ्या देशात असावे. > बर्याच देशात असते. काही देशात परकिय चलन मिळते म्हणुन फी कमी असते तर काही देशात जास्त पेपर वर्क करावे लागते म्हणुन फी थोडी जास्त असते. पण admission साठी quality लागते . आणि जर जास्त फी देत असेल तर तशी service पण देतात. ऑस्ट्रेलियात ऐअर पोर्ट वरुन पिक उप करुन special orientation program असतो. अमेरिकेत पिकप नसतो पण special orientation program असतो. भारतात पण वेलोर सारखी कॉलेज/ युनि मध्ये असा प्रोग्राम आहे बाकी सगळ्या ठिकाणी quality/ service च्या बाबत बोम्ब आहे.

Oci म्हणजे काय, हे us, युरोप साठी असते का >>>> Overseas Citizen of India.. मुळ भारतीय असलेल्या आणि आता परदेशी नागरिक झालेल्या लोकांसाठी असते.. (मतदान / निवडणूकीत उभे रहाणे, आणि सरकारी नोकरी सोडता इतर सगळे अधिकार भारतात मिळू शकतात)

"मतदान / निवडणूकीत उभे रहाणे, आणि सरकारी नोकरी सोडता इतर सगळे अधिकार भारतात मिळू शकतात" - माझ्या माहितीप्रमाणे मतदान करता न येणे / निवडणुक लढवता ने येणे आणी शेतजमिन खरेदी करता न येणे इतकेच निर्बंध आहेत. सरकारी नोकरीसाठी नागरिकत्वाची अट काही नोकर्यांमधे असेल, पण सरसकट नाही.

पुनश्च OCI....
या वर्षी भारतात सुट्टीसाठी जाणार्‍या बर्‍याच (OCI असलेल्या) लोकांना विमानतळावरून परत पाठवले गेले अशी बातमी आहे.
कालच एका जवळच्या मित्राच्या भाचीला ही परत पाठवले गेल्याचे तो सांगत होता, तेव्हा खरे असावे.
मुळ नियमः OCI आयुष्याची वीस वर्षे पूर्ण होण्या आधी घेतले असले तर २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा....
५० वर्षे पूर्ण होण्याआधी घेतले असले तर ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, OCI Renew करणे गरजेचे आहे.
.... Part-B
१. हा नियम पहिल्यापासूनच आहे पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
२. भारतात Immigration Officer ला विचारले असता, कशाला आजून पैशे खर्च करताय? असे उत्तर ३/४ वर्षांपूर्वी मिळाले होते.
३. अजूनही भारतात Immigration Officer ने या डिसेंबर मधे अडवले नाही..
४. ज्या लोकाना विमानतळावरून परत पाठवले गेले , त्याना विमान कंपन्यानी परत पाठवले (असावे).
५. सध्या हा नियम १ जून २०२० पर्यंत शिथील करण्यात आलेला आहे अशी बातमी वाचली (पण पुन्हा हा प्रश्न येणारच आहे).
६. OCI चा गोंधळ नको म्हणून On -Arrival Visa Online घ्यायला किमान ४ Business days द्यावे लागतात.
७. OCI Renew साठी Online Site आहे, पण ती नीट चालत नाही... (गेल्या ४ वर्षात ३/४ प्रयत्न करून सोडुन दिले आहेत).
OCI Renewal..
१. Part-A, Photo/Image Upload, Part-B अश्या तीन Steps आहेत.
२. प्रयत्न सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातल्या सगळ्यांचे पासपोर्ट, सगळ्यांचे OCI, आणि सगळ्यांचे जुने भारतीय पासपोर्ट हाताशी ठेवा.
३. Part-A केव्हाही भरता येतो. तो भरल्यानंतर मिळालेला Temporary ID जपून ठेवा.
४. Photo/Image Upload इथे सगळ्यात मोठी गोची आहे. Photo/Image वर बरेच नियम आहेत. (Pizel size, aspect Ration, file size) इत्यादी. हे सगळे करूनही जवळपास २ तास घालवले तरी Photo/Image Upload होत नव्हती. याच कारणासाठी मी प्रयत्न सोडला होता.
५. सगळे काही ठिक असूनही, Submit केले तर पुन्हा Photo/Image Upload पान परत येते, आणि एकही Error message दाखवला जात नाही (तुम्ही गाढव आहात, तुमचा Photo चुकीचा आहे, फालतूगिरी करू नका, आम्ही झोपलो आहोत असले काहीही नाही).
६. Internet वर बर्‍याच लोकांनी प्रश्न विचारले आहेत, पण कोणत्याही साईटवर त्याचे नीट उत्तर नाही.
७. एका ठिकाणी उत्तर मिळाले.. ( भारतात Business Hours असतील तेव्हाच Photo/Image Upload करता येते)...
८. आज इथे अमेरिकेत पहाटे ५:५० ला Photo/Image Upload झाली.
९. Part-B आज सुरू केला आहे. ८ वाजता प्रयत्न केला पण पुर्ण झाला नाही. कदाचित भारतात Business Hours असतील तेव्हाच होणार असेल. उद्या पहाटे परत करून बघणार आहे.
....
....
Internet वर अशी साईट (फक्त Business Hours मधे चालणारी) बघितली नव्हती.. ..
आणि असली तरी 'We are sleeping , come tomorrow,' किंवा 'कल आना' असा Message द्यायला काय होते कळत नाही....
असो.. 'मेरा भारत महान..' असल्याने पुढे प्रयत्न करण्यात येतील...
...
याचा कुणाला उपयोग झाला तर झाला म्हणुन लिहीले आहे.. आणि तुम्हाला काही आतल्या गोटातून माहिती मिळाली असेल तर मला सांगा म्हणजे माझाही त्रास / त्रागा कमी होईल...

अरे बाप रे!! दारुण अनुभव आहे.
मी ३ दा ओ सी आय चा प्रयत्न केला . माझ्या दुर्दैवाने काही ना काही चुक होउन, अ‍ॅप्लिकेशन रिजेक्टच होत गेले. नाद सोडला आहे.

परदेसाई खूप चांगली माहिती दिलीत. खरंच खूप कठीण कर्म आहे OCI मिळवणे. OCI Renew बद्दल काही नियम आपल्याला माहिती आहे का. म्हणजे expire झाल्यानंतर किती कालावधीत रिन्यू करावा लागतो?

OCI कायमचे असते.. ते Expire होत नाही... फक्त २० आणि ५० ओलांडताना मी सांगितल्याप्रमाणे ते Renew करावे लागते...
OCI is for life-time.

>>४. Photo/Image Upload इथे सगळ्यात मोठी गोची आहे. Photo/Image वर बरेच नियम आहेत. (Pizel size, aspect Ration, file size) इत्यादी. हे सगळे करूनही जवळपास २ तास घालवले तरी Photo/Image Upload होत नव्हती. याच कारणासाठी मी प्रयत्न सोडला होता.<<
तुमचं धैर्य बघुन मी हि प्रयत्न केला, ओसिआय रिनु (रिइशु) करण्याचा. फोटो, सहि त्यांचे साइझचे नियम पाळल्यामुळे सक्सेस्फुली अप्लोड झाले (म्हणजे एरर आली नाहि). खातरजमा करावि या उद्देशाने एक्झिट करुन परत टेंप आय्डीने लॉगिन केलं तर पार्ट-ए कंप्लिट झाला आहे अशी गुड न्युज मिळाली. फोटो/सहि अप्लोड करा हे बटन अजुन अ‍ॅक्टिव आहे. आता या परिस्थितीत, तुमचे सगळ्यांचे अनुभव वाचुन माझं भारतीय मन म्हणतंय - ह्या, बेक्कार, बगी वेब्साइट आहे. फोटो/सहि अप्लोड झालेच नाहि, सगळा वेळ फुकट सगळा; तर आय्टी मन म्हणतंय - वेबसर्वरची कॅश, डेटाबेस सर्वर बरोबर सिंकप झाली नसेल. २४ तास थांबुया. तर मंडळी, यावर तुमचं काय मत/अनुभव?..

एकदा Upload झाले तर तुम्ही Part-B करू शकता... ते करून पूर्ण होते का बघा... Website वर Error Message द्यायचाच नाही ही काय प्रथा आहे कळत नाही... गेली कित्येक वर्षे मी बँकांच्या Website वर काम करतोय.. एकही बँक असला येडपटपणा चालवून घेणार नाही.
....
माझा Part-B Submit होत नाहीय... आता आज रात्री आणि उद्या पहाटे करून बघणार आहे...
(एकदा OCI असूनही जुने पासपोर्ट नंबर कशाला हवेत, वगैरे प्रश्न आहेत.. २००१ सालचा पासपोर्ट मी जपून ठेवला म्हणुन ठिक.. पण फेकून दिला असता तर.? )

धन्यवाद परदेसाई. कन्येचा पासपोर्ट बदललाय म्हणुन रिन्यु करावे लागेल आता.
राज, फोटो दुकानात काढुन मग स्कॅन करुन अपलोड केला का की काही अ‍ॅप वापरले फोटो काढायला?

परतः पासपोर्ट बदलला म्हणून OCI नवीन करावे लागत नाही... ती २० वर्षांची झाली असेल तरच ....

आता फोटो मोबाईल वर काढून Edit केला तरी चालतो... नियम पाळले की झालं... कुठल्याच सरकारला फरक पडत्/कळत नाही...

>>२००१ सालचा पासपोर्ट मी जपून ठेवला म्हणुन ठिक.. पण फेकून दिला असता तर.? )<<
ओसिआय बुकलेट वर शेवटच्या पानावर त्यावेळेच्या पासपोर्टचा नंबर छापलेला असतो. दोन्हि नंबर्स मागण्या मागे क्रॉस वॅलिडेशनची शक्यता नाकारता येत नाहि. पण एक चांगली सवय म्हणुन संपुर्ण कुटुंबाच्या महत्वाच्या जुन्या/नव्या आय्डिंची (ड्राला, पासपोर्ट, ओसिआय, सोशल इ.) डिजिटल कॉपी करुन ठेवावी. वेळोवेळी उपयोगी (हँडि) येते...

>>राज, फोटो दुकानात काढुन मग स्कॅन करुन अपलोड केला का की काही अ‍ॅप वापरले फोटो काढायला?<<
दोन्हि नाहि. एक चांगल्या क्वालिटिची जेपेग फाइल सिलेक्ट केली. नाहि तरी त्या वेबसाइट वर फोटो क्रॉप करावाच लागतो...

परतः पासपोर्ट बदलला म्हणून OCI नवीन करावे लागत नाही... ती २० वर्षांची झाली असेल तरच .. >> आम्ही मागच्या महिन्यात पाहिले तेंव्हा नवा पासपोर्ट असेल तर ओसीआय रीन्यू करावा लागेल म्हटले होते . रीन्यू करताना आई वडिलांचे मॅरेज सर्टिफिकेट मागताहेत. पी आय ओ आणि ओ सी आय करताना लागले नव्हते आधी. आताच कशाला पाहिजे ते देव जाणे !
जुना आणि नवा पासपोर्ट , ओसी आय हे सर्व पोस्टाने अथवा फेडेक्स ने पाठवा, किती दिवस लागतील ते सांगत नाहीत . त्यामुळे आम्ही इ व्हिसा अप्लाय केला . त्या साठी सुद्धा ३-४ तास खटपट करावी लागली - सगळे डॉक्युमेंट्स आणि अपलोड गोष्टी तयार झाल्यानंतर !

भारतात गेल्यावर त्यांनी 'कुठला व्हिसा आहे' असे विचारले. ओ सी आय दिलेले होतेच. मग इ व्हिसा आणि ओसीआय दोन्ही आहे म्हटल्यावर छापा मारून दिला पासपोर्टावर .

आता ओसीआय रिन्युवल साठी पासपोर्ट पाठवावा लागत नाही असे ऐकले आहे. १-२ दिवसात प्रयत्न करायचा विचार आहे.

ओसीआय करताना आणि इ व्हिसा साठी आम्ही फोनवर फोटो काढून ते क्रॉप करुन वापरले होते.

फक्त २० आणि ५० ओलांडताना मी सांगितल्याप्रमाणे ते Renew करावे लागते >> SFO मधे लवकर होते असे ऐकले आहे. पोरीचे करायचे आहे renew. मी मानसिक तयारी करतोय .

मी मागच्या वर्षात दोन वेळा हे उद्योग केले होते. आता मागच्या १-२ महिन्यांत प्रोसेस पुन्हा बदलली आहे. मेधा म्हणते तसे आता सुरूवातीलाच ओरिजिनल ओसीआय पाठवावे लागते. पूर्वी अ‍ॅप्लाय करताना फक्त कॉपीज पाठवून अगदी नंतर ओरिजिनल पाठवावे लागे व त्यानंतर दोन आठवड्यात नवीन ओसीआय येत होते. माझा दोन्ही वेळचा अनुभव असा होता की ही प्रोसेस किचकट आहे पण सीकेजीएस शी संपर्क करून सर्व शंकांबद्दल कन्फर्म माहिती काढून केले की व्यवस्थित होते. सीकेजीएसचे मेल ला उत्तरे देण्याबद्दल आणि फोनवरही माहिती देण्याबद्दल अनुभव चांगले आहेत.

वरती अपलोड प्रॉब्लेम्स बद्दल वाचले तसा मला काही अनुभव आला नव्हता. कदाचित गेल्या काही दिवसांत अ‍ॅप्लिकेशन करणारे एकदम वाढले असतील (त्या बातम्यांमुळे) व सर्वर वर लोड आला असेल.

मात्र आता सुरूवातीलाच ओसीआय पाठवावे लागणार त्यामुळे इ-व्हिसा काढून ठेवणे चांगले, नाहीतर भारतात जायला डॉक्युमेण्ट नसेल.

आम्ही दोघानी पण ओसिआय चा नाद सोडुन व्हिसा काढला आहे, मुलाचे पीआयओ आहे जे फक्त मार्च पर्यत व्हॅलिड आहे जर त्याचा पासपोर्ट बदलल्यावर परत रिन्यु करा अशा सताराशे भनगडी असतिल तर व्हिसाच काढलेला काय वाइट असा विचार येतोय.
ओसिआयचे सगळ बाड रिजेक्ट होणे हा अनुभव जवळच्या २-३ मैत्रिणिना आला आहे...
प्रत्यक्ष जाउन करणे कमी किचकट असेल तर sfo ला जावे का?

मी पार्ट-बी कंप्लीट केला. अ‍ॅप्लिकेशनची पिडिएफ फाइल जनरेट झाली म्हणजे ऑन्लाइन पोर्शन सुरळीत पार पडला. अर्धी लढाई जिंकली (बहुतेक).

माझं निरिक्षणः
१. प्रिंटेड अ‍ॅप्लिकेशन फॉर्म्वर (पिडिएफ) कुठेहि ओसिआय रिनुअल असा उल्लेख नाहि. फक्त कंसात लिहिलंय - ओसिआय मिसलेनियस सर्विस अ‍ॅप्लिकंट.
२. फॉर्मवर सर्विस सिलेक्टेड (आय्टम #२१) च्या रकान्यात "चेंज ऑफ पास्पोर्ट पर्टिक्युलर्स" छापलेलं आहे. रिनुअल अ‍ॅप्लिकेशनचा हा इंडिकेटर असावा.
३. फॉर्मवर सद्ध्याच्या ओसिआयचे कुठलेहि डिटेल्स प्रिंट केलेले नाहित. मात्र, ऑन्लाइन अ‍ॅप्लिकेशन करताना ओसिआय नंबर विचारलेला.
४. इंस्ट्रक्शन्सच्या पानांवर, रिनुअल साठी वेगळा पॅरा नाहि. फ्रेश अ‍ॅप्लिकेशनची इंस्ट्रक्शन्स वाचावी अशी बहुतेक अपेक्षा असावी. रिनुअल फि $४५ आहे हे कुठेतरी वाचलेलं असल्याने माहित आहे. रिनुअल अ‍ॅप्लिकेशन सोबत कोणते डॉक्युमेंट्स पाठवायचे याचा अर्थात उल्लेख नाहि. फ्रेश अ‍ॅप्लिकेशनच्या संदर्भातली लिस्ट आहे, पण ती रिनुअल करता इर्रेलवंट आहे (नविन युएस पासपोर्टची कॉपी सोडुन).

>>जुना आणि नवा पासपोर्ट , ओसी आय हे सर्व पोस्टाने अथवा फेडेक्स ने <<
हि माहिती कुठे वेबसाइट वर आहे का? लिंक द्या जमल्यास...

माफ करा, हा प्रतिसाद पुन्हा बदलत आहे....
जुना पासपोर्ट न्यायचा नियम तात्पुरता आहे, जुन २०२० पर्यंत. इतर नियम तेच आहेत.
प्लीज कोणीतरी पुन्हा पहा व हे बरोबर आहे याची खात्री करा.

ही लिंक जरा वेगळे सांगते आहे, रि-इश्यु व रिन्यु हे एकच आहे असे समजुन चालले तर,
https://www.in.ckgs.us/oci/oci-how-to-apply/except-nyc/oci-re-issue-for-...

OCI card holders should apply for RE-ISSUE of their OCI card if a NEW PASSPORT is issued.
RULES
1. For an applicant who is 20 years of age or younger, OCI must be RE-ISSUED EACH TIME A NEW PASSPORT is
issued. << २० पेक्षा कमी वय असेल तर पासपोर्ट बदलल्यास रि-इश्यु करावे लागेल.
2. For an applicant who is 50 years of age or older, OCI must be RE-ISSUED ONCE after the issuance of a new
passport. << ५० पेक्षा जास्त वय असेल तर पासपोर्ट बदलल्यास रि-इश्यु करावे लागेल अन्यथा नाही (????? हे परदेसाई यांच्या माहितीपेक्षा वेगळे आहे)
3. If the OCI card is issued for the first time after the age of 50 years, then there is no need for re-issuance of OCI. >> स्पष्ट आहे.
4. For an applicant who is 21 to 49 years of age, there is NO need to re-issue OCI documents each time a new passport is issued. However, if the applicant desires, he / she can request re-issue of the OCI document to update the new passport number >> स्पष्ट आहे.

हे अधिकृत प्रेस रिलीज,
https://www.in.ckgs.us/resources/pdf/Press%20Release%20OCI%20Reissuance.pdf
इथेही वरचीच माहिती आहे, व याशिवाय...
जर ओसीआय रि-इश्यु केले नाही तर नवीन पापो. बरोबर त्यावर असलेला जुना पासपोर्ट नेला तर चालेल.
In case an OCI card holder below the age of 20 years has not got the OCI card reissued on change of passport, he/she may travel on the strength of his/her existing
OCI card bearing old passport number subject to the condition that along with the new
passport, the OCI cardholder carries old passport mentioned in the OCI card.
In case an OCI card holder who has attained the age of 50 years and has got his/her
passport renewed subsequently but has not got his/her OCI card re-issued on renewal
of his/her passport, he/she may travel on the strength of the existing OCI card along
with the old and new passports.

पण अर्थातच रि-इश्यु करुन घेतलेले बरे.

Pages