OCI करून घेणे गरजेचे आहे का?

Submitted by sneha1 on 17 October, 2019 - 15:04

नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. OCI करून घेणे गरजेचे आहे का? त्याचे काय फायदे / तोटे असतात? भारतीय नागरिकत्व नसताना तुम्हाला भारतातली प्रॉपर्टी विकायची असेल तर त्याची गरज असते का?
धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ष्टांपव्हेंडर चा साइड धंदा चांगला चालेल. <<< हाच धंदा करायचा विचार आहे.. Happy
(वडील समाजसेवा म्हणून आर्मी वाल्यांचे अर्ज फुकट भरून द्यायचे... मी वकीलातीचे देईन.. ? ) Wink

बो- हो- री- ही- क- ह- र- आठवले. >> एकंदर वेब साईट बघता तसेच प्रकरण आहे Wink

देसायांनी मनावर घ्यावे Happy

>>देसायांनी मनावर घ्यावे<<
या धाग्यावर विस्कळित असलेली माहिती संकलित करुन एका नविन धाग्यावर टाकली (प्रॉपर टॅग्ज देउन) तर उपयोगी पडेल. कारण रिनुअलच्या बाबतीत, आता सुपात असणारे कधितरी जात्यात जाणारंच आहेत...

चालेल धागा काढू.. त्याआधी मनिऑर्डर साठी... Cox & Kings Global Services USA LLC असा Recipient असणे आवश्यक...
(आमच्या गल्लीत एक दुकान आहे म्हणे हे सगळे करणारे).

जनहितार्थ ही लिंक देते आहे. अशा वेळेस ओसिआय असेल तर प्लान्ड ट्रीप्स तुम्हाला जायचंच असेल तर निदान रद्द करावी लागणार नाही.
>> The government on Wednesday suspended all tourist visas to India till April 15 to prevent the spread of coronavirus in the country, according to an

https://timesofindia.indiatimes.com/india/coronavirus-india-suspends-all...

>>The government on Wednesday suspended all tourist visas to India till April 15 to prevent the spread of coronavirus in the country, according to an
https://timesofindia.indiatimes.com/india/coronavirus-india-suspends-all...<<
लिंक इज ब्रोकन. नक्कि काय केलेलं आहे, नविन विजा इशु करणं थांबवलं आहे कि वॅलिड विजा धारकांना हि प्रवेश नाकारणार आहेत? सॉर्ट ऑफ एयरपोर्ट (पोर्ट ऑफ एन्ट्रि) शट डाउन फॉर फॉरेनर्स...

हो. Diplomatic सोडून सगळे visa आणि oci रद्द 15 एप्रिल पर्यंत.
भारतीयांना travel advisory issue केली आहे, परदेशप्रवास करू नका.
7 देशांमधून आलेल्या प्रवाशांना mandatory quarantine.

हा धागा पुन्हा जनहितार्थ वर काढत आहे. नवीन अ‍ॅप्लिकेशन्स विषयी किंवा प्रवासाविषयी माहिती द्यायची असेल तर हा वापरता येईल.

अरे वा, व्हीएफएस ग्लोबलला दिले का कॉन्ट्रॅक्ट. बरे झाले.
जवळ जवळ सर्व प्रगत देशांचे विसा प्रोसेसिंगचे काम व्हीएफएस करते. उत्तम सुविधा आहे. अर्थात ज्या देशाचा विसाचे प्रोसेसिंग करायचे त्यांची प्रोसेसही सुलभ/सोपी हवी.

हे फक्त डीसी साठी आहे की सर्वांसाठी ते मात्र नीट बघितलं पाहिजे.. >> भारतीय Consulate नसती तर एकाच Consulate साठी असे कसे करता येईल असा प्रश्न बेधडक विचारता आला असता. पण मूळात ज्या सर्वीस मधे आधीच एव्हढे घोळ आहेत त्यात एका कंपनी कडून दुसरी कडे सीमलेस ट्रांस्फर करणे हि अपेक्षाच अधिक झाली असती.

माझ्या मुलीचे OCI Renewal पडत घडत, आता पोस्टांत पडले आहे म्हणे.. तेव्हा आज्/उद्या येईल..

ओसीआय अप्लाय करायच्या आधी इंडीयन पासपोर्ट सबमिट करुन सिटीझन शिप कॅन्सल करायला लागेल असे ओसिआय च्या चेक्लिस्ट वर लिहिले आहे पण त्याचे ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन कुठे करायचे? लिंकच सापडत नाहीये. चेक लिस्ट सापड्ली पण त्यात पण ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशेनचा उल्लेख आहे.

https://www.vfsglobal.com/one-pager/india/united-states-of-america/renun...
या पानावर सगळ्यात उजवीकडे 'Apply now" टॅब आहे . त्यावर टिचकी मारली की सगळ्यात खाली "Complete Questionnaire and Create Profile" अशी लिंक आहे त्यावर टिचकी मारली की अजून एक पान उघडते. त्यावर "Renunciation" अशी अजून एक लिंक सगळ्यात उजवीकडे आहे. तिथून तो ऑनलाईन फॉर्म दिसेल.
हि माहिती अमेरिकन रहिवाशांसाठी आहे. इतर देशांसाठी त्या त्या देशातल्या वकिलातीच्या वेबसाईट वरुन जावे लागेल.

Oci च्या फोटो साठी नेमकं काय background हवंय? एके ठिकाणी म्हणलंय white नको पण कोणताही फेंट कलर चालेल. एके ठिकाणी म्हणलंय white च हवंय.

नेमकं काय आहे?

रीया, मी आमच्या इथे एका फोटो च्या दुकानात जाउन फोटो काढला. त्याला फक्त ओसिआय साठी हवे आहे असे सांगितले तर त्याने नीट काढुन दिला. अगदी फिक्क्ट आकाशी बॅग्राउंडचा फोटो आहे.

बर मी आता ओसिआय्चा ऑनलाईन फॉर्म भरला. पोस्टाने पाठवणार आहे. ऑनलाईन फॉर्म्वर फोटो प्रिंट होउन आला आहे. तर चेकलिस्ट्वर 'ONE recent photograph (2 inch x 2 inch), meeting strict specifications' लिहिले आहे तर तो फोटो प्रिंट केलेल्या फॉर्म वर कुठे चिकटवायचा का कि फक्त बरोबर पाठ्वुन द्यायचा?

अगं आमच्या इथला मनुष्य अति मंद आहे त्याला OCI साठी हवाय हे कळालं नाहीच. पुन्हा 2×2 चा हवा आहे तर तो पण साईज नाही म्हणे आमच्याकडे. आता आम्हीच मॅन्युअली अपडेट करणार फोटो पण नेमकं काय बॅकग्राऊंड हवंय ते कळेना.

आकाशी म्हणजे नॉन white फेंट कलर. थँक्स गं!

फोटो नुसता सोबत पाठवायचा असतो बहुदा. मी 2 वर्षा पूर्वी हे सगळं केलेलं पण नंतर आम्हाला रिटर्न घ्यावं लागलं अँप्लिकेशन. आता मी विसरलेय सगळं

Oci च्या फोटो साठी नेमकं काय background हवंय? एके ठिकाणी म्हणलंय white नको पण कोणताही फेंट कलर चालेल. एके ठिकाणी म्हणलंय white च हवंय.

नेमकं काय आहे?

>> हे खरंच गोंधळात टाकणारं आहे. मी वॉलग्रीन्स ला जाऊन मुलीचा फोटो काढून आणला. ते मागे व्हाईट बॅकग्राऊंड च वापरतात. त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं कि बहुतेक देशांचे पासपोर्ट व्हाईट बॅकग्राऊंड स्वीकारतात . मी अजून नूतनीकरण अर्ज पाठवला नाहीये पण पहिल्या वेळेला OCI apply केलेला तेव्हा असाच फोटो पाठवला होता

तो फोटो प्रिंट केलेल्या फॉर्म वर कुठे चिकटवायचा का कि फक्त बरोबर पाठ्वुन द्यायचा? >> अपलोड केलेला फोटो प्रिंट झाला असेल ना. खरा फोटो सोबत पाठवून द्यायचा आहे

एक नवीन गम्मत... आता व्हिएफएस वाले फोन वर तुमच्याशी बोलायचे मिन्टाला अडीच डॉलर घेतात Happy (पहिली पाच मिन्टं फ्री)

>>आता व्हिएफएस वाले फोन वर तुमच्याशी बोलायचे मिन्टाला अडीच डॉलर घेतात <<
पहिली रिअ‍ॅक्शन - व्हादफ! पण त्यानंतर माझ्यातला देशप्रेमी जागा झाला, आणि आता कमीत-कमी १० मिनिटं बोलण्याचा संकल्प मी सोडलेला आहे... Happy

फोटो साठी मी फिक्कट पांढरा background वापरला. फोटो घरीच फोनवर काढला. फोटो अॅप वापरून ट्रिमींग केला.
ट्रिमींग केलेला अपलोड केला आणि मुळ फोटो वापरून वालमार्टला आॅनलाईन प्रिंट केला आणि अँप्लिकेशन सोबत पाठवला.

काही टिप्स -
१. व्हिएफएस कडून कुरीअर लेबल विकत घेतले असल्यास, अँप्लिकेशन सोबत रिटर्न लेबल पाठवण्यास विसरू नये.
तसेच, नवीन OCI साठी $१५ चा चेक original पासपोर्ट परत पाठवण्यासाठी लागतो. याची रिसीट मिळाल्याची नोंद घ्यावी. नाहीतर कार्ड पाठवण्यास फार विलंब करतात.
२. बर्थ-सर्टीफिकेट व पासपोर्ट वर आई/वडीलांचे नाव तंतोतंत जुळले पाहीजे, नाहीतर नेम-मिसमॅच चे affidavit पाठवावे लागेल.
३. वेगवेगळे फोन नंबर वापरून पहिली पाच मिन्टं अनेकदा फ्री घेता येतात Happy

सध्याच्या प्रोसेस मधे जर रिन्युअल असेल तर ओरिजिनल पासपोर्ट आणि आधीचे ओसीआय कधी पाठवावे लागते? मध्यंतरी अशी प्रोसेस होती की आधी कॉपीज पाठवायच्या व शेवटी ओरिजिनल पाठवले की १०-१५ दिवसांत सगळी डॉक्युमेण्ट्स परत मिळत.

माझ्यातला देशप्रेमी जागा झाला, आणि आता कमीत-कमी १० मिनिटं बोलण्याचा संकल्प मी सोडलेला आहे>>>
VFS Global भारतीय कंपनी नाही. Happy भारत त्यांचा (अनेक देशांपैकी एक) क्लायंट आहे.
असो अवांतर होतंय

Pages