OCI करून घेणे गरजेचे आहे का?

Submitted by sneha1 on 17 October, 2019 - 15:04

नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. OCI करून घेणे गरजेचे आहे का? त्याचे काय फायदे / तोटे असतात? भारतीय नागरिकत्व नसताना तुम्हाला भारतातली प्रॉपर्टी विकायची असेल तर त्याची गरज असते का?
धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्याच्या प्रोसेस मधे जर रिन्युअल असेल तर ओरिजिनल पासपोर्ट आणि आधीचे ओसीआय कधी पाठवावे लागते? मध्यंतरी अशी प्रोसेस होती की आधी कॉपीज पाठवायच्या व शेवटी ओरिजिनल पाठवले की १०-१५ दिवसांत सगळी डॉक्युमेण्ट्स परत मिळत. >>

जुने ओसीआय सुरुवातीला अर्जाबरोबरच पाठवायचं आहे. ओरिजिनल पासपोर्ट पाठवायचा आहे असे कुठे नमूद केलेले नाही. Affidavit in Lieu of Originals मध्ये पासपोर्ट चा उल्लेख आवश्यक आहे.

७ फेब्रुवारी च्या नोटिफिकेशन नुसार नवीन अर्जाबरोबर पासपोर्ट कॉपी notarize करावयाची आहे

https://visa.vfsglobal.com/usa/en/ind/news/oci-requirement.

माझ्या अनुभवानुसार CKGS ची माहिती बरीच डिटेल होती. VFS हे एक डोकेदुखी प्रकरण दिसतंय

धन्यवाद. CKGS ची कस्टमर सर्विस खूप चांगली होती. फोन वर व्यवस्थित माहिती देत.

फोटो संदर्भात मी त्यांना मेल केलेला. हा त्यांचा reply :-

Thank you for contacting the VFS Indian Visa, Passport & OCI Application Center Help Desk in the United States.

We understand that you wish to know the details related to the OCI application.

Please note as per our guidelines you need passport size photographs 2x2 inch on a white background. Please note do not efer to the document checklist on the governemnt site.

Please refer to the checklist for updated information including photo specifications via the velow link;
https://www.vfsglobal.com/one-pager/india/united-states-of-america/oci-s...

In case of further assistance, please feel free to reply to the same email or you may contact us on +1 800 320 9693 and we will be glad to assist you.

Best Regards,
Wilfred

VFS Indian Visa, Passport & OCI Application Center Help Desk

पासपोर्ट/व्हिसा साठी फोटो काढण्यासाठी मी गेली अनेक वर्षे ही साईट वापरतो:
https://www.epassportphoto.com/
फोन वरुन प्लेन बॅकग्राउंडला फोटो काढून या साईटवर हव्या त्या पासपोर्ट/व्हिसा साईझचे 4x6 मधे डाउनलोड करता येतात. ती फाईल घेउन मग कुठेही CVS/Walgreens/Walmart etc मधे self-service kiosk मधून प्रींट करायची, 10-20 cents मधे काम होते.

Pages