आईचे नाव मधले नाव (मिडल नेम) म्हणून लावण्याबाबत

Submitted by अनु_अनामिका on 26 December, 2019 - 05:18

नमस्कार.

मी एका ३ वर्षाच्या मुलीची आई असून सध्या मुंबई येथे स्थित आहे.

मुलीचा जन्म झाल्यापासून तिचा जन्मदाखला सोडल्यास तिचे स्वतःचे असे काही कागदपत्र बनवण्याची वेळ आली नाही.
आता तिला शाळेत घालण्याच्या दृष्टीने तिचे कागदपत्र बनवावे लागतील. त्यासाठी आधार कार्ड बनवण्यास जाणार आहोत.
जन्मदाखल्यावर नाव म्हणून फक्त <मुलीचे नाव> लिहिले आहे. आणि आईचे नाव म्हणून माझे संपूर्ण नाव आणि वडीलांचे नाव म्हणून माझ्या नवर्‍याचे संपूर्ण नाव लिहिलेले आहे.

आता आधार कार्ड बनवताना मला तिचे नाव <मुलीचे नाव> <माझे नाव> <पतीचे नाव> असे लावायची इच्छा होती. परंतु, नवर्‍याला आडनाव न लावणे पटत नाही. त्यामुळे तो म्हणतो कि हवं तर मिडल नेम म्हणून तुझे नाव लाव पण आडनाव हवेच.मी लग्नानंतर नाव बदलले आहे. ( <माझे नाव><नवर्‍याचे नाव><नवर्‍याचे आडनाव> ) त्यावेळी बदलावे वाटत नव्हते. परंतु पुढे जाऊन तांत्रिक अडचणी येऊ शकतात या भावनेने / भीतीने मी नाव बदलले. (आणि आता त्याबद्द्ल फार रिग्रेट्स नाहीत. मी ते मनापासून स्वीकारले आहे). परंतु मुलीच्या नावात माझा उल्लेख असावा हे मला प्रकर्षाने वाटते आहे. त्यामुळे <मुलीचे नाव> <माझे नाव> <नवर्‍याचे (आणि आता माझेही) आडनाव> असे लावायचे ठरवले आहे.

तर असे केल्यास काय आणि कितपत अडचणी येऊ शकतात? इथल्या कोणी किंवा कोणाच्या परीचयात असे केलेली व्यक्ती आहे का? मुलीला मुंबईतल्याच एका चांगल्या मराठी शाळेत घालणार आहोत. तर शाळेत मुलीला वेगळे/ एकटे पडल्याची भावना येऊ शकते का? इतर ठिकाणी फॉर्म भरताना/ पासपोर्ट काढताना कितपत अडचण येऊ शकते? फॉर्म भरताना खूप ठिकाणी मिडल नेम च्या ऐवजी 'वडीलांचे नाव' असे लिहिलेले असते, तेव्हा काय करावे? पुढे मुलीला या/ अश्या नावाची खूप कटकट होईल का?

नवर्‍याचे म्हणणे आहे की असेही लहान मुलांचे आधार कार्ड ५ वर्षाने पुन्हा काढावे लागते. तेव्हा आताच्या नावाने खूप प्रॉब्लेम होतोय असे वाटले तर तेव्हा बदलून सरधोपट <मुलीचे नाव> <नवर्‍याचे नाव> <आमच्या दोघांचे आडनाव> असे लावू. पण माझ्यामते मुलीला आता शाळेत घालणार तेव्हा हेच आधार कार्ड सबमिट होणार. तेव्हा शाळेत तसेच नाव लागणार. पुढे मुलीच्या नावावर थोडी गुंतवणूक करायची इच्छा आहे तेव्हा तिथेही हेच नाव येणार. कदाचित बँक अकाउंटही काढू. पॅनकार्डही काढू. पासपोर्ट काढू. तर जितके वाटते तितके हे नंतर नाव बदलणे सोपे असेलच असे नाही. पुढे मुलीला १८ पूर्ण झाल्यावर तिला नावात काहीही बदल करावा वाटला तर ती करेनच. पण तोवर मला हे नाव ठेवावे असे मनापासून वाटते आहे.

काय करावे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Now THIS is sad and funny at the same time! (कपाळावर हात मारून घेणारी बाहुली)
>>
Ok, lets talk about a 'real' illiterate customer who really does not know English.

What are you achieving by forcing him to sign a form which states - even though he signed in non-English language - he understood the form written IN ENGLISH? How will he understand the form IN English if he don't know English?

As per natural human rights and constitution every citizen has right to be served in his Mother tongue.

If anything is really sad and funny at the same time here, it is that, you are forcing him to sign a form written in foreign language and then again forcing him to sign another form forcing him to declare he understood everything written in that foreign language.

त्या बँकेत सर्व फॉर्म निव्वळ इंग्लिश मधीलच आहेत का ?
>>
हे सगळीकडे होते. फॉर्म कोणत्याही भाषेत असु दे, "तुम्ही" मराठीत सही केली म्हणून असा वेगळा फॉर्म भरावा लागतो. मुळ फॉर्म फक्त हिंदी/ईंग्लिश मधे आहे म्हणुन नव्हे. हा भेदभाव व नैसर्गीक हक्कंची पायमल्ली आहे.

मलाही राजसीचे दोन्ही प्रतिसाद आवडले व पटले. नाव वगैरे बाबत निर्णय घेताना मुलांना शाळा-कॉलेजात वेगळ्या नावांमुळे अडचणी येऊ शकतात, इतर मुलांकडून प्रश्न केले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत.

यूपी बिहारमध्ये बरेच जण आडनाव न लावता कुमार अथवा कुमारी असे लावतात. हे लोक महाराष्ट्रात आले की इथले लोक कुमार हे आडनाव समजतात. Happy माझ्या ऑफिसात बरेच कुमार व कुमारी आहेत. ते म्हणतात तिकडे सामाजिक आयुष्यात जातींचा पगडा अजूनही खूप भारी आहे, त्यामुळे आपली जात जाहीर करायची नसेल तर कुमार/रीचा आधार घ्यावा लागतो. अन्यथा आडनावावरून जात ओळखली जाते.

इंग्रजी सोडून अन्य भाषेत सही केल्यास वेगळा फॉर्म भरावा लागतो हे बघितले आहे. माझी मुलगीही देवनागरीत सही करते, अद्यापतरी त्रास झालेला नाही पण सरकारी खात्यात समोर भेटलेला त्याच्या डोक्याने नियम लावतो, वाद घालता येतो पण समोरचा रेम्याडोक्या निघाला तर आपल्याला कपाळबडवंती योग करावा लागतो Happy Happy

हा भेदभाव व नैसर्गीक हक्कंची पायमल्ली आहे >> +७८६ सहमत

पण समोरचा रेम्याडोक्या निघाला तर आपल्याला कपाळबडवंती योग Lol

सही कोणत्या भाषेत आहे ह्या गोष्टी ला तसा काही अर्थ नाही
.
सही च्या नावाखाली त्यांनी काय रेखाटलं आहे ह्याची जुळवणी
करणे / जुळणे हे महत्त्वाचे आहे.
सरकारी बिनडोक नियम कधी कधी डोक्यात जातात.
माझ्या गावच्या जागेच्या प्रॉपर्टी कार्ड वर गाव चे नाव बरोबर
आहे,माझे नाव बरोबर आहे,क्षेत्र बरोबर आहे पण तालुका चुकीचा टाकला आहे.
ही चूक संबंधित अधिकाऱ्याच्या लक्षात आणि दिली आणि ती चूक सरकारी अधिकाऱ्याची आहे माझी नाही हे पण दाखवून दिले ते त्यांनी मान्य केले पण केले पण चूक दुरुस्त करण्यासाठी साफ नकार दिला .
हे दुरुस्त करण्याचा अधिकारच आम्हाला नाही हे त्यांचे उत्तर.
त्यांचीच चूक दुरुस्त करण्यासाठी आपण proof द्यायचे अर्ज करायचा,पाठपुरावा करायचे असे आपले सरकारी काम चालतं

भार्तात कोणत्याही भाषेत शिकलेले लोक सह्या करतात पण बँकिंगची समान भाषा व अंतर्गत डेटा मॅनेजमेंट ची भा षा तर इंग्रजी आहे. त्यामुळे हे अंग्रेजी फॉर्म बँकेच्या खबरदारी प्रोटोकॉल पैकी एक आहे. कम्युनिकेशन फ्लो मध्ये इन्फॉर्मेशन लॉस होउ नये हे बेस्ट.
>>
मग हा बँकेचा प्रॉब्लेम आहे. नैसर्गीक न्यायाने, बँकेसारखी महत्वाची सेवा प्रत्येकाला मातृभाषेत मिळायला हवी. कमीत क्मी त्या राज्याचा अधिकृत भाषत तरी.
भाषांतरकार व मराठी जाणणारे वकील नेमने ही बॅकेची जबाबदारी आहे. बँकेचा धंदा व्हावा म्हणुन, परकीय भाषा शिकुन त्यात सही करणे ही ग्राहकाची जबाबदारी असु नये.

ही चूक संबंधित अधिकाऱ्याच्या लक्षात आणि दिली आणि ती चूक सरकारी अधिकाऱ्याची आहे माझी नाही हे पण दाखवून दिले ते त्यांनी मान्य केले पण केले पण चूक दुरुस्त करण्यासाठी साफ नकार दिला .
हे दुरुस्त करण्याचा अधिकारच आम्हाला नाही हे त्यांचे उत्तर.>>>>>

शालेय शिक्षण संपल्यावर शाळा सोडल्याचा जो दाखला मिळतो त्यावर शाळेच्या क्लार्कने जन्मतारीख लिहिताना चूक केली तर ती दुरुस्त करायला कोर्टात जावे लागते किंवा जन्मभर ती चूक बाळगावी लागते. ही परिस्थिती आता सुधारली असेल ही आशा आहे.

मी कितीही मातृभाषेची भोक्ती असले आणि मला प्रचंड अभिमान असला तरीही सरकारी आणि बँक/ विमा अश्या महत्तावचे कागदपत्रांच्या बाबतीत भाषा मध्ये आणू नये. आपला देश बहुभाषिक आहे, त्यामुळे आपल्याला एक कॉमन भाषा हवीच. निव्वळ पोष्टात कानडी भाषा वापरली जाते आणि तिथल्या लोकांना ही इंग्लिश / हिंदी येत नाही म्हणून इच्छा असूनही आम्हाला पोष्टात इन्व्हेस्ट करता येत नाही.
इथे भाषेचा वाद आणला नाही तर चालणार नाही का?

बँकेत स्थानिक भाषेत सही केली की जो फॉर्म भरुन द्यावा लागतो त्यात असं लिहलेले असतं की मला माझ्या भाषेत हे सगळं बँकेच्या कर्मचाऱ्यांनी समजावले आहे आणि मला समजले आहे. म्हणजे आयडियली स्थानिक भाषेच्या हक्कांची कोणी पायमल्ली केलेली नाही. बँकेत हे समजावून सांगणारा उपस्थित असतो.

सरकारी आणि बँक/ विमा अश्या महत्तावचे कागदपत्रांच्या बाबतीत भाषा मध्ये आणू नये.
>>
बरोबर. नैसर्गीक न्यायाने सर्व नागरीकांना त्यांच्या मातृभाषेत किंवा राज्याच्या अधिकॄत भाषेत सर्व सरकारी / बँकेच्या सेवा देण्यात याव्यात. यात मधे ईंग्लिश सारख्या परकीय भाषेची सक्ती करुन अन्याय करु नये.

आपला देश बहुभाषिक आहे, त्यामुळे आपल्याला एक कॉमन भाषा हवीच
>>
Rofl
We don't have multi-lingual single country. We have multi-lingual States and we are Union of States. Not the Country. Each State has its own official language.

निव्वळ पोष्टात कानडी भाषा वापरली जाते आणि तिथल्या लोकांना ही इंग्लिश / हिंदी येत नाही म्हणून इच्छा असूनही आम्हाला पोष्टात इन्व्हेस्ट करता येत नाही.
>>
इंग्लिश यायला हवी. ती आंतरराष्टॄय कामकाजाची व व्यवहाराची भाषा आहे. तुम्ही अधिकृत तक्रार करायला हवी ईंग्लिशमधे सेवा मिळत नाही म्हणुन.

इथे भाषेचा वाद आणला नाही तर चालणार नाही का?
>>
इथे मराठीत सही करणारे अर्धशिक्षीत/अशिक्षीत आहेत असे नाही म्हटले तर चालणार नाही का?
इथे नैसर्गीक न्यायाच्या संकल्पनेला विरोध नाही केला तर चालणार नाही का?

तुम्ही अधिकृत तक्रार करायला हवी ईंग्लिशमधे सेवा मिळत नाही म्हणुन. ---- माझ्या प्रतिसादातील 'सोय' ह्या महत्त्वाच्या शब्दांकडे आपले लक्ष वेधू इच्छिते. भाषेसाठी, समाजसुधारणांसाठी आग्रह धरणाऱ्या लोकांचा मला आदर आहेच.

इथे मराठीत सही करणारे अर्धशिक्षीत/अशिक्षीत आहेत असे नाही म्हटले तर चालणार नाही का? --- असं त्या फॉर्म मध्ये लिहिलं आहे का ते नीट वाचा.

राज्याची भाषा हीच त्या राज्यातील सरकारी व्यवहाराची भाषा
असाच नियम आहे.
पण काही जे राज्यभाषा मधील सही मान्य करत नाहीत ते गुन्हा करत आहेत .आणि त्या व्यक्तीचा हक्क डावला जात आहे हा .
असा मुद्दा आहे .
भाषा वरून मतभेद हा
असा अर्थ काढू नका

बँकेत स्थानिक भाषेत सही केली की जो फॉर्म भरुन द्यावा लागतो त्यात असं लिहलेले असतं की मला माझ्या भाषेत हे सगळं बँकेच्या कर्मचाऱ्यांनी समजावले आहे आणि मला समजले आहे. म्हणजे आयडियली स्थानिक भाषेच्या हक्कांची कोणी पायमल्ली केलेली नाही.
>>
परक्या भाषेत फॉर्म भरायची सक्ती करुन मग "समजावण्यापेक्षा", नैसर्गीक न्यायाने तो फॉर्मच मराठीत का नाही देत? मराठी ही स्थानीक नव्हे जागतीक किर्तीची भाषा आहे. सेवा मराठीत न देता परक्या भाषेत देणे व नंतर अशिक्षीतासारखं समजावुन सांगणे ही हक्कंची पायमल्लीच आहे.
जर तुम्ही "समजावण्यासाठी" व्यक्ती नेमु शकता तर , थेट फॉर्मच मराठीत देऊन, वेगळा वर्नाकुलरचा फॉरम न घेणे हे ही करु शकताच की.

बँकेत हे समजावून सांगणारा उपस्थित असतो.
>>
नसतो. गमंत म्हणुन बँगळुरुतल्या बँकेत जाऊन बघा. तुम्हाला असाच फॉर्म भरायला लावतील. तिथे त्यांना विचारा , "पण मला तर इथे कोणी मराठीत समजावुन सांगितले नाही मग मी कशी सही करणार?".

मुलीचे First Name च तिचेनाव-तुमचेनाव असे लिहले तर?
>> आधार वाले असं चालणार नाही असं म्हणाले. बर्थ सर्टिफिकेटवर तिचे एकटीचेच नाव असणार ना ? मग ते मॅच होणार नाही. +१
पण मिडल नेम म्हणुन दोन नावे देता येतील का हे विचारते. ते राहीले विचारायचे. पण त्या केस मध्ये फादर्स नेम मध्ये दोन नावे (माझे नाव आणि नवर्‍याचे नाव) येतील आणि पालक म्हणून आमचे कागदपत्र सादर करावे लागले तर आमची डॉक्युमेंट्स आपापल्या नावांचीच आहेत. तेव्हा अजून अडचण येईल का?

30 years ago we had a neighbor who did it with their daughter. She had her mom’s name as middle name. Still has.
>> खूप ठिकाणी अडचण आली का?

इथे प्रत्येक वेळी ठामपणे माझं नाव असंच आहे ते तसंच लिहावं हा आग्रह धरावा लागतो. मुलंही बरोबर खमकी होऊन सांगतात पुढे पुढे.
>> इथे राजसी म्हणत आहेत तसं खमकी होण्याऐवजी लेक वेगळी पडू नये याची जास्त काळजी आहे.

काही फरक पडणार नाही. फार तर काही भोचक लोक विचारतील की काही प्रोब्लेम तर नाही ना घरात. तिकडे सरळ दुर्लक्ष करायचे.
>> ते मला नक्की जमेल. पण मुलीला जमेल का पुढे ती वैतागेल याची काळजी वाटते.

चर्चा होण्याची इच्या असेल तर ही जागा योग्य आहे.
>> मला कायद्याने असे नाव लावता येते हे माहीत आहे. परंतु प्रत्यक्षात कोणाला असे करण्याचा अनुभव असेल तर हवे आहे. त्या अनुषंगाने या विषयावर सर्व प्रकारची चर्चा झालेलीही मला आवडेल.

परंपरेने आलेली संपत्ती जी कोणीच सोडत नाही तेव्हा वंशावळ सिद्ध करण्यासाठी नाव लागत योग्य format मध्ये
जातीचे फायदे हवे असतील तर वंशावळ लागते परफेक्ट.

>> लेक मोठी झाल्यावर अगदीच वेळ पडली संपत्तीत वाटा घेण्याची, तेव्हा तिला एक अ‍ॅफिडेव्हीट करून बदलता येणार नाही का?

सं लीला भ ना विचारा
>> त्यांनी कश्यावरून कागदोपत्रीही नाव बदलले असेल? त्यांना त्यांच्या आईला ट्रिब्युट द्यायचा आहे जो त्यांनी फक्त प्रचलित नावात बदल करुन दिला असेल. त्यांचा सेक्रेटरी त्यांचे चेक्स जुन्या नावाने घेत असेल तर आपल्याला काय कल्पना? तसेही त्यांनी हे नाव मोठे झाल्यावर बदलले आहे आणि ते सेलिब्रीटी आहेत या दोन्ही गोष्टिंमुळे मला त्यांच्याशी तुलना करणे योग्य वाटत नाही.

कोणाचं नाव लावायचं हे मुला/ मुलीनं ठरवलं पाहिजे.
>> आत्ता मुलगी ते ठरवण्याच्या वयात नाहीये.

ते कागदोपत्रीही तसेच असते का माहीत नाही.
>> एक्झाक्टली

तर मुलीचे नाव +आईचे नाव + वडि लांचे नाव + आडनाव असे केल्यास उत्तम असे वाटते.
>> ते कसं लावावं?

मला असं वाटतं की आपल्याला समाजसुधारणा करायची म्हणून मुलांना गिनीपिग करु नये. ते मोठे झाले की त्यांना ते महत्त्वाचे वाटलं तर ते स्वतः करतील. वाढत्या वयात मुलांना फार फरक पडतो वेगळेपणामुळे. मुलं मानसिक दृष्टया सक्षम नसतात लोकांच्या सूचक/ खोचक प्रश्नांसाठी. तुमचं नाव हवं तसं कागदोपत्री बदलून घ्या.
>> हि एक गोष्ट आणि दुसरं तांत्रिक अडचणी या दोनच गोष्टींची काळजी आहे.

मुलांच्या बाबतीत जेव्हा आपण चारचौघांपेक्षा काही वेगळे निर्णय घेतो, त्यावेळी मुळात त्या निर्णयाबद्दलचे आपले विचार स्पष्ट हवेत - तरच तशी स्पष्टता मुलांच्याही विचारात येते आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपण आणि मुलंही सहज सामोरं जाऊ शकतो.
>> हेही पटलं.

त्यांना मधलं नाव त्या व्यक्तीचे असले तर सोपे पडते.
>> मुलीला मिळणारी सर्व संपत्ती ही तिच्या वडिलांकडूनच मिळेल असे आहे का?

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार. काही प्रतिसादात मला जे म्हणायचे आहे तेच आल्याने त्यांचा स्वतंत्र उल्लेख केला नाही.

इथे मराठीत सही करणारे अर्धशिक्षीत/अशिक्षीत आहेत असे नाही म्हटले तर चालणार नाही का? --- असं त्या फॉर्म मध्ये लिहिलं आहे का ते नीट वाचा.
Submitted by राजसी on 27 December, 2019 - 12:26
>>
vernacular
: using a language or dialect native to a region or country rather than a literary, cultured, or foreign language
: of, relating to, or being a nonstandard language or dialect of a place, region, or country

शाळेचा दाखला,बँकेचे
अकाउंट,आधार कार्ड,pan कार्ड
,रेशन कार्ड,मतदार यादी,ह्या मध्ये प्रचीलीत नियम नुसार कागद पत्र असावीत आणि सर्व ठिकाणी एकच नाव (पूर्ण),एकच जन्म तारीख असावी .
महाराष्ट्र मध्ये जेव्हा मतदार यादी मध्ये नाव नोंदवावे लागत तेव्हा दक्षिण भारतीय लोकांना सुद्धा वडिलांचे नाव आणि आडनाव असा क्रमाने च नाव लिहावे लागते.
घरच्या पाटीवर नाव,समाजात आपली ओळख दाखवताना जे नाव,लिखाण करताना वापरायचे नाव,इथे तुम्ही काही ही नाव घ्या.
वडिलांचे/ आई चे कोणतेही.
आडनाव maherach/सासर च कोणतेही
लावा काही अडचण नाही.
पण कागद पत्री एकाच फॉरमॅट मध्ये नाव असावा जे सर्वमान्य(सरकारी यंत्रणेला) असावे.
जेव्हा सरकारी पातळीवर दखल घेवून तसा बदल केला जाईल तेव्हा आपण त्या फॉरमॅट मध्ये नाव करून घेवू शकता.
पाहिले सरकारी पातळीवर नियम बदल झाले पाहिजेत .

Screenshot_2019-12-27-12-46-07-437_com.google.android.apps_.docs_.pngScreenshot_2019-12-27-12-45-57-478_com.google.android.apps_.docs_.pngScreenshot_2019-12-27-12-46-29-254_com.google.android.apps_.docs_.png
मतदारयादी.
८४,१२३ आणि १३५ पहा

कॅथलिक लोकांत अनेकांची दोन फर्स्ट नेम्स असतात आणि त्यातले अनेक दोन्ही लावतात.

मतदारयादी >>

मग इथे वडिलांचे नाव म्हणून मुलगी माझं नाव लिहिणार का?
कि नाव कॉलम मध्ये <तिचं नाव> <माझं नाव> <आडनाव> आणि वडिलांचे नाव म्हणून <नवर्‍याचे पूर्ण नाव> असे लिहिणार का?

तिच्या बर्थ सर्टिफिकेट पक्षी जन्माच्या दाखल्यावर काय नाव आहे. ते नाव व हे तुम्ही नवीन प्रपोज केले आहे ते नाव ह्यात फरक असेल तर पासपोर्ट इशू करताना एफिडेव्हिट करावे लागेल.

मतदार यादीत नवरा / वडिलांचे नाव वेगळे विचारतात. Pan साठी सुद्धा.

मतदारयादी सर्वज्ञ आजोबांसाठी दिली.महाराष्ट्रात सगळ्यांची नावं इथल्या पद्धतीनेच लिहितात, असा त्यांचा दावा आहे.

तुमच्या मुलीला आडनाव लावायचे असेल तर दोन मधली नावं लावता येतील. आई आणि वडिलांचं.

जन्मदाखल्यावर बाळाचे, आईचे आणि वडिलांचे नाव वेगवेगळे असते ना ? कोणत्या ऑर्डर मध्ये नसते.

>> बरोबर. जन्मदाखल्यावर हे सगळे सुटे सुटे लिहीले आहे. बाळाचे नाव पुढे फक्त लेकीचे पहिले नाव लिहिले आहे.
आणि आईचे नाव म्हणून माझे संपूर्ण नाव आणि वडीलांचे नाव म्हणून माझ्या नवर्‍याचे संपूर्ण नाव लिहिलेले आहे.

तुमच्या मुलीला आडनाव लावायचे असेल तर दोन मधली नावं लावता येतील. आई आणि वडिलांचं.

>> खरंच? आधार वाल्या काकू असं चालणार नाही म्हणाले.
मुळात मी आधारमध्ये माझं नाव लावलं तर चालेल का हे विचारायला गेले तर त्या काकू अतीशय शॉक झालेल्या. Uhoh
त्यामुळे त्यांची माहिती पूर्ण आहे कि नाही याची कल्पना नाही.

माझ्या शाळेतील दाखला वरचे नाव आणि
आधार कार्ड,pan कार्ड,वरचे नाव वेगळे होते फक्त दोन अक्षरं नी.
जिथे आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला proof म्हणून मागत होते तिथे मला शाळेच्या दाखला वरच्या नावासाठी pratinya पत्र देण्यास भाग पडले होते.

मतदारयादी सर्वज्ञ आजोबांसाठी दिली.महाराष्ट्रात सगळ्यांची नावं इथल्या पद्धतीनेच लिहितात, असा त्यांचा दावा आहे..

भारत भाऊ आजोबा असा माझा उल्लेख करून इथला प्रवास लवकर संपवा हे नाही सांगायचे ना.
अजुन आजोबा होण्यास खूप वेळ आहे मला.
दुसरे मी सर्वण्य नाही भरत भावा ह्या जगात असा सर्वच नॉलेज असलेला व्यक्ती कोणाचं नसतं माणूस हा शेवट पर्यंत विद्यार्थी च असतो हे माज ठाम मत आहे.
तेव्हा भरत जी असा काही आजोबा ,सर्व ज्ञानी अशा काही पदव्या मला देवू नका.
माझा तसा दावा सुध्दा नाही.
अपवाद म्हणून एक दोन नावाचं proof देणे वेगळे आणि सर्रास काय फॉरमॅट वापरलं जाते ते वेगळे.
हे पण लक्षात ठेवत जा.

आजोबा, मतदार यादीतल्या तीन पानांवर प्रत्येकी किमान एक नाव दाखवलंय.
याला अपवाद म्हणतात?
तसा नियम असेल तर दाखवा

चर्चा पुढे चालू ध्या एकच ठिकाणी थांबू नये.
भरत जी तुम्ही दिलेला पुरावा हेच अंतिम सत्य आहे अस समजायला माझी काहीच हरकत नाही.

Pages