आईचे नाव मधले नाव (मिडल नेम) म्हणून लावण्याबाबत

Submitted by अनु_अनामिका on 26 December, 2019 - 05:18

नमस्कार.

मी एका ३ वर्षाच्या मुलीची आई असून सध्या मुंबई येथे स्थित आहे.

मुलीचा जन्म झाल्यापासून तिचा जन्मदाखला सोडल्यास तिचे स्वतःचे असे काही कागदपत्र बनवण्याची वेळ आली नाही.
आता तिला शाळेत घालण्याच्या दृष्टीने तिचे कागदपत्र बनवावे लागतील. त्यासाठी आधार कार्ड बनवण्यास जाणार आहोत.
जन्मदाखल्यावर नाव म्हणून फक्त <मुलीचे नाव> लिहिले आहे. आणि आईचे नाव म्हणून माझे संपूर्ण नाव आणि वडीलांचे नाव म्हणून माझ्या नवर्‍याचे संपूर्ण नाव लिहिलेले आहे.

आता आधार कार्ड बनवताना मला तिचे नाव <मुलीचे नाव> <माझे नाव> <पतीचे नाव> असे लावायची इच्छा होती. परंतु, नवर्‍याला आडनाव न लावणे पटत नाही. त्यामुळे तो म्हणतो कि हवं तर मिडल नेम म्हणून तुझे नाव लाव पण आडनाव हवेच.मी लग्नानंतर नाव बदलले आहे. ( <माझे नाव><नवर्‍याचे नाव><नवर्‍याचे आडनाव> ) त्यावेळी बदलावे वाटत नव्हते. परंतु पुढे जाऊन तांत्रिक अडचणी येऊ शकतात या भावनेने / भीतीने मी नाव बदलले. (आणि आता त्याबद्द्ल फार रिग्रेट्स नाहीत. मी ते मनापासून स्वीकारले आहे). परंतु मुलीच्या नावात माझा उल्लेख असावा हे मला प्रकर्षाने वाटते आहे. त्यामुळे <मुलीचे नाव> <माझे नाव> <नवर्‍याचे (आणि आता माझेही) आडनाव> असे लावायचे ठरवले आहे.

तर असे केल्यास काय आणि कितपत अडचणी येऊ शकतात? इथल्या कोणी किंवा कोणाच्या परीचयात असे केलेली व्यक्ती आहे का? मुलीला मुंबईतल्याच एका चांगल्या मराठी शाळेत घालणार आहोत. तर शाळेत मुलीला वेगळे/ एकटे पडल्याची भावना येऊ शकते का? इतर ठिकाणी फॉर्म भरताना/ पासपोर्ट काढताना कितपत अडचण येऊ शकते? फॉर्म भरताना खूप ठिकाणी मिडल नेम च्या ऐवजी 'वडीलांचे नाव' असे लिहिलेले असते, तेव्हा काय करावे? पुढे मुलीला या/ अश्या नावाची खूप कटकट होईल का?

नवर्‍याचे म्हणणे आहे की असेही लहान मुलांचे आधार कार्ड ५ वर्षाने पुन्हा काढावे लागते. तेव्हा आताच्या नावाने खूप प्रॉब्लेम होतोय असे वाटले तर तेव्हा बदलून सरधोपट <मुलीचे नाव> <नवर्‍याचे नाव> <आमच्या दोघांचे आडनाव> असे लावू. पण माझ्यामते मुलीला आता शाळेत घालणार तेव्हा हेच आधार कार्ड सबमिट होणार. तेव्हा शाळेत तसेच नाव लागणार. पुढे मुलीच्या नावावर थोडी गुंतवणूक करायची इच्छा आहे तेव्हा तिथेही हेच नाव येणार. कदाचित बँक अकाउंटही काढू. पॅनकार्डही काढू. पासपोर्ट काढू. तर जितके वाटते तितके हे नंतर नाव बदलणे सोपे असेलच असे नाही. पुढे मुलीला १८ पूर्ण झाल्यावर तिला नावात काहीही बदल करावा वाटला तर ती करेनच. पण तोवर मला हे नाव ठेवावे असे मनापासून वाटते आहे.

काय करावे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलीचे First Name च तिचेनाव-तुमचेनाव असे लिहले तर?
पुढे Middle/Father/Husband's Name जिथे असते तिथे नवर्याचे नाव टाका.
Surname मधे आडनाव येईल.

खरंतर तुमचा आडनाव काढून टाकायचा प्लॅन चांगला होता/आहे.
<मुलीचे नाव> <नवर्याचे नाव> <आमच्या दोघांचे आडनाव> हा फॉरमॅट फक्त महाराष्ट्रात वापरला जातो असे ऐकले आहे. उत्तरेकडचे आणि दक्षिणेकडचे दोघेही नावं अशी लिहीत नाहीत.

मुलीचे First Name च तिचेनाव-तुमचेनाव असे लिहले तर?

नाही चालणार,

बर्थ सर्टिफिकेटवर तिचे एकटीचेच नाव असणार ना ? मग ते मॅच होणार नाही.

मुलीचे नाव , मीना माया --- ----, पण बर्थ सर्टिफिकेटवर , मीना

मग नातीचे नाव , मंदा मीना ? , पण बर्थ सर्टिफिकेटवर मंदा.

डिटेन्शन केम्प , बांगला देशात वगैरे जाणार का ?

काहीही फरक पडत नाही, तुम्हाला हवे ते व तसे नाव ठेवू शकता. मिडल नेम (वडील वा आईचे वा इतर दुसरेच कुठलेही) असावे असे बंधन नाही. महाराष्ट्र गुजरात सोडता मी ते पाहिलेले नाही. आडनावाचेही बंधन नाही. अनेकांचे लास्ट नेम कुमार/किशोर वगैरे असते. उदा. प्रशांत किशोर, अमित कुमार वगैरे. दक्षिण भारतात आडनाव नसतेही बरेचदा. मग दुसरे काहीतरी लावतात. माझ्या मित्राचे नाव आहे अजित चंद्रन, आणि त्याच्या भावाचे आहे अरुण सी (arun c). यातला चंद्रन व सी हे त्यांच्या वडलांचे चंद्रशेखर की काहितरी नाव आहे त्यातलं आहे! वडलांचे नाव मिडल नेम असलेला उत्तर अथवा दक्षिण भारतीय भेटला तर 99% तो महाराष्ट्रात शाळा सुरू केलेला असतो

Yes you can do that. We have done exactly the same with our kids.
30 years ago we had a neighbor who did it with their daughter. She had her mom’s name as middle name. Still has.
Only thing is that we have to keep correcting people patiently who assume that our kids use only their father’s name/family name.
माफ करा मराठी नीट लिहिता येत नाही म्हणुन प्रतिसाद इंग्लिश मधे दिला

मुलीचे नाव> <नवर्याचे नाव> < नवऱ्याचे आडनाव> हा फॉरमॅट फक्त महाराष्ट्रात वापरला जातो आणि महाराष्ट्रात यापेक्षा वेगळे नाव असले तरी आपापली डोकी लावून नसते उद्योग नावाबाबत करून ठेवतात.
मधले नाव नसले तरी आपल्या मनाने कुठूनतरी वडलांचे नाव शोधून सर्टिफिकेट किंवा महत्वाच्या कागदपत्रांवर घालायचे.
लग्न झाल्यावर मुलीने आडनाव बदलले नसले तरी उगाच नको तिथे पाहिल्या नावापुढे नवऱ्याचे नाव आडनाव ठोकायचे.
मुलीने पूर्ण नावात वडलांचे नाव मधले म्हणून सांगितले नाही तर उद्धार करायचा
हे उद्योग फक्त महाराष्ट्रात होतात आणि त्याचा प्रत्येकवेळी भयंकर वैताग होतो. ( स्वानुभव)
पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुम्हाला हवे तसे नाव ठेवू शकत नाही.
सरकारी कायद्याने त्यावर काही निर्बंध नाहीत. मधले नाव वडील अथवा नवरा यांचेच ठेवायचे असा काही नियम कुठेही नाहीये.
उत्तर प्रदेश, ओरिसा अशा ठिकाणी मधले नाव नसले तरी चालते. किंवा मुलीचे मधले नाव दुसरे स्त्रीलिंगी नावच आहे असेही असू शकते ( घरातच आहे आमच्या)
महाराष्ट्र सोडून जगात कुठेच प्रॉब्लेम होत नाही.
इथे प्रत्येक वेळी ठामपणे माझं नाव असंच आहे ते तसंच लिहावं हा आग्रह धरावा लागतो. मुलंही बरोबर खमकी होऊन सांगतात पुढे पुढे.
त्यामुळे तुमचा
मुलीचं नाव, तुमचं नाव , नवऱ्याचे आडनाव हा ऑप्शन आवडला आहे. खरच अंमलात आणा. जिथे नाव बरोबर लिहीलं जाणार नाही तिथे तिथे मागे लागून ते करून घ्या.

काही फरक पडणार नाही. फार तर काही भोचक लोक विचारतील की काही प्रोब्लेम तर नाही ना घरात. तिकडे सरळ दुर्लक्ष करायचे. किशोर शांताबाई काळे हे प्रसिद्ध लेखक (पुस्तकाचे नाव कोल्ह्याट्याचा पोर ) आईचे नाव लावायचे.
नंतर पाहीजे तर लग्नानंतर <मुलीचे पहिले नाव> <सासूचे पहिले नाव> <माहेरचे आडनाव><सासरचे आडनाव> असे पण करता येईल मग.

तुम्हाला हवे तसे नाव डिक्लेअर करा, काहीही फरक पडत नाही.

माझ्या मुलीने सर्वत्र तिचे नाव हे तिचे नाव + आडनाव असेच ठेवलेय, मधले आई/वडील यांचे नाव काढून टाकले. तिच्या पॅनकार्डवर तिने आडनाव दिलेले नाही, फक्त पहिले नाव दिलेय.

शाळेत आईचे नावही लावले जाते, मुलाने स्वतःचे पूर्ण नाव म्हणून जे काही जाहीर केले त्याच्यापुढे.

मुळात हा myboli वर मांडण्याचा विषयच नाह.
इथे व्यक्त होणारी मत ही जबाबदार सरकारी यंत्रणेची नाहीत तर प्रत्येकाच्या विचार प्रवाह नुसार व्यक्त झालेली मत आहेत.
सरकारी अधिकृत वेबसाईट आहेत तिथे जावून माहिती करून घेणे हा योग्य मार्ग आहे .
माहिती हवी असेल तर .
चर्चा होण्याची
इच्या असेल तर ही जागा योग्य आहे.
नावा विषयी जगात काय नियम आहेत हे सुद्धा महत्वाचे आहे.
शेवटी दुसऱ्या देशात जाताना अडचण यायला नको.
जसे जागतिक प्रमाण वेळ हीच वेळ जगात मान्य केली गेली आहे कारण गोंधळ उडू नये.
तसेच जागतिक पातळीवर नावा विषयी एकच सूत्र असायला हवं.

नाव हे शोभे साठी नसते.
तुमची
ओळख पटवण्यात ते उपयोगी पडत..
परंपरेने आलेली संपत्ती जी कोणीच सोडत नाही तेव्हा वंशावळ सिद्ध करण्यासाठी नाव लागत योग्य format मध्ये
जातीचे फायदे हवे असतील तर वंशावळ लागते परफेक्ट.
नावातील एक अक्षर चुकलं तरी चालत नाही आणि ठराविक format मध्येच.
दोन प्रातिनिधिक उदाहरणे.
माणूस फायदे कधीच सोडत नाही त्या पुढे नाव ही गोष्ट खूप किरकोळ आहे

कोणाचं नाव लावायचं हे मुला/ मुलीनं ठरवलं पाहिजे. जितेंद्र जोशी आईचं नाव लावतात. आई किंवा वडील यापैकी लायक व्यक्तीचं नाव लावलं पाहिजे.

आजकाल काही लेखक स्वतःचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव असे संपूर्ण नाव लावताना दिसतात.
उदा : रवींद्र रुक्मिणी, पंढरीनाथ , परिमल माया सुधाकर .
काहीजण आईवडिलांच्या नावांची फक्त आद्याक्षरं लावतात.

ते कागदोपत्रीही तसेच असते का माहीत नाही.

पॅन कार्डच्या अ‍ॅप्लि केशन फॉर्ममध्ये सरनेम, लास्ट नेम ; फर्स्ट नेम आणि मिडल नेम विचारलेलं असतं. पॅनकार्डावर तुमचं नाव कसं छापायला हवं ते वेगळं भरायचं. पुढे आई आणि व डील दोघांची नावे विचारली आहेत. आई एकल पालक नस ल्यास वडिलांचे नाव अनिवार्य आहे. तेच आई एकल पालक नसेल तर आईचे नाव देणं अनिवार्य नाही.

आधारसाठी संपूर्ण नाव विचारलंय.

लहान मुलांचे फक्त बायोमेट्रिक्स अपडेट केले जातात. नवं आधार कार्ड बनवतात का? आधार कार्डावर नाव बद लणं कटकटीचं असू शकेल. कारण नाव नोंदवण्यासाठीच दुसरं काहीतरी ओळखपत्र लागतं.

सध्या शैक्षणिक प्रमाणपत्रांत आईवडील दोघांचीही नावे येतात.
तुमचा आग्रह मुलीच्या नावात स्वतःचे ( आईचे ) नाव हवे असा आहे, तर मिस्टरांना आडनाव असायलाच हवे आहे. आडनाव लावायला तुमचा विरोध नाही, असं दिसते. तर मुलीचे नाव +आईचे नाव + वडि लांचे नाव + आडनाव असे केल्यास उत्तम असे वाटते.

मुलीच्या नावावर गुंतवणूक करण्यापेक्षा तिच्यासाठी वेगळी अशी तुमच्याच नावे गुंतवणूक करावी.

भरत +१
मुलीचे नाव +आईचे नाव + वडि लांचे नाव + आडनाव>>>> असं शाळेत पण अपडेट होत आहे हळुहळु.

आता जो प्रकार डॉक्युमेंटला ठेवला आहे तोच वापरावा. वेगवेगळ्या नावाची डॉक्युमेंटस अडचणी आणतील.
जेव्हा आईचे/ वडिलांचे/पतीचे नाव पर्याय येत नाहीत तोपर्यंत बदल करू नये.

नाव प्रत्येकाचा वैयतिक प्रश्न आहे काही
पण आणि कोणत्या ही फॉरमॅट मध्ये वापर करा तुमची इच्या.
पण एकाध्या संस्थेचा(कॉलेज,बँक,पासपोर्ट,महसूल विभाग,इत्यादी) ह्यांचे स्वतःचे काही नियम असतात तो त्यांचा अधिकार आहे त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी त्या संस्था आई,वडील,आडनाव,आजी,आजोबा ह्यांची नावं आणि संबंधित कागद पत्र नात सिद्ध करण्यासाठी मागू शकतात.
प्रचलित व्यवस्थेनुसार त्यांचे नियम जास्तीत जास्त लोकांचा विचार करूनच ठरवलेले असतात .
त्या ते अपवाद करतील असे वाटत नाही .
आणि त्यांनी अपवाद करावा हे आपण त्यांना सांगू शकत नाही

राजेश, तुम्ही ज्या शक्यता मांडता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? कारण मला तुमचे म्हणणे पटते आहे - काही तरी विचित्र नियम असतात कधी कधी आणि त्यामुळे कामे अडू शकतात!
उदाहरणार्थ, मी मराठीतून सही करते. या माझ्या सहीमुळे मला अमेरिकेचा व्हिसा ते तिथल्या विद्यापीठाची पदवी यापैकी काहीही मिळवताना अडचण आली नाही. मात्र भारतात परतून आल्यावर कोटक महिंद्रा बँकेत खाते उघडायला मला माझ्या सहीमुळे अजून एका इंग्रजी फॉर्मवर सही करावी लागली ज्यात असे लिहिले होते की जरी मी vernacular भाषेत सही केली असली तरी मला इंग्रजीतून लिहीलेला मजकूर समजला आहे आणि तो मला मान्य आहे! मी डोक्याला हात लावला! This situation is funny and sad at the same time! पण मी सही केली कारण त्या वाचून पर्याय नव्हता. असे एखादे उदाहरण असेल तर तुम्ही जरूर मांडा!

मला असं वाटतं की आपल्याला समाजसुधारणा करायची म्हणून मुलांना गिनीपिग करु नये. ते मोठे झाले की त्यांना ते महत्त्वाचे वाटलं तर ते स्वतः करतील. वाढत्या वयात मुलांना फार फरक पडतो वेगळेपणामुळे. मुलं मानसिक दृष्टया सक्षम नसतात लोकांच्या सूचक/ खोचक प्रश्नांसाठी. तुमचं नाव हवं तसं कागदोपत्री बदलून घ्या.

>> मुलीला मुंबईतल्याच एका चांगल्या मराठी शाळेत घालणार आहोत. तर शाळेत मुलीला वेगळे/ एकटे पडल्याची भावना येऊ शकते का? >>
मुलांच्या बाबतीत जेव्हा आपण चारचौघांपेक्षा काही वेगळे निर्णय घेतो, त्यावेळी मुळात त्या निर्णयाबद्दलचे आपले विचार स्पष्ट हवेत - तरच तशी स्पष्टता मुलांच्याही विचारात येते आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपण आणि मुलंही सहज सामोरं जाऊ शकतो.

सरकार रुल बनवते की कायदेशीर वारसदारांना अमुक एक मिळेल. ते कायदे implement करणारी तुमच्या आमच्यासारखी साधी माणसं असतात. त्यांना मधलं नाव त्या व्यक्तीचे असले तर सोपे पडते. कमीतकमी कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रामध्ये कामं व्हावी असं वाटत असेल तर सरधोपट मार्गाने चालावं.

नाव वेगळं असेल तर कोणता जास्तीचा कागद लागतो?
मधलं नाव वडलांचं असल्याने कोणता कागद वाचतो?

अनेकांनी लिहिल्याप्रमाणे महाराष्ट्राखेरीज अन्यत्र मधले नाव वडिलांचे अशी पद्धत अन्यत्र दिसत नाही. त्या सगळ्यांना सर सकट काय त्रास होतो?

इंदूरमधल्या माझ्या सगळ्या पुरुष सहका र्‍यांची नावे कागदोपत्री अमुक कुमार आडनाव अशी असत. लघुरुपात मधल्या कुमारचा K व्हायचा.
एकानेही वडिलांचे नाव लावले नव्हते.
एकाचे नाव ओमप्रकाश होते, तर त्याचं लघुरूप ओ पी व्हायचे. हेच बिहार, युपीतून आलेल्या सहकार्‍यांबाबतही पाहिलंय.
मुली स्वतःचं नाव + आडनाव लावायच्या.

उगाच काहीही.

कोटक महिंद्रा बँकेत खाते उघडायला मला माझ्या सहीमुळे अजून एका इंग्रजी फॉर्मवर सही करावी लागली ज्यात असे लिहिले होते की जरी मी vernacular भाषेत सही केली असली तरी मला इंग्रजीतून लिहीलेला मजकूर समजला आहे आणि तो मला मान्य आहे! मी डोक्याला हात लावला! This situation is funny and sad at the same time!>> यात फनी काही नाही आणी सॅडही नाही. अर्धशिक्षित ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली खबरदारी आहे ती.

अर्धशिक्षित ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली खबरदारी आहे ती.
नवीन Submitted by आपले ते हे on 27 December, 2019 - 11:16
>>
भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक असणा-या व महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा असणा-या मराठी भाषेत ( देवनागरीत) सही करणे म्हणजे अर्धशिक्षीत असणे हा अ‍ॅटिट्युड, पुर्वी ब्रिटिशांचा त्यांच्यादृष्टिने अशिक्षीत असलेल्या भारतीयांबाबत होता तसाच नाही का? बॅकेमधुन हा वर्नाकुलरचा वेगळा फॉर्म पुर्ण हद्दपार करण्याबाबत नवा कायद होणे आवश्यक आहे.

आणखी कोणत्या देशात , मातृभाषेत सही केल्याने, एक वेगळा फॉर्म भरुन , "मी मातृभाषेत (मराठीत) सही केली असली, तरी बँकेचे/पैशाचे व्यवहार न समजण्याईतका मी काही अडाणी नाही "- असे जाहीर करावे लागते?

ईंग्लिश सही न करणारा ग्राहक चालतो, पण त्याची भाषा चालत नाही, असे का?

तेच मी सांगते आहे की जो माणूस कागदपत्रे घ्यायला, तपासायला बसलाय त्याच्या comfort level वर अवलंबून असते. जास्तीची कागदपत्रे मागायची का नाही. पटत नसेल तर वाद घालायचा option आहेच, इथे आणि जिथे कुठे विचित्र नाव लावलंय तिथे. सोय सरधोपट मार्गाने जाण्यात आहे.

अर्धशिक्षित ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली खबरदारी आहे ती.
नवीन Submitted by आपले ते हे on 27 December, 2019 - 11:16
>>
भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक असणा-या व महाराष्ट्र राज्याची अधिकृत राजभाषा असणा-या मराठी भाषेत ( देवनागरीत) सही करणे म्हणजे अर्धशिक्षीत असणे हा अ‍ॅटिट्युड, पुर्वी ब्रिटिशांचा त्यांच्यादृष्टिने अशिक्षीत असलेल्या भारतीयांबाबत होता तसाच नाही का? बॅकेमधुन हा वर्नाकुलरचा वेगळा फॉर्म पुर्ण हद्दपार करण्याबाबत नवा कायद होणे आवश्यक आहे.

आणखी कोणत्या देशात , मातृभाषेत सही केल्याने, एक वेगळा फॉर्म भरुन , "मी मातृभाषेत (मराठीत) सही केली असली, तरी बँकेचे/पैशाचे व्यवहार न समजण्याईतका मी काही अडाणी नाही "- असे जाहीर करावे लागते?>>>
Now THIS is sad and funny at the same time! (कपाळावर हात मारून घेणारी बाहुली)

फॉर्म बरेचदा एक बाजु इंग्लिश तर मागची बाजू हिंदी / मराठी अशीच पाहण्यात आलीय मग अश्या अजुन एका वेगळा फॉर्म बद्दलचे उदाहरण समजले नाही. त्या बँकेत सर्व फॉर्म निव्वळ इंग्लिश मधीलच आहेत का ?
________

उत्तम धागा आणि छान चर्चा

काय कागदपत्रे मागायची यांचे नियम असतात. ते माणसाच्या कंफर्ट लेव्हलवर ठरत नाहीत.
सरधोपट नाव लावल्याने नक्की कोणता कागद वाचतो इतका साधा प्रश्र्न आहे.

राजसी मस्त प्रतिसाद. मला असेच म्हणायचे होते पण टोकेरी प्रतिसाद द्यायाचा नव्हता. आपले ते हे ह्यांचे पण बरोबर आहे. भार्तात कोणत्याही भाषेत शिकलेले लोक सह्या करतात पण बँकिंगची समान भाषा व अंतर्गत डेटा मॅनेजमेंट ची भा षा तर इंग्रजी आहे. त्यामुळे हे अंग्रेजी फॉर्म बँकेच्या खबरदारी प्रोटोकॉल पैकी एक आहे. कम्युनिकेशन फ्लो मध्ये इन्फॉर्मेशन लॉस होउ नये हे बेस्ट.

माझे सहावीत अस्ताना कायदेशीर रित्या दत्तक विधान झाले व शाळेत नाव बदलले तेव्हा एका शिक्षकांनी बघा ह्यांचे नाव व आडनाव आत्ताच बदलले अशी असभ्य टिप्पणी केली होती. व सर्व वर्ग हसला होता ते मला फार अपमानास्पद वाटले होते. अजूनही मला आपण नक्की कोणत्या आडनावाला बिलाँग करतो. ह्या बद्दल संभ्रम असतो - होता एके काळी पण आता मी ते सर्व सॉर्ट आउट केले मेंटली.

मुलीला ह्या स्ट्रगल मधून जावे लागेल. तिची खंबीर अशी स्वतःची आयडेंटिटी निर्माण होइस्तो.

Pages