आईचे नाव मधले नाव (मिडल नेम) म्हणून लावण्याबाबत

Submitted by अनु_अनामिका on 26 December, 2019 - 05:18

नमस्कार.

मी एका ३ वर्षाच्या मुलीची आई असून सध्या मुंबई येथे स्थित आहे.

मुलीचा जन्म झाल्यापासून तिचा जन्मदाखला सोडल्यास तिचे स्वतःचे असे काही कागदपत्र बनवण्याची वेळ आली नाही.
आता तिला शाळेत घालण्याच्या दृष्टीने तिचे कागदपत्र बनवावे लागतील. त्यासाठी आधार कार्ड बनवण्यास जाणार आहोत.
जन्मदाखल्यावर नाव म्हणून फक्त <मुलीचे नाव> लिहिले आहे. आणि आईचे नाव म्हणून माझे संपूर्ण नाव आणि वडीलांचे नाव म्हणून माझ्या नवर्‍याचे संपूर्ण नाव लिहिलेले आहे.

आता आधार कार्ड बनवताना मला तिचे नाव <मुलीचे नाव> <माझे नाव> <पतीचे नाव> असे लावायची इच्छा होती. परंतु, नवर्‍याला आडनाव न लावणे पटत नाही. त्यामुळे तो म्हणतो कि हवं तर मिडल नेम म्हणून तुझे नाव लाव पण आडनाव हवेच.मी लग्नानंतर नाव बदलले आहे. ( <माझे नाव><नवर्‍याचे नाव><नवर्‍याचे आडनाव> ) त्यावेळी बदलावे वाटत नव्हते. परंतु पुढे जाऊन तांत्रिक अडचणी येऊ शकतात या भावनेने / भीतीने मी नाव बदलले. (आणि आता त्याबद्द्ल फार रिग्रेट्स नाहीत. मी ते मनापासून स्वीकारले आहे). परंतु मुलीच्या नावात माझा उल्लेख असावा हे मला प्रकर्षाने वाटते आहे. त्यामुळे <मुलीचे नाव> <माझे नाव> <नवर्‍याचे (आणि आता माझेही) आडनाव> असे लावायचे ठरवले आहे.

तर असे केल्यास काय आणि कितपत अडचणी येऊ शकतात? इथल्या कोणी किंवा कोणाच्या परीचयात असे केलेली व्यक्ती आहे का? मुलीला मुंबईतल्याच एका चांगल्या मराठी शाळेत घालणार आहोत. तर शाळेत मुलीला वेगळे/ एकटे पडल्याची भावना येऊ शकते का? इतर ठिकाणी फॉर्म भरताना/ पासपोर्ट काढताना कितपत अडचण येऊ शकते? फॉर्म भरताना खूप ठिकाणी मिडल नेम च्या ऐवजी 'वडीलांचे नाव' असे लिहिलेले असते, तेव्हा काय करावे? पुढे मुलीला या/ अश्या नावाची खूप कटकट होईल का?

नवर्‍याचे म्हणणे आहे की असेही लहान मुलांचे आधार कार्ड ५ वर्षाने पुन्हा काढावे लागते. तेव्हा आताच्या नावाने खूप प्रॉब्लेम होतोय असे वाटले तर तेव्हा बदलून सरधोपट <मुलीचे नाव> <नवर्‍याचे नाव> <आमच्या दोघांचे आडनाव> असे लावू. पण माझ्यामते मुलीला आता शाळेत घालणार तेव्हा हेच आधार कार्ड सबमिट होणार. तेव्हा शाळेत तसेच नाव लागणार. पुढे मुलीच्या नावावर थोडी गुंतवणूक करायची इच्छा आहे तेव्हा तिथेही हेच नाव येणार. कदाचित बँक अकाउंटही काढू. पॅनकार्डही काढू. पासपोर्ट काढू. तर जितके वाटते तितके हे नंतर नाव बदलणे सोपे असेलच असे नाही. पुढे मुलीला १८ पूर्ण झाल्यावर तिला नावात काहीही बदल करावा वाटला तर ती करेनच. पण तोवर मला हे नाव ठेवावे असे मनापासून वाटते आहे.

काय करावे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु_अनामिका यांनी शेवटी काय ठरवले?

इथे आपापले मुद्दे रेटत बसणाऱ्यांची इतकी गर्दी झालीय की त्यांनी काही प्रतिसाद दिला असेल तर तो कुठे आहे हे शोधणे कठीण झालेय.

Which surname can I choose for my child?
For your first child you can choose either the mother’s surname or the father’s surname. This surname will be given to all subsequent children. This is to ensure that all the children in a family have the same surname. You can choose your first child’s surname before birth or when registering the birth. Both parents must go to the Registrar of Births, Deaths, Marriages and Registered Partnerships to register the choice of surname. This cannot be done by one parent or in writing.

Automatic surname
If you do not choose a surname, your child will automatically be given the father’s surname or the mother’s surname. This depends on the family situation:

Parents who are married or registered partners (of different sexes)
Your child will automatically be given the father’s surname. However, you can choose the mother’s surname instead. To do so, both parents must go to the Registrar of Births, Deaths, Marriages and Registered Partnerships to register the choice of the mother’s surname. You can do this before the birth or when registering the birth.
Unmarried parents (of different sexes)
Your child will automatically be given the mother’s surname. If you would prefer your child to be given the father’s surname, he must acknowledge the child. At the time of acknowledgement you will also be asked for your choice of surname. To acknowledge the child and choose its surname both parents must go to the Registrar of Births, Deaths, Marriages and Registered Partnerships. You can do this before birth, when registering the birth or at a later time after the birth.
Parents of the same sex (2 men)
If you adopt a child with another man, you can choose either of your surnames. However, this only applies to your first child. Your other children will be given the same surname as your first child. You choose the surname of your child in court when formalising the adoption.
Parents of the same sex (2 women)
If 2 women who are married or registered partners have a child, the following applies:
if the child was conceived through an anonymous sperm donation under the terms of the Human Fertilisation (Donor Information) Act: the child is given the surname of the co-mother. This only applies if the co-mother automatically becomes the child’s lawful parent when the child is born. The parents can also choose the surname of the biological mother;
if the child was conceived through a known donor and the co-mother acknowledges the child: the child is given the surname of the biological mother. The parents can also choose the surname of the co-mother by signing a declaration of surname choice.
New partner and child’s surname
Do you already have a child from a previous relationship and are you expecting a child with your new partner? In this case the child does Not have to given the same surname as her/his half brother or sister by law

सही जवाब
१ cr आपण जिंकले आहेत.

Either father or mother?

भांडण्यापेक्षा कुणाचेच लावू नका, म्हणून Neither Land

Proud

माझ्या मुलाच्या अभियांत्रिकी पदवीत "आकाश वैदेही सुबोध खरे" असे त्याच्या आई वडील दोघांचे नाव आले आहे.
मुंबई विद्यापीठ सुधारलेले असावे.

मुळात हा वाद कशासाठी हा एक प्रश्न आहे.

२७ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले बायकोला तिचे अगोदरचे (जन्मापासूनचे) नाव आवडत नव्हते. तेंव्हा तिने नाव बदलासाठी सुचवले. मी काही नावे सुचवली. तिला ती फारशी आवडली नाहीत. तिने वैदेही हे नाव सुचवले लग्नात हे नाव आम्ही ठेवले.

माझे काही वर्ग मित्र आणि मैत्रिणी यांनी माझ्यावर टीकेची झोड उठवली कि तू बायकोचे नाव बदललेसच कसे? हि तिची ओळख आहे.
मी शांतपणे म्हणालो हे नाव( लग्नाअगोदरचे) तिने स्वतः ठेवलेले आहे का? तिचे नाव सुद्धा वडिलांनीच ठेवलेले आहे आडनाव सुद्धा वडिलांचे आहे.आमच्या कडे (महाराष्ट्रात) हि नाव बदलण्याची सोय आहे म्हणून मी ते केले.
यावर तू "एम सी पी", पुरुष प्रधान संस्कृतीच्या मनोवृत्तीचा आहेस इ. बरीच टीका केली मी कुणालाही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही.
बायकोने मला आश्चर्याने विचारले कि तुझे मित्र तुला एवढी, नावे ठेवत आहेत तू सत्य काय ते सांगत का नाहीस.
मी शांतपणे म्हणालो ते बहुसंख्य लोक दिखाऊ पुरोगामी आहेत.
माझ्या मुलीचे नाव मी ठेवले (शमिका). मुलाचे नाव तिने ठेवले (आकाश). मुलीला तिचे नाव आवडले आहे आणि ती लग्नानंतर बदलणार नाहीये.
मुलाला नाव बदलून हवे असेल तर तसे शपथ पत्र करण्याची माझी तयारी आहे.

आजपर्यंतच्या सर्व स्थावर जंगम मालमत्तेत आणि बँकेच्या खात्यात माझ्या बायकोचे नाव जॉईंट ओनर म्हणून आहे.

समानता मनात असावी लागते

मुळात नाव बदलून घेण्याचं वयस्क व्यक्तीस पूर्ण अधिकार आपल्या देशात आहे.
नाव आणि आडनाव हे १८ वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीला बदलून घेता येते ..त्या साठी ठराविक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते
फक्त वडिलांचं नावात बदल करण्याचा अधिकार नसतो(वडिलांच्या नावात बदल केल्याचे उदाहरण माझ्या पाहण्यात नाही)
आता राहिले फक्त मुलाच्या नावा समोर आई च नाव लावायचे की वडिलांचं हा कळी चा प्रश्न प्रश्न आहे.
नवऱ्या पासून काही करणानाने अलिप्त राहत आहेत .
किंवा नवरा बायको मध्ये प्रेम कमी आणि व्यवहारिक नात जास्त आहे त्या कुटुंब साठी हा कळीचा मुद्दा आहे.
आणि महत्वाचं सुद्धा आहे.
पण ह्या सामाजिक समस्येवर उपाय सांगण्याच्या नावा वर हिंदू धर्म च्या पारंपरिक रिती रिवाजा वर हल्ला करून हिंदू धर्मात फूट पाडणे आणि ओळख कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा स्त्री स्वतंत्र च्या आडून चालू आहे.
जसे अंध श्रद्धा हटाव च्या गोंडस नाव खाली हिंदू च्या श्रद्धा स्थान वर सुद्धा हल्ले झाले आहेत..
त्या मुळे सावध राहणे सुद्धा गरजेचे आहे.

राजेश १८८: कृपया तुमच्या प्रतिसादांपूर्वी "राजेश १८८ यांचा प्रतिसाद" असे प्रेफिक्स लावत चला. जेणेकरून तुमचे अभ्यासपूर्ण, वाचनीय प्रतिसाद आवर्जून वाचणाऱ्या माझ्यासारख्या लोकांची सोय होईल.

<<< हिंदू धर्म च्या पारंपरिक रिती रिवाजा वर हल्ला करून हिंदू धर्मात फूट पाडणे आणि ओळख कमी करण्याचा प्रयत्न >>>
@राजेश१८८
यात हिंदू धर्माचा प्रश्न कुठे आला? फार तर फेमिनिस्टांचा कावा आहे असे म्हणा फारतर. नेहमीचे कन्व्हेन्शन झुगारून, मधले नाव आईचे लावायचे, वडिलांचे नको यात काय साध्य होणार आहे हे मला तरी कळले नाही. पण जर कुणी त्या त्रासाला सामोरे जाण्यास तयार असेल तर प्रॉब्लेम काय आहे?

चूक आणि बरोबर काही नाही. सोईस्कर काय आहे ते बघायचे. <पहिले नाव> <मधले नाव> <शेवटचे नाव> यासाठी <पहिले नाव> <वडिलांचे/नवऱ्याचे पहिले नाव> <आडनाव> असे सर्वसाधारण कन्व्हेन्शन भारतात वापरले जाते. ते सोडून जर इतर काही वापरायचे असेल, आणि होणाऱ्या त्रासाला जर कुणी तयार असेल तर हरकत का? इतकाच मुद्दा आहे.
इतर देशात असे कन्व्हेन्शन नसते. उदा. माझ्या penfriend चे नाव Betty Marie Jensen होते आणि Betty व Marie ही दोन्ही तिची नावे होती कारण तिच्या देशात तसे कन्व्हेन्शन होते. भारतात सध्या तरी तसा प्रघात नाही, पुढे मागे बदलू शकेल, इतकेच म्हणायचे आहे.

आता अँडमिशन घेताना शाळेमध्ये वडीलांचे नावाबरोबर आईचे नाव सुध्दा असते तसेच कुठलाही फॉर्म भरताना आईचे सुध्दा नाव लिहावे लागते.

<पहिले नाव> <मधले नाव> <शेवटचे नाव> यासाठी <पहिले नाव> <वडिलांचे/नवऱ्याचे पहिले नाव> <आडनाव> असे सर्वसाधारण कन्व्हेन्शन भारतात वापरले जाते >>> मला वाटतं हे फक्त महाराष्ट्रात आहे, इतर भारतात नसावं, किंवा असलंच तर गुजराथ, बंगाल अश्या तुरळक ठिकाणीच असावं. आमच्या हापिसात एका तेलगू माणसाचं नाव 'महेश्वर भवानी शंकर चेल्लापती राव' असं होतं, त्यात सगळीच त्याची नावे आहेत, वडिलांचं नाव कुठेच नाही यात. त्याला शाळेत चेल्लापती नावाने ओळखायचे, पुढे मुंबईत आल्यावर तो आपलं नाव शंकर राव असं सुटसुटीत सांगू लागला. एका पंजाबी मैत्रिणीचं नाव आंचल सरीन, तिच्या भावाचं नाव युग कुमार - हे लोक मधलं नाव लावत नाहीत आणि लास्ट नेम हे त्यांचं आडनाव नाही. एका कोमल नावाच्या हरयाणवी मैत्रिणीला आडनावच नाही (पासपोर्ट वर देखील). एका मेघालयन माणसाचं नाव 'इ बोम चा' असं होतं. तो म्हणाला की हे तीन शब्द मिळून त्याचं नाव तयार होतं. अपल्यासारखं एकशब्दी नाव नाही. एच डी देवेगौडा - यात पहिलं नाव हर्दनहळ्ळी हे गाव आहे, दोड्डेगौडा त्यांचे वडील आणि शेवटचं नाव देवेगौडा हे आडनाव नसून त्यांचं स्वतःचं पाळण्यातलं नाव आहे.

फक्त वडिलांचं नावात बदल करण्याचा अधिकार नसतो(वडिलांच्या नावात बदल केल्याचे उदाहरण माझ्या पाहण्यात नाही)
>>>
हे जरा सविस्तर सांगता का? आखीर केहना क्या चाहते हो?
स्वतःच्या नावातले वडिलांचे नाव बदलता येत नाही असे म्हणायचे आहे का वडिलांचे नाव बदलता येत नाही असे म्हणायचे आहे?

वय वर्ष विसावा लागलं आणि आई बापाने ठेवलेले नाव आवडणासे वाटू लागलं तर काही procedure purn karun nav बदलता येते .
त्याच पद्धतीने आडनाव बदललता येते.
आपल्या कडे असे होत नाही पण 2 वर्षांनी पती बदलणाऱ्या देशात जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा biological bap sambhal karat nasto .
Dusrach कोण्ही तरी बापाच्या जागेवर असतो तेव्हा biological बापाचे नाव बदलता येत नाही.
मला वाटतं आता जास्त समजायची गरज नाही

असे काय नाय,

त्याला सावत्र मुलाऐवजी , दत्तक मुलगा दाखवला तर तेही नाव चालेल

पश्चिमात्य देश व्यक्ती स्वातंत्र्याचे भोगते आहेत आणि हुशार आहेत.
भारता मध्ये काही लोक व्यक्ती स्वातंत्र्याचे भोगते आहेत पण अती हुशार आहेत.
आज पर्यंत जन्म झाल्या पासून मरे पर्यंत एकच बाप आणि एकाच आई असायची.
पण भारता मधील अती हुशार व्यक्ती स्वतंत्र चे पुरस्कर्ते स्त्री स्वतंत्र वाले.
भारतात काही लोकात अशी स्थिती आणतील.
५ . ५ वर्षांनी खरं जन्म देणारे आई वडील बदलत जातील आणि मुल २० वर्षाचे होईल तेव्हा त्याचे खरे आई बाप कोण .
आणि कोणत्या आई बापाची संपत्ती त्याला मिळेल ह्यांची शास्वती राहणार नाही.
खरे आई बाप शोधणे हेच अवघड काम होईल

Screenshot_2019-12-30-21-24-14-689_com.whatsapp.png<

@Blackcat
याचा इथं काय संबंध?
गल्ली चुकली काय?

भारतात सध्या तरी तसा प्रघात नाही, पुढे मागे बदलू शकेल, इतकेच म्हणायचे आहे.
>>>>>>

उपशिबोका , अजिबात नाहि. वर चर्चा झालि आहे याच धाग्यावर. अनेक (बहुतांश) अमराठि /अगुजराथी लोकांच्या नावात वडिलांचे नाव हे मधले नाव नस्ते. एका हरयाणाच्या व्यक्तिने अश्चर्याने मला विचारले होते एक्दा - "तुम्च्याकडे वडीलंआ चे नाव मधले नाव म्हनुन लावतात ना? " . विचारणारे साठी चे ग्रूहस्थ होते.

Pages