आईचे नाव मधले नाव (मिडल नेम) म्हणून लावण्याबाबत

Submitted by अनु_अनामिका on 26 December, 2019 - 05:18

नमस्कार.

मी एका ३ वर्षाच्या मुलीची आई असून सध्या मुंबई येथे स्थित आहे.

मुलीचा जन्म झाल्यापासून तिचा जन्मदाखला सोडल्यास तिचे स्वतःचे असे काही कागदपत्र बनवण्याची वेळ आली नाही.
आता तिला शाळेत घालण्याच्या दृष्टीने तिचे कागदपत्र बनवावे लागतील. त्यासाठी आधार कार्ड बनवण्यास जाणार आहोत.
जन्मदाखल्यावर नाव म्हणून फक्त <मुलीचे नाव> लिहिले आहे. आणि आईचे नाव म्हणून माझे संपूर्ण नाव आणि वडीलांचे नाव म्हणून माझ्या नवर्‍याचे संपूर्ण नाव लिहिलेले आहे.

आता आधार कार्ड बनवताना मला तिचे नाव <मुलीचे नाव> <माझे नाव> <पतीचे नाव> असे लावायची इच्छा होती. परंतु, नवर्‍याला आडनाव न लावणे पटत नाही. त्यामुळे तो म्हणतो कि हवं तर मिडल नेम म्हणून तुझे नाव लाव पण आडनाव हवेच.मी लग्नानंतर नाव बदलले आहे. ( <माझे नाव><नवर्‍याचे नाव><नवर्‍याचे आडनाव> ) त्यावेळी बदलावे वाटत नव्हते. परंतु पुढे जाऊन तांत्रिक अडचणी येऊ शकतात या भावनेने / भीतीने मी नाव बदलले. (आणि आता त्याबद्द्ल फार रिग्रेट्स नाहीत. मी ते मनापासून स्वीकारले आहे). परंतु मुलीच्या नावात माझा उल्लेख असावा हे मला प्रकर्षाने वाटते आहे. त्यामुळे <मुलीचे नाव> <माझे नाव> <नवर्‍याचे (आणि आता माझेही) आडनाव> असे लावायचे ठरवले आहे.

तर असे केल्यास काय आणि कितपत अडचणी येऊ शकतात? इथल्या कोणी किंवा कोणाच्या परीचयात असे केलेली व्यक्ती आहे का? मुलीला मुंबईतल्याच एका चांगल्या मराठी शाळेत घालणार आहोत. तर शाळेत मुलीला वेगळे/ एकटे पडल्याची भावना येऊ शकते का? इतर ठिकाणी फॉर्म भरताना/ पासपोर्ट काढताना कितपत अडचण येऊ शकते? फॉर्म भरताना खूप ठिकाणी मिडल नेम च्या ऐवजी 'वडीलांचे नाव' असे लिहिलेले असते, तेव्हा काय करावे? पुढे मुलीला या/ अश्या नावाची खूप कटकट होईल का?

नवर्‍याचे म्हणणे आहे की असेही लहान मुलांचे आधार कार्ड ५ वर्षाने पुन्हा काढावे लागते. तेव्हा आताच्या नावाने खूप प्रॉब्लेम होतोय असे वाटले तर तेव्हा बदलून सरधोपट <मुलीचे नाव> <नवर्‍याचे नाव> <आमच्या दोघांचे आडनाव> असे लावू. पण माझ्यामते मुलीला आता शाळेत घालणार तेव्हा हेच आधार कार्ड सबमिट होणार. तेव्हा शाळेत तसेच नाव लागणार. पुढे मुलीच्या नावावर थोडी गुंतवणूक करायची इच्छा आहे तेव्हा तिथेही हेच नाव येणार. कदाचित बँक अकाउंटही काढू. पॅनकार्डही काढू. पासपोर्ट काढू. तर जितके वाटते तितके हे नंतर नाव बदलणे सोपे असेलच असे नाही. पुढे मुलीला १८ पूर्ण झाल्यावर तिला नावात काहीही बदल करावा वाटला तर ती करेनच. पण तोवर मला हे नाव ठेवावे असे मनापासून वाटते आहे.

काय करावे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठीचा अर्ज बघा.
त्यात Given name <पहिले नाव> <मधले नाव> आणि Surname <शेवटचे नाव> हे रकाने आहेत.
Given name आणि Surname मध्ये तुम्ही काय लिहिता तो तुमचा प्रश्न आहे.

काल महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांनी शपथ घेताना संपूर्ण नावात आई आणि वडील दोघांची नावे घेतली.

उदा : आदित्य रश्मी उद्धव ठाकरे.

मग त्याचीच सुरुवात करताहेत ना अनु अनामिका.

सांगण्याचा हेतू हा की दोन्ही पालकांची नावे लावणे ही ट्रेंड येऊ घातलीय. ती अधिकृतही होईल.
मुंबई विद्यापीठाचं उदाहरण दिलंच आहे.

सॉरी. मध्यंतरी मायबोलीवर येणे जमले नाही त्याबद्दल. सर्व प्रतिसादकांचे आभार.

शेवटी आम्ही (नवरा व मी) <मुलीचे नाव> < माझे (आईचे) नाव> <आडनाव> या फॉरमॅटमध्ये आधार कार्ड काढून घेतले.

आधार घरी आल्या आल्या फोटो काढून कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅप गृपवर टाकले. जवळचे लोक (सासू सासरे दीर जाऊ) वगैरे सोडून इतर सर्वांनी कौतुक केले. याव्यतिरिक्त अजून कुठे कोणालाही दाखवायची वेळ आली नाही.
काही कारणाने मुलीचे बँक अकाऊंट लगेचच काढावे लागणार आहे. तेव्हा तिथे असेच नाव लागेल आता.

मुलगी स्वतः अजूनतरी लहानपणी तिला शिकवले होते त्याप्रमाणे <तिचे नाव> <तिच्या बाबाचे (म्हणजे माझ्या नवर्‍याचे) नाव> <आडनाव> अश्याच फॉरमॅटमध्ये नाव सांगतेय. बघुयात पुढे काय होतंय ते.

फर्स्ट नेम प्लस आधार नंबर

असा फॉरमॅट द्यावा, म्हणजे कटकट नको
तसेही 10 अंकी मोबाईल नंबर लोक लक्षात ठेवतात , 12 अंकी आधारपण ठेवतील

हाक मारताना फक्त नावाने मारावे , आडनाव बंद , मधले नाव बंद , पी व्ही वगैरे आद्याक्षरे बंद

अनु अनामिका अभिनंदन
शक्यतो मुलीची स्वतः ची व कागदोपत्री ओलख एकच ठेवायचा प्रयत्न असूद्या. म्हणजे तिला स्वतःच्या नावाविषयी काही संभ्रम राहणार नाही व कोणी परंपरा परंपरा चा घोष करत उलट सुलट प्रश्न केल्यास ती त्याला सामोरी जाऊ शकेल

या निमित्त मला एक प्रश्न आहे
जर (so called) जवळचे नातलग मुद्दामहून टोचू लागल्यास त्यांना कसे काय हँडल करायचे?

मधले नाव आईचे अन आडनाव बापाचे

छान आहे,
पण ही प्रयोगशाळा नवर्याच्या घरात का म्हणे ?

माहेरी असताना बापाचे बखोट धरून सांगायचे होते, माझ्या नावात आईचे नाव लाव व तुझे आडनाव लाव म्हणून, तिकडे नाही हे जमले ?

Proud

नवरा प्राणी घरजावई करून त्याचे नाव 'श्रीराम माधुरी दीक्षित' असे करणे ही ह्या प्रयोगाची पुढची पायरी ठरो व नाव बदलण्याची तयारी असलेल्या सर्व पुरुषांना घरजावई होण्याचे सुख लाभो व सर्वत्र शांतता लाभो

Pages