सद्या कलर्स मराठी वरती एक आगळी वेगळी प्रेम कहाणी बघायला मिळत आहे. जवळ जवळ १०० एपिसोड्स झाले आहेत आणि अजूनही धागा निघाला नव्हता म्हणून चर्चा करायला हा धागा-प्रपंच!
तत्त्वनिष्ठ, शहरांत शिकलेली शिक्षकाची मुलगी सिद्धी आणि कमी शिकलेला, राजकारणासाठी कायदा धाब्यावर बसविणारा पण सच्चा, रांगडा शिवा यांची अनोखी प्रेम कहाणी आहे. अनोखी या कारणाकरता की दोघानाही नको असताना केवळ राजकारणासाठी त्यांचा विवाह लावून देण्यात येतो. एकमेकांविषयी गैरसमजूतींमधून ते आधीच शत्रु बनतात. दोघांचेही लग्नाआधी ज्या मुला-मुलीवर प्रेम असते त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. त्यामुळे हा विवाह दोघानाही अमान्य आहे पण केवळ राजकारण आणि आई - वडलांच्या सांगण्यावरून ते एकत्र राहाताहेत. एकत्र राहाता राहाता त्याना एकमेकांची नव्याने कशी ओळख होते आणि ते प्रेमात पडतात याची ही कहाणी आहे.
मालिकेची सर्वात उजवी बाजू म्हणजे यातील कलाकार - विदुला चौघुले ( सिद्धी) आणि अशोक फळदेसाई ( शिवा) यानी छान केमिस्ट्री जमविली आहे. शिवाची आई, वडिल ( मोहन जोशी), काका-काकू छानच! पण अगदी उल्लेख करावा असा अभिनय म्हणजे शिवाची बहीण झालेली शर्वरी जोग ( सोनल) आणि शिवाचा मित्र जलवा ( विकास पाटील). चिन्मयी सुमीत ने राजकारणी आत्याबाई छान वठवली आहे.

मी पण येता जाता बघितलं.
मी पण येता जाता बघितलं.
शिवा देव आहे, तो परोपकारी आहे हे सांगणारे बरेच जण भेटायला आले हॉस्पिटलात. सिद्धीला एकदम आता शिवा कित्ती चांगला साक्षात्कार होत चाललाय. इन्स्पेक्टरला संशय आलाय सिद्धीने पेढा भरवला त्यात गुंगीचं औषध होतं पण तो म्हणतोय की ते पेढे कोणी आणले त्याचा शोध घ्यायला हवा. तो म्हणताना मिठाई म्हणतो, हे सर्व तो सिद्धीशी बोलतो.
सिद्धीच्या आईला संशय येतो, सिद्धी कबुल करते, का केलं सांगते. मी पोलिसांना पण खरं सांगणार असं म्हणते, तिची आई नको सांगूस असं सांगते तिला. घरातले सर्व सासरे, काकू, सोनी प्रेम करते तुझ्यावर, त्यांना कसं वाटेल, त्रास होईल म्हणे.
दोन दिवस हे घडलं.
थँक्यू अन्जू . फारसं काही
थँक्यू अन्जू
. फारसं काही घडलेलं दिसत नाही म्हणजे. मला वाटलं सिद्धी शिवाच्या हातात फुलं ठेवते तेव्हा शिवा तिचा हात पकडतो (कोमातून बाहेर येतो) हे दाखवताएत मधेमधे adv मधे तो एपिसोड झाला कि काय.
जिद्दी आणि तिची आई खूपच पीळ
जिद्दी आणि तिची आई खूपच पीळ मारतात राव.अजून एक आठवडा नाही पहिली तरी चालेल. काहीच घडत नाही आहे.
सोनी छा गयी, दोन स्पेशलमधे.
सोनी छा गयी, दोन स्पेशलमधे.
कसली गोड आहे पोरगी, गातेही किती गोड. मस्त गायली लग जा गले गाणं.
ती मम्मी पण एन्टरटेनर आहे.
आता अग्निहोत्र बघेन. अर्धा तास आहे अजून संपायला.
ह्यात आज सिद्धीला शिवा
ह्यात आज सिद्धीला शिवा कशासाठी जीवावर उदार होऊन सुरमारीत भाग घ्यायला उत्सुक होता हे समजणार.
ह्याची टीम एबीपी माझावर आलेली
ह्याची टीम एबीपी माझावर आलेली आत्ता. काकू झाल्या आहेत ना त्यांचं संस्कृत उत्तम आहे आणि त्या चालीही लावतात गाण्यांना.
ह्याची टीम एबीपी माझावर आलेली
ह्याची टीम एबीपी माझावर आलेली आत्ता. काकू झाल्या आहेत ना त्यांचं संस्कृत उत्तम आहे आणि त्या चालीही लावतात गाण्यांना. गायत्री दातार नाव बहुतेक. >>>>>>> क्काय?
ह्या गायत्री दातारवरुन आठवल, झी युवावर डान्सिन्ग क्वीन नावाचा शो सुरु झालाय. ज्यु. सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य जज आहेत. टिव्ही सिरियलमध्ये काम करणार्या नटयान्नी यात पार्टिसिपेट केलय. ईशा निमकर उर्फ गादाही आहे त्यात. तिला तिकडे बघून शॉक्ड झाले मी. आता ती तिकडे डान्सचे काय दिवे पाजळणार ते तिलाच माहीत.
नाही नाही गायत्री दातार नाही,
नाही नाही गायत्री दातार नाही, sorry
पण काकू कोणीतरी दातार आहेत बहुतेक, कुठेतरी वाचलेलं. केलं एडीट, thank u ती इशा म्हणजे गादा लक्षात आणून दिल्याबद्दल. हो ती झी युवावर डान्स शो मध्ये येतेय, वाचलं कुठेतरी.
त्या बऱ्याच मुली अमराठी आहेत
त्या बऱ्याच मुली अमराठी आहेत आणि कधी नाव नाही ऐकले. हिंदीमध्ये कामं करत असतील तर माहित नाही. सोकुचं एक गाणं गाजलं तर ती किती कार्यक्रम जज करणार, आधी लावण्या जज करत होती. एवढं कळतं का खरंच तिला डान्समधलं. चला हवा येऊ द्या मध्ये तिने सांगितलं की एका हिंदी गाण्यात ज्यात शिल्पा शेट्टी होती त्या गाण्यात ती पन्नास जणी पैकी एक बॅक डान्सर होती
नशीब एवढं पालटलं.
तुजीरची नन्दिनी आहे त्यात.
तुजीरची नन्दिनी आहे त्यात. नेहा खान नावाची नटी आहे त्यात, तिने ममाच्या ' शिकारी' मध्ये काम केल होत.
हुश्श एक महीन्याने शिवा
हुश्श एक महीन्याने शिवा शुद्धीवर आला. आता त्याचा अभिनय बघायला मिळेल. बिचाऱ्याला झोपवून ठेवलेलं जवळजवळ महीनाभर.
. बिचाऱ्याला झोपवून ठेवलेलं
. बिचाऱ्याला झोपवून ठेवलेलं जवळजवळ महीनाभर. >>>>>>>ते त्याला उघड झोपलेलं पाहून कंटाळा आला होता, वाटायचं कि पुरुष नर्स ला सांगून हॉस्पिटलचा पेशंटचा युनिफॉर्म तरी त्याला घालायला लावावा.
ती सिद्धी खरंच मठ्ठ अभिनय,
ती सिद्धी खरंच मठ्ठ अभिनय, सिच्युएशन कुठलीही असो, जाऊदे लहान आहे म्हणावं तर मेन नायिकेचा रोल का दिला. दिसायला छान आहे हा प्लस point पण उंची हा मायनस point वाटतो मला. साडीत किंवा कशातही okच वाटते.
अर्थात शिवा rocking, रांगडेपणा असो किंवा मृदुपणा.
मला आवडताएत अत्ता चे एपिसोड.
मला आवडताएत अत्ता चे एपिसोड. छान कामं करताएत शिवा सिद्धी. दोघांचं अवघडलेपण खुप छान घेतलय
सिद्धी ची आई पण खुप छान काम
सिद्धी ची आई पण खुप छान काम करतेय, शिवा आणि सिद्धी च्या आईचे प्रसंग पण आवडले मला
सिद्धिच्या आईचे छान असते काम,
सिद्धिच्या आईचे छान असते काम, मला सिद्धि सोडून सर्वांचाच अभिनय आवडतो
ती दिसायला सुंदर आहे पण तिची अभिनयात प्रगती व्ह्यायला हवीय, अर्थात माझं वैयक्तिक मत.
परवाच्या प्रसंगात मला एक
परवाच्या प्रसंगात मला एक समजलं नाही, सिद्धी स्वतः च्याच घरात असते ना तर तिला स्वैपाक घरातली भांडी कुठे लावायची हे माहीती असू नये? शिवा च लावतो, तिचं घर आहे तर जागा तिला माहीती असेल भांड्यांची, बाकी तो स्वैपाक करतो, वाढतो आणि ती पुस्तकं बाइंडिंग करत असते हे खुपच छान दाखवलय.
तिचं घर आहे तर जागा तिला
तिचं घर आहे तर जागा तिला माहीती असेल भांड्यांची >>> मलाही सेम वाटलं.
ह्या सिरीयलीचे ५-७ मिनिट असे
ह्या सिरीयलीचे ५-७ मिनिट असे ५-७ भाग जाऊबाईंकडे पाहिलेत. सोबत जाऊबाई स्टोरी सांगत असतात.
मला शिवा फार आवडलाय. मस्त आहे तो.
सिद्धी सुंदर वैगेरे नाही वाटली. केवढे मोठाले डोळे. आणि नुसती किडकिडीत. साडीत तर नुसती उभी काठी दिसते. अभिनय पण नाही.
मला शिवा फार आवडलाय. मस्त आहे
मला शिवा फार आवडलाय. मस्त आहे तो. >>> हो एकदम करेक्ट.
सिद्धीचा चेहरा सुंदर वाटतो मला पण बाकी अजिबात आवडत नाही, तिचे उच्चारपण नीट नसतात. तिच्या मुलाखतीत जास्त तीव्रतेने जाणवलं, ती ठ ला ट म्हणते. सिरीयलमधेही म्हणते. ती प्रमाण मराठी बोलणारी वगैरे दाखवलेली म्हणून तिच्या कॅरॅक्टरनुसार तिचे उच्चार व्यवस्थितच हवेत पण नाहीयेत. ठासून ठासून जाम म्हणते डायलॉग्ज, तेही डोक्यात जातं माझ्या. जोडी आवडते शिवा सिद्धीची पण कोणीतरी दुसरी हवी होती असं बरेचदा वाटतं.
तिला मेन नायिका म्हणून सिलेक्ट का केलं असं मला अजूनही वाटतं.
खरंतर नायक नायिकेमधलं एक कोणी नाही आवडलं तर मी बघत नाही सिरीयल, पण ही बघावीशी वाटते कारण इतर सर्वच जण अभिनय सुरेख करतात.
तसंही इतर सिरीयलमधले बरेच नायक जास्त चांगले वाटतात नायिकांपेक्षा. घाडगे सुन, मन बावरे, ही सिरीयल कुठलीच नायिका आवडत नाही मला, पण इतर बघत नाही, ही बघते.
गौरव परत आला.
गौरव परत आला.
गौरव हा आत्याबाईने मुद्दाम
गौरव हा आत्याबाईने मुद्दाम शिवा आणि सिद्धीचे लग्न मोडण्यासाठी आणि सिद्धीला धडा शिकवण्यासाठी आणला आहे. तो वेडेपणाचे नाटक करत आहे.
सिरिअल वर एखादा चित्रपट निघू
सिरिअल वर एखादा चित्रपट निघू शकतो.
शिवा सिद्धी ला गौरव कडे जायला सांगणार. ती दूर गेल्यावरच त्याला प्रेमाची जाणीव होणार असे दिसते.
कित्ती बोअर आहे तो गौरव,
कित्ती बोअर आहे तो गौरव, चम्या वाटतो. आता महीनाभर बघायला नको, हा गौरव ट्रॅक असेल. मी खूप महीन्यांनी बघायला सुरुवात केलेली त्यामुळे गौरवला आधी बघितलं नव्हतं.
चिन्मयी गायब एकदम, अचानक भावेंना अति दाखवतायेत, तेपण बोअर करतात. सरकारपण गायब.
गौरव track संपला की सायलीला आणतील, तीपण जिवंत असेल. आता ह्या सिरीयलवर काट मारायला हवी बहुतेक. बाकी सिद्धीची साडी छान होती नाहीतर बेकार साड्या आहेत तिच्या.
काल गौरवचे नाटक उघडकीस आले.
काल गौरवचे नाटक उघडकीस आले. शिवाच्या सासू सासर्यांना बाथरूममध्ये सिगारेटचे तुकडे आणि गौरव च्या रूम मध्ये आत्याबाईने दिलेले पैसे मिळतात मग शिवाला हे सगळे सांगितले आणि शिवाने त्या गौरवला कोंडीत पकडून चांगलेच धमकावले व खोटेच सांगितले कि तू सिद्धीला घेऊन जा तुम्ही तिघे सुखात रहा. तिघे म्हणताच गौरव चमकतो आणि विचारतो कि तिघे कोण शिवा सांगतो तुम्ही, त्या आणि माझे बाळ। गौरव लॉजिकली विचार करतो आणि म्हणतो कि हे मला सिध्दीने का नाही सांगितले। त्याचे वेडेपणाचे सोंग उघडकीस येते आणि सिद्धी, शिवा दोघे एक एक देतात ठेवून त्या गौरवच्या कानाखाली.
हो, कालचा एपिसोड मस्त होता.
हो, कालचा एपिसोड मस्त होता. व्हॅलेंटाईन विक आहे म्हणून असेल, आदरवाईज मला वाटलेलं मिनिमम एक महीना असेल गौरव प्रकरण.
आत्याबाईंचं सत्य इतक्या लवकर उघडकीस येणार नाही, गौरव पळाला.
सिद्धीचा पण मेकओव्हर झालाय.
सिद्धीचा पण मेकओव्हर झालाय. साड्यांऐवजी आता ड्रेस घालतेय आणि केसांचे फुगे काढून त्यांना पिना लावून मोकळे सोडलेत अजिबात शोभत नाहीत चपट ती चपट च
हे आणि शिवाला काय बावळट
हे आणि शिवाला काय बावळट डायलॉग दिलेत, ते सारखं लाडात सिद्धी म्हणतो ते नाही आवडतए. आणि आता जरा त्या दोघांना मोकळं सोडा कि सोनी,काकू, आणि जलवा टीम डोक्यात जायला लागलीये
शिवा सिद्धीची लवस्टोरी बोअर
शिवा सिद्धीची लवस्टोरी बोअर होतेय. सिद्धीतर जास्त बावळट वाटते lovescenes मधे आणि लहान बाळासारखी बोलते. एखादवेळेस comfortable नसेल, लहान आहे. शिवाहि नसतो पण तिचं ऐकताना जाम कंटाळा येतो. नाही दाखवले तरी चालतील त्यांचे सीन्स
मलाही शिवा सिद्धी हाक मारतो ते नाही आवडत.
सिद्धी मला ड्रेसमधे आणि ती एक छान साडी आहे त्यात आवडते पण तिचा आधीच नीट नसलेला अभिनय अजून dull झालाय.
आता शिवाची पूर्वीची gf येईलहि कदाचित. परवा तिच्याबद्दल खूप हळवा झालेला शिवा, फोटो बघून.
जलवा >>> हा तर जाम डोक्यात जातो माझ्याही. स्वत: लेखक आहे, म्हणून सोनीचा हिरो म्हणून तिच्याशी लग्न केलं तर मला नाही बघवणार.
मलाही शिवा सिद्धी हाक मारतो
मलाही शिवा सिद्धी हाक मारतो ते नाही आवडत.
होना ... तो अहो जाहो करायचा तेच छान वाटत आहे.तसेच ठेवायला हवे होते ते. मी तर गौरवला मारताना पाहिले त्या नंतर ही मालीका बघितलीच नाही. नकोच वाटते बघायला.
Pages