जीव झाला येडा पिसा - एक आगळी वेगळी प्रेम कहाणी

Submitted by sulu on 9 August, 2019 - 13:31

सद्या कलर्स मराठी वरती एक आगळी वेगळी प्रेम कहाणी बघायला मिळत आहे. जवळ जवळ १०० एपिसोड्स झाले आहेत आणि अजूनही धागा निघाला नव्हता म्हणून चर्चा करायला हा धागा-प्रपंच!

तत्त्वनिष्ठ, शहरांत शिकलेली शिक्षकाची मुलगी सिद्धी आणि कमी शिकलेला, राजकारणासाठी कायदा धाब्यावर बसविणारा पण सच्चा, रांगडा शिवा यांची अनोखी प्रेम कहाणी आहे. अनोखी या कारणाकरता की दोघानाही नको असताना केवळ राजकारणासाठी त्यांचा विवाह लावून देण्यात येतो. एकमेकांविषयी गैरसमजूतींमधून ते आधीच शत्रु बनतात. दोघांचेही लग्नाआधी ज्या मुला-मुलीवर प्रेम असते त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. त्यामुळे हा विवाह दोघानाही अमान्य आहे पण केवळ राजकारण आणि आई - वडलांच्या सांगण्यावरून ते एकत्र राहाताहेत. एकत्र राहाता राहाता त्याना एकमेकांची नव्याने कशी ओळख होते आणि ते प्रेमात पडतात याची ही कहाणी आहे.

मालिकेची सर्वात उजवी बाजू म्हणजे यातील कलाकार - विदुला चौघुले ( सिद्धी) आणि अशोक फळदेसाई ( शिवा) यानी छान केमिस्ट्री जमविली आहे. शिवाची आई, वडिल ( मोहन जोशी), काका-काकू छानच! पण अगदी उल्लेख करावा असा अभिनय म्हणजे शिवाची बहीण झालेली शर्वरी जोग ( सोनल) आणि शिवाचा मित्र जलवा ( विकास पाटील). चिन्मयी सुमीत ने राजकारणी आत्याबाई छान वठवली आहे.

Jeev-Zala-Yedapisa-Start-Watch-on-Colors-Marathi-schedule-cast-story.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हि सिरीयल मी पूर्वी सलग बघायची पण गौरव पळाल्यापासून आणि सरकार फिरायला गेल्यापासून सिरीयल आठवड्यातून एकदा बघितली तरी चालते, काहीच घडत नाही. सिद्धीचा अभिनय नाही आवडत आता. फक्त शिवाला किती बघणार हल्ली त्याच्यासोबत ती चपटी चिकटलेली असते.

जलवा >>> हा तर जाम डोक्यात जातो माझ्याही. स्वत: लेखक आहे, म्हणून सोनीचा हिरो म्हणून तिच्याशी लग्न केलं तर मला नाही बघवणार. >>> अगं नाही, तो बहिणी मानतो सोनलला, असं नाही दाखवणार. पण खरंच शिवाला बुळचट करून टाकले, रांगडा होता तेव्हा पण चांगला केअरिंग दाखवला होता. आता मंद बुद्धी असल्यासारखा सि ssss द्धी अशी हाक मारत असतो मधेमधे नाहीतर मास्तरीणबाई असं वेगळ्याच टोन मध्ये म्हणतो. छ्या मजाच गेली

मी परवाचा एपिसोड बघितला व्हूटवर, मला आवडली सिद्धी .पिच कलर टॉप आणि लाईट पिंक कलरचा पटियाला छान दिसत होती. साधे बांधले होते केस, तशीच चांगली दिसते. उगीच कर्लस् वगैरे करून सोडलेले केस नाही आवडले. आणि शिवा पण आवडला. फॉर अ चेंज सिद्धी असं नाही म्हणाला. आणि रूमच्या आत मधले डायलॉग आवडले मला.

मला आवडली सिद्धी .पिच कलर टॉप आणि लाईट पिंक कलरचा पटियाला छान दिसत होती. >>>पिच नाही पिस्ता कलर चा टॉप, सॉरी माय मिष्टेक

हल्ली साड्या पण छान दिल्यात तिला, कालची निळी छान होती. नाहीतर आधीच्या साड्या, एक राणीकलरकडे झुकणारी आवडायची फक्त मला. पण सिरीयल बोअर होतेय मात्र.

काल सिद्धी अगदी काहीतरीच दिसत होती, शिवा भारी दिसत होता. परवा शिवाच्या मम्मीने सुपर्ब अभिनय केला. मला तर वाटतं सरकार आणि सोनीचं लग्न व्हावं आणि ती सुधारते सरकारला दाखवावं, ते बघायला तरी मजा येईल. नाहीतर सोनी आणि जलवाचे दाखवतील. एकवेळ त्या मास्तरांना बोलावून त्यांच्याशी लाऊन द्यावं पण जलवा नको.

आता शिवा सिद्धी बघायला कंटाळा येतो. त्यापेक्षा सरकार, सोनी, आत्याबाई बघायला मजा येईल.

जलवा भावासारखा आहे गं अन्जू सोनीला. त्याच्याशी कसं दाखवतील लग्न?
सरकार आणि सिद्धीचे आईबाबा- भाउ यांना सिरीयल मधून कटाप केलय कि काय? इव्हन नरपत चिकणे, एकपण सिन नसतो यांचा

धनुडी सिरीयलमध्ये काहीही दाखवतील, त्या विकास पाटीलनेच सोनीबरोबरचं नातं पुढे कसही जाऊ शकतं अशी hint दिलेली, जितेंद्र जोशीच्या कार्यक्रमात, तेव्हापासून मी साशंक आहे.

बऱ्याच जणांना गायब केलंय हे खरं आहे.

नवीन 2 सिरियल्स येणार आहेत, सख्खे शेजारी आणि स्वामी समर्थ. कदाचित मन बावरे आणि बाळूमामा संपणार असेल.

लग्न होईल असं मला वाटत नाही, पण ताणतील तिथपर्यंत. त्या मास्तरांशी लाऊन देतील लग्न, त्याला शोधतील आणि मग जा सिमरन जा, तसं जा सोनी जा जिले अपनी जिंदगी करतील. याबाबतीत मी सरकार, मास्तर परवडतील पण जलवा आवर म्हणेन. खरंतर सोनीसाठी छान कोणीतरी हिरो हवा होता.

कालचा नाही बघितला, पंतप्रधान संवाद साधत होतेना आपल्याशी, ते महत्वाचं वाटलं मला. आज वुट वर बघेन एखादवेळेस.

सरकार छान आहे अगदीच त्याला विलंन करून ठेवले आहे। त्यालाही सुधरवता येईल कि। ती एक स्टार प्लस वर प्रतिज्ञा सिरीयल होती त्यात त्या पढीलिखी प्रतिज्ञा चे राजकीय गावगुंडाशी लग्न होते आणि मग तो सुधारतो वैग्रे।

तसंहि चालेल पण जलवा नको हे मी आधीच लिहिलं आहे, काही दिवसांपूर्वी. ते बघायला जास्त मजा येईल, सरकारला कसं सुधरवते सोनी, आणि तो कसा आत्याबाई विरोधात जातो.

आता शिवा सिद्धी पेक्षा हे बघायला खरं तर मजा येईल, सिद्धीला बघून कंटाळा आला.

ही मालिका कोण बघत का आता.
पार आधी शीवाला नंतर सागर आणी आता सिद्धी आत्या बाईंची खरी मुलगी आहे असे दाखवले आहे.
कथा भरकट आहे खुप

परवा बघितला एक एपिसोड. दिवाळीचा होता, सागर blackmail करून आत्याबाईकडून पैसे घेतो. शिवाच्या घरी बाबा आलेले असतात, पाडवा भाऊबीज औक्षण बघितलं. याआधी एक सीन बघितला होता मागे, सिद्धीची सुपारी आत्याबाई देतात तो, ती सुपारी देऊन झाल्यावर ती मुल देवळात ठेवणारी बाई वरातीमागून घोडे असल्यासारखी सांगते तिला की तुला मुलगी झालेली आणि ती सिद्धी आहे.

तो सरकार कुठे गेला.

मोहन जोशी कधी पण येतात कधी पण जातात.
लॉक डाउन मध्ये 3 महिने कोणत्या ही मालिका सुरु नव्हत्या . त्यामूळे परत सुरु झल्यावर स्टोरी वेगळ्याच लाईन वर गेली.

हिंदीत आली सीरिअल 'बावरा दिल' directed by Randip Shantaram Mahadik त्यातही में लीड चे नाव शिवा आणि सिद्धी आहे । It is based on the Marathi series Jeev Zala Yeda Pisa.
मराठीतले एकसे एक कलाकार यात आहेत आपल्या संजनाचा नवराही आहे यात .

मी प्रोमो बघितला. मराठीतून हिंदीत गेली हे आवडलं, नाहीतर एरवी हिंदीचा रिमेक मराठी सिरियल्स असतात.

शिवा आपला मराठी जास्त आवडला मला.

ही सिरीयल संपतेय, असं वाचलं.

त्यामुळे कालचा भाग आज voot वर बघितला. गेल्यावर्षी lockdown आधी बघायचे बरेचदा, शिवासाठी. मग मोठ्या gap नंतर सुरु झाल्यावर बघावंसं वाटेना.

सिद्धी सोडून बऱ्याच जणांचे अभिनय उत्तम, पण सिद्धीने कालच्या भागात छान काम केलं.

Pages