जीव झाला येडा पिसा - एक आगळी वेगळी प्रेम कहाणी

Submitted by sulu on 9 August, 2019 - 13:31

सद्या कलर्स मराठी वरती एक आगळी वेगळी प्रेम कहाणी बघायला मिळत आहे. जवळ जवळ १०० एपिसोड्स झाले आहेत आणि अजूनही धागा निघाला नव्हता म्हणून चर्चा करायला हा धागा-प्रपंच!

तत्त्वनिष्ठ, शहरांत शिकलेली शिक्षकाची मुलगी सिद्धी आणि कमी शिकलेला, राजकारणासाठी कायदा धाब्यावर बसविणारा पण सच्चा, रांगडा शिवा यांची अनोखी प्रेम कहाणी आहे. अनोखी या कारणाकरता की दोघानाही नको असताना केवळ राजकारणासाठी त्यांचा विवाह लावून देण्यात येतो. एकमेकांविषयी गैरसमजूतींमधून ते आधीच शत्रु बनतात. दोघांचेही लग्नाआधी ज्या मुला-मुलीवर प्रेम असते त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. त्यामुळे हा विवाह दोघानाही अमान्य आहे पण केवळ राजकारण आणि आई - वडलांच्या सांगण्यावरून ते एकत्र राहाताहेत. एकत्र राहाता राहाता त्याना एकमेकांची नव्याने कशी ओळख होते आणि ते प्रेमात पडतात याची ही कहाणी आहे.

मालिकेची सर्वात उजवी बाजू म्हणजे यातील कलाकार - विदुला चौघुले ( सिद्धी) आणि अशोक फळदेसाई ( शिवा) यानी छान केमिस्ट्री जमविली आहे. शिवाची आई, वडिल ( मोहन जोशी), काका-काकू छानच! पण अगदी उल्लेख करावा असा अभिनय म्हणजे शिवाची बहीण झालेली शर्वरी जोग ( सोनल) आणि शिवाचा मित्र जलवा ( विकास पाटील). चिन्मयी सुमीत ने राजकारणी आत्याबाई छान वठवली आहे.

Jeev-Zala-Yedapisa-Start-Watch-on-Colors-Marathi-schedule-cast-story.jpg

Group content visibility: 
Use group defaults

YouTube वर मिरची मराठी वर शिव विणा चा किती मस्त व्हिडिओ आहे. लिंक कशी देउ ते कळत नाहीये अत्ता, म्हंजे आठवत नाहीये.

वरती अ‍ॅड्रेस बार वर कॉपी क्लिक करुन, इथे पेस्ट.

पण इथे नको, मराठी बिग बॉस किंवा अभिनंदन शिव वर पोस्ट कर.

थँक्यू अमूपरी, मला एकदा वाटलं हं, पण वेगळाच दिसतोय, तरी खुप ओळखीचा वाटतोय. आठवेपर्यंत डोक्यात भुंगा राहीला असता
अन्जू तुला पण थँक्यू, दिली मी लिंक बिबॉ च्या बाफवर, बघ. Happy

नेटवर मधलेच 2 भाग बघितले, ती सिद्धि आत्याबाईवर डाव उलटवते तो, एरवी दुसऱ्या कोणीतरी तो भाषण सीन छान वठवला असता पण किती एकसुरी बोलत होती, so bored.

नंतर शिवाला भडकवते तर शिवा काय तिची पुस्तकंच जाळतो, वाईट वाटलं पण सिद्धि किंवा इतर बायका येऊन अडवू शकल्या असत्या खरंतर, थातुरमातुर बोलल्या सोनी आणि काकु, सिद्धि स्तब्ध, अग पुस्तकं ना तुझी मग तिथे त्वेष दाखव, धावत येऊन झटापट कर त्याच्याशी, काडेपेटी काढून घे, किंवा पुस्तकांवर पड. सगळे तो काडी कधी पेटवतोय आणि आग कधी लावतोय ह्याची वाट बघत होत्या म्हणजे नंतर सिद्धीला पुस्तकांची राख हातात घेऊन शिवाला बरबाद करायचं टाईप डायलॉग्ज डिलिव्हर करता येतील. त्यापुढे मी बघितलं नाही.

त्या शिवालापण आत्याबाई देव वगैरे का वाटतात, डोकं गहाण टाकलं आहे का, आंधळा कार्यकर्ता.

शिवा सिद्धीत अजून जास्त खुन्नस, द्वेष दाखवणार. जाऊदे अजून काही महिने बघायला नको.

मी पाहिले. जीव झिला आणि मन बावरेला जिस्त अँवॉर्ड्स मिळाले.सूत्रसंचालनाच अँवॉर्ड चक्क ममांना मिळाल.

Thank u UP आणि चंपा. चांगला झाला का prgm. इंटरेस्टिंग झाला असेल तर परत कधी दाखवला तर बघेन.

कलर अ‍ॅवार्ड बघितले आज ! सुमित राघवन ने छान केल अ‍ॅकरिन्ग ! त्याची बायको त्याच्यापेक्षा मोठि आहे का ? तस वाटत तरी बघताना.
बाकी झी सारखच सगळ केल होत यातही पण कॉमेडी मिसिन्ग आहे कलर्स कडे.
हर्शद नायबळ खरच गिफ्टेड पोरग आहे, ती सिद्दि १० वी पास झालिये आता? केवढी मोठी दिसते? .
मेघा धाडे पण दिसली अवॅर्ड देताना, जाड झालिये मेघा.
सगळ्यात बेकार स्प्रुहा दिसत होती , काय ते केस आणि ड्रेस , एक्दम गन्डलेल प्रकरण.

कॉपी पेस्ट कसं करतात मोबाईलमध्ये. अगंबाईच्या धाग्यावर लिहिलंय मी थोडं. सिद्धी बद्दल मलाही तेच वाटलं, साडी नेसते मालिकेत ते ठीक, पण इथेही ती मोठीच दिसत होती, आणि बरीच स्मार्ट आहे, लाजरी बुजरी नाही, रिंकू राजगुरू सारखी. झीची बरीच कॉपी केली होती, कुठेही बोर होणार नाही याची काळजी घेतली होती. सुमित राघवनने धमाल उडवून दिली, तो नसता तर कंटाळवाणं झालं असतं सगळं. हर्षद कमाल मुलगा आहे. अजून एक मुलगी पण छोटी यावर्षी सूनध्यान मध्ये बोलावणार हर्षदसारखी मध्ये मध्ये टीपी करायला असं म्हणाले होते, ती कुठे दिसली नाही.
मेघाने खूप जास्त मेकप केला होता, तिचा चेहरा नीट दिसतच नव्हता, नुसती पांढरी पावडर आणि लाल ओठ, बिग बॉस नंतर मेकअपचं सामान पडून असेल, सगळं फासून घेतलं असेल Happy
ऐश्वर्या नारकर अगदी घुश्श्यात दिसत होती, हसतही नव्हती. स्टेजवर नवरा तिचा हात पकडत होता तर हिने पकडूच दिला नाही आणि अवॉर्ड दिल्यावर तरातरा निघून गेली.
स्पृहाच्या साडीवर सगळ्या अभिनेत्री होत्या का, काही कळलं नाही. साडी विचित्र होती खरी. सर्वोत्कृष्ट नायिका अनु हे काही पटलं नाही, ती सगळ्यात जुनी आणि अनुभवी आहे हेच एक कारण असेल, आणि तिच्याबरोबर स्पर्धेत फक्त लक्ष्मी नारायण आणि छोटी रमा, काहीही. शशांक केतकर म्हणाला तसं घरचेच अवॉर्ड आहेत त्यामुळे असेल, नाहीतर अनुपेक्षा सान्वी बरी आहे.

मी पण बघितलं, सुमित राघवन आणि चिन्मयी सुमीत छान अँकरिंग केलं. Award function त्यादिवशी दोनदा दाखवलं, दुपारी १२ आणि रात्री ८ वा. परत दाखवतील म्हणा. सरकार ने मिमिक्री छान केली, तो शिवा ची पण छान नक्कल करतो. हो सिद्धी बद्दल मलाही प्रश्न पडलाय कि ती खरोखर इतकी लहान आहे कि दहावी उशीरा देतेय?

रात्री ८ वा. >>> ओहह हे माहिती नव्हतं, नाहीतर बघितलं असते. Voot वर असेल कदाचित, बघेन.

कलर अ‍ॅवार्ड बघितले आज ! सुमित राघवन ने छान केल अ‍ॅकरिन्ग ! >>>>>>>+++++++११११११११

कॉमेडी मिसिन्ग आहे कलर्स कडे.>>>>>>>>> कुठे? सुमित राघवनच्या अ‍ॅकरिन्गमध्ये नर्मविनोदीपणा होता.

हर्शद नायबळ खरच गिफ्टेड पोरग आहे, >>>>>>>> अगदी अगदी

सगळ्यात बेकार स्प्रुहा दिसत होती , काय ते केस आणि ड्रेस , एक्दम गन्डलेल प्रकरण. >>>>>>> सहमत

ऐश्वर्या नारकर अगदी घुश्श्यात दिसत होती, हसतही नव्हती. स्टेजवर नवरा तिचा हात पकडत होता तर हिने पकडूच दिला नाही आणि अवॉर्ड दिल्यावर तरातरा निघून गेली. >>>>>>>> राग तर येणार ना तिला. सर्वोत्कृष्ट खलनायिकासाठी एक सोडून दोन अवॉर्डस विभागून देण्यात आले आणि तेही भलत्याच जणीन्नाच. हिला मात्र सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेच सेपरेट अवॉर्ड दिल.

निखिल सानेने भाषणात झीमला टोमणा मारला होता का? चॅनेल हेड सगळ ठरवतात, पण इथे मात्र निर्णयस्वातन्त्र्य आहे अस काहीतरी म्हणाले.

शरद पोन्क्षेन्नी एबीपी माझाच्या मुलाखतीत लेखकान्ना , मेकअपमनना का नाही अवॉर्डस देत असा योग्य टोमणा मारला. ते चॅनेलवाल्यान्नी सिरियसली घेतलेल दिसतय. आधी झीमने मेकअपमनना , लेखकान्ना आणि आता कलर्सने लेखकान्ना अवॉर्डस दिले. छान केल.

तुपारेची रुपाली इथे छान दिसत होती.

सरकार ने मिमिक्री छान केली >>>>>>>> हो. ह्याला आधी कुठेतरी पाहिल्यासारख वाटतय. हा आधी लाफ्टर चॅलेन्ज किव्वा फु बाई फु मध्ये होता का?

बाकी कलर्स मराठी अवॉर्ड झीमपेक्षा चान्गला होता. मी तुकडयातुकडयात बघितल, पुर्ण बघितला नाहीये अजून.

मीही पूर्ण नाही बघितलं. ऐश्वर्याला काय बक्षीस दिलं ते नाही बघितलं, यासाठी रागावली होती ती Uhoh आत्ता कुठे मालिका सुरु झालीये, मिळेल की पुढच्या वर्षी.
सरकार कोण, कुठल्या मालिकेत आहे तो. मी फक्त जलवाने जे केलं ते थोडं बघितलं.
लेखकांना आधीही बक्षीस दिलं होतं बहुतेक झीने. निखिल साने यांनी बरेच टोमणे मारले असे वाटले, कलाकारांनाही बोलले, की यांचं एक बरं असतं, पर डे किती, महिन्याला सुट्ट्या किती, सुपाऱ्या, उदघाटन, मॉडेलिंग, बाकी कसली चिंता नाही Proud
कार्यक्रम खरेच चांगला होता पण काही मालिका अजिबात बघत नाही, त्यामुळे बरेच विनोद कळले नाहीत.

ह्याला आधी कुठेतरी पाहिल्यासारख वाटतय. >>> एका लग्नाची तिसरी गोष्ट मधे होता आणि अजूनही कशात तरी होता.

सरकार कोण, कुठल्या मालिकेत आहे तो >>> जीव झाला येडापिसामधे आत्याबाईंचा मुलगा आहे तो.

बाकी कलर्स मराठी अवॉर्ड झीमपेक्षा चान्गला होता. मी तुकडयातुकडयात बघितल, पुर्ण बघितला नाहीये अजून. >>> वुट वर आहे का, तर मीही तुकड्या तुकड्यात बघेन.

ह्याला आधी कुठेतरी पाहिल्यासारख वाटतय. >>> एका लग्नाची तिसरी गोष्ट मधे होता आणि अजूनही कशात तरी होता.>>>>> तुझं माझं ब्रेक अप मध्ये त्या दोघांचा मित्र होता.

तुझं माझं ब्रेक अप मध्ये त्या दोघांचा मित्र होता. >>> त्याचा पहिला एपिसोड बघितलेला फक्त, त्यात नाही आठवत पण मग अजून कशाततरी होता.

Voot वर पोस्ट नाही केले channelने awards.

आहे आहे voot वर. आज सापडलं मला. पावणेतीन तासाचा prgm दिसतोय. अजून सेपरेट त्या नेहाने प्रत्येक सिरियल्सच्या सेट वर जाऊन मुलाखत वगैरे घेतली ते दिसतंय.

बघेन निवांत.

पहिली दिवाळी चालू आहे. त्यामुळे दोघे 'नाटक' करताहेत. ती ओवळण्याचे आणि तो ओवाळून घेण्याचे.
मध्यंतरी शिवाला भाषणात मदत केल्याबद्दल किरण गुरुजी एक्दम शिवा च्या गूड बूक्स मध्ये.
सोनल किरण गुरुजींच्या पुरती प्रेमात!

सिरिअल एवढी चालेल असा अंदाज नसावा त्यामुळे प्रत्येक एपिसोड मध्यी पाणी खूप!

थँक यु सुलू. आजचा भाग थोडा बघितला.

कलर्स मराठी अवॉर्डस येत्या रविवारी संध्याकाळी सात वाजता परत दाखवणार आहेत, जमलं तर बघेन.

दोन स्पेशलचा पहीला भाग आवडला, मला सुमित राघवन खूप आवडतो, सुबोध पण आवड्तो पण सुमितपेक्षा कितीतरी कमी आवडतो.

पहिली दिवाळी चालू आहे.>>>>>>>>> अभ्यंगस्नानाचा सीन खुपच मस्त होता, काकु आणि सोनी उटणं लावताना " उठ गोपाळजी चाल धेनु कडे , पाहती सौंगडे वाट तुझी" हे गाणं म्हणंतात. . खुपच सुंदर म्हंणाल्या त्या दोघी. किती तरी दिवसांनी ऐकलं हे गाणं/कविता.

बघितले कलर्स मराठी awards, चांगली होती. मला तो तात्या आवडला, मी बघत नाही मालिका पण जलवापेक्षा त्याचं impression पडलं. वीणा वरून छान केलेलं, त्यावरून सिद्ध होतं की वीणा अजूनही कलर्स channel साठी महत्वाची आहे. जलवा स्टेजवर फार नाही आवडला. मी voting जास्त जी झा वे साठी केलेलं पण बाळूमामा म्हणून छोट्याला vote दिलेलं बालकलाकार categoryत.

अनु मात्र मला उदास उदास वाटते, बोअर झाली. शशांक केतकरची बायको छान आहे, एकदम गोड हसतमुख. आत्याबाईना वैयक्तिक एकही award नाही मिळालं Sad .

निखील साने यांचे भाषण फार आवडलं, सर्व लेखकांना awards दिली ते छान झालं. त्याना सर्व channels वरच्या लेखकांना द्यायचं मनात होतं म्हणाले.

चिन्मय मांडलेकर आणि विकास पाटील म्हणजे जलवा दोघे ही मालिका लिहितात. एकजण संवाद लिहित असेल.

मला सोनी आणि किरण सर सीन्स बोअर होतात.

मला सोनी आणि किरण सर सीन्स बोअर होतात.>>>>> मलापण. उगीच ओढून ताणून लव स्टोरी तयार करताएत. एरवी ती सोनी एवढी लाजरीबुजरी दाखवली आहे आणि आता गुरूजींना सरळ सरळ हिंट देतेय कि मला तुम्ही आवडता? आणि ह्या सिध्दी ला पण अक्कल नाही का आधी सोनीचे शिक्षण पूर्ण नको करायला? कुठे फोकस करायला पाहिजे तर हीच पाठिंबा देतेय, कशात काही नाही तरी

Pages