जीव झाला येडा पिसा - एक आगळी वेगळी प्रेम कहाणी

Submitted by sulu on 9 August, 2019 - 13:31

सद्या कलर्स मराठी वरती एक आगळी वेगळी प्रेम कहाणी बघायला मिळत आहे. जवळ जवळ १०० एपिसोड्स झाले आहेत आणि अजूनही धागा निघाला नव्हता म्हणून चर्चा करायला हा धागा-प्रपंच!

तत्त्वनिष्ठ, शहरांत शिकलेली शिक्षकाची मुलगी सिद्धी आणि कमी शिकलेला, राजकारणासाठी कायदा धाब्यावर बसविणारा पण सच्चा, रांगडा शिवा यांची अनोखी प्रेम कहाणी आहे. अनोखी या कारणाकरता की दोघानाही नको असताना केवळ राजकारणासाठी त्यांचा विवाह लावून देण्यात येतो. एकमेकांविषयी गैरसमजूतींमधून ते आधीच शत्रु बनतात. दोघांचेही लग्नाआधी ज्या मुला-मुलीवर प्रेम असते त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. त्यामुळे हा विवाह दोघानाही अमान्य आहे पण केवळ राजकारण आणि आई - वडलांच्या सांगण्यावरून ते एकत्र राहाताहेत. एकत्र राहाता राहाता त्याना एकमेकांची नव्याने कशी ओळख होते आणि ते प्रेमात पडतात याची ही कहाणी आहे.

मालिकेची सर्वात उजवी बाजू म्हणजे यातील कलाकार - विदुला चौघुले ( सिद्धी) आणि अशोक फळदेसाई ( शिवा) यानी छान केमिस्ट्री जमविली आहे. शिवाची आई, वडिल ( मोहन जोशी), काका-काकू छानच! पण अगदी उल्लेख करावा असा अभिनय म्हणजे शिवाची बहीण झालेली शर्वरी जोग ( सोनल) आणि शिवाचा मित्र जलवा ( विकास पाटील). चिन्मयी सुमीत ने राजकारणी आत्याबाई छान वठवली आहे.

Jeev-Zala-Yedapisa-Start-Watch-on-Colors-Marathi-schedule-cast-story.jpg

Group content visibility: 
Use group defaults

मलाही आवडते ही सिरियल, अगदी रोज नाही, तरी अधूनमधून बघते. सोनल फारच आवडते आणि शिवादादाही. चिन्मयी सुमित फार भारी काम करते. ती असली की इतर सगळे कच्चा लिंबू वाटतात तिच्यापुढे Happy सिद्धीचं काम करणारी मुलगी नाही आवडत फारशी, बोलताना ती स्वतःला खूप आवळून घेते असं वाटतं, तिच्यात तेजश्री प्रधानचा फारच भास होतो!
नरपत चिकणेचं काम करणारा नटही मस्त आहे.
गावचं राजकारण पर्फेक्ट दाखवलं आहे. फ्लेक्स, सतत मोबाईल फोन, पुढे पुढे करणारे कार्यकर्ते, मुजोर मुलगा या छोट्या छोट्या गोष्टी मस्त कॅच केल्या आहेत.

अजुन 4 5 दिवस तर नविन भाग नाही घालणार. चित्रीकरणला ब्रेक आहे.आधी च शूट करुन ठेवलेले सर्व एपिसोड दाखवून झाले आहेत.

पूरा नंतरच्या ४-५ एपिसोड्स नंतर काहीच गोष्ट पुढे गेलेली दिसत नाहीये. सतत सासु ची सिद्धी विरुद्ध ची कारस्थानं बघून कंटाळा आला. सिद्धी आणि शिवाची प्रेम कहाणी पुढे नेण्याची चांगली संधी होती या आठवड्यात !

आता उद्या खतरनाक आहे, सिद्धी त्या सरकारला कानफटात मारते. कारण सरकार म्हंजे आत्याबाईला मुलगा सोनीशी (शिवाची बहिण) मिसबिहेव करतो, विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो म्हणून.

परवा शिवाची आई पाय घसरून पडली,सिध्दी वर सगळं ढकललं,तेंंव्हा बरं काकुने वेळेवर तोंड ऊघडलं शिवासमोर,हे सिद्दी मुळे झालं नाही म्हणून.
नाहीतर हवं तेंव्हा, हवं तिथे न बोलण्याची व गै.स. पसरण्याची परंपरा ईथे चालू रहाणार वाटतं असं वाटलं.

मो.जो. कुठे गेले?

देवाला मी ही जातो जातो म्हणुनी राहू नये. त्या सोनी चा आवाज चांगला आहे. मोजो पिक्चर वा नाटक मध्ये व्यस्त असतिल त्यामूळे गायब आहेत. तो सिद्धी चा भाऊ उगीच कशाला आत्याबाई आणी नरपत मध्ये पडत आहे. पुढे तो गोत्यात येइल.
आत्या बाईं चा मुलगा सोने ला काहितरी करणार असे मला खुप अधिपासुन वाटत होते. जेंव्हा त्याने मार्केट मध्ये एका मुलीची छेड काढली होती. आणी ते शिवांने निस्तरले होते. ती शिवा ची आई सोनेच लग्न सरकार बरोबर कशाला लावायचे आहे. नुसता पैसा पैसा करते.

झाला का तो एपिसोड, त्या सरकारच्या सिद्धी मुस्कटात देते तो. प्रोमोज बघितले होते bb बघताना.

झाला का तो एपिसोड, त्या सरकारच्या सिद्धी मुस्कटात देते तो. प्रोमोज बघितले होते bb बघताना.>>>> आज आहे.

आज लष्करे हाउस मध्ये गणपती ची धांदल. उद्या परत आत्याबाईंचा अपमान होणारसे दिसते. शिवा आणि सिद्धी यांची लव-स्टोरी मुंगी च्या पावलानं पुढे जातेय.

सोनलला english शिकवायला एक तरूण मास्तरणी आणली ये जलवाने, तर ती शिवावर फुल लट्टू दाखवली आहे. अगदी अन फिट ह्यांच्या स्टार कास्ट मध्ये, एकतर गावात अशा टाईप च्या मुली कुठे असतात आणि तिला शिवाची ख्याती माहिती नाही ?तो मुलींशी बोलताना नाही. तर असो आता तिसरा कोन आल्या मुळे सरकेल स्टोरी थोडीथोडी

कोणाला आणलं. आता महिना दोन महिने तीच असणार.

मला वाटलं होतं की सिद्धीच्या भावाला ठेवेल शिकवायला शिवा मग त्यांची जोडी जमेल. त्याला शिकून नोकरी चाकरी नाही, शिवासाठीच काम करतोय ना.

तिकडे शिव आणि इथे शिवा दोघे आवडतात मला, इथे confirmed केलं की मी नक्की शिवा लिहिलं ना, नाहीतर शिव लिहीन चुकून Lol

काल पहिल्यांदा सिद्धी ने बोलता बोलता स्वतःहून शिवाशी लग्ना चा विषय काढला. लक्षात आल्यावर बोलता बोलता थांबलीच. तो क्षण दिग्दर्शकाने छान टिपला.

नवी मास्तरीण ठिक्ठिक वाटली. थोडी कृत्रिम वाटतेय बाकीच्यांच्या समोर!

मी आज एक सीन बघितला, तो सिद्धी चा भाऊ काय शिवावर दादागिरी करत होता, सरकारच्या जीवावर, त्याला माहिती नाही का, त्याच्या बहिणीने कानफटवले सरकारला ते. मग त्या टिंग्याने बुकललं त्या भावाला.

कोण आहे नवीन एन्ट्री, दिसली नाही आज म्हणजे कलाकार कोण आहे.

धनुडी Lol

तीन भाग धावडवत बघितले voot वर. सागर टोटली बदलला, सिद्धी छान react होते. तो पिठाचा सीन मस्त होता, मम्मीचा डाव मम्मीवर उलटला. ती नवीन टीचर काहीही आहे, तिचा शिवावर लाईन मारण्याचा डाव आहे. शिवा सिद्धीला एकत्र आणण्यासाठी आणली आहे तिला बहुतेक. बंट्या positive झाला, बबल्या अजून negative होणार बहुतेक. सिद्धी काकूचे दु:ख समजून आधार देते तिला.

काल शिवा ने म्हणे सर्वर डाउन केला आणि त्यामुळे सिद्धी इम्प्रेस झाली. कठीण आहे. चांगल्या गोष्टींना हे सिरिअल वाले असे सुरुंग लावतात. Happy तरी बरे, त्या निमित्ताने दोघांची लव-एष्टोरी पुढे तर गेली.

शिवा लय भारी. सिद्धी मात्र कधी कधी कृत्रिम वाटते. उगाच ठसक्यात टोन असतो. पण आवडायला लागला की काय शिवा, थोडी impressed झाल्यासारखी वाटते.

बंट्या बबल्याच्या टीशर्टवरचे सुविचार Wink , जबरी असतात. एक सुधारतोय त्यातला.

Pages