जीव झाला येडा पिसा - एक आगळी वेगळी प्रेम कहाणी

Submitted by sulu on 9 August, 2019 - 13:31

सद्या कलर्स मराठी वरती एक आगळी वेगळी प्रेम कहाणी बघायला मिळत आहे. जवळ जवळ १०० एपिसोड्स झाले आहेत आणि अजूनही धागा निघाला नव्हता म्हणून चर्चा करायला हा धागा-प्रपंच!

तत्त्वनिष्ठ, शहरांत शिकलेली शिक्षकाची मुलगी सिद्धी आणि कमी शिकलेला, राजकारणासाठी कायदा धाब्यावर बसविणारा पण सच्चा, रांगडा शिवा यांची अनोखी प्रेम कहाणी आहे. अनोखी या कारणाकरता की दोघानाही नको असताना केवळ राजकारणासाठी त्यांचा विवाह लावून देण्यात येतो. एकमेकांविषयी गैरसमजूतींमधून ते आधीच शत्रु बनतात. दोघांचेही लग्नाआधी ज्या मुला-मुलीवर प्रेम असते त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. त्यामुळे हा विवाह दोघानाही अमान्य आहे पण केवळ राजकारण आणि आई - वडलांच्या सांगण्यावरून ते एकत्र राहाताहेत. एकत्र राहाता राहाता त्याना एकमेकांची नव्याने कशी ओळख होते आणि ते प्रेमात पडतात याची ही कहाणी आहे.

मालिकेची सर्वात उजवी बाजू म्हणजे यातील कलाकार - विदुला चौघुले ( सिद्धी) आणि अशोक फळदेसाई ( शिवा) यानी छान केमिस्ट्री जमविली आहे. शिवाची आई, वडिल ( मोहन जोशी), काका-काकू छानच! पण अगदी उल्लेख करावा असा अभिनय म्हणजे शिवाची बहीण झालेली शर्वरी जोग ( सोनल) आणि शिवाचा मित्र जलवा ( विकास पाटील). चिन्मयी सुमीत ने राजकारणी आत्याबाई छान वठवली आहे.

Jeev-Zala-Yedapisa-Start-Watch-on-Colors-Marathi-schedule-cast-story.jpg

Group content visibility: 
Use group defaults

म्हणजे एँड टीवीवर लागनार्या गठबंधन आणि कलर्स वरिल बेपनाह यांची उचला उचली करुन एकत्र खिचडी बनवण्यात आलीये तर

बेपनाहची स्टोरी खूप वेगळी होती. ती बघितलेली मी मध्ये मध्ये, मला जेनिफर विंगेट आणि तो हिरो चोप्राना, नाव विसरले आवडायचे दोघेही.. ती गठबंधन नावाची सिरीयल नाही माहिती.

मी 2 दिवस बघितलं नाहीये पण ती कशी काय पडली प्रेमात, मध्ये मध्ये बघते.

तो हॉल तिकीट laminate करून आणू देतो आणि परीक्षा पोस्टपोनड करून घेतो म्हणून का.

आजच्या एपिसोड मधे सिद्धी ने सोनल आणि काकी ला ' एक सरप्राईज' सांगितलं होतं. हाच खुलासा केला तिने आज. शिवा तिच्याबरोबर नाटक करतोय हे तिला समजले त्याचाच खुलासा.

बिचारी सोनल. भाबडेपणे दादा आणि वहिनी च्या स्वागताची खूप तयारी केली होती तिने. सिद्धी ने सगळे धुडकावून लावले.

बघितला एपिसोड. शिवा काय सॉलिड अभिनय करतो. सिद्धी मात्र जाम बोअर करते, जाम एकसुरी वाटते. काकु, सोनी शिवा आणि सिद्धी च्या सीनमध्ये, सिद्धी कमीच पडली.

शिवा सिद्धीचा अजूनही एवढा द्वेष करतो हे आत्ताच समजलं.

सिरिअल इज लॉस्ट! Sad

मागच्या दोन एपिसोड्स मधे शिवाची क्रेडिबिलिटी घसरतच चालली आहे. ना काकी ला वाईट वाटल्याचे दु:ख ना बहिणिला! त्यातून नवे शिक्षकाचे पात्र आणलेय…

एक चांगल्या कथानकाची अशी वाट लावू नका रे!

गुरुजी कोणीतरी छान हिरो हवा होता सोनीसाठी, हाईट छान, अभिनय बरा पण फार बोअर आहेत. छ्या मला वाटलेलं एखादा छान सोनीला शोभेल असा आणतील. बोअर होतेय खरंच.

मी केलं voting. पण ते सगळ्या category त द्यायला लावतात. मी bb बघितलेलं आणि हीच सिरीयल बघते. बाकी काहीच बघत नाही, त्यामुळे जीव झाला वेडापिसाला जास्त दिली votes. एक छोटा बाळूमामा होता त्याला दिलं आणि एक छोट्या रमेला दिलं बघत नसून, छोटा बाळूमामा गोड होता, एकदोनदा बघितलेलं. एक बिग बॉसला दिलं, कथाबाह्य कार्यक्रमाचे पण anchor म्हणून म मां ना अजिबात नाही दिलं, ते मी असंच सुनील बर्वेला दिलं, तो मला आवडतो म्हणून Lol , त्याचा तो कार्यक्रम मी एकदाच बघितला. खरंतर मला शिवाला द्यायचं होतं आणि त्याच्या बहिणीला म्हणून voting करायला गेले. अर्थात त्याना दिलंच.

https://www.youtube.com/watch?v=Ab_a8vDdocE

कलर्स मराठी विनर. शिवाला नाही मिळालं लीडरोलचं, सिद्धीला मिळालं. लीड शशांक केतकर, तो आवडतो मला पण शिवाने जास्त छान काम केलं आहे असं वाटतं मला. सहाय्यक अभिनेत्री सोनीला मिळालं, हे छान झालं आणि लोकप्रिय भावंडं पण सोनी शिवा. सिद्धीपेक्षा शिवाने छान काम करुन त्याला नाही मिळालं Sad .

बाकी जास्त त्या बावरे मनला मिळाली आहेत.

सिरीयल मधे मधे बघते, बोअर होतेय. त्या सोनीसाठी कोणीतरी छान हिरो हवा होता. किरणमास्तर अँक्टींग छान करतात, हाईट छान पण मला ते तिचे हिरो म्हणून नाही आवडत.

माझा इंट्रेस्ट संपत आला आहे. गोष्ट कुठच्या कुठे गेली आहे असे माझे मत आहे. शिवा आणि सिद्धी च्या प्रेमकहाणी ला फुलु च दिले नाहीये.

मी पण रोज नेमाने नाही बघत. तो किरण मास्तर आल्यापासून मला बोअर वाटतेय. शिवा सिद्धीत अजूनच विसंवाद वाढवतायेत आणि उगाच किरण सोनीचं मात्र जमवणार असं वाटलं सोमवारी बघून.

मला ही सोनी अणि किरण मास्तरांची जोडी नाही आवडत. सिध्दी अणि शिवाची स्टोरी परत आधी सारखीच झालीये. जशी जुन महिन्यात होती.

आत्याबाईचा मुलगा कसा वागतो आपल्या बहिणीशी हे शिवाला माहीतीये ना? तरी तो त्यांची ईतकी हांजी हांजी का करतो?

आणि मास्तरला पार कुटून काढला..

शिवाला आत्याबाई अणि त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांच्या चुका दिसत नाहित फक्त साध्या माणसांच्या दिसतात.
शिवाने सिद्धी बरोबर चुकी चे वागले असते त्यामूळे तिची सगळी लाइफ खराब होते पण जराही पश्चात्ताप नाही त्याला. वर अणि उठ सुठ तिला ओरडत असतो.
बर्याच वेळेला मला शिवा कैरेक्टर चे वागणे पटत नाही चुकीचे वाटते.

आणि मास्तरला पार कुटून काढला.. >>> कोणी कुटला, कधी.

शिवाला काहीतरी जबरदस्त फटका बसल्याशिवाय कळणार नाही काही, पट्टी आहे डोळ्यावर.

शिवा सिद्धी ला दसर्या दिवशी सोन्याचे काहितरी गिफ्ट देतो ती ते घेत नाही . अणि त्याला बोलते की तू माझ्या आयुष्यातला रावण आहेस. म शिवाला खुप राग येतो. नंतर तो किरण मास्तर घरात ल्या लोकाना सल्ले देत असतो की दुधात खरिक पुड घाला विज बिल मोबाइल वर भरा ते त्याला आवडत नाही . किरण मास्तर त्याच्या बाबांच्या साइकल मध्ये हवा भरत असतो ते त्याला आवडत नाही तो त्याला ओरडतो हवा नाही भरायची बा च्या साइकिल ला हात नाही लावायचा तरी तो किरण गुरजी आगाऊ पणा करुन भरत असतो म शिवा त्याला मारतो अणि त्याकिरण ची साइकिल तोडून मोडून टाकतो.
अणि म सिद्धी ला बोलतो रावण बघायचा होता ना हा बघा.
सोनी अणि काकी रडतात. सिद्धी ला ही वाईट वाटते की आपला राग किरण वर काढला. दुसर्या दिवशी सोनी अभ्यास कॉलेज ला न जाता घरात ली भांडी घासणे अशी कामे करत बसते. ते शिवा बघुन तिला विचारतो तर ती बोलते काय करायचे शिकुन वगैरे . म शिवा किरण कडे जाऊन त्याची माफी मागतो व त्याला नविन साइकिल देतो. तो घेउन तो किरण घरी येतो अणि सोनी किरण गुरुजी ना पळत जाऊन मिठी मारते अणि रडू लागते. ते सिद्धी पहाते.
सिद्धी त्या भाषेच्या परिक्षेत पहिली येते.
इतक्या दिवसा पासुन गायब आलेले आत्याबाई अणि नरपत चिकने परत आले आहेत.

थँक्स अमुपरी. शिवा अति करतोच पण मला सिद्धीचा पण राग येतो कधी कधी. काल थोडं बघितलं. चिन्मयी सॉलिड acting करते. नरपतपण भारी.

किरण मास्तरने पण फक्त शिकवणीचं काम करावं बाकी फार सल्ले देऊ नयेत. काल ती सोनीची आई अपमान करते मास्तरांचा पण आत्याबाई तोरा उतरवते तिचा.

आता काय दाखवणार काय माहित, सिद्धी शिवाचा अपमान करायची एक संधी सोडताना दाखवली नाहीये, मधला काळ जरा बरं चाललेलं दाखवलं दोघांचं. सिद्धी ला कधी समजलेलं दाखवणार आहेत कि तिचे शिवा बद्दल गैरसमज झालेत

आजचा मस्त होता, सिद्धि बहुतेक एका दगडात 2 पक्षी मारणार, आत्याबाई आणि नरपत दोघांचा अपमान करेल स्टेजवर भाषणात.

सिद्धि अभिनयात मात्र कमीच पडते, डायलॉगज छान होते, तरी एकसुरी बोलणे. आत्याबाई जबरी acting.

हो मला सरकार चं काम करणारा पण आवडतो. तो एलतीगो मधे उमेश कामत चा चुलत भाऊ होता, तेव्हा पण एका एपिसोड मधे त्याने मस्त मिमिक्री केली होती. आत्याबाई तर एक नंबर. मस्त काम करते चिन्मयी सुमीत.

तो एलतीगो मधे उमेश कामत चा चुलत भाऊ होता, >>> हो.

जवळजवळ सगळे अभिनय छान करतात. सिद्धी एकसुरी वाटते आणि तिचे बाबाही वाटतात मला. पण बाबा कमी दाखवतात ही जास्त, त्यामुळे जाणवतं जास्त.

शिवा च्या बाबांची साताराला बदली करुन सीरियल मधुन दिसेनासे झाले. >>> हो का, मोहन जोशी यांना एखादा मोठा प्रोजेक्ट मिळाला असेल.

कलर्स मराठी अवॉर्डस आज झाले, मग मधे उगाच कोणी लिस्ट टाकलेली विनर्सची काय माहीती, मी शेअर केलेली इथे.

https://www.youtube.com/watch?v=my0Lcqd1t-8 इथे बरेच जण आहेत. माझे आणि अनेकांचे आवडते शिव वीणापण आहेत.

अजून एक बघितला त्यात फक्त क्युट शिव वीणा, एकात या दोघांसह, बरेच जण होते स्मिता, नेहा, बाळूमामा दोघे, हे सर्वच भारी रॉकींग दिसत होते. स्मिता आणि मोठा बाळूमामा खूपच मस्त.

https://www.youtube.com/watch?v=HTgkyYNVBvY हे आपले शिवा सिद्धी, सिद्धी शिवाला फार बोलायलाच देत नाहीये.

Thanks अन्जू, कलर्स मराठी अवार्ड्स ची लिंक दिल्याबद्दल. मजा आली सगळ्यांना बघायला. शिवा सिद्धी भारीच दिसत होते. अनु सिद्धार्थ पण छानच. काहीजण पटकन ओळखू आले नाहीत. एक नट मला नाही ओळखू आला, सोनीच्या नंतर दिसतो ह्या क्लिप मधे, खुप ओळखीचा आहे चेहेरा, पण लक्षात येत नाहीये.
आणि आपल्या शिव विणा बद्दल काय बोलणार ऑल टाईम फेवरिट आहेत ते. अन्जू तू दुसरी लिंक दिली आहेस ती शिव विणा ची आहे, शिवाय आणि सिद्धी ची नाही.

Pages