जीव झाला येडा पिसा - एक आगळी वेगळी प्रेम कहाणी

Submitted by sulu on 9 August, 2019 - 13:31

सद्या कलर्स मराठी वरती एक आगळी वेगळी प्रेम कहाणी बघायला मिळत आहे. जवळ जवळ १०० एपिसोड्स झाले आहेत आणि अजूनही धागा निघाला नव्हता म्हणून चर्चा करायला हा धागा-प्रपंच!

तत्त्वनिष्ठ, शहरांत शिकलेली शिक्षकाची मुलगी सिद्धी आणि कमी शिकलेला, राजकारणासाठी कायदा धाब्यावर बसविणारा पण सच्चा, रांगडा शिवा यांची अनोखी प्रेम कहाणी आहे. अनोखी या कारणाकरता की दोघानाही नको असताना केवळ राजकारणासाठी त्यांचा विवाह लावून देण्यात येतो. एकमेकांविषयी गैरसमजूतींमधून ते आधीच शत्रु बनतात. दोघांचेही लग्नाआधी ज्या मुला-मुलीवर प्रेम असते त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. त्यामुळे हा विवाह दोघानाही अमान्य आहे पण केवळ राजकारण आणि आई - वडलांच्या सांगण्यावरून ते एकत्र राहाताहेत. एकत्र राहाता राहाता त्याना एकमेकांची नव्याने कशी ओळख होते आणि ते प्रेमात पडतात याची ही कहाणी आहे.

मालिकेची सर्वात उजवी बाजू म्हणजे यातील कलाकार - विदुला चौघुले ( सिद्धी) आणि अशोक फळदेसाई ( शिवा) यानी छान केमिस्ट्री जमविली आहे. शिवाची आई, वडिल ( मोहन जोशी), काका-काकू छानच! पण अगदी उल्लेख करावा असा अभिनय म्हणजे शिवाची बहीण झालेली शर्वरी जोग ( सोनल) आणि शिवाचा मित्र जलवा ( विकास पाटील). चिन्मयी सुमीत ने राजकारणी आत्याबाई छान वठवली आहे.

Jeev-Zala-Yedapisa-Start-Watch-on-Colors-Marathi-schedule-cast-story.jpg

Group content visibility: 
Use group defaults

ह्याचा एपिसोड बघितला, किरण गुरुजींना नसेल सोनीशी नातं पुढे न्यायचं तर त्यात काय एवढं, ती सोनी कित्ती रडत होती, आता सिद्धि त्यांच्यावर सोनीवर प्रेम करायची जबरदस्ती करणार का, अरे त्या सोनीच्या अभ्यासासाठी आलेत ना सर. तिला आवडले म्हणून त्यांनी accept करावं का प्रेम तिचं.

अन्जू+११११ आता हि सिद्धी त्या गुरुजींच्या मनात नसलेलं प्रेम घुसवणार आहे, त्यांच्या मनावर बिंबवणार कि तुम्हाला पण सोनी बद्दल जे वाटतय ते प्रेमच आहे वगैरे वगैरे आणि शिवाला घाबरायची गरज नाही

हो ना धनुडी, लादलेलं प्रेम. त्या शिवा सिद्धीचं काही पुढे होईना आणि बसलेत रविकिरण सोनी जमवायला. सोनी नापास झालीय ना, मग अभ्यास राहिला बाजूला आणि हे सुरु.

त्यात शिवाला करून द्यायला लागेल, भाऊबीज आणि बड्डे गिफ्ट सोनीने नंतर घेईन, मागेन ते दे वचन घेतलं आहे.

सिद्धी एक महाआगाऊ, भोचक, एकसुरी आहे. शिवा वाईट वागत असला तरी आवडतो, तो एक चांगला माणूस आहे खरंतर पण आंधळा कार्यकर्ता आहे Wink .

शिवा कधी कधी टोटली राक्षस होतो. किती मारतो त्या किरणला. खरंतर पहिलं सोनीच्या कानफटात द्यायला हवी होती, नापास झालीस म्हणून ट्युशन लावली आहे ना, अभ्यास कर पहिला मग नंतर बघू. ऐकून पण घेत नाही सोनीचं काही.

त्या भोचक, आगाऊ, ठसक्यात एरवी प्रवर्चन देणाऱ्या सिद्धीसाठी जोरदार टाळ्या. नुसते तोंड चालते. आपली पुस्तकं शिवा कशी जाळतोय आणि कधी जाळतोय याची वाट बघायची आणि किरणला कसं बेदम मारतोय हे आश्चर्यचकित होऊन बघत बसायचं, मध्ये पडायचं नाही. सहज किरणला वाचवू शकली असती.

हो सिद्धी नुसत्या मोठमोठ्या गप्पा मारते . किरण ला मारण्या पासुन शिवाला साधे थांबवता पण आले नाही.
त्या सोनी ने शिवा कडून गिफ्ट घेतले नव्हते त्याचा तरी उपयोग करायचा

हो सिद्धी नुसत्या मोठमोठ्या गप्पा मारते . किरण ला मारण्या पासुन शिवाला साधे थांबवता पण आले नाही. >>>
अगदी अगदी.

कधी एकदा किरणला बदड बदड बदडतोय असं झालेलं जणू तिला, तिलाच बदडायला हवं होतं शिवाने, जबरी डोक्यात जाते सिद्धी. पुस्तकांच्यावेळी पण कधी एकदा पुस्तकं जाळतोय शिवा आणि मग राख हातात घेऊन कधी बै मी प्रतिज्ञा करते, शिवाला बरबाद करण्याची हा attitube तिचा.

एखादी दुसरी असती तर सोनीला नीट समजावलं असते, बाई ग नापास झाली आहेस, लहान आहेस आधी पास नीट हो किंवा किमान परीक्षा दे मग किरणशी बोलूया आपण.

एखादी दुसरी असती तर सोनीला नीट समजावलं असते, बाई ग नापास झाली आहेस, लहान आहेस आधी पास नीट हो किंवा किमान परीक्षा दे मग किरणशी बोलूया आपण. >>>
हो सिद्धी नी सोनिला जास्त प्रोत्साहन दिले.अभ्यास बाजुलाच.

सिद्धी च्या मूर्खपणा मुळे त्या बिचार्या किरण ला मार खावा लागला. थोडे दिवस थांबायचे लगेच सोनी आणि किरणची भेट कशाला घालून द्यायची.

शिवाचा जोर पण फक्त साध्या माणसांवर चालतो. त्या आत्याबाईंच्या मुलाला सरकार ला काही सुधा करायची हिमत नाही.

शिवाचा जोर पण फक्त साध्या माणसांवर चालतो. त्या आत्याबाईंच्या मुलाला सरकार ला काही सुधा करायची हिमत नाही. >>> हो ना.

आता सोनीचे शिक्षण राहणार आहे बाजूला आणि लग्न होणार, तो सरकार मागणी घालणार आणि मग तोपर्यंत त्या शिवाला समजेल किरण मास्तर कित्ती चांगले मग, जा सिमरन जा सारखं शिवा सोनीला म्हणणार जा सोनी जा, जीले अपनी जिंदगी किरण के साथ.

हे सर्व झाल्यावर मग टीमला जरा वेळ मिळेल शिवा सिद्धी स्टोरी पुढे न्यायला Lol

हो ना, इथे त्या किरणगुरूजींचे खायचे वांदे आहेत. तो परत परत सांगत असतो कि मला ह्या नोकरीची किती गरज आहे. सिद्धी सोोनीला समजवायचं सोडून चिडवत बसलीये , किरण ला काय वाटतय ते कोण विचारणार? आणि तो किती मोठा आहे सोनी पेक्षा! सोनी ला समजवायचं कि हे प्रेम नाही नुसतं आकर्षण आहे , कारण आत्ता पर्यंत शिवा ने सोनीला कुठल्याही,मुलाशी मैत्री करू दिली नाहीये. त्यामुळे पहिल्या च मैत्री ला ती प्रेम समजत असेल.
आणि ह्या कोणालाही शिवा चिडून काय करु शकतो ह्याचा अंदाज नाही? किरण गुरूजी ला मार खायला आणलं सिद्धीने

अगं बघ आता जरा इंटरेस्टिंग असेल, कारण प्रोमो मध्ये शिवा वर सूरमारीच्या स्पर्धेत चाकू हल्ला होताना दाखवला आणि त्याला सिद्धी पाण्यात उडी टाकून वाचवते

मी बघितला तो प्रोमो मगाशी. तो एपिसोड कधी आहे, त्या दिवसापासून बघेन.

सुरमारीत जिंकल्यावर, सोनीचं लग्न कॅन्सल करुन घेणार असतो ते माहीतेय पण ती सिद्धी त्या नरपतचं ऐकुन शिवाच्या विरोधात जाईल असं वातावरण आहे म्हणून नाही बघत. तो सुरमारी आला की बघेन.

https://www.youtube.com/watch?v=ODkBHUFakPI

Underwater शूटिंग. शिवा सिद्धीने खूप मेहनत घेतली यासाठी. असं याआधी गोठ मध्ये पहिल्याच भागात बघितलेलं, पण तलाव होता आणि शुटींग थोडा वेळ होतं.

त्या सिद्धीने दुसऱ्या माणसाकडे हत्यार आहे बघितलं ना, माझा तो शॉट हुकला पण बघूनही तिथल्यातिथे माणसाला रोखण्याऐवजी नरपतशी discussion का करत बसली, डोक्यावर पडली आहे का ती. शिवाच्या जीवाशी खेळ होण्यासाठी तीही जबाबदार आहे मग वार कधी होईल वाट बघत उडी मारणार त्याला वाचवायला.

त्या सिद्धीने दुसऱ्या माणसाकडे हत्यार आहे बघितलं ना, माझा तो शॉट हुकला पण बघूनही तिथल्यातिथे माणसाला रोखण्याऐवजी नरपतशी discussion का करत बसली, डोक्यावर पडली आहे का ती. शिवाच्या जीवाशी खेळ होण्यासाठी तीही जबाबदार आहे मग वार कधी होईल वाट बघत उडी मारणार त्याला वाचवायला.>>>>> अगदी अगदी अन्जू, तो नरपत चिकणे कसा मणुस आहे हे काय तिला माहित नसेल? त्याच गावातली आहे ना?

धनुडी मी नेहेमी लिहिते ना सिद्धी बघत बसते, पुस्तकं कधी जाळतोय शिवा, कसं मारतोय किरणला. आता कधी वार करतोय तो माणूस शिवावर मग आपली मी नायिकेसारखी उडी मारून जीव वाचवून क्रेडीट घेणार. पण हत्यार असलेल्या माणसाला तिथल्यातिथे रोखून सगळ्या लोकांना ते दाखवणार नाही.

जितेंद्र जोशींच्या शो मध्ये सिद्धी, शिवा, सोनी, मम्मे, जलवा, आणि सरकार आले. त्यात शिवा आणि सोनीने "उंदीर मामा आयलो" गाणे छान गायले. सोनीचा गळा खूपच गोड आहे. शिवा सुद्धा खूप छान गायला खूपच एनर्जेटिक आहे. पण तिथे सुद्धा त्या सिद्धीमध्ये काहीच चार्म नाही दिसला.

पण तिथे सुद्धा त्या सिद्धीमध्ये काहीच चार्म नाही दिसला. >>> Lol हे भारी वाक्य.

हो प्रोमोज मध्ये काही आवडली नाहीये ती, एकच वादा शिवादादा. तो आणि बाकीचे सर्वच छान acting करतात. सिद्धी अजूनही एकसुरी वाटते.

आताच्या प्रोमोमध्ये उदय टिकेकरांना पाहिल.खूप दिवसात पाहिली नाही,नवीन कँरेक्टर आहे का टिकेकरांच?

काय माहिती, एकतर सरकारचे वडील म्हणून येतील किंवा मो जो च्या बदली.

मी आज थोडं उशिरा लावलं, पहिली दहा मिनिटं नाही बघता आलं, नंतरही स्वयंपाक करता करता बघितलं.

काय माहिती, एकतर सरकारचे वडील म्हणून येतील किंवा मो जो च्या बदली. >>>>शर्टाची स्टाईल आणि हातातले घड्याळावरून ते मोजो सरांची रिप्लेसमेंट आहेत.

एकतर सरकारचे वडील म्हणून येतील >>>> सरकारची आई एवढी dramebaz तर वडील किती असतील आणि त्यांची एन्ट्री (भले कोणी नवखा कलाकार असलातरी) थोडी वाजत गाजत दाखवतील.

शर्टाची स्टाईल आणि हातातले घड्याळावरून ते मोजो सरांची रिप्लेसमेंट आहेत.>>>>>> +++१ मलाही तसंच वाटलं , कारण मोजो फार बिझी असतात, त्यामुळे ते बर्‍याच सिरीयल अर्धवट सोडतात असा त्याचा इतिहास आहे. (एका लग्नाची दुसरी गोष्ट). मला आवडायचे ते शिवाचे वडिल म्हणुन. पण उदय टिकेकर पण चांगले वाटतील, चांगलं काम करतील.

ह्याचा कालचा भाग नीट नाही बघितला, पहिला बघितला.

शिवा झालेला अशोक फार शांत आहे. सिद्धी म्हणजे मात्र लहान आहे आणि स्वत:त मग्न जास्त वाटली. ती बोलत असताना अशोक तिच्याकडे कौतुकाने बघत होता. त्याची आई त्याच्या लहानपणीच गेलीय, वाईट वाटलं ऐकून. तो खूप अभ्यासू आणि धडपड्या वाटला. मातृभाषा कोकणी असून त्याचं मराठी विदुलापेक्षा चांगलं आहे. विदुला दिसायला छान आहे पण बाकी तिला अजून खूप शिकायचं आहे. ती मराठी बोलताना बरेचदा ठ च्या जागी ट ऐकू येतं. सिरीयलमध्ये प्रमाण मराठी बोलणारे charactor दाखवलं आहे, तिथे पण ठ चा ट करते का नीट ऐकायला हवं. नाहीतर परवा मुलाखतीत मोठा ऐवजी मोटा वगैरे वाटलं चक्क, एकदा नाही बरेचदा, तिचे उच्चार नीट नाहीयेत असं जाणवलं. नाचता पण नीट येत नव्हतं. एखादी दुसरी हवी होती ह्या भूमिकेसाठी असं बरेचदा वाटतं मला. लहान आहे शिकेल हळूहळू म्हणा पण तरीही वाटतं दुसरी हवी होती अजून चांगला अभिनय करणारी. जितु मात्र तिच्या कौतुकात मग्न होता आणि तिलाच जास्त प्रश्न विचारत होता Lol

सर्वात जास्त मम्मी आणि सोनी आवडल्या. दोघी फार natural वाटल्या, सोनी फार हसतमुख आहे. त्यांची मुलाखत पुढच्यावेळी आहे. काल सरकार आणि जलवाची येता जाता बघितली.

बाकी सिरीयलमधे सिद्धीला नरपत व्हिडीओ शुटींग दाखवतो गुंगी पेढे देताना, तर सिद्धी घाबरते.

दुसऱ्यांना प्रवर्चन देताना आणि शहाणपण शिकवताना सिद्धी कशी पुढे पुढे असते आणि आता स्वत: वर वेळ आली तर गप्प. एखाद्या पाण्यात उतरणाऱ्या माणसाला गुंगीचे पेढे देणे वाईटना, बरं त्यात विष असते तर, एवढा कसा नरपतवर विश्वास.

स्वत: चूक केलीच आहे म्हणून नरपत गुन्हा घडवू शकला. त्यामुळे त्या व्हिडीओ शुटींगला न घाबरता त्याच्याविरोधात तक्रार करून, स्वत: काय केलं हेही सांगायला हवं होतं आणि त्यासाठी लागेल ती शिक्षा घ्यायची तयारी दाखवायला हवी होती. एकतर पेढा दिला तिने आणि हत्यार असलेला माणूस बघून गप्प बसली. नरपतपेक्षा तीच जास्त जबाबदार आहे ह्या सर्व घडमोडींना.

स्वत: चूक केलीच आहे म्हणून नरपत गुन्हा घडवू शकला. त्यामुळे त्या व्हिडीओ शुटींगला न घाबरता त्याच्याविरोधात तक्रार करून, स्वत: काय केलं हेही सांगायला हवं होतं आणि त्यासाठी लागेल ती शिक्षा घ्यायची तयारी दाखवायला हवी>>>>> ++1111 पण मला वाटतं कि दाखवतील असंच, करेल ती कबूल ,कारण एकीकडे ती नरपत चिकणेला म्हणत होती कि तू मला असं वागायला भरीस पाडलंस, तर तो विचारतो कि पुरावा काय? तेव्हा ती गप्प बसते पण पुढच्या क्षणी नरपत हा व्हिडिओ दाखवतो, तोच पुरावा नाहीये का कि ह्याच्या सांगण्यावरुन हे केलंय? मग घाबरून जाण्यासारखे काय आहे त्यात?

काल आणि आज काय झालं? आज कलर्स वर रिपीट टेलिकास्ट नाही दाखवलं. Sad ११ कि ११:३०ला असतं ना? माझं दोन दिवस मिसलं. सांगा ना कुणीतरी प्लिज.

Pages