नागरिकत्व सुधारणा विधेयक - हिंदूराष्ट्राकडे वाटचाल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2019 - 13:21

नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.

काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे

धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.

या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?

श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.

बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बाकी रोहिनग्याना मदत करायची पण हिंदूंना मात्र त्यांच्या नशिबावर सोडून द्यायचे हे मस्त आहे,

>>>>>>>

या कायद्याला विरोध करणारयांना सरसकट या एकाच गटात का बसवत आहात. एकच चष्मा घालून प्रत्येक पोस्ट का वाचत आहात?
धर्मावर आधारीत कायदा नको असा जर कोणाचा आग्रह असेल तर त्यात गैर काय? निर्वासित घ्या किंवा नका घेऊ जे वाटेल ते करा पण धर्मावर आधारीत ठराविक धर्मांचेच लांगुलचालन का केले जातेय? आणि ठराविक धर्मांना उपरे का ठरवले जातेय?

समानतेच्या आधारवर कोणी विरोध करत असेल तर त्यावर हिंदूद्वेष्ट्यांचा, इस्लामप्रेमीचा, देशद्रोहाचा शिक्का का मारला जातोय?

तटस्थ म्हणूनही एक जमात असते यावर विश्वास नाही का?
समाजात अशीही लोकं असतात जी सर्वधर्मीयांना समान नजरेने बघतात हे पचवायला ईतके अवघड का जातेय?

धर्मावर आधारीत कायदा नको असा जर कोणाचा आग्रह असेल तर त्यात गैर काय? निर्वासित घ्या किंवा नका घेऊ जे वाटेल ते करा पण धर्मावर आधारीत ठराविक धर्मांचेच लांगुलचालन का केले जातेय? आणि ठराविक धर्मांना उपरे का ठरवले जातेय?

>>

हा प्रश्न आताच पडण्याचे काय कारण ?

ह्या आधी एकाच हिरव्या धर्माचे लांगूलचालन खूलेआम सुरु होते त्यावेळी तुम्हाला वरिल प्रश्न पडला नाही ? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, काल राज्यसभेत पास झालेल्या CAB मधे फक्त हिदू नसून त्यात जैन, शिख, पारशी, बौद्ध व इसाई धर्माचे लोक सुद्धा आहेत. तेंव्हा जरा डोळे उघडा.

काल राज्यसभेत पास झालेल्या CAB मधे फक्त हिदू नसून त्यात जैन, शिख, पारशी, बौद्ध व इसाई धर्माचे लोक सुद्धा आहेत. तेंव्हा जरा डोळे उघडा.>>>> अहो पण त्यात मुस्लिम कुठेत? ते नाहीत म्हणून तर यांचे दंगे सुरु आहेत ना. पाकीस्तानात हिंदु, शीख, ख्रिश्चन यांच्यवर एवढे अत्याचार चालू आहेत तरी हे कुंभकर्ण झोपलेलेच आहेत. नाहीतर कुठे झालेत अत्याचार, दाखवा बघु पुरावे म्हणून छाती पिटणे पण चालू आहे. ह्या असल्या झापडबंद लोकांमुळेच शिवाजी महाराज अखंड स्वराज्य बनवु शकले नाहीत आणी संभाजी महाराजांचे अनन्वीत अत्याचारामुळे हाल झाले. संभाजी महाराज जर अकाली गेले नसते तर औरंग्या कधीच खतम झाला असता आणी पुढचे सारे पण टळले असते.

ह्या असल्या झापडबंद लोकांमुळेच शिवाजी महाराज अखंड स्वराज्य बनवु शकले नाहीत आणी संभाजी महाराजांचे अनन्वीत अत्याचारामुळे हाल झाले. संभाजी महाराज जर अकाली गेले नसते तर औरंग्या कधीच खतम झाला असता आणी पुढचे सारे पण टळले असते
>>

सहमत !
शिवाय हे अंधविरोधक एकिकडे म्हणतात, "भारत मुसलमांसाठी सुरक्षित नाही", व दुसरीकडे पाकिस्तान व इतर देशातील मुसलमांनाची आयात त्यांना ह्या देशात हवी, ह्यांच्या ह्याच दुतोंडी भुमिकेमुळे या देशातील तथाकथित पुरोगामी, विचारवंत, निधर्मी, उदारमतवादी व सोशल मिडीयावरिल इतर ऐरेगैरे लोक डोक्यात जातात.

काल राज्यसभेत तो मुल्ला कपिल सिब्बल, अमित शहा यांना 'मुसलमान आपसे डरते नही' असे म्हणाला. व याचेच इतर कॉंग्रेसी भाऊबंद २४X७ टिव्हीवर बोंबलत असतात की 'अमित शहा व मोदी मुसलमानो को डरा रहे है'. एका भुमिकेवर किमान ठाम तरी राहा.

https://www.thelallantop.com/news/poster-threatening-baghpat-rape-victim...

यावर चर्चा करण्याची गरज राहीलेली नाही आता. देशात सर्वत्र आनंदी आनंद आहे. हिंदू आनंदात आहेत. कुठेही बलात्कार नाहीत, खोटे एण्काउंटर नाहीत. बीफच्या संशयावरून माणसे मारली जात नाहीत. इन्स्पेक्टरची हत्या होत नाही. एकदम शांतताप्रिय देशात आपले स्वागत असो.

ह्यांच्या ह्याच दुतोंडी भुमिकेमुळे या देशातील तथाकथित पुरोगामी,विचारवंत, निधर्मी, उदारमतवादी व सोशल मिडीयावरिल इतर ऐरेगैरे लोक डोक्यात जातात.>>>

सहमत. ह्या दुतोंडया लोकांमुळे असे लोक जे खरोखरी विचारवंत, निधर्मी, उदारमतवादी आहेत त्यांच्याकडेही लोक संशयाने बघतात, त्यांनाही दुतोंडे समजतात.

त्याचेच तर ४० पैसे मिळतात.>>>

किती वर्षे एकच तुणतुणे?

पण चांगले आहे, 300 च्या वर लोकांना निवडून देणाऱ्या कोट्यवधींना असे कुठेही काहीही खरडाईचे लिहायचे पैसे मिळत असतील तर काय वाईट आहे? निदान लोक कामे तर करतात.

तीन पिढ्या गरिबी हटावचा नारा लावणाऱ्या गांधी कुटुंबाला ही आयडिया का सुचली नाही?? लोकांना काम मिळून गरिबी हटली असती, यांचा प्रचारही होत राहिला असता आणि पुढे जाऊन मोदी शाह ही जोडगोळी यांच्या बोकांडी येऊन बसलीही नसती. आज लोक सुखाने पैसे घेत राहिले असते आणि राहुलबाब पंतप्रधान झाला असता... का नाही सुचले काँग्रेसला... किती ते वैचारिक मागासलेपण....

जाता जाता-Supreme Court dismisses all review petitions in Ayodhya case ..>>>>

सब मिले हुये है... इति यु नो हू। Wink Wink

समाजात अशीही लोकं असतात जी सर्वधर्मीयांना समान नजरेने बघतात हे पचवायला ईतके अवघड का जातेय?

80 % लोकसंख्या एका धर्माची असून सुद्धा इथे असंख्य लहान मोठे धर्म राहिले,वाढले .
हे कसे शक्य झाले 80% वाले दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे असते तर आता फक्त आणि फक्त हिंदू च इथे राहिले असते .हे सत्य तुम्हाला दिसत नाही का?
तमिळ लोक श्री लंके मधून अत्याचार ला बळी पडून भारतात आले त्यांचा सुद्धा ह्या विधेयकात उल्लेख नाही किती न्याय प्रिय सर्वधर्म समभाव वाल्या ढोंगी लोकांनी हा पॉइंट उपस्थित केला?
पाकिस्तान मध्ये हिंदू अल्पसंख्य लोकांना वर अतोनात अत्याचार झाले त्यांचे मुडदे पाडले गेले,संपत्ती हडप केली गेली आणि ते सरकारी यंत्रणेच्या साक्षीने..
काश्मीर मधून हिंदू पंडितांना कसे हाकलून दिले हे तरी तुम्हाला माहीत असेल?
त्या पिडीत लोकांसाठी हा कायदा आहे .
अफगाणिस्तान ची स्थिती काही वेगळी नाही ..
त्या मुळे ह्या तिन्ही देशातील अल्पसंख्य पिडीत लोकांनी भारतात आश्रय घेतला आहे त्यांना नागरिकत्व देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
हे खूप पाहिले होणे गरजेच होत..पण ढोंगी सत्तेवर होते..
ह्यात मुस्लिम का नाहीत?
मुस्लिम ह्या साठी नाहीत करण ते संबंधित देशात बहुसंख्य आहेत आणि त्यांच्या वर तिथे धार्मिक अत्याचार होण्याचा प्रश्न नाही त्या मुळे ते पिडीत नाहीत.
मग ह्या तिन्ही देशातून मुस्लिम इथे का येत आहेत?
नोकरी साठी येत आहेत असे समजले तर कायदेशीर मार्गे वर्क परमिट घेवून ते कधी ही येवू शकतात जसे आपण दुबई,अमेरिकेला जातो.
मग ते कायदेशीर मार्ग का अवलंबत नाहीत?
ह्या प्रश्नाचे उत्तर किचकट आहे.
गरीब देश असल्या मुळे असंख्य संघटित टोळ्या ह्या मध्ये सहभागी आहेत .
स्त्रिया ची तस्करी सारखे गंभीर प्रकार ते करतात आणि येथील ढोंगी सर्व धर्म समभाव वाले नेते त्यांना मदत करतात..
अगदी पद्धतशीर पने ढोंगी सर्वधर्म समभाव वाले देशाच्या हिताला तिलांजली देवून स्वतःची वोट बँक तयार करण्यासाठी ह्या लोकांना इथे वसवत आहेत.
नियोजित पने.
ते पिडीत नाहीत त्या मुळे त्यांना ह्या कायद्याचा फायदा नाही.
भारतीय मुस्लिम चा विरोध आहे का या कायद्याला ?
तर बिलकुल विरोध नाही त्यांच्या नावावर भलतेच ढोंगी पुरोगामी लाल पिवळे झाले आहेत..देशात कोणत्याच भागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकांनी जाहीर निषेध केल्याची घटना नाही.
1 /2 घटना असतील तर त्या घडवून आणल्या आहेत ह्या ढोंगी:::::;;;;;

किती वर्षे एकच तुणतुणे?
>>

कॉंग्रेसची चाटूगिरी २४X७ करुनही,
त्यांना चाळीस पैसेच काय "फुटिकौडी" देखील कोणीही देत नसल्याने, त्यांची जळजळ होणे स्वाभाविक आहे.

>>> कॉंग्रेसची चाटूगिरी २४X७ करुनही,
त्यांना चाळीस पैसेच काय "फुटिकौडी" देखील कोणीही देत नसल्याने, त्यांची जळजळ होणे स्वाभाविक आहे. >>>

+ ७८६

काश्मीर चे ठेवलेले भिजत घोंगड.

370 कलम विषयी काहीच निर्णय न घेणे.

आरक्षण विषयी काहीच निर्णय न घेता तो प्रश्न तसाच ठेवणे
आणि असे बरेच प्रश्न न सोडवता पेटते ठेवून समाजात दुही कायम ठेवण्याचे पाप कोणाचं आहे.
समाजात दूही bjp निर्माण करत नाही ती दुहि मित्वण्या चे काम करत आहे रिस्क घेवून

ते श्रीलंकन तामिळी हिंदूंना पण परत पाठवणार का कसे? की ते पुरेसे आर्य वंशीय नाहीत त्यामुळे चालणार नाहीत? की तामिळनाडू मध्ये इतक्यात सत्ता येण्याची शक्यता नाही म्हणून?

समाजात दूही bjp निर्माण करत नाही ती दुहि मित्वण्या चे काम करत आहे रिस्क घेवून
नवीन Submitted by Rajesh188 on 12 December, 2019 - 18:33
<<

सहमत !
कलम ३७०, ३५ अ, राम मंदिर, तीन तलाक, समान नागरी कायदा वगैरे...वगैरे प्रश्न गेल्या सत्तर वर्षात, कॉंग्रेसने सोडविले असते, तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व अमित शहा यांना सत्तेवर यायची गरजच पडली नसती.

मात्र भ्रष्टाचार व घोटाळे सोडून इतर सर्व प्रश्नांचे घोंघडे कॉंग्रेसने सतत भिजत ठेवले व देशाचे वातावरण सांप्रदायिक करुन समाजात तेढ निर्माण केली.

राज्यकर्ते सोडुन द्या, पण पाकीस्तानातले सामान्य मुस्लिम तर त्यांच्या शासनाला खूप कंटाळले आहेत. आपल्या कडे जसे पिण्याचे पाणी बर्‍याच ठिकाणी मिळत नाही. तशीच स्थिती पाकीस्तानात पण आहे. तिथल्या एका गावातल्या बायकांची ( बायका बुरख्यात अजीबात नव्हत्या हे विशेष ) व पुरुषांची मुलाखत घेतली तेव्हा एका वयस्कर बाईने तिथल्या शासनाला अगदी जी ( G ) वरुन शिव्या दिल्या होत्या. वर्षानुवर्षे आमची हीच स्थिती आहे असे ते म्हणाले.

ते श्रीलंकन तामिळी हिंदूंना पण परत पाठवणार का कसे? की ते पुरेसे आर्य वंशीय नाहीत त्यामुळे चालणार नाहीत?
>>

तमिळ हिंदूना कॉंग्रेसने कधीचेच भारताचे नागरिकत्व देऊन टाकलेय,
प्रश्न आहे तो विस्थापित श्रीलंकन तमिळ मुसलमानांचा. त्यांना कॉंग्रेसने देखील सेक्युलर असूनही नागरिकत्व दिले नव्हते.

काय मस्त थयथयाट होताय पब्लिकचा! लय भारी मज्जा येतंय!!
तेव्हा भाजपला गुच्ची मारून शेनेच सरकार आलं तवाबी मस्त थयथयाट भक्तांनी केलता.

आता सो सो पुरोगामी करताय वांझोट्या चर्चा Lol

There are nearly 80,000 refugees 132 camps in Tamil Nadu and one in Orissa. All refugee camps are registered. This entitles them to government assistance-cash, shelter, health facilities, clothing and provision of essential items. The refugees from Sri Lanka have been the recipients of one of the most advanced systems of education in the world, but since 1991, this privilege has been withdrawn.
Former Tamil Nadu Chief Minister Mr.M.Karunanidhi assured that the Sri Lankan Tamil refugees living in and outside the camps would be granted Indian citizenship soon. Spiritual leader Sri Sri Ravi Shankar has backed Tamil Nadu Chief Minister M. Karunanidhi’s call to give Indian citizenship to Sri Lankan Tamil refugees in India.

पाकिस्तान वरून आठवले.

काल राज्य सभेत काही ढोंगी उल्लेख
करत होते .
Bjp जिना chya मार्गाने जात आहे आणि त्यांना भारताचे सर्वधर्म समभाव हे सूत्र संपवून हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे.
इथपर्यंत राजकीय टीका म्हणून समजून घेता येईल पण त्या पुढे जावून अकलेचे तारे तोडत होते पाकिस्तान धर्मा वर आधारित देश झाल्यामुळे मागास राहिला आणि भारत सर्व धर्म भाव ला आहे म्हणून प्रगत झाला..
जगात बरेच देश धर्मा वर आधारित आहेत
मुस्लिम देश च घ्यायचे झाले तर सौदी,दुबई,इराक,इराण हे देश आहेत ते नाही मागे राहिले.
ख्रिस्ती धर्मीय किती तरी देश आहेत बौध्द धर्मीय किती तरी देश आहेत ते प्रगत देश आहेत..
पण कट्टर पना आणि धर्म वेडेपणा मुळे पाकिस्तान नरक झाला मागास राहिला हे सत्य सांगायची हिम्मत मात्र त्यांची झाली नाही

देशहिताच्या विधेयकाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले.

बांगलादेशी घुसखोरा चा सर्वात जास्त त्रास आसाम ला झालेला आहे .
त्यात मुस्लिम घुसखोर आणि हिंदू बंगाली लोकांचा समावेश आहेत त्या मुळे तेथील स्थानिक lokan वर सांस्कृतिक भाषिक आक्रमण होत आहे.
त्यांचा राग योग्य आहे त्याची तुलना ढोंगी पुरोगामी विरोधाशी करू नका..
आणि ह्या प्रश्नावर नक्की मार्ग काढला जाईल असे आश्वासन आणि हमी गृह मंत्री अमित शह नी केंद्र सरकार तर्फे दिली आहे.
स्थानिक लोकांना घटनात्मक संरक्षण देवून त्यांचे हक्क अबाधित राखले जातील .
त्याची काळजी नसावी

पुरोगामी गाढव किरणू आहे काय? सुबोध खरे मिपा सोडून इकडे सक्रीय झाले हे पाहून बरे वाटले.

80634272_10163651584595725_1277646650508050432_o.jpg

राज्या राज्य मध्ये असलेलं असमतोल विकास मुळे काही ठराविक राज्यातील च लोकांना मोठ्या प्रमाणात राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जावं लागत आहे आणि संघर्ष होत आहे.
आणि हा प्रश्न सुद्धा काँग्रेस नी च भिजत ठेवला आहे आणि मज्जा बघत आहे कशी दूहि निर्माण होत आहे ते..
होईल हळू हळू तो सुधा प्रश्न solve

अजून एक बातमी कन्फर्म झालेली नाही. पण ती खरी असेल तर फार मोठा धक्का असेल सेव्हन सिस्टर्स राज्यांमधे.

काही लोक परिस्थिती बिघटवण्याचे काम जाणूनबुजून करत असतील ईशान्य च्या राज्यात तर bjp सरकार राष्ट्रीय सुरक्षा कायद्या चा वापर करायला मागे पुढे पाहणार नाही हे मात्र नक्की

Pages