कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ठाकरे इतके दिवस तुमच्या बाजूला होते, तोवर त्यांची संपत्ती खटकली नाही. आताच खटकली होय ?

देशात मंदी असताना जय शहाच्या कंपन्या वायुवेगाने घोड दौड कशा करतात तेही विचारा.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा निकालाच्या तीन आठवड्यांनंतरही सुटलेला नाही. मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावरून शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा वाढला आहे. शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच भाजपाचे समर्थकही भाजपाची साथ सोडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वाक्यानं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. त्यानंतर आता मी_भाजप_सोडतोय हा हॅशटॅग सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्विटर आणि फेसबुकवर सकाळपासून मी_भाजप_सोडतोय हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराज होऊन आपण भाजप सोडत असल्याच्या प्रतिक्रिया भाजपच्या समर्थकांनी म्हटलं आहे. तर काही जणांनी भाजपाच्या काही दाव्यांची खिल्ली उडवत आपण भाजप सोडत असल्याचं म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या / राज्याच्या / जनतेच्या भल्या साठी आम्ही विनाशर्त कुणाला पाठींबा देतोय, आधी महत्वाच्या गोष्टी मार्गी लागू देत, मुख्य गोष्टी मार्गी लागल्या की मग पाठींबा टिकवायचा की नाही अथवा सत्ता वाटप कशी करावी याचा विचार करू
असं कुणी म्हटलं आहे का?

नसेल तर कशाला कुण्या पक्षाच्या भाकऱ्या भाजतहात किंवा करपवताहात?

>>>>>>देशात मंदी असताना जय शहाच्या कंपन्या वायुवेगाने घोड दौड कशा करतात तेही विचारा.<<<<<<<<
एकीकडे शेतकरी आत्महत्त्या करत असताना चिद्दु च्या इंकम टॅक्स रीटर्न मध्ये गार्डन टेरेसवर भाज्याच ऊत्पादन करोडो रुपयांच व्हायच अस नमुद केलेल, हे जर तुम्हाला पचवता येत असेल तर हे ही पचेल !!!

महाराष्ट्रात निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर वाद होवून युतीतिल दोन्ही पक्षांनी नको तितपत तानल आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लादली गेली,आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या ,कोण खरे कोण खोटे , कुणी विश्वासघात केला हे कळायला मार्ग नाही कारण सेनेकडे काही लिखित करारपत्र नाही आणि शहा बंद दाराआड झालेली चर्चा सांगण्याची आमची संस्कृती नाही असं म्हणतात याचाच अर्थ शहा संस्कृतीच्या नावाखाली काहीतरी लपवत आहेत असाही अर्थ निघू शकतो, फिसकटलेली चर्चा पुन्हा सुरू झाली याचा अर्थ सेनेला आश्वासन मिळाले असावे असाही होतो.आणि निवडणुकीत भाजपला अबकी बार २२०के पार हा भ्रामक आत्मविश्वास होताच की. त्यामुळे कदाचित शहांनी असाही विचार केला असावा की नाही २२०पण दिडशे जागा तरी मिळतीलच मग बहुमतासाठी सेनेची गरजच नसेल सेनेची आपल्याला मागील प्रमाणे पुन्हा फरपट करता येईल आता निवडणूक होईपर्यंत आश्वासन द्यायला काय हरकत आहे पुढचे पुढे पहाता येईल असाही गेम असु शकतो पण जनतेने भाजपचे बारा वाजवत फक्त १०५ जागांवरच थांबवले व आघाडीला प्रबळ विरोधी पक्ष म्हणुन कौल दिला , सेनेने भाजपने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी स्थिती अनकुल ठरली सेनेसमोर पर्याय खुले झाले, भाजपने सेनेला कबुल करुनही कमी जागा दिल्या आणि त्यातही पाडापाडी चे राजकारण केले हा सेनेला संपवण्याचा डाव होता तो लक्षात आल्याने सेनेने तुटे पर्यंत मानले,आताही भाजप नेते महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस व कर्नाटक पॅटर्न थांबवण्याच्या प्रयत्नात आहेत एकुण काय तर आज सत्तेसाठी काही विधिनिषेध न बाळगता सत्तेसाठी कायपण करणारा पक्ष म्हणुन जनमानसात भाजप ची प्रतिमा तयार होत आहे.

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मुंबईऐवजी राजधानी दिल्लीत केंद्रीत होण्याची शक्यता आहे. या घडामोडींचा केंद्रबिंदू काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निवासस्थान, १० जनपथ ठरण्याची चिन्हे असून आज, रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोनिया यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील तसेच विधिमंडळ पक्षनेते अजित पवारही दिल्लीत पोहोचणार आहेत. शिवसेनेचेही काही नेते आज, रविवारी दिल्लीत दाखल होणार असल्याचे समजते

सध्या चालू असणार्या घडामोडीवर माझे चार आणे:
१)आज पवार-गांधी भेटी पश्चात पवारसाहेबांनी सत्तास्थापने बद्दल गुगली टाकली की काँग्रेसशी काहीही बोलणी झाली नाही.
२) काल राष्ट्रवादी प्रवक्त्याने सांगितल्याप्रमाणे काॅमन मिनीमम प्रोग्रॅम काँग्रेस शी बोलणी पुर्ण.

या बेभरवशाच्या राजकारणावर माझे वैयक्तिक मत:
कदाचित राकाॅ काॅ मधे विलिनिकरणाची बोलणी चालू असतील. ज्याचा Common minimum program तयार असेल.(नेहमीप्रमाणे मास्टर स्ट्रोक) ज्यामुळे राज्यपातळीवर व देशपातळीवर असलेली विरोधी पक्षाची / नेत्रुत्वाची पोकळी भरून निघेल. जाणत्या राजाला सन्मानजनक तोडगा अपेक्षित असेल. बाकी असे घडले तर पुन्हा येणारे वाटाण्याच्या अक्षदा धुपाटण्याला लावून येतीलही.

प्रत्यक्षात या तीन पक्षांच्या युतीबाबत त्या पक्षांमध्येच मतभेद आहेत. यातही सत्तेची जास्त आस शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला आहे. काँग्रेसला सावध पावले टाकावी लागतात कारण तो राष्ट्रीय पातळीचा पक्ष आहे. त्यात यावेळी लोकसभेत त्यांच्या जास्त जागा दक्षिण भारतात आल्याने तिथल्या नेत्यांच्या मतांना जास्त वजन आहे.

शिवसेनेला झुलवत ठेवून घायकुतीला आणायचं व कमीत कमी त्यांच्या पदरात टाकायचं हा प्लॅन आहे. त्यात भाजपही इडी चा ससेमिरा मागे लावण्याची चिंता आहेच.

आता एकवेळ यांची युती झाली तरी पुढे जागावाटपाच्या वेळी कठीण आहे. आताच्या १२४ जागाही शिवसेनेला लढवायला मिळणार नाहीत.

सध्यातरी या तीन पक्षांचं सरकार बनणे सर्वस्वी असंभव दिसतेय. सरकार बनो वा नाही, कुठल्याही प्रकारे शिवसेना नुकसानीत जाणार आहे, ज्याचे परिणाम राऊत भोगणार....

अवांतर - एकाच प्रश्नावरती इथे "कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?" आणि "कौन बनेगा मुख्यमंत्री ?" असे दोन धागे का आहेत ?

फडण२० च्या सन्मानार्थ. त्यांना सवय आहे प्रत्येक मराठी वाक्य नंतर लगेच हिंदीत बोलण्याची.

असो. मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर होणार. याच बोलीवर त्यांनी कोथरुड विधानसभेवरील क्लेम सोडला असावा. पुन्हा निवडनुक व्हावी आणि कोथरुडात मोकाटे विरुध्द चंपा असा सामना व्हावा ही इच्छा पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करत आहे.

पाफा - इण्टरेस्टिंग. सोनिया गांधींना एकत्रीकरण कितपत मान्य असेल माहीत नाही, त्यातही जर पवारांचे महत्त्व वाढणार असेल तर. कारण एकेकाळी त्यांनी सोनिया गांधींना भरपूर विरोध केलेला आहे. एकूण हे मेक्सिकन स्टॅण्डऑफ सारखे चालू आहे, एकमेकांवर विश्वास नसलेल्या तीन पक्षांनी एकमेकांकडे गन्स रोखून धरल्यासारखे.

बाय द वे, पवारांच्या अशा वक्तव्यांच्या बाबतीत पुलंच्या नारायण मधले लॉजिक नेहमी लावावे. मुलाकडची मंडळी समंजस आहेत हो - याचा अर्थ समंजस नाहीत असा घ्यायचा Happy म्हणजे चर्चा नक्कीच झाली असावी.

<कीकडे शेतकरी आत्महत्त्या करत असताना चिद्दु च्या इंकम टॅक्स रीटर्न मध्ये गार्डन टेरेसवर भाज्याच ऊत्पादन करोडो रुपयांच व्हायच अस नमुद केलेल, > बातमीची लिंक प्लीज. ओप इंडिया, स्वराज मॅग , बीबीसी न्यूज हब सोडून दुसरं काही.

>> पवारांच्या अशा वक्तव्यांच्या बाबतीत पुलंच्या नारायण मधले लॉजिक नेहमी लावावे.<<
म्हणजे बाइट पण असा दिलाय कि दोन्हि समर्थकांनी आपापल्या आवडि/कल्पनाशक्ति नुसार अर्थ लावावा.

महाशिवआघाडिवाले म्हणतील - अ‍ॅग्रीमेंट झालंय ऑलरेडि आता परत त्याच विषयावर चर्चा कशाला करतील, आणि भाजपावाले म्हणतील - घ्या यांची अजुन चर्चाच झालेली नाहि, आणि हे निघाले घोडिवर बसायला... Lol

@फारएन्ड, माझ्या लाॅजिकला सपोर्ट म्हणून निवडणूकीच्या काळातील सुशिलकुमार शिंदे यांचे सूतोवाच करणारे विधान आठवा.
युवराजांनी गादी सोडलेली. मॅडमला इच्छा नसतानाही राज्यशकट हाकलावा लागतोय. लेक जावयाची कोंडी केलेली. पहिल्या व पुढील प्रत्येक फळीतील दुफळी / अंतर्गत लाथाळ्या. अनुभवी साथिदारांची कमतरता. त्यात तब्येत साथ देत नाही. बार्गेनिंग पवार कमी पडते.
राज्यातील ५ वर्षाच्या विरहाने शिर्षस्थ नेते सत्तातुर अन आक्रमक अशा काळात कोणालाही संधी साधून पदरात दान पाडून घेता येईल

उद्याच घ्यायचा ना शपथविधी, मधे खूप दिवस आहेत.

उद्याच सर्व करायला हवं होतं, शपथविधी, बहुमत सिद्ध करणं. इथे रोज वेगवेगळ्या घडामोडी घडतायेत, परत बहुमत सिद्ध केल्यावर, उद्धवना सहा महिन्यांच्या आत निवडून पण यायला लागेल.

मी कंपनीत सामान्य पदावर काम करतो. माझी खूप इच्छा होती की बॉससारखं आयुष्य जगावं पण ते शक्य न्हवतं. परंतु मागील आठवड्यात मला एक युक्ती मिळाली. मी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी येतो आणि स्वतःच स्वतःला बॉस घोषित करतो. मस्त मजा करतो आणि रविवारी बॉस पदाचा राजीनामा देऊन एक सामान्य कर्मचारी म्हणून कंपनीत जॉईन होतो. सब अच्छा है, सब चंगासी, सर्व छान चालले आहे.

टीव्हीनाईन न्यूजवाल्यांनी काहीतरी गाणे बनवलेय..

आला रे आला सर्वांचा बाप रे..
नाव आहे त्याचे उद्धव ठाकरे Proud

नाना : मालक, तुमचे घर भाड्याने देणे आहे असे कळले.

घरमालक : होय, पण तुम्ही कोण ?

नाना : आम्ही फडणविस, पुर्वीचे घर सुटले. आता नविन घराच्या शोधात आहोत. तुमच्या घराचे भाडे किती ?

घरमालक : महिना पन्नास हजार !

नाना : अबब, एवढे !!! अहो वर्तमानपत्रात जाहिरातित तर तुम्ही पंचविस हजारच दिले होतेत.

घरमालक : ते ईतरांसाठी. तुमच्यासाठी पन्नासंच.

नाना : परंतु, हा दुजाभाव का ?

घरमालक : त्याचे कायेय, याच महिन्यात आमच्या घराच्या भिंतिंना महागडा रंग काढलाय.

घरमालक रॉक्स, नाना शॉक्स !

https://www.facebook.com/100005493164692/posts/1213220642204363/?sfnsn=w...

**

Pages