कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ठाकरे घराण्याचा मुख्यनंत्री नको - सोनिया गांधींची अट
खरे असेल तर लावला बांबू

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 14 November, 2019 - 01:54. >>>

मुख्यमंत्री कदाचित राऊत बनेल व त्याला एकच काम असेल... ते म्हणजे सं पादकीय लिहिणे

दोन्ही ठाकरे बंधूंनी स्वतच्या परतीचे दोर कापून टाकलेत. अशा वेळी भाजपकडे त्यांच्यातला एक गेला आणि माफी मागितली तरच भाजपवरोबर त्याची युती होऊ शकेल.

मुख्यमंत्री कदाचित राऊत बनेल व त्याला एकच काम असेल... ते म्हणजे सं पादकीय लिहिणे >>> Lol बिग नो राऊत यांच्यासाठी.

होणारचं असेल कोणी, तर उद्धव व्हावेत. ठाकरे नको म्हणतायेत मग याच साठी केला होता ना अट्टाहास. अर्थात शिवसेनेने नाव कोणाचेच जाहीर केलं नसल्याने मान्य करतील म्हणणं. हात दगडाखाली आहेत आता.

खरंतर या तिघांचे धड काहीही ठरत नाहीये, जितके जास्त दिवस लावतील तितका तोटा होईल.

>>खरंतर या तिघांचे धड काहीही ठरत नाहीये, <<

ठरेल हो!
शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच ते एकत्र येतायत.... त्याच योजनांच्या वाटाघाटी चालू असतील.... जरा वेळ लागायचाच Proud

एक राज्य कुणी चालवायचे ह्यावर निर्णय न घेऊन शकणारे व राज्यपालांकडे जाणारे अर्धभंपक लोक नेहरू युनोत का गेले म्हणून बोंबलत फिरतात

( सेना सध्या आमच्या बाजूला आहे, त्यामुळे फक्त भाजपाला उद्देशून अर्धभम्पक लोक म्हटले आहे )

एक राज्य कुणी चालवायचे ह्यावर निर्णय न घेऊन शकणारे व राज्यपालांकडे जाणारे अर्धभंपक लोक नेहरू युनोत का गेले म्हणून बोंबलत फिरतात

( सेना सध्या आमच्या बाजूला आहे, त्यामुळे फक्त भाजपाला उद्देशून अर्धभम्पक लोक म्हटले आहे )

नवीन Submitted by BLACKCAT on 14 November, 2019 - 13:14 >>

पूर्णभंपक blackcat भाऊ, भाजपने स्पष्ट सांगितलंय की त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही त्यामुळे ते सरकार स्थापन करू शकत नाहीत.

मग आता बाकीच्यांनी सरकार बनवून दाखवावे. ६ महिन्यांचा वेळ आहे.

मला वाटते सत्तेत आल्यावर एका महिन्यातच सेना स्वताहून बाहेर पडेल, हे काही आपल्याला झेपत नाही म्हणून.
म्हणजे मुंबईतले खड्डे, पडणारे पूल, तुंबणारे रस्ते, गल्ल्या, परप्रांतीय लोंढे, मराठी माणसाची दयनीय अवस्था, पालिकेतील भ्रष्टाचार, बिल्डर लॉबी, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ, .... या सर्व समस्यांवर ऊपाय शोधून अमलात आणायचे... अर्र! शेतकरी समस्या राहिल्याच की. अबब!
त्यापेक्षा बाहेर राहून सत्ताधार्‍यांवर गोळीबाराच्या फैरी झाडणे व १० रू जेवण चे वादे करणे बरे. त्या निमित्ताने 'अस्तित्व' टीकून राहते.

जे लोढणे भाजपा ने अनेक वर्षे वागवले (येन केन प्रकारेण!) ते आता राषट्रवादी व काँ कसे काय गळ्यात ठेवून फिरतील हे बघायला गंमत येणार.

बाकी या निमित्ताने सोशल मिडीया (its not been so social by the way!) मध्ये 'एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट ' ने पप्पू चे सर्व विक्रम मोडले हे नक्की. किमान हे एक कारण पुरेसे असावे, युवराजांनी सेने ला मिठी मारायला. Wink

काँग्रेस आणि शिवसेना विखे किंवा राणे ह्यांना मुख्यमंत्री--उपमुख्यमंत्री का करत नाहीत. ते दोघे आघाडी आणि विरोधी अशा सगळ्या पक्षांच्या विचारधारांचे melting pot आहेत. त्यांची नावे पुढे आल्यास कुणाला काही आक्षेप असायला नको.

राष्ट्रपती राजवट असेल तर शेतकऱ्यांना मदत करता येत नाही का. करता येत असेल तर करावी लगेच, ते सरकार स्थापन होईल तेव्हा होईल.

तसं तर ऊध्दव ठाकरे यांच्यकेडे देखिल थेट पालिका/प्रशासन/ राज्य चालवणे, शासकीय व्यवस्थापन, यातला अनुभव शून्यच आहे. त्यामूळे अशा अत्यंत कठीण व जटील समस्यांनी महा ला घेरले असताना त्यांना मु.मं बनवणे यावर नक्की कुणाचे एकमत होते हा कुतुहलाचा विषय आहे. मातोश्री, दादर, बांद्रा, मुंबई मधले संघटना कार्य व्यवस्थापन आणि राज्य शासन चालवणे यात जमिन आसमानाचा फरक आहे. निव्वळ वडीलांच्या अट्टाहासापाई/स्वप्नपूर्तीसाठी (?) झालेला मु.मं महाराष्ट्राला मिळण्या एव्हडी वेळ अजून तरी महा वर आली आहे असे वाटत नाही.

त्यापेक्षा श.पवार, चव्हाण, थोरात फारच ऊजवे ठरतात.

मु.मं चा कमीत कमी cv काय असावा यावर एक वेगळा बाफ निघू शकेल...!

दादरच्या भाजप कार्यालयात भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करतानाच शिवसेनेवरही दोषारोप केले. भाजपच्या सहभागामुळेच मित्रपक्षांना जास्त जागा जिंकता आल्या. भाजपचे नेते शिवसेनेच्या अनेक मतदारसंघात प्रचारासाठी गेले. या उलट शिवसेनेचा एकही नेता भाजप उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप वगळता राज्यात कोणतंही सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशीच सध्याची राजकीय परिस्थिती आहे. योग्यवेळी पक्ष निर्णय घेईल, असंही ते म्हणाले.
मुंबईत थांबू नका
यावेळी फडणवीस यांनी सर्व आमदारांना मुंबईत न जाण्याचे आदेश दिले. आमदारांनी जनतेत जावं, काम करावं. मुंबईत थांबण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना भक्कम मदत मिळेल, हे निश्चित आहे. सत्तेसाठी भाजप काम करीत नसून, जनतेसाठी काम करणे, हे आपले पहिले लक्ष्य आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपला अतिशय भक्कम यश प्राप्त झाले. प्रत्येक विभागात भाजपला यश आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

>>महाराष्ट्र गमावून मोदी-शहांनी नेमके काय कमावले?<<
अगदि वास्तववादि अग्रलेख आहे. गोवा सारख्या लहान राज्यात आकाश-पाताळ एक करुन सत्ता काबिज करणार्‍या चाणक्यांची शेंडी, देशाच्या आर्थिक नाड्या असलेल्या महाराष्ट्रात सुटल्यात जमा आहे. दुर्दैवाने नजिकच्या भविष्यकाळात तरी त्यांना चंद्रगुप्त सापडेल अशी आशा वाटत नाहि...

मी एकच निष्कर्ष काढू शकतो.

लोकसभेच्या वेळी भाजपला बहुमताची खात्री नसल्याने सेनेच्या गळ्यात पडून युती करून घेतली. युतीसाठी उद्धवला निम्म्या जागा, मंत्रीपदे, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद अशी तोंडी आश्वासने दिली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सेनेची गरज लागणार नाही व त्यावेळी सेनेला देतोय ते घ्या नाही तर निघा असे सांगून हाकलता येईल असा त्यावेळी शहांना विश्वास वाटला असावा. उद्धवने त्यांच्या तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवला. पत्रकारांसमोर संदिग्ध शब्दात सांगितलेले उद्धवला समजलेच नाही व त्याच वेळी भाजपने मुख्यमंत्रीपद असे स्पष्ट न सांगता पळवाट तयार करून ठेवली होती.

पण हाय रे दैवा. मतदारांनी भाजपची योजना हाणून पाडला. त्यामुळे सेनेला लाथ घालणे शक्य झाले नाही. परंतु तोंडी आश्वासन पूर्ण करायचे नसल्याने (ते पूर्ण करावे लागेल असे त्यांना वाटले नसावे) आता शब्दांचा खेळ करून भाजप डिनायल मोड मध्ये गेला आहे.

जनतेत जाऊन शेवा करा

ये ये खराटा घेऊन झाडायला ये

नवीन Submitted by BLACKCAT on 14 November, 2019 - 23:03. >>>
अरे बाळू, शांत बस... ते "जनता" म्हणाले , "जंतू" नाही.

व्हॉटसप फॉर्वर्ड - बुद्धीला खाद्य
__________________________

*संघ - मोदी शहा - नितीन गडकरी*
*या त्रिकोणात देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली*?

वरील प्रश्न खरच अनुत्तरीत आहे. दिल्ली, रेशीमबाग म्हणजे RSS Headquarters इथेच काहीतरी घडलय.
सरसंघचालक श्री मोहन भागवत यांच्या एका फोनवर श्री उद्धव ठाकरे हे हिंदुत्वावर परत आले असते.
ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल नेटवर्क वापरल होत, तेच RSS महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या वेळी एवढी अलिप्त का?
काही कारणे आतील असावीत. कानोकानी बरच ऐकू येत.

1) श्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ कारभारा बद्द्ल दबक्या आवाजात रेशीम बागेत बर्‍याच गोष्टी बोलल्या जात होत्या, ज्या सामान्य नागरिक, भाजपचे followers ना माहिती नाही. त्यात भाजपच्या सामान्य कार्यकर्ताची( नागपुराच्या) काम झाली नाहीत. आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत CM ने 70% नितीन गडकरी यांच्या समर्थकांची तिकिटे कापली.

माझा एक मित्र नागपुरात RSS च काम वीस वर्षे करतोय. रेशमबागेत आजही वजन नितीन गडकरींच सगळ्यात जास्त आहे. मोदी - शहांना RSS आपल मानत पण नितीन गडकरींना "आतल" मानते.
लोकसभा निवडणुकीत नागपूरात कुणबी मते गडकरी यांच्या विरुद्ध टाकायला कोणी गेम केला हे नागपुरात गल्ली गल्लीत माहीती आहे. गडकरींची पॉवर महाराष्ट्रात कोण कापतय या विषयी रेशमबागेत तक्रारी गेल्या असाव्यात.

2) पुलवामा व surgical strike च्या अगोदर मोदी सरकार कथित अडचणीत आले होते. लोकसभेत 180/200 जागा मिळतील असे सर्वे सांगत होते. व संघाने ने श्री नितीन गडकरी साहेबांना देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून project करायला सुरुवात केली होती.

चाणाक्ष शरद पवारांनी एक मार्मिक टिप्पणी केली होती की देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून project करत असतील तर मला गडकरींची 'काळजी' वाटते.
नितीन गडकरींनी सुध्दा एक दोन quote मोदी - शहांच्या विरुद्ध केली होती.

पण पुलवामा घडले व बालकोटमुळे भाजपा पुन्हा सत्तेत आली. मोदी शहा - फडवणीस यांनी नागपुरात गडकरी यांच्या विरुद्ध कुणबी मतांचे polarisation करुन लोकसभा निवडणुकीत गडकरी यांना stress दिला होता व त्यांच मताधिक्य घटेल याची काळजी घेतली..
भाजपा सरकार आल्यावर नितीन गडकरी यांच Port Trust खात काढल ही बाब रेशीम बागेत पसंत नव्हती.

3) मागच्या मोदी सरकार मधे नितीन गडकरी यांचच काम दाखवण्यासारख होत. बाकी कुठल्या खात्याच मोदी सरकार काम दाखवण्याच्या परिस्थितीत नव्हत.
GDP खाली यायला सुरवात झालेली होती. व Economic Front वर बोंबाबोंब सुरु झालेली होती.. मात्र नितीन गडकरी यांची काम धुमधडाक्यात चालू होती.
त्यांच्या कामाचे कौतुक 2018 मधे दस्तुरखुद्द सोनिया गांधी व लोकसभा अध्यक्ष मा. सुमित्रा ताई महाजनांनी केल होत ( म्हणून की काय सुमित्रा ताईंचा पत्ता कापला गेला) .
एवढ जबरदस्त काम असताना 2019 लोकसभा प्रचारात श्री नितीन गडकरी यांच्या कामाचा उल्लेखही केला नाही व अख्खी निवडणूक पुलवामा व surgical strike वर लढुन मोदी शहा सत्तेत आले. पण त्यांचा राग गडकरींवर होता म्हणूनच खाते वाटपात नितीन गडकरी यांच Port Trust खात गेल. आता निर्णय प्रक्रियेत त्यांना महत्व दिल गेलं नाही व त्यांना मोठ्या निणयापासून अलिप्त करण्यात आल.
पण त्यांना Direct हात लावायची हिंमत मोदी शहां मधे नाही कारण नितीन गडकरी यांच काम व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "अगदी आतल्या गोटात" गडकरी आहेत. रेशीमबाग ही वास्तु गडकरींच्या काळात झाली हे नागपुरात सर्वश्रुत आहे.

4) सत्तेत आल्यावर PMO ने गडकरींच्या रस्ते विकास ची फाईल बाहेर काढली व त्यातील उत्तम काम झाल आहे ते न बघता Delayed projects ची कारणे दाखवा असे सांगितले व यापुढे रस्तेविकास मंत्रालयाला स्वतःचे funding उभे करायला सांगितले. Infrastructure projects च सरकारी funding बजेट मधुन कमी केल.
पण शेवटी ते नितीन गडकरी.अजिबात न डगमगता Foreign Private Equity, Sovereign funds, Hong-Kong Pension funds या माध्यमातून पैसे उभे केले व LiC कडून Rs.1.25 L Cr पाच वर्षासाठी घेतले. म्हणता म्हणता विधानसभा आली.

5) विधानसभा निवडणुकीत गडकरी यांच्या मर्जीतील 70℅ लोकांची तिकट कापली हे रेशमबागेत अजिबात आवडल नाही.
पण रेशीम बागेच ऐकण्याच्या परिस्थिती दिल्ली नव्हती. सगळ दिल्ली व देवेंद्रजी यांच्यात चालू होत व म्हणूनच बावनकुळे, तावडे, खडसे यांची विकेट दिल्लीतून गेली असे देवेंद्रजींनी दाखवल.
रेशमबागेत या सगळ्याची नोंद होत होती.... व त्यात आरे तील घाई व समृद्ध महामार्ग संबधी बर्‍याच नकारात्मक गोष्टी रेशमबागेत पोहचत होत्याच. त्या देवेंद्रजींया विरोधात होत्या.

विधानसभा निकाल आला व उत्तम strike rate असुनही देवेंद्रजी 122 वरुन 105 वर आले.
आता उलटा पंच मारण्याची संधी रेशमबागेला व नितीन गडकरी यांना मिळाली.
पंधरा दिवस होऊनही सत्ता स्थापन होऊ शकत नाही म्हटल्यावर रेशमबागेतून फतवा निघाला की गडकरी आपण महाराष्ट्रात जाऊन परिस्थिती हाताळावी.
त्या आधी मुख्यमंत्री गडकरींना भेटायला स्वतः गेले तेव्हाच लक्षात आल, देवेंद्र यांची विकेट पडणार... गडकरी साहेब रेशीम बागे मुळे "पुन्हा प्रवाहात आले" पण तरीही त्यांना मोदी शहांनी पाठवले असे कुठेही छापून आलेल नाही.
नीट Observe केल तर लक्षात येईल गडकरी यांच्या घरी फक्त बावनकुळे व विनोद तावडे हेच गेले. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन किंवा आशिष शेलार यापैकी कोणीही त्यांना भेटले नाही. पण गडकरींना गोव्यात केल तस काहीही करुन राज्य आणा हे अधिकार मोदी शहांनी यावेळी दिले नव्हते.

नितीन गडकरी व मातोश्री यांचे स्वर्गीय बाळासाहेब यांच्या पासुनचे घनिष्ठ संबध व मा. बाळासाहेबांचा नितीन गडकरी यांच्या कर्तुत्वावर प्रचंड विश्वास होता.
रेशम बागेचा निरोप घेऊन गडकरींना मातोश्रीत संजय राऊत पण थांबवू शकले नसते. पण गडकरीनी आमचे अध्यक्ष मला असे म्हणाले अस सांगून मातोश्री आपल्याला बोलवणार नाही याची काळजी त्यांनी घेतली..
थोडक्यात महाराष्ट्रात परत येण्याचा कुठलाही विचार नाही हे सांगून कसलाही प्रयत्न न करता गडकरी माघारी परतले.

रेशमबाग व श्री उद्धव ठाकरे यांचे उत्तम संबध आहेत. श्री उद्धव ठाकरे यांना संघा बद्द्ल आजही प्रचंड आदर आहे. म्हणूनच काटशह करताना व देवेंद्रजींच्या pressला उत्तर देताना श्री ठाकरे एक वाक्य संघाला म्हणाले की RSS ला ही खोट बोलणारी माणस चालतात का? त्यात सगळ आल..
संघालाला भाजप सत्तेत असताना काहीही अशक्य नाही. तरी संघाने ने भाजपा शिवसेनेच सरकारने यायला हवे यासाठी जेवढा करायला पाहिजे होता तेवढा प्रयत्न मुळीच केला नाही. या देशात प्रथमच श्री अमित शहांना " खोट" म्हणवण्याचे धाडस झाले व ते सुद्धा श्री उद्धव ठाकरे यांच्या कडून..

नितीन गडकरी एवढे हुशार की आमचे अध्यक्ष काय म्हणाले हे सांगितल पण अमितभाईंची बाजु घेऊन तावा तावाने भांडले नाहीत..
त्या उलट देवेंद्रजी यांनी हाच stand न घेता, अमितभाईंची direct बाजु घेऊन श्री उद्धव ठाकरे यांना खोट ठरवल. व शिवसेनेला अंगावर घेतल ते सुध्दा श्री अमितभाईंसाठी.
तस न करता अमितभाई अस म्हणतात अस सांगीतल असत तर अमित शहा शिवसेनेच्या press मधे एकटेच target झाले असते...
पण शेवटी मी परत येईन - मी परत येईन अशा किती आरोळ्या ठोकल्या तरी आपण कोणामुळे आहोत हे देवेंद्रजींना माहीती होत व त्यामुळेच देवेंद्रजी ना *रनाआऊट* व्हायला लागल.

सत्तेच्या एवढ्या चाव्या आहेत काही ओरीजिनल तर काही डुप्लिकेट..

(सूत्रांकडून)

दुर्दैवाने नजिकच्या भविष्यकाळात तरी त्यांना चंद्रगुप्त सापडेल अशी आशा वाटत नाहि...>>>

चंद्रगुप्त नंतर मिळेलही पण आधी डेविड फर्नांडिसला गप बसवण्याची गरज आहे.

Submitted by पुरोगामी on 14 November, 2019 - 13:10 >> मला असे वाट नाही..
शिवसेना त्यांच्या खोट्या ईगोपायी आपण भाजपापेक्षा कमकुवत आहोत हे सत्य मानायला तयार नाही. मागच्यावेळी जागावाटपा वरून युती तुटली तेव्हाही त्यांचा "आम्ही तुल्यबळ आहोत म्हणून कमी जागा घेणार नाही" हाच ईगो आडवा आला होता. कमी जागा म्हणजे फक्त ९ की १० जागांवरून युती तुटली होती. पण आपल्याशिवाय भाजप सत्तेत येऊ शकते हे कळाल्यावर त्यांनी तेवढ्या काळाकरता पडते घेतले. आपण कधीही एकहाती बहुमत जिंकू शकत नाही ह्याची जबरदस्त जाणीवही त्यांना २०१४ मध्ये झाली.
ह्यावेळी लोकसभेनंतर भाजपला मोठा जनाधार आहे, फडणवीस सरकारने काही मोठे ब्लंडर्स केलेले नाहीत ज्यावरून जनाधार ऊलटा पडेल म्हणून पुन्हा जागा वाटपावरुन युती तोडल्यास आपल्याला भाजप पुन्हा परत घेणार नाही आणि सत्तेतही येता येणार नाही हे सुद्धा त्यांना माहित होते.
म्हणून त्यांनी भाजपावर 'जागा कितीही द्या पण पदे आणि सत्ता समान मिळायला हवी' असा अप्रत्यक्ष आणि संदिग्ध प्रचार केला. कारण निवडणुकीआधी समोरासमोर हे मागणे लाऊन धरल्यास युती तुटेल हे त्यांना माहित होते. म्हणून त्यांना निवडणुकीनंतर हा गनिमी कावा करावा लागला.
जसे तुम्ही म्हणालात तसे ईथे भाजपाची एक चूक झाली की (हे त्यांनी मुद्दाम केले असे मला वाटत नाही) कायम घरचा आहेर देणार्‍या शिवसेनेच्या असंख्य बढाईखोर वक्तव्यांसारखे वेळ पडल्यास शिवसेना घर फोडू शकते ही शक्यता त्यांनी सिरिअसली घेतले नाही.

ज्या राष्ट्र्वादीचा फुकटात मिळालेला पाठिंबा अव्हेरून भाजपाने शिवसेनेला युती तुटल्यानंतरही जवळ केले त्याच शिवसेनेने पुन्हा राष्ट्रवादीशी मिळून भाजपाला एकटे पाडले... ही मोठीच आयर्नी म्हणावी लागेल.

वरचा लोकमतचा लेख पटला.
भाजपाला सत्तेत यायचं होतं पण ते एकहाती शक्य नाही समजल्यावर सेनेशी नमतं घेऊन वाटाघाटी करणं आवश्यक होतं. मुख्यमंत्री आमचाच, सगळी मलिदा मिळणारी आणि वचक ठेवू शकणारी खाती आमचीच सांगून सेनेने का आणि कशाला ऐकावं?
त्यानंतर उद्धव फोन घेत नाहीत म्हणून मिस्ड कॉल करत बसणे असली स्टॅटेजी घेऊन हातावर हात धरुन बसलं तर कसं होणार? सत्ता ही सगळ्यात जास्त महत्त्वाची, कारण ती मिळाली की अनेक कामं चुटकी सरशी होतात.
मान/ अपमान/ मोठा/छोटा वरुन झालेल्या भांडणांचे वचपे सत्ता आल्यावर काढायचे हे बेसिक गणित झेपलं नाही त्यांना. बाकी कोण काँग्रेस बरोबर गेलं आणि कोण राकाँ बरोबर गेलं असल्या गोष्टींना टोपली दाखवते जनता एकदा का त्यांना हवं ते त्यांना मिळालं. आणि ते फक्त आणि फक्त सत्ता देऊ शकते. त्यातुन ती मुंबईची सत्ता.
बघुया अजुन काही शक्कल लढवतात का ते. अन्यथा राणे, नाईक, विखे इ. इ. सत्तेपोटी आलेले लोक गळायला ही वेळ लागणार नाहीच.

मला सेनेची चूक वाटत नाही
जे घडत आहे ते योग्यच आहे फक्त राज्यपाल चा वापर करून bjp नी घाणेरडी खेळी खेळली आणि विधान सभा भंग केली तरी bjp ला निवडणुकीत फटका बसेल .
तेव्हा सांभाळून

रेशमबागेतून फतवा निघाला की गडकरी आपण महाराष्ट्रात जाऊन परिस्थिती हाताळावी.??? नाग्पुर महाराष्त्रा बाहेर?

फडणवीस गडकरींचा पत्ता कापायच काम नागपुरात करत होते, सर्वश्रुत आहेच, शिवाय बाहेरची मंडळी इंपोर्ट करण्याचं पुण्यकर्म त्यांनी केलं, म्हणून हरले.

शिवसेनेनं अगदी व्यवस्थित काम केलंय. त्यांचा मुख्यमंत्री 5 वर्ष टिकावा!

>>शिवसेनेनं अगदी व्यवस्थित काम केलंय. त्यांचा मुख्यमंत्री 5 वर्ष टिकावा!
राजकीय अस्थिरता ही कुणाच्याही भल्याची नाहीच. त्याचे गंभीर परिणाम सर्व स्तरांवर होतात आणि विकास धोरणे, गुंतवणूक, रोजगार, दैनंदीन व्यवस्थापन हे सर्वच कुंठीत होते. त्यामूळे तिकडी येवो वा आणखीन कुणि पण लोकांच्या भल्यासाठी (?) सरकार ५ वर्षे टीकायलाच हवे.
राहिला प्रश्ण नैतीकता, तत्वे, जोड तोड.. तर आता त्यात काही नविन नाही, गल्ली ते दिल्ली हे अनेक वर्षे सुरू आहे. सेने साठी हे पहीलेच असे ऊघड धाडस आहे. आता सत्ता मिळेल पण त्याची किंमत कुठल्या तरी स्वरूपात मोजावी लागेल.. so welcome Sena to mainstream politics!

आता मात्र झाला एव्हडा तमाशा, राडा पुरे झाला असे वाटते. २० मोठे का गडकरी याने राज्याला फरक पडत नाही. तसेच सेनेच्या वाघाने मॅडम समोर मान टाकली का वगैरे असल्या भावनि़क मुद्द्यांनी देखिल प्रश्ण सुटत नाहीत. खेरीज, पक्षांनी, नागरीकांनी ऊठ सूठ नुसते सर्वोच्च न्यायालयात जाणे, संभ्रम निर्माण करणे, याने निव्वळ अराजक माजेल. एकदा काय ते सरकार स्थापन करून एकदा कोण तो मुख्यमंत्री बसवा आणि शटर ऊघडा.
'साहेब' दार ऊघडा! (दार ऊघड बये!)
एक बार फिर पवार. चालू देत! जे ईतके वर्षे जमले नाही ते निदान पुढील पाच वर्षे करून दाखवतील अशी आशा करुयात. एकीकडे म्हणायचे मी क्रिकेट खेळत नाही, दुसरीकडे मात्र ईतर सर्व गोष्टि दुर्लक्षून क्रिकेट च्या व्यवस्थापनात/राजकारणात श्रम ,शक्ती, पैसा, व सत्ता व्यय घालवण्याचे काम अनेक दशके केले. तेव्हा ही 'ऊपरती झाली असली तर बरेच आहे सर्वांच्याच तब्येतीला !

300

Pages