कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सेनेकडे थोडीजरी हुशारी शिल्लक असेल तर सेने ने कॉंग्रेस आणि कंपनीला बाहेरुन पाठिंबा द्यावा आणि मागच्या दाराने भाजपा बरोबर बोलणी चालू ठेवावीत (भाजपा आता इतक्यात त्यांना किती धूप घालेल माहिती नाही पण सेनेचा नाईलाज आहे).... कॉंग्रेस, राष्ट्रवादीला हवे तसे नाचवून घ्यावे आणि वर्षा-दोन वर्षात भाजपा जे देईल ते घेवून सरकार पाडावे

>>> इतक्या वर्षानंतर उद्धव सेनेला कोणाचेच डावपेच कळत नसतील तर काय धन्यच आहेत. >>>

+ ७८६

उद्धव राजकीय चाली खेळण्यात शरद पवारांसमोर अत्यंत कच्चा ठरला. शिवसेना कायमच वाटाघाटीत हरते. कायम भ्रमात पाहणाऱ्या व पोकळ फुशारक्या मारणाऱ्यांना राजकारणाच्या साध्या चाली सुद्धा समजत नाहीत.

सध्याच्या बातम्या पाहून असे वाटतेय की सेनेला काकुळतीला आणायला आघाडी वेटींग गेम खेळतेय
पण अखेरीस आघाडी सेना सरकार स्थापन होऊ शकते.
भाज्पला सत्तेपासून दूर ठेवायची संधी पवार सहजी सोडणार नाहीत.

ऋन्मेssष आपला शिवसेनेवरचा विश्वास आपल्याह्या चर्चा प्रस्तावात दिसतो. शिवसेनेत काही नेतृत्व नाही. ठाकरे मोठे व लहान दोघे अगदीच राजकारण परिपक्व नाहीत. हिंदुत्वाची वैचारिक कास पण नाही त्यांच्याकजे. उरला फक्त परिवारवाद. स्वतःच्या मुला करता सगळे होत आहे. ठाकरे नावाचा प्रभाव आहे तो पर्यंत ते टिकतील हे त्यांना पण माहित आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी झाली असे म्हणायचे.

कायम भ्रमात पाहणाऱ्या व पोकळ फुशारक्या मारणाऱ्यांना राजकारणाच्या साध्या चाली सुद्धा समजत नाहीत.
नवीन Submitted by पुरोगामी on 12 November, 2019 - 10:26
>>

सहमत !
'तुम्ही राजभवनावर जा, आम्ही समर्थन पत्र फॅक्सने पाठवतो' राजकारणात ह्या पोकळ आश्वासानावर कोणीतरी विश्वास ठेवेल काय ? शिवसेनेचे नेते इतके दुधखुळे कसे ? ह्यावरुन एक लक्षात येते की घड्याळकाकांनी आधी पद्धतशीरपणे मनसे संपविली व आता शिवसेनेच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला आहे.

राज्यपाल आज सुमननगर बिकेसी ब्रिजच्या उद्घाटनाला चाललेत.

Proud
सवय करताहेत , राष्ट्रपती राजवट आली की सगळी उद्घाटने राज्यपाल करणार

माझा विश्वास सेनेवर नाही वा त्यांच्या नेतृत्वावर नाही.
राजकारणात राष्ट्रवादी भाज्पा हे सेनेपेक्षा नक्कीच जास्त मुरलेले आहेत.
मी परिस्थितीवर भाष्य करतोय.
कारण सध्या सत्तेचे समीकरण असे आहे की सेना + भाजपा होऊ शकते. किंवा सेना + आघाडी होऊ शकते.
सेना कॉमन असल्याने किंगमेकरच आहे. भले ही परिस्थिती हाताळण्याचा मुत्सद्दीपणा त्यांच्या नेतृत्वात कमी असला तरी ते या पोजिशनला आहेत.

कॉन्ग्रेस्ला शिवसेनेला समर्थन द्ययचे असते तर ते कालच दिले असते. आजही राष्ट्रवादी काहीही करु शकणार नाही.

राष्ट्रपती राजवट, मग शिवसेना भाजपकडे गयावया करत जाणे वा आणखी १-२ महीन्यांनी शिवसेना फुटणे अटळ आहे.

मनसे संपली
हा निष्कर्ष कसा काय काढलात सध्या त्यांची अवस्था बिकट आहे
परिस्थिती बदली की परत जोमात येवू शकते.
Bjp आता फॉर्म मध्ये आहे ह्यांचा अर्थ उद्या पण फॉर्म मध्ये राहील असे म्हणणे सुद्धा अपरिपक्व पणाच झाला..

इथे काही स्थिर नसतं .
बदल होतच असतात.
एकवेळ असा होता की कॉग्रस ह्या देशात सम्राट म्हणून राज्य करत होती
आता काय अवस्था आहे.

राष्ट्रपती राजवट, मग शिवसेना भाजपकडे गयावया करत जाणे वा आणखी १-२ महीन्यांनी शिवसेना फुटणे अटळ आहे.
>>>>

यात तर मग भाजप सरस झाली ना...
असे होण्यास पवार हातभार लावतील असे म्हणायचेय का?

संजय राऊतांची exclusive दृश्ये
हॉस्पिटलच्या बेडवर बसून संपादकीय लिहीत आहेत.
अचाट आहे हा माणूस.
नुकतेच पवार भेटून गेलेत त्यांना

५२ आमदारांच्या जोरावर पवार काही करु शकतील हा विचारच हास्यास्पद आहे. त्यानी त्यान्च्या किचन पोलिटिक्सच्या हातोटीने शिवसेना- भाजप यान्च्यात भान्डण लावलंय (उद्धव ला फुस लावुन). तेव्हढाच एक त्यांचा युएसपी आहे.

बाकी निट योजना आखुन ३७० संपवणारे लोक दुधखुळे आहेत व त्यांनीं महाराष्ट्रासाठी काहीच योजना आखली नसेल अशा भ्रमात कुणी राहु नये.

पवार कधीच शिवसेनेला त्यांच्या अटीवर पाठींबा देणार नाहीत. आजही ते 'आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा आदेश जनतेने दिला आहे' असे म्हणत आहेत. शिवसेनेला एकतर भाजपाकडे किंव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सत्तेसाठी गयावया करण्यावाचून दुसरा आता पर्यायच नाही.

शिवाय सेनेसारख्या मद्य पिलेल्या मर्कटाच्या हाताखाली पवार तर सोडाच त्यांच्या पक्षातील इतर नेते देखील काम करु शकत नाहीत. कारण हा मर्कट एका मर्यादे पलिकडे पवार व सोनिया गांधीना अजिबात जुमाणार नाही, ह्याचे प्रात्येक्षिक गेल्या पाचवर्षात देशाने पाहीलेच आहे.

५२ आमदारांच्या जोरावर पवार काही करु शकतील हा विचारच हास्यास्पद आहे.
>>>>
भाजपचे नेतृत्वही खरेच असा विचार करत असेल तर ते हास्यास्पद ठरेल Happy

संजय राऊतांची exclusive दृश्ये
हॉस्पिटलच्या बेडवर बसून संपादकीय लिहीत आहेत.
अचाट आहे हा माणूस.
नुकतेच पवार भेटून गेलेत त्यांना
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 12 November, 2019 - 11:23
<<

ह्याचा अर्थ निलेश राणे यांच्या ट्विटमधे तथ्य दिसतेय.
--
Nilesh Rane.png
--
https://twitter.com/meneeleshnrane?lang=en

आता पर्यंतच्या असेंबली इलेक्शन चा निकाल बघितलं तर सेनेच्या जागा जास्त निवडणुकी मध्ये bjp पेक्षा जास्त आहेत

Bjp आता सेने बरोबर युती झाल्यानंतर सत्तेच्या जवळ जावू लागली

किती तरी वर्ष काँग्रेस इथे टॉप ला च होती ..

आजच्या घडामोडी

शरद पवार लीलावतीकडे रवाना...

आतली खबर
राष्ट्रवादीची सेनेला ५०-५० ऑफर - TV9 सूत्रांतर्फे

आता उद्धव ठाकरे पोहोचले लीलावतीला
राऊत द बॉस यांची भेट घ्यायला

अविश्वसनीय असे करून दाखवणार
उद्धव ठाकरे यांचे उद्गार !

ब्रेकिंग न्यूज
भाजपाचे आशिष शेलार राऊतांच्या भेटीला..
आणि
भाजपा नेतेही राऊत यांना भेटणार....

गुप्त चर्चा.. विशेष कक्षात जाऊन...
सेना आणि राऊत हेडक्वार्टर झाले आहे..
मजा येतेय एकंदरीत

सेनेला आता कोण चांगली ऑफर देतेय.. आघाडी की भाजपा?
जे आघाडी देतेय तेच भाजपाने दिले की सेना भाजपासोबत..
म्हणजे २.५ वर्षे मुख्यमंत्रीपद ! सेनेला नक्की आहे, ते सोडू नये सेनेने आता.

अवांतर - राऊत खोटे खोटेच ॲडमिट असतील तर मानला सेनेला ! - मास्टर डावपेच

पवार एकदा फक्त 40 आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झाले होते,

कधी झाले होते ?

1978 साली सत्ताधारी पक्षातील 40 आमदार फोडून विरोधी पक्षात गेले आणि मुख्यमंत्री झाले असा इतिहास आहे.
पवार काही ही करू शकतात

सेनेला आता कोण चांगली ऑफर देतेय.. आघाडी की भाजपा?
जे आघाडी देतेय तेच भाजपाने दिले की सेना भाजपासोबत..
म्हणजे २.५ वर्षे मुख्यमंत्रीपद ! सेनेला नक्की आहे, ते सोडू नये सेनेने आता.

अवांतर - राऊत खोटे खोटेच ॲडमिट असतील तर मानला सेनेला ! - मास्टर डावपेच

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 November, 2019 - 12:43>>>

भाजपा सेनेला ऑफर देतेय? Lol तेही राउतची भेट घेऊन?

>>सेना आणि राऊत हेडक्वार्टर झाले आहे..<<

आर यु किडींग? दस्तुरखुद्द शिवसैनिक पण आता असे म्हणायचे धाडस करणार नाही!
आणि अजुनही भाजपा अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देईल असले अंदाज बांधत असाल तर अजुन राजकारणाच्या बालवाडीत आहात Wink

Bjp च्या राज्यात विरोधी मततीतल लोकांना दाबण्याचा प्रयत्न झाला आहे.
म्हणून मुख्य मंत्री पदासाठी सेना हट्ट करून बसली आहे.
योजना मंजूर न करणे.
विकास काम ना खीळ घालणे .
असला नीच पना bjp नी केला आहे.
आणि दबावाखाली ठेवणे हे प्रकार bjp नी केले आहेत
त्या मुळे विभाग नुसार ठराविक लोकप्रतिनिधी ची काम खोळंबली आहेत जनता विरोधी गेली आहे

>>Bjp च्या राज्यात विरोधी मततीतल लोकांना दाबण्याचा प्रयत्न झाला आहे.
म्हणून मुख्य मंत्री पदासाठी सेना हट्ट करून बसली आहे.
योजना मंजूर न करणे.
विकास काम ना खीळ घालणे .<<

तुम्हीच तर म्हणत होतात की युतीच येणार म्हणून!

बरे ते एक जाउद्या! ते वर जे काही आरोप केलेत त्याची जरा उदाहरणे द्या बघू Wink

Pages