मदत हवी आहे.

तुम्हाला मायबोली संदर्भात जर का काही प्रश्न असतील, मायबोलीवर काही सुविधा कश्या वापरायच्या याची माहिती हवी असेल, तर इथे विचारा.

विषय: 
प्रकार: 

आम्ही इथे रशियात काल शिवजयंती साजरी केली. मागे गणेशोत्सवाबद्दल मी एक लेख 'गणेशोत्सव लेखन' मधे लिहिला होता. त्याचप्रमाणे आमच्या कालच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाबद्दल लिहायचा आहे. कुठे लिहु?????
मला रंगीबेरंगीत लेखन करता येईल का???मी तिथे नियमीत लिहित जाइल.

मायबोलीवर हजर असलेले सभासद एकमेकांना का दिसत नाही?

कृपया आपले ईपत्र पहावे.

धन्यवाद मॉड!!!आपण मला संधी दिलित याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण मला जागा देउन दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेल. मी माझे पहिले लिखाण केलेले आहे. फक्त त्यात फोटो कसा टाकायचा हे माहीत नाही. मी माझ्या खाजगी जागेत एक फोटो अपलोड केलेला आहे तो तुम्ही माझ्या रंगिबेरंगीतील लेखात टाकाल का???

मायबोलीकर जगभर सगळे विखुरले आहेत आणि वेगवेगळ्या वेळेस मायबोलीवर येतात. किती लोक एका वेळेस हजर आहेत यावरून काही मदत होणार आहे का?

मी प्रथम च काही लिखाण केले आहे. माझा लेख सर्वाना वाचायला मिळतो ना? कारण माझ्या लेखाला प्रतिसाद आलेले नाहीत. कदाचित कोणी वाचलाच नसेल , ही एक शक्यता आहे. पण टेकनिकली काही चुकीचे झाले नाही ना? माझ्या आजूबाजूच्या लेखाना प्रतिसाद आलेले दिसतात. फक्त माझ्याकडून काही चूक झाली नाही ना सेव्ह करण्यात वगैरे ?

मी बरेच महिने झाले ही साईट बघत होते (रॉम मोडमधे) . आजच मी register केले . पण एक अडचण आहे.
हितगुज मधील कोणत्याही बीबी वर मी माझे पोस्ट टाकु शकत नाहीये .
जेव्हा जेव्हा मी माझे नाव अनि पासवर्ड वापरुन हितगुज मधील बीबी वर पोस्ट करायचा ट्राय करते तेव्हा खालिल error येते,
"Error
Your username/password combination was invalid, or you do not have permission to post to this topic. You may revise your username and password using the form at the bottom of this page. "

तेव्हा क्रुपया मला मदत करा.मला कळत नाहीये नक्की काय चुकते आहे ते.

विचारले. इतर बहुसंख्य मराठी संकेतस्थळावर हजर सभासद मुखपृष्ठावर दिसतात. अशा हजर सभासदांमध्ये आपल्याला हवी असलेली व्यक्ती दिसल्यास त्वरीत संपर्क साधता येतो,संवाद साधता येतो असा अनुभव आहे.
मात्र इथेही तसे काही असल्यास मला तरी दिसले नाही. ते माहीत करून घेण्यासाठी हा एक प्रयत्न आहे.
तसेच नवे लेख,प्रतिसाद मुखपृष्टावर दिसेल असे नाही का करता येणार? ज्यामुळे वाचक आपोआप त्याकडे आकर्षित होतील!
संकेतस्थळावरील सभासद जगभर विखुरलेले आहेत म्हणूनच ही सोय असावी असे वाटते. त्यामुळे संकेतस्थळावर जाग दिसते.

खालील टप्पे वापरून लॉगीन करता येते आहे. कृपया हा प्रयत्न करून पहा.

१. इमेल लिहून हितगुजचा पासवर्ड पुन्हा मागवा, हा त्याचा दुवा
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/board-profile.cgi?action=forgot
२. नवीन पासवर्ड भरा. (तोच पुन्हा दिला तरी चालेल)
३. इमेल मधे आलेली Activation Key लिहा.
४. हितगुजवर लॉगीन करा.

नमस्कार ऍड्मीन,

मला हितगुज वर लॉगिन करता येत नाही. रजिस्टर कसे करायचे?

आपला मंदार @};-

मीमंदार,
हितगुजवर लॉग इन करण्यासाठी वर लिहीलेला पर्याय वापरा

dinkarshruti,
कदाचीत तुम्ही अपलोड करत असलेल्या पिक्चर फाइलची साइझ लिमीट(150kb) पेक्षा जास्त असेल त्यामुळे तुम्हाला ती
इथे टाकता येत नसेल. पिक्चरची साइझ कमी करुन परत एकदा अपलोड करुन बघा.

मायबोलीवरुन कुठल्याही प्रकारची mp3 गाणी डाउनलोड करता येत नाहीत. ही सुविधा येथे अस्तित्वात नाही

मी पहातेय की इथल्या प्रश्नाला admin आणि runi हे दोघे उत्तरं देत आहेत त्याबद्दल धन्यवाद पण मला एक शंका आहे, admin चे नाव रुनी आहे की रुनी नावाची admin आहे की admin आणि रुनी असे २ admin आहेत की कसे?

हा प्रश्न सहज मनात आला म्हणुन विचारला, एक माहीती म्हणुन, कृपया राग नसावा.

धन्यवाद.

vira,
रुनि आणि ऍडमीन या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आणि आयडी आहेत. त्यांचा एकमेकांशी तसा काही संबंध नाही.
एकच ऍडमीन आहेत दोन नाही. मी फक्त माझ्यापरीने ऍडमीनच्या कामातला खारीचा वाटा उचलतेय. Happy

प्रशासक, खाली जो मराठी ईंग्रजी मधे लिहिण्यासाठी (Ctrl + \ ने बदला) असा चौकोनी डबा आहे तो जरा वर उचलून ठेवता येणार नाही का? दरवेळी मला असं वाटत कि त्याची जागा अयोग्य झाली आहे. वर कमेंटच्या शेजारी छान दिसेल तो.

-- बी

धन्यवाद रुनि,

अजुन एक शन्का,
हितगुज वरिल विनोदाचा बिबि हलवला आहे. तो कुठे आहे?

Help Please.

Wish to visit Amboli in rainy season. our's is a group of 15-20 girls n boys. pls. guide for economical accomodation also. how to plan from pune-amboli n back.

नमस्कार अतुल पटवर्धन,
तुम्ही हा प्रश्न पुण्यातील अथवा आंबोलीच्या आसपासच्या गावातील मायबोलीकरांना विचारलात तर तुम्हाला हवे असलेले मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे.

शहरानुसार मायबोलीवरील ग्रूप्स तुम्हाला या दुव्यावर मिळतील.

शिवाय, "आंबोली" हा शब्द मायबोलीवरील शोधसुविधेचा वापर करून शोध घेतल्याने तुम्हाला उपयुक्त माहीती कळू शकेल वा आंबोलीबद्दल लिहिणार्‍या मायबोलीकरांशी संपर्क साधता येईल. शोधसुविधा वापरून सापडलेले काही दुवे खालीलप्रमाणे:
http://www.maayboli.com/node/3587
http://www.maayboli.com/node/8455
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/103067.html?1145369261

शोधसुविधा प्रत्येक पानाच्या सर्वात शेवटी उपलब्ध आहे.

- मदत समिती.
*************************
जनसेवेचे बांधुन कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकुन
अर्पुन आपुले हृदसिंहासन, नित भजतो मानवतेला
*************************

पांढरी शाइ, रंगित अक्षरे, लिहीलेल्यावरून रेघ मारणे अश्या सोयई केंव्हा हो उपलब्ध होणार? आमच्या प्रतिभेच्या उत्तुंग विलासाला त्यांची फार मदत होईल.
Happy Light 1

अभिप्राय लिहिताना बरेच जण 'ह्याविषयी अधिक माहीती इथे मिळेल' असं लिहून इथे शब्दामध्ये लिंक देतात. हे कसं करायचं?

जी लिंक द्यायची आहे त्याचा पत्ता कॉपी करून घ्या.
इथे (किंवा ज्या शब्दावर लिंक द्यायची आहे तो/ते शब्द ) निवडून मग प्रतिसाद विंडोच्या चौकटीवर चिकटून असलेल्या चौकोनांतील इन्सर्ट/एडिट लिंक वर क्लिक करा. नवी खिडकी उघडेल. त्यात तुम्हाला हवी ती लिंक द्या. ओक्के म्हणा.

सचिन, जाई, याकरता; टेक्स्ट बॉक्स च्या वर जो टूलबार आहे (जिथून बोल्ड, आयटॅलिक वगैरे करता येतंय) त्यावर 'म/E' या बटणाच्या बाजूला फिक्या पर्पल/पिंक कलरचं जे बटण आहे, तिथून लिंक देता येते.

याकरता आधी जी लिंक द्यायचीय ती कॉपी करून घ्या. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स मध्ये ज्या शब्दाला लिंक द्यायचीय तो शब्द अथवा वाक्य सिलेक्ट करा (उदा. 'इथे') मग 'ते' बटन सिलेक्ट करा येणार्‍या बॉक्स मध्ये आधी कॉपी केलेली लिंक पेस्ट करा. मग ओके वर क्लिक करा. लिंक टेक्स्ट बॉक्स मध्ये येईल. प्रतिसाद सेव्ह केल्यावर ज्या शब्द/वाक्यावर लिंक असेल ते निळ्या रंगात दिसेल...

होप धिस हेल्प्स Happy

Pages