मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एम आय मॅक्स वापरला आहे २ वर्ष. खूप आवडला.स्क्रिन वर जास्त वेब ब्राउजिंग किंवा वाचन करणार्‍यांना बरे पडते.व्हिडिओ क्वालीटी पण मस्त.
नंतर एकदा बिना कव्हर चा फोन बाहेर नेला असताना बागेत मोठ्या दगडावर फेस डाऊन पडून फुटला. (२ मायबोलीकरीणी या ऐतिहासिक घटनेला साक्ष होत्या.) मग तो २५०० टाकून पूर्ण डिस्प्ले बदलून रिपेअर करुन आणला आणि परत एकदा दुचाकीवर मागे बसून बघत असताना स्पीड ब्रेकर वर फेस डाऊन पडून रिपेअर च्या पलिकडे गेला. आपण इतका चांगला मोठा फोन वापरायच्या लायकीचे नाही असे समजून घेऊन रेडमी घेतला.तो ठिक चालू आहे.

>>ऑप्पो रिलमी ची बॅटरी कमी वाटते आहे. दोन्ही एकदम सिम एकाचवेळी ४ G सिग्नल पकडत असतील तर बॅटरी जास्त ड्रेन होत रहाते. प्रायमरी सिम ४g व सेकंडरी २ जी वर ठेवावे.

माझे दोन्ही सिम जिओ चे आहेत, त्यामुळे नो २जी ओप्शन. पण दोन्ही सिम ४ जी चे असूनही आणि २४ तास डेटा चालू ठेवूनही ३५०० ची बैटरी १.५ दिवस येते. त्यान्ची color OS नावाची OS android OS च्या वर आहे.

२ आठवडे झालेत. यात हाय्ब्रिड सिम नाही आहे. २ सेपरेट सिम स्लॉट्स आणि सेपरेट एस डी स्लॉट आहे. आत्तापर्यन्त तरी सगळ व्यवस्थित चालू आहे. पुढे पाहू Happy

Moto C+, Oppo Realme, Redmi 4 आणि 5
आतापर्यंत एवढे पर्याय आलेले आहेत. सुचवणाऱ्या सगळ्यांचे आभार _/\_

मित्रमंडळी Redmi च सांगतायत पण त्यांचं लाईफ जास्त नाही असेदेखील म्हणतायत. बघू काहीतरी ठरवेन.
===
< पण ६४ जीबी मेमरी लोकांना का पुरत नसावी हा मला प्रश्न आहे. काय भरतात एवढे स्मार्टफोनमध्ये? >>>
+१ Lol

(आयफोन स्पेसिफिकली विचारात नसेल तर), कुठलाही घ्या फोन आता. बहुतेक सग़ळेच ३२ जीबी, ३ जीबी कॉमन झालेत.
रॅम ३ जीबी, आणि पुढे असलेला घेतलात तर पुढले २/३ वर्षे दमदमीत चालेल फोन.

मित्रमंडळी Redmi च सांगतायत पण त्यांचं लाईफ जास्त नाही असेदेखील म्हणतायत. बघू काहीतरी ठरवेन.
<<
कमी लाईफवाला स्वस्त फोन चांगला. अशीही दोन वर्षांत टेक्नॉलॉजी बदलते, अन जुन्या फोनवर नवी अ‍ॅप्स डुगुडुगु चालतात.
**
< पण ६४ जीबी मेमरी लोकांना का पुरत नसावी हा मला प्रश्न आहे. काय भरतात एवढे स्मार्टफोनमध्ये? >>>
+१ Lol
<<
सेल्फ्या.
मोठे मेग्यापिक्सेल्स वापरून ८-१० एम्बी साईजची रद्दड छायाचित्रे तीही लागोपाठ ५-६ काढायची एकाच वेळी.
यांना ६४ टीबी कमी पडतील. जीबीचं काय घेऊन बसलात?

वेमासाहेब,
या धाग्यावर २ हजार प्रतिसाद होऊन चुकलेत.

कृपया नवा धागा काढा व याला कुलुप लावा, ही विनंती!

अनुमोदन, असेही २०१० म्हणजे ८ वर्षापूर्वी काढलेला धागा, बरीचशी माहिती निरुपयोगी झाली असेल, मॉडेल बंद झाली असतील.

Pages