पर्यायस्वातंत्र्य

Submitted by सामो on 23 September, 2019 - 11:49

द सब्बाथ ऑफ म्युचुअल रिस्पेक्ट - https://idealisticrebel.com/2014/12/04/the-sabbath-of-mutual-respect/

अमेरीकन समाज कितीही प्रगत वाटत असला, तरीही काही लोकांचे विचार हे प्रतिगामी आहेत हे देखील सत्य आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. विशेषतः विस्कॉन्सिन मध्ये 'रस्ट बेल्ट' भागातील एका खेड्यात रहाताना हे प्रतिगामी विचार अधिकच ठळकपणे लक्षात येत असत. उदा - गर्भपात करण्यास प्रतिबंध' असावा अशी एक विचारधारा मुख्यत्वे मला आढळली ती याच भागात. बसने जाता येता पोस्टर्स दिसत ज्याव अतिशय गोंडस , हसरं मूल/ कॅलेंडर बेबी चे चित्र असे व खाली लिहीलेले असे " तुम्हाला माहीत आहे काय माझ्या हृदयाचे ठोके कन्सेप्शनपासून, ३ र्‍या आठवड्या पासून चालू झाले." किंवा असेच अर्भकाचे गोड चित्र व खाली शीर्षक - " माझ्या कन्सेप्शनपासून, ५ व्या आठवड्यात मला स्मित करता येऊ लागले" - या आहेत अँटायअ‍ॅबॉर्शन संदेश देणार्‍या जाहीराती. एकदा बसमध्ये ४-५ टिनेजर मुलींचा एका मध्यमवयीन अगदी अशक्त स्त्रीशी मोठमोठ्याने वाद चाललेला ऐकला. इतक्या आवेशात त्या मुली तो वाद घालत होत्या की माझे लक्ष वेधल्याविना राहीले नाही. मुलींचा मुद्दा होता - 'गर्भपात हा समर्थनिय नाही. ते पाप आहे. एका लहान अर्भकाचा खून आहे.' ती स्त्री परोपरीने त्यांना सांगत होती की 'काही परिस्थितींत गर्भपात करणे टाळता येत नाही." शेवटी शेवटी तर त्या स्त्रीवर इतका शाब्दिक हल्ला होउ लागला - "मग तू केला आहेस का गर्भपात?" वगैरे. ती स्त्री उतरल्यावरती तो वाद थांबला. अमेरीकेत क्वचित प्रसंगी कुमारी मातादेखील पाहीलेल्या आहेत. ती आई स्वतःच एक लहान मुलगी असते आणि तिच्या कडेवर तिचे टॉडलर मूल दिसते असे दॄष्य पाहीलेले आहे.
.
खरे पहाता, स्त्रीला तिच्या शरीरावरती हक्क असलाच पाहीजे. 'मूल ठेवायचे की नाही' हा आयुष्यातील एक सर्वात मोठा निर्णय तिचा तिला घेता आलाच पाहीजे. सुदैवाने असे पुरोगामी किंवा समजूतदार विचार करणारेही लोक आहेत. या लोकांची विचारधारा ही 'प्रो चॉइस' म्हणजे 'पर्याय स्वातंत्र्य' म्हणुन ओळखली जाते. तर "पर्याय स्वातंत्र्य" या विषयावर वाचलेली माझी ही पहीली कविता जिच्याबद्दल मी काही मांडत आहे. इतक्या गंभीर विषयावर काव्यात्म टिप्पणी करणारी "द सब्बाथ ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट" ही मार्ज पियर्सी या कवयित्रीची कविता. "द मून इज ऑलवेज फिमेल" या पुस्तकातील बर्‍याच कविता आवडल्या. गर्भपाताचे समर्थन करणारी ही जास्त रोखठोक असल्याने समजली. मार्ज पियर्सी यांचे विचार स्त्रीमुक्तीवादी आहेत असे त्यांच्या बर्‍याच कवितांतून जाणवले. प्रसिद्ध कविंच्या , लेखकांच्या मतांनी, शब्दांनी समाज घडू शकतो. लोक त्यांचे साहीत्य वाचून विचार करतात. प्रसिद्धी हे समाजसेवेकरता उत्तम माध्यम बनू शकते.
.
"द सब्बाथ ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट" या कवितेची सुरुवातच पूर्वजांच्या पुण्यस्मरणाने होते.
In the natural year come two thanksgivings,
the harvest of summer and the harvest of fall,
two times when we eat and drink and remember our dead
under the golden basin of the moon of plenty.
थँक्स्-गिव्हींग हा सण सुगीच्या दिवसांत येतो. जेव्हा कणसे कापणीला आलेली असतात. दुकाना दुकानांमधून, कणसांचे घड विकायला येतात. बुजगावणी , तांबडे भोपळे यांची रेलचेल दिसून येते. काहीकाही धान्यांच्या ओंब्या टांगलेल्या व विकायला ठेवलेल्या असतात. तर हेमंतात दिसून येणार्‍या या सुगीच्या विपुलतेचे चित्रण पहील्या काही कडव्यात आढळते. कवयित्री पर्याय निवडीचे स्वातंत्र्य अगदी साध्या प्रसंगातून दाखविते. खाद्यपदार्थांची रेलचेल आहे व अनेक पौष्टिक पदार्थांतून आपण स्वतःला रुचणारे पदार्थ निवडतो. म्हणजे आपल्या शरीराला काय पौष्टिक असते ते आपण ठरवतो. हक्काने ठरवतो.
The blowing grasses nourish us, wheat
and corn and rye, millet and rice, oat
and barley and buckwheat, all the servicable
grasses of the pasture that the cow grazes,
the lamb, the horse, the goat; the grasses
that quicken into meat and cheese and milk,
the humble necessary mute vegetable bees,
the armies of the grasses waving their
golden banners of ripe seed.
विपुलताच आपल्याला निवडीचे पर्याय देते व आपण किती सहजतेने ते निवडतो. कवयित्री म्हणते, हॅबॉन्डिया ही समृद्धीची देवता. तिच्या कारकत्वाखाली जशी समृद्धी येते तसेच पर्यायनिवडीचे स्वातंत्र्यदेखील येते. पुढे कवयित्री हेच लहानसे स्वातंत्र्य विस्तारुन आयुष्यातील अतिमहत्त्वाचे व आयुष्याला कलाटणी देणारे निर्णय यांची तुलना करते, ते निर्णय सहजतेने घेण्याचे स्वातंत्र्य यावर टिप्पणी करते. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला विवाहामधून मूल जन्माला घालावेसे वाटेल तर कोणा स्त्रीला तिच्या "लेस्बियन" जोडीदाराबरोबर, मूल दत्तक घ्यायला आवडेल, तर अन्य कोणा स्त्रीला एकटेपण आवडेल. आपण निवडलेल्या पर्यायाहून अन्य कोणी दुसरा पर्याय निवडला तर त्याचा मान राखण्याचे भान ही कविता देते, तसा मान राखावा असे आवाहन करते.
In another
life, dear sister, I too would bear six fat
children. In another life, my sister, I too
would love another woman and raise one child
together as if that pushed from both our wombs.
In another life, sister, I too would dwell
solitary and splendid as a lighthouse on the rocks
or be born to mate for life like the faithful goose.
Praise all our choices. Praise any woman
who chooses, and make safe her choice.
मूल हवे असताना होऊ न देणे जितके यातनामय आहे तितकेच नको असलेले मूल प्रसविणे व वाढविणे त्रासदायक आहे ही जाणीव कवितेत बोलून दाखविलेली आहे.
To bear children unwanted
is to be used like a public sewer.
To be sterilized unchosen is to have
your heart cut out.
अनेक देवता - हॅबॉन्डिया, आर्टेमिस, दिती, इनाना, शिन मू इतकेच काय आपल्या पणजा, खापरपणजा यांनी त्यांचे जीवन, आराम सर्व त्यागून नवीन वाटा चोखाळल्या, आपल्याकरता नवीन वाटा बनविल्या. त्यांनी खंबीरपणे आपल्याला सोपविलेला इतिहास, वारसहक्क, जाणीवा, नवे हक्क व कर्तव्ये यांचा परीपाक म्हणजे आयुष्यविषयक निर्णय सहजतेने घेता येणे. आणि ते स्वातंत्र्य ही आपण स्त्रियांची खरी समृद्धी अशा आशयाची ही कविता आहे.
Praise our choices, sisters, for each doorway
open to us was taken by squads of fighting
women who paid years of trouble and struggle,
who paid their wombs, their sleep, their lives
that we might walk through these gates upright.
Doorways are sacred to women for we
are the doorways of life and we must choose
what comes in and what goes out. Freedom
is our real abundance.
मला या कवितेत काय आवडले तर - स्त्रीस्वातंत्र्याबद्दलचे मार्जचे विचार, गर्भपाताबद्दलचा तिने घेतलेली भूमिका व आवाहन याची काव्यमय अभिव्यक्ती आवडली. या विषयावर कळलेली ही पहीलीच कविता.

Group content visibility: 
Use group defaults

शिक्षणाचा हक्क नाकारणे.
भवितव्य घडवण्याचा हक्क नाकारणे.
नोकरी किंवा व्यवसाय करण्यास प्रतिबंध करणे.
वर निवडायचा हक्क नाकारणे.
छंद बाळगायला विरोध करणे ( मग तो खेळाचा असेल ,डान्स चा असेल etc).
घरातील कामाचा वाटा तिच्या अंगावर टाकणे .
हे सर्व नाकारणे म्हणजे तिच्या वर अन्याय होतो आहे असं मी समजतो .

रात्री अपरात्री बाहेर जाण्यास मज्जाव करणे .
दारू ,सिगारेट सारख्या व्यसन पासून रोखणे.
बाहेर कुठे जायचे असेल तर परवानगी घेवून च जा असे सांगणे .
अशा प्रकारच्या गोष्टी ल
मी तिच्यावर अन्याय होतोय ह्या सदरात पकडत नाही .
साधी उदाहरण दिली आहेत जास्त खोलात न जाता

मध्यमवर्गीय स्त्री आता बाहेर पडून बऱ्यापैकी अर्थार्जन करतेय. तिने आणलेला पगार हवा असेल तर आपोआपच तिला स्वयंपाक, कपडे धुणे, घराची स्वच्छता इत्यादी गोष्टी करता येणार नाहीत हे स्विकारलं जात आहे. तिला सपोर्ट सिस्टीम सहज उपलब्ध होते. पण ग्रामीण शेतकरी, शेतमजूर, अल्पउत्पन्न गटातील महिलांना या गोष्टी चुकत नाहीत.

स्वप्नील
आपली आर्थिक परिस्थिती ,समाजातील स्थान,उत्पादांची साधने ,शत्रुत्व
ह्या सर्वाचा विचार करून संपूर्ण कुटुंबाचे विचार एकच असावे लागतात .
कुटुंब मध्ये स्त्री ,पुरुष,लहान मूल सर्व असतात .
शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबात प्रेम असते एकमेकांविषयी .
पुरुष ,स्त्री,मुल,हक्क ,अंन्याय ही भानगड नसते कुटुंब एकत्र प्रयत्न करत असते .
त्या आदर्श ,जमिनीवर असणाऱ्या लोकांची तुलना कुठे इथे करताय स्वार्थी लोकांशी

खरे बोलण्याचा
राग नसावा .
मत म्हणून लाईटली घेणे

शिक्षणाचा हक्क नाकारणे.
>>
भारतात मुलांचे आणि मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण जाणून घ्यायला हवे.
..

नोकरी किंवा व्यवसाय करण्यास प्रतिबंध करणे.
>>>>
किती बाप आपल्या मुलाला व्यवसायासाठी भांडवल देताना मुलगा मुलगी हा भेद करत नाही हे जाणून घेणेही रोचक असेल.
..

वर निवडायचा हक्क नाकारणे.
>>
मुलांच्या प्रेमविवाहाला मान्यता देताना किती लोकं मुलगा की मुलगी हा भेद नाही करत असे तुम्हाला वाटते?
मुलाची गर्लफ्रेंड असणे वा मुलीचा बॉयफ्रेंड असणे याकडे किती लोकं एकाच नजरेने बघत असावेत?
..

छंद बाळगायला विरोध करणे ( मग तो खेळाचा असेल ,डान्स चा असेल etc).
>>>
मुलींबाबत चित्रकलेचा छंद आणि नृत्याचा छंद हे सगळीकडे एकाच तराजूत तोलले जात नाहीत हा अनुभव चांगल्य चांगल्या घरात घेतलाय.
दिपिका पदुकोन जन्माला यावी. पण शेजारच्या घरात. असा विचार करणारा बहुसंख्य समाज आहे.
.

घरातील कामाचा वाटा तिच्या अंगावर टाकणे.
>>>
हे फार मजेशीर आहे. गाव असो वा शहर. मोलकरीण नसणारया घरात मुलांमध्ये घरकामाची अपेक्षा मुलींकडूनच जास्त केली जाते. बाकी मोलकरीण असणारया घरातही मोलकरीण बाईच असते.

असो तर .... आपण म्हटल्याप्रमाणे,
हे सर्व नाकारणे म्हणजे तिच्या वर अन्याय होतो आहे असं मी समजतो.

तर वरील सर्वच् बाबींना टिकमार्क होईल असे न्यायदान करणारी किती घरे असतील टक्केवारीत सांगायचे झाल्यास?

एकदम बरोबर लिहिले आहे ऋन्मेष तुम्ही. माझी बहीण थोडी मोठी झाल्यावर तिला संपूर्ण घरकाम, स्वयंपाक, कपडे धुणे भांडी घासणे इ कामं करणं आईनं भाग पाडलं केवळ मुलीची जात म्हणून. परिणामी दहावीत नापास झाली. मठ्ठपणाचा शिक्का बसला, लग्न सुध्दा शेती करणाऱ्या मुलाबरोबर लावून दिले. तिच्या कष्टांत अजून भर पडली. भेदभाव केला जातो हे खरं आहे.

> बाकी मोलकरीण असणारया घरातही मोलकरीण बाईच असते. > असुदेत की. अशिक्षीत, खेड्यातून शहरात आलेल्या, इतरकाही तंत्र अवगत नसलेल्या स्त्रीयांसाठी उत्पन्न मिळवण्याचा, बऱ्यापैकी सुरक्षित मार्ग आहे तो.

हक्क आणि अधिकार आले की जोडीनी जबाबदारी पण येते .
आणि जबाबदारी मुळे जी काम करावी लागतात त्याला आपण हक्क आणि अधिकारावर आक्रमण झाले असे समजतो .
आपल्या समजण्याची पद्धत चुकीची असते .
डिटेल उदाहरण ची गरज नसावी .
स्वतंत्र पाहिजे असेल तर नियमन सुद्धा जोडीनं येते .
नियमन नसेल तर स्वतंत्र उपभोगण्यासाठी आवश्यक असलेलं सामाजिक वातावरण तयार होणार नाही .
मला वाटतं इथे पण उदाहरण देण्याची गरज नाही .
आणि आपण नेमके नियमन लाच स्वतंत्र वर घाला समजतो .
इथे प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते
मर्यादा ओलांडली की संतुलन बिघडून सिस्टम निकामी होते

इतरकाही तंत्र अवगत नसलेल्या स्त्रीयांसाठी उत्पन्न मिळवण्याचा, बऱ्यापैकी सुरक्षित मार्ग आहे तो.
>>>>>

एक झॅक टली !!

ईतर काही तंत्र का अवगत नसते.... तर हा भेद त्यांच्या आईवडीलांनी केला असतो

आणि त्यांच्या शोषणाला कोणी वाचा फोडत नाही. उलट कामवाल्या बाया कशा डांबीस असतात याचे धागे काढले जातात नोकरदार भगिनींकडून.

मुलांचे मानस शास्त्र समजून घेवून त्यांच्या शी कसे वागावे म्हणजे ती आपल्या ऐकण्यात राहतील हे सुद्धा पालकांना शिकवावे लागते .
तसेच मोलकरीण ,ड्रायव्हर अशा आपल्या ला सेवा देणाऱ्या लोकांशी कस वागावे ह्याचे क्लास सुद्धा सुरू कोणीतरी केले पाहिजे .
नोकर आहे म्हणजे काही ही बोलून त्याचा अपमान कराल तर तो जशास तसेच वागेल .
पिठ्यान पिठ्या ज्यांच्या कडे नोकरचाकर आहेत ते व्यवस्थित manage करतात ..नुकतेच नोकर ठेवण्या स ज्यांनी survat केली आहे ते गोंधळून जातात आणि आपण पैसे देतो म्हणून ते आपले गुलाम आहेत असं समजण्याचा मूर्ख पना करतात

रात्री अपरात्री बाहेर जाण्यास मज्जाव करणे .
दारू ,सिगारेट सारख्या व्यसन पासून रोखणे.
बाहेर कुठे जायचे असेल तर परवानगी घेवून च जा असे सांगणे .
>> हे नियम मलाही अन्यायकारक वाटत नाहीत. फक्त हेच सर्व नियम किंवा बंधने घरातील मुलग्यांना किंवा पुरूषांनाही लागू होतात का नाही हे तपासून पहायला हवे.

If you can't negotiate contraception in your marriage, do you really think you're going to [negotiate] that high-powered job?

https://www.cnn.com/2021/09/03/africa/women-sexual-pleasure-gender-equal...
------------------

"Pleasure is threatening," he says. "It challenges those who are in power. As long as the society keeps women as second-class citizens, then men are in control. So denying [women] reproductive health, contraception, safe abortions, and certainly altering their body -- taking away the sexual pleasure aspects of one's anatomy -- keeps them suppressed and patriarchy in power."

आज मैत्रीणीबरोबर न्यु यॉर्क ग्रंथालयात जाउन, खालील पुस्तक आणले. बेसिकली स्त्रीमुक्तीवादाचा अनेकविध कोनांमधुन , विविध निबंधांमधुन परामर्ष घेतलेला आहे. थोडे निबंध समजतायत बरेचसे डोक्यावरुन जातायत परंतु एक नक्की आहे एक वेगळा दृष्टीकोन, वेगळा विचार, नवीन परस्पेक्टिव्ह मिळतो आहे. जे काही समजणार आहे ते या धाग्यावरती कमेंटसमधुन संकलित करण्याचा मानस आहे.
.
https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/51KmMBwKMRL._SY291_BO1,204,203,200_QL40_FMwebp_.jpg
________________________________________
शारलॉट बंच (Charlotte Bunch) यांचा एक निबंध आहे - Lesbian in Revolt तो https://www.feminist-reprise.org/docs/lwmbunch.htm येथे वाचता येइल. पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये 'लेस्बिअ‍ॅनिझम अर्थात स्त्रीयांची समलैंगिकतेतेची व्याप्ती अथवा व्याख्या ही फक्त दोन स्त्रियांमधील संभोग एवढीच मर्यादित केली जाते. यामुळे एकच होते ते म्हणजे पुरुषांचा स्त्रीकडे फक्त एक भोगवस्तु म्हणुन पहाण्याचा दृष्टिकोन अधोरेखित होतो. बरेचदा पुरुषांचा हा समज असतो की समलैंगिक स्त्री ही अस्सल स्त्री नव्हेच. अस्सल स्त्री तिच जी पुरुषाकडुन भोगली जाते. पण ते निखालस चूकीचे आहे. स्त्री जेव्हा समलैंगिकता हा पर्याय निवडते तेव्हा ती तिचे 'स्व' आणि उर्जा ज्यामध्ये लैंगिक उर्जाही येते, ती अन्य स्त्रीकडे वळवते. समलैंगिक स्त्री ही स्वतःच्या राजकारण, भावनिक, आर्थिक, शारीरीक भूकेकरता, आधाराकरता अन्य स्त्रीची निवड करते - अशी विस्तृत व्याख्या करता येइल. तिच्याकरता किंवा तिच्या आयुष्यात पुरुषाहूनही एका 'स्त्री' ला जास्त महत्वाचे स्थान असते. याउलट समाजाची जी मागणी असते की आपल्या आयुष्यात बाईने पुरुषाला मुख्य स्थान द्यावे, ती मागणी समलैंगिक स्त्री धुडकावुन लावते.
relationships between men and women are essentially political, they involve power and dominance.

अर्थात स्त्री-पुरुष यांच्यामधील संबंध हे प्रा मुख्याने, सत्ता आणि वर्चस्व या २ खांबांवरती आधारीत असतात,
.
स्त्री-समलैंगिकता, पुरुषी वर्चस्ववादास आव्हान देते कारण 'स्त्रिया या दुबळ्या, कमअस्सल, कमजोर आणि निष्क्रिय असतात आणि त्यांना पदोपदी पुरुषाची गरज असते' या समजूतीलाच ती सुरुंग लावते. खरं तर क्लोनिंग प्रत्यक्षात आल्यानंतर स्त्रियांना , पुरुषांची गरजच पडणार नाही. अगदी पुनरुत्पादनाकरता सुद्धा नाही.
याउलट भिन्नलैंगिकता स्त्रियांमध्ये दुफळी माजवते. भिन्नलैंगिकत्व हे पुरुषी वर्चस्ववादास खतपाणी घालते. भिन्नलैंगिकत्व हे स्त्रीस स्वतःच्या अस्तित्वाकरता पुरुषाची आवश्यकता भासवुन, अन्य स्त्रियांबरोबर स्पर्धात्मक वृत्ती जोपासण्यास भाग पाडाते. समाजातील स्थान ,सामाजिक फायदे आदिंकरता स्त्रीला दुसर्‍या स्त्रीचीच शत्रू बनविते.
जेव्हा एखादी स्त्री समलैंगिक असते तेव्हा ती आर्थिकदृष्ट्या स्वतःला स्वावलंबी बनवते. ती जास्त वेतन, उच्च पद याकरता टक्कर देते. कोणावरही अवलंबून रहात नाही. पारंपारीक समजूतींना, पारंपारीक निष्क्रियवादाला , अन्य जोडीदारावरती अवलंबून असण्याच्या गरजेला ती छेद देते. आणि स्वतःच्या आयुष्याचे सुकाणु स्वतःच्या हाती घेते. यामधुन कॅपिटॅलिझमवरती भार येउ शकतो. जर सर्वच स्त्रिया स्वावलंबी, पूर्णवेळ वेतन असणार्‍या, स्पर्धा करणार्‍या बनल्या तर कॅपिटॅलिझम तो भार सहन करु शकणार नाही.
.
.
.
अशा काहीशा मुद्द्यांचा या लेखात उहापोह केलेला आहे. माझ्याकरता relationships between men and women are essentially political, they involve power and dominance. ही संकल्पना अशी शब्दात मांडली जाणे हे नाविन्यपूर्ण आहे. हा नवीन मुद्दा आहे. अन्य मुद्देही खूप नवीन आहेत.

पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये 'लेस्बिअ‍ॅनिझम अर्थात स्त्रीयांची समलैंगिकतेतेची व्याप्ती अथवा व्याख्या ही फक्त दोन स्त्रियांमधील संभोग एवढीच मर्यादित केली जाते. >>> पुरुषांच्या समलैंगिकतेची व्याप्ती व व्याख्याही अशीच केली असते ना?

बरेचदा पुरुषांचा हा समज असतो की समलैंगिक स्त्री ही अस्सल स्त्री नव्हेच. अस्सल स्त्री तिच जी पुरुषाकडुन भोगली जाते. >> समलींगी पुरुषा बद्दलही असाच समज असतो ना?

स्त्री जेव्हा समलैंगिकता हा पर्याय निवडते >> इथे पूर्ण कन्फ्युज्ड समलैंगिकता ही पर्यायाने निवडली जाते का? की जन्मत: असते? पर्यायाने जिथे विरुद्ध लिंगी जोडीदार मिळत नाही तिथे (जसे की तुरुंगात) निवडत असतील, पण एकंदरीत पर्यायाने निवडलेली असते का?

स्त्री समलैंगिकता पुरुषसत्ताक पध्द्ती झुगारण्यासाठी निवडलेला पर्याय आहे का? की आढळणारी समलैंगिकता फारशी पर्यायाने नाहीय आणि लेखकाने ती पर्यायानेच स्वीकारली असते असा अर्थ काढला आहे? असे प्रश्न उभे राहिले.

की काही स्त्रियांनी असे ठरवून निवडली आहे आणि त्याबद्दल आहे हे?

मानव अतिशय योग्य प्रश्न आणि हेच प्रश्न मलाही पडलेले होते, मला या विषयावरती वाचायचे आहे. समजून घ्यायचे आहे. पण स्पुन फीडिंगकरता, मी माझ्या एका स्त्रीमुक्तीवादी आणि बुद्धीमान मैत्रीणीला हाच वरचा उतारा पाठवला की तिला अधिक कळेल. त्यावर तिने दिलेले हे उत्तर -

दुसऱ्या लाटेतल्या स्त्रीवादी म्हणायच्या की पुरुष आपल्यावर सत्ता गाजवतात, तर आपण त्यांच्याबरोबर का झोपायचं. काही स्त्रीवादी आणखी पुढे जाऊन म्हणायच्या की ज्या पुरुषांबरोबर झोपतात त्या खऱ्या स्त्रीवादी नाहीच.

आता प्रश्न असा येतो, आता म्हणजे २०२१ सालात म्हण, की मी मुळात हेटरोसेक्शुअल आहे. मला बायकांत असा रस नाहीच. मग स्त्रीवाद सांभाळण्यासाठी मी माझी मूळ रचना डावलून बायकांबरोबर झोपायचं का शरीरसुखाचा आनंद मिळवायचाच नाही? दुसऱ्या पिढीतल्या स्त्रीवादापासून आपण आता बरेच पुढे आलो आहोत, आता कुणी तसं म्हणत नाही, अपेक्षाही धरत नाहीत. हल्लीच न्यू यॉर्करमध्ये यासंदर्भात लेख वाचला होता. हौस असेल तर तोही वाच. - Who Lost the Sex Wars?
---------------------------------------
मी अस्ध्या बॅड फेमिनिस्ट हे पुस्तकही वाचते आहे. त्यात लेखिका म्हणते - स्त्रीमुक्तीवादात तृटी आहेत कारण ती चळवळ लोकांनी केलेली आहे. आणि लोकांमध्ये तृटि या असणारच. How do we reconcile the imperfections of feminism with all the good it can do? In truth, feminism is flawed because it is a movement powered by people and people are inherently flawed.

आता ही दुसरी लाट , पहीली लाट हे सर्व वाचण्याची खूप इच्छा आहे. पण हे कसं पटकन होणारं नाही. आयुष्यभर ध्यास घेतला, आवडीने वाचन केले तरच हे नुआन्सेस कळतील.
मी समजत होते आणि आहेच की ' समलैंगिकता/ भिन्न लैंगिकता' हे पर्याय नसून ती जडणघडण असते. ती प्रकृती असते पण वरील निबंधाने त्या विचारास वेगळिच कलाटणी दिली.
म्हणुनच म्हटले की थोडेच कळते आहे. हे पुस्तक अवघड अ‍ॅव्हेन्युज ओपन अप करते आहे.

आधी मला फेमिनिस्टची निट व्याख्या आणि व्याप्ती समजून घ्यावी लागेल. मग पुढिल प्रश्न/कॉमेंट.

मानव सेम हियर. मी कन्फ्युझड तर आहेच पण अज्ञानीही. फक्त इथे मी वाचुन समजलेले शाब्दिक भाषान्तर टाकणार आहे/होते.
————
On a second thought how will that be beneficial? ही अर्धवट वाचुन केलेली पोपटपंची अधिक गोंधळात टाकणारी व कमअस्सल होइल. तेव्हा उगाच टाकत ना ही. उदाहरणार्थ या पुस्तकात बरेच कालावधी दिलेले आहेत पैकी वरील लेख १९७२ चा आहे. , ही कालावधीची म्हणजे हा विचार आऊटडेटेड असण्याची माहीती मी दिलेलीच नाहीये. ही अशी अर्धवट माहीती काय कामाची? I will refrain from compiling the information. I would rather do so on my private blog. असो. Happy

ज्या गोष्टीला फक्त स्त्री जबाबदार नसते पण होणाऱ्या परिणामाची शिक्षा एकटीने भोगणे हा न्याय नक्कीच नाही .
गर्भ पात मध्ये हा असा एकतर्भी न्याय केला जातो.+१००

स्त्री च्या शरीरावर फक्त तिचाच हक्क आहे.

छान लेख.

फेमिनिझमची थोडक्यात व्याख्या आणि इतिहास
यात आता चौथ्या लाटेत ट्रान्स महिलांना स्थान मिळतंय, आधी नव्हतं असं लिहिलंय. पण समलैंगिकतेचा पर्याय निवडण्या बद्दल काही उल्लेख नाही.
ती या मुख्य फेमिनिझम पासून वेगळी चळवळ असावी.

मानव नक्की वाचेन ती लिंक. मैत्रिणीने विचारलेले होते - तू political lesbianismबद्दल वाचलं आहेस का?
मग मी तो शब्द गुगल केला.

Political lesbianism is a phenomenon within feminism, primarily second-wave feminism and radical feminism; it includes, but is not limited to, lesbian separatism. Political lesbianism asserts that sexual orientation is a political and feminist choice, and advocates lesbianism as a positive alternative to heterosexuality for women[1] as part of the struggle against sexism.[2]
-----------------------------------

खूप काही वाचून समजून घेण्यासारखं आहे. माझ्या, स्वतःच्या जीवनशैलीतही बदल घडवता येण्यासारखे आहे. मानव तुम्ही या विषयात रस घेताय हेच इतकं सकारात्मक आहे. की ही चळवळ फक्त स्त्रियांनी पुढे न्यायची नाही आणि यात सजग पुरुषांचाहि सहभाग असेल हे मला महत्वाचे वाटते. खूप खूप आभार.

पण मला समलैंगिकता मुद्दाम निवडणे ही टोकाची भूमिका - रोगापेक्षा इलाज भयंकर असे वाटते आहे. तर स्त्रीवाद मुख्य पासून धारेपासून अशी टोकाची भूमिका घेण्याचे कारण काय याबद्दल कुतुहल आहे एवढेच.
Gender equality पाठिंबा आहे.

Pages