पर्यायस्वातंत्र्य

Submitted by सामो on 23 September, 2019 - 11:49

द सब्बाथ ऑफ म्युचुअल रिस्पेक्ट - https://idealisticrebel.com/2014/12/04/the-sabbath-of-mutual-respect/

अमेरीकन समाज कितीही प्रगत वाटत असला, तरीही काही लोकांचे विचार हे प्रतिगामी आहेत हे देखील सत्य आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. विशेषतः विस्कॉन्सिन मध्ये 'रस्ट बेल्ट' भागातील एका खेड्यात रहाताना हे प्रतिगामी विचार अधिकच ठळकपणे लक्षात येत असत. उदा - गर्भपात करण्यास प्रतिबंध' असावा अशी एक विचारधारा मुख्यत्वे मला आढळली ती याच भागात. बसने जाता येता पोस्टर्स दिसत ज्याव अतिशय गोंडस , हसरं मूल/ कॅलेंडर बेबी चे चित्र असे व खाली लिहीलेले असे " तुम्हाला माहीत आहे काय माझ्या हृदयाचे ठोके कन्सेप्शनपासून, ३ र्‍या आठवड्या पासून चालू झाले." किंवा असेच अर्भकाचे गोड चित्र व खाली शीर्षक - " माझ्या कन्सेप्शनपासून, ५ व्या आठवड्यात मला स्मित करता येऊ लागले" - या आहेत अँटायअ‍ॅबॉर्शन संदेश देणार्‍या जाहीराती. एकदा बसमध्ये ४-५ टिनेजर मुलींचा एका मध्यमवयीन अगदी अशक्त स्त्रीशी मोठमोठ्याने वाद चाललेला ऐकला. इतक्या आवेशात त्या मुली तो वाद घालत होत्या की माझे लक्ष वेधल्याविना राहीले नाही. मुलींचा मुद्दा होता - 'गर्भपात हा समर्थनिय नाही. ते पाप आहे. एका लहान अर्भकाचा खून आहे.' ती स्त्री परोपरीने त्यांना सांगत होती की 'काही परिस्थितींत गर्भपात करणे टाळता येत नाही." शेवटी शेवटी तर त्या स्त्रीवर इतका शाब्दिक हल्ला होउ लागला - "मग तू केला आहेस का गर्भपात?" वगैरे. ती स्त्री उतरल्यावरती तो वाद थांबला. अमेरीकेत क्वचित प्रसंगी कुमारी मातादेखील पाहीलेल्या आहेत. ती आई स्वतःच एक लहान मुलगी असते आणि तिच्या कडेवर तिचे टॉडलर मूल दिसते असे दॄष्य पाहीलेले आहे.
.
खरे पहाता, स्त्रीला तिच्या शरीरावरती हक्क असलाच पाहीजे. 'मूल ठेवायचे की नाही' हा आयुष्यातील एक सर्वात मोठा निर्णय तिचा तिला घेता आलाच पाहीजे. सुदैवाने असे पुरोगामी किंवा समजूतदार विचार करणारेही लोक आहेत. या लोकांची विचारधारा ही 'प्रो चॉइस' म्हणजे 'पर्याय स्वातंत्र्य' म्हणुन ओळखली जाते. तर "पर्याय स्वातंत्र्य" या विषयावर वाचलेली माझी ही पहीली कविता जिच्याबद्दल मी काही मांडत आहे. इतक्या गंभीर विषयावर काव्यात्म टिप्पणी करणारी "द सब्बाथ ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट" ही मार्ज पियर्सी या कवयित्रीची कविता. "द मून इज ऑलवेज फिमेल" या पुस्तकातील बर्‍याच कविता आवडल्या. गर्भपाताचे समर्थन करणारी ही जास्त रोखठोक असल्याने समजली. मार्ज पियर्सी यांचे विचार स्त्रीमुक्तीवादी आहेत असे त्यांच्या बर्‍याच कवितांतून जाणवले. प्रसिद्ध कविंच्या , लेखकांच्या मतांनी, शब्दांनी समाज घडू शकतो. लोक त्यांचे साहीत्य वाचून विचार करतात. प्रसिद्धी हे समाजसेवेकरता उत्तम माध्यम बनू शकते.
.
"द सब्बाथ ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट" या कवितेची सुरुवातच पूर्वजांच्या पुण्यस्मरणाने होते.
In the natural year come two thanksgivings,
the harvest of summer and the harvest of fall,
two times when we eat and drink and remember our dead
under the golden basin of the moon of plenty.
थँक्स्-गिव्हींग हा सण सुगीच्या दिवसांत येतो. जेव्हा कणसे कापणीला आलेली असतात. दुकाना दुकानांमधून, कणसांचे घड विकायला येतात. बुजगावणी , तांबडे भोपळे यांची रेलचेल दिसून येते. काहीकाही धान्यांच्या ओंब्या टांगलेल्या व विकायला ठेवलेल्या असतात. तर हेमंतात दिसून येणार्‍या या सुगीच्या विपुलतेचे चित्रण पहील्या काही कडव्यात आढळते. कवयित्री पर्याय निवडीचे स्वातंत्र्य अगदी साध्या प्रसंगातून दाखविते. खाद्यपदार्थांची रेलचेल आहे व अनेक पौष्टिक पदार्थांतून आपण स्वतःला रुचणारे पदार्थ निवडतो. म्हणजे आपल्या शरीराला काय पौष्टिक असते ते आपण ठरवतो. हक्काने ठरवतो.
The blowing grasses nourish us, wheat
and corn and rye, millet and rice, oat
and barley and buckwheat, all the servicable
grasses of the pasture that the cow grazes,
the lamb, the horse, the goat; the grasses
that quicken into meat and cheese and milk,
the humble necessary mute vegetable bees,
the armies of the grasses waving their
golden banners of ripe seed.
विपुलताच आपल्याला निवडीचे पर्याय देते व आपण किती सहजतेने ते निवडतो. कवयित्री म्हणते, हॅबॉन्डिया ही समृद्धीची देवता. तिच्या कारकत्वाखाली जशी समृद्धी येते तसेच पर्यायनिवडीचे स्वातंत्र्यदेखील येते. पुढे कवयित्री हेच लहानसे स्वातंत्र्य विस्तारुन आयुष्यातील अतिमहत्त्वाचे व आयुष्याला कलाटणी देणारे निर्णय यांची तुलना करते, ते निर्णय सहजतेने घेण्याचे स्वातंत्र्य यावर टिप्पणी करते. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला विवाहामधून मूल जन्माला घालावेसे वाटेल तर कोणा स्त्रीला तिच्या "लेस्बियन" जोडीदाराबरोबर, मूल दत्तक घ्यायला आवडेल, तर अन्य कोणा स्त्रीला एकटेपण आवडेल. आपण निवडलेल्या पर्यायाहून अन्य कोणी दुसरा पर्याय निवडला तर त्याचा मान राखण्याचे भान ही कविता देते, तसा मान राखावा असे आवाहन करते.
In another
life, dear sister, I too would bear six fat
children. In another life, my sister, I too
would love another woman and raise one child
together as if that pushed from both our wombs.
In another life, sister, I too would dwell
solitary and splendid as a lighthouse on the rocks
or be born to mate for life like the faithful goose.
Praise all our choices. Praise any woman
who chooses, and make safe her choice.
मूल हवे असताना होऊ न देणे जितके यातनामय आहे तितकेच नको असलेले मूल प्रसविणे व वाढविणे त्रासदायक आहे ही जाणीव कवितेत बोलून दाखविलेली आहे.
To bear children unwanted
is to be used like a public sewer.
To be sterilized unchosen is to have
your heart cut out.
अनेक देवता - हॅबॉन्डिया, आर्टेमिस, दिती, इनाना, शिन मू इतकेच काय आपल्या पणजा, खापरपणजा यांनी त्यांचे जीवन, आराम सर्व त्यागून नवीन वाटा चोखाळल्या, आपल्याकरता नवीन वाटा बनविल्या. त्यांनी खंबीरपणे आपल्याला सोपविलेला इतिहास, वारसहक्क, जाणीवा, नवे हक्क व कर्तव्ये यांचा परीपाक म्हणजे आयुष्यविषयक निर्णय सहजतेने घेता येणे. आणि ते स्वातंत्र्य ही आपण स्त्रियांची खरी समृद्धी अशा आशयाची ही कविता आहे.
Praise our choices, sisters, for each doorway
open to us was taken by squads of fighting
women who paid years of trouble and struggle,
who paid their wombs, their sleep, their lives
that we might walk through these gates upright.
Doorways are sacred to women for we
are the doorways of life and we must choose
what comes in and what goes out. Freedom
is our real abundance.
मला या कवितेत काय आवडले तर - स्त्रीस्वातंत्र्याबद्दलचे मार्जचे विचार, गर्भपाताबद्दलचा तिने घेतलेली भूमिका व आवाहन याची काव्यमय अभिव्यक्ती आवडली. या विषयावर कळलेली ही पहीलीच कविता.

Group content visibility: 
Use group defaults

'अ‍ॅबॉर्शन रीपील लॉ' बद्दल एक निबंध वाचला. हा १९७०-१९७९ कालखंडातील लेख आहे. लेखिका - Lucinda Cisler
त्यात लेखिका म्हणते की आत्ताचा जो कायदा आहे त्यामध्ये पुढील ३ कारणांकरता गर्भपात समर्थनिय ठरतो-
(१) बलात्कारामधुन गर्भ राहीला (२) स्त्री वेडी असेल तर (३) बाळ सदोष वाढीचे असल्यास
-----------
या लेखात ४ मुद्द्यांवरती आक्षेप घेतलेला आहे.

(१) गर्भपात हा फक्त परवानाधारक दवा खान्यातच होउ शकतो - या आक्षेपामध्ये स्त्रीमुक्तीवाद्यांचे असे म्हणणे आहे की - गर्भपात ही फरशी क्लिष्ट नसलेली प्रोसिजर आहे ज्यात स्त्रीस झोपण्या एवढी जागा लागते व नंतर थोडी विश्रांतीची आवश्यकता असते. या २ बाबींकरता ना फारशी स्थावरजंगम फारशी जागा आवश्यक आहे ना कुशल स्टाफची गरज आहे कारण त्या दोन्ही गोष्टी महाग आहेत व गरीब स्त्रियांना परवडु शकणार नाहीत. 'परवान्याची' अट घालून विनाकारण हॉस्पिटल्सना मनमानी आणि मोनोपॉली करण्याची मुभा दिली जाइल. कारण काहीच नाही जी प्रोसिजर क्लिष्ट नाही तिचे उगाच अवडंबर माजवले जाइल आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर महीलांना तोटा होइल .

(२) गर्भपात हा फक्त परवानाधारक डॉक्टर्सच करु शकतात. - यावर स्त्रीमुक्तीवाद्यांचे म्हणणे हे पडते की - हा मुद्दा तार्किक वाटत असला तरी तो बाष्कळ आहे कसा तर - गर्भपात ही क्लिष्ट आणि धोकादायक प्रोसिजर आहे हेच गृ हीतक मूळात चूकीचे आहे. गर्भापातापेक्षा, प्रसूती अधिक किचकट असुनही तुम्ही मिडवाईव्हज ना परवानगी देता. पण गर्भपात म्हटलं की मात्र परवानाच हवा असा लाल फीतीचा बाऊ घालता हे बरोबर नाही. बहुसंख्य डॉ क्टरांचा अ‍ॅबॉर शन करण्यास विरोध असतो. जरी त्यांचा गर्भपातास रुकार असला तरी ती प्रोसिजरच इतकी कंटाळवाणी आहे की सहसा डॉक्टरांना ती करायची नसते. मग हा अडथळाच ठरतो. उद्या जर 'सेल्फ-अ‍ॅबॉर्सिअन्टस' चा शोध लागला व स्त्री स्वतःची स्वतः गर्भपात करुन घेउ शकली तरी परवान्याच्या अटीमुळे तिला ते करता येणार नाही.
(३) एका ठराविक मुदतीनंतर स्त्रीला गर्भपात करुन घेता येणार नाही. जर तिला स्वतःला धोका असेल तर मात्र परवानगी असेल. - या मुद्द्याचे खंडन करताना स्त्रीमुक्तीवादी म्हणातात - ही मॅजिक टाइम लिमिट कोण ठर व णार आणि समज अठरवली देखील तरी त्या मुदतीनंतर स्त्रीचा स्वतः च्या शरीरावरचा हक्क नाहीसा होउन तो हक्क सरकारकडे जातो हे कितपत ब रोबर आहे? एका ठराविक मुदतीनंतर असे समजून चाला की गर्भवती स्त्रीच्या जीवास समजा धोका आहे पण जर ती स्वतः हा धोका पत्करत असेल तर तिला 'वाचवणारे ' असे सरकार कोण टिक्कोजीराव लागून गेलेत? तसेच कन्सेप्शन केव्हा झाले हे ठामपणे कळत नसल्याने अशी मुदत ठरविणेच मूळात शक्य नाही.
(४) जर विवाहीत स्त्रीच्या नवर्‍याने परवानगी दिली किंवा एकट्या स्त्रीच्या पालकांनी परवानगी दिली तरच गर्भपात होउ शकतो - हा मुद्दा तर हास्यास्पदच आहे, याबद्दल फार बोलायलाच नको.
-----------------------------------------------
आत्ता अ‍ॅबॉर्शन रीपील / प्रो चॉइस चळवळ कोणत्या राज्यात अजुनही चालू आहे, कोणत्या राज्यांनी 'प्रो-चॉइअस हक्कांना' मान्यता दिलेली आहे ते मी फॉलो करत नाही. Sad पण इथे हे पूर्वीचे विचार व चळवळ कशी फॉर्म होत गेली ते डॉक्युमेन्ट करुन ठेवते आहे.

>>>>>>>पण मला समलैंगिकता मुद्दाम निवडणे ही टोकाची भूमिका - रोगापेक्षा इलाज भयंकर असे वाटते आहे.

होय रॅडिकल अ‍ॅप्रोच आहे. Radical feminism wanted to reshape society entirely, saying that the system was inherently patriarchal and only an overhaul would bring liberation.

मला आतापर्यंत वाचलेल्या निबंधांतून सर्वात जास्त कळलेला व मला सोपा वाटलेला एक निबंध - १९७० चा -मला बायको का हवी? - judy syfers

या निबंधात ज्युडी म्हणातात मला बायको हवीये एक बा यको कारण -
- मला परत एकदा शिक्षण सुरुकरायचे आहे व अधिक कमावण्याची संधी हवी आहे स्वतःकरता तसेच माझ्यावर अवलंबुन असणार्‍या लोकांकरता मला अधिक कमवायचे आहे.
-मी जर परत शिक्षण सुरु केले तर मग माझ्या मुलांच्या डॉक्टरांच्या , दंतवैद्यांच्या वेळा, कोण सांभाळणार, मुलांची व माझी काळजी कोण घेणार.
माझ्या मुलांच्या खाण्यापीण्याच्या वेळा त्यांची स्वच्छता वगैरे सांभाळायला म्हणुन मला बायको हवी आहे.
- मुलांच्या पोषणाची ज बाबदारी घेणारी, त्यांच्याकडुन अभ्यास करवुन घेणारी, त्यां च्या मनोरंजनाकरता त्यांना बागेत, प्राणिसंग्रहालयात घेउन जाण्याकरता, त्यांना मित्र मैत्रीणी मिळावे म्हणुन इ क डेतिकडे त्यांना घेउन जाणारी मला बायको हवी आहे.
-मुलं आजारी पडली, दुखणीखुपणि निघाली तर ती कोण सांभाळणार कारण मी तर अभ्यास करणार म्हणुन मला बायको हवी आहे.
-तिने नोकरी केली पाहीजे पण घ र सांभाळुन हं. तिने तारेवरची कसरत केली पाहिजे. त्या बदल्यात मी तिला पोसेन. तिने तिखट मीठापुरता पैसे आणले तरी चालवुन घेइन.
-माझ्या लैंगिक गरजा पुरवण्याकरता मला बायको हवी आहे.
- माझी , माझ्या मुलांची खरकटी उष्टी काढण्याकरता मला बायको हवी आहे.
- माझ्या कपड्यांना इस्त्री करणारी, बटणं काजी करणारी, कपडे धुवुन घड्या घालणारी, माझ्या वैयक्तिक वस्तू जागेवर ठेउन मला हव्या तेवह आणून देण्याकरता म्हणुन मला बायको हवी आहे.
- मी अभ्यास करतेवेळि कोणीतरी स्वयंपाक करायला, खाण्यापिण्याचे प्लॅनिंग करायला, माझ्या वेळा सांभाळायला, माझ्या खाण्यानंतर भांडी आवरायला म्हणुन मला बायको हवी आहे.
- मी आजारी प डलो तर मा झे कॉलेज बुडेल मग माझी काळजी घ्यायला, मला सहानुभूती दाखवायला, माझी काळजी घ्यायला मला बायको हवी आहे.
- मला कधी हवापालटाकर ता बाहेर जाअयची हुक्की आली तर मग माझ्या तैनातीला म्हणुन मला बायको हवी आहे.
- कधीही स्वतः तक्रार करु नये पण मला जर काही समस्या आली तर माझ्या तक्रारी तिने ऐकाव्या. या आणि अशा अपेक्षा पूर्ण करणारी अशी मला बायको हवी आहे.
- मला काही लेखन करावे लागले तर माझे काम टाइप करुन देणारी मला बायको हवी आहे
- माझ्या व माझ्या माझ्या मित्रांना खाणेपीणे रांधुन माझे सोशल लाईफ सांभाळणारी बायको मला हवी आ हे.
- कामसुखात उत्कट साथ देणारी पण स्वतःच्या अपेक्ष अशून्य ठेवणारी अशी बायको मला हवी आहे.
- बरं मला मूल नको म्हणुन स्वतः संताननिरोधक साधने वापरणारी अशी मला बायको हवी आहे.
.
.
.
अशी खूप मोठी ' बायको का हवी' जंत्री देउन ज्युडी उपरोधाने विचारते - My God! who wouldn't want a wife

या निबंधा संबंधात एक लेख वाचनात आला.- https://www.washingtonpost.com/history/2020/09/05/judy-brady-syfer-wife-...
-------------------------------------------
जरुरत है जरुरत है जरुरत है
एक श्रीमती की , कलावति की, सेवा करे जो पती की

गाणे आठवले.

the moon is always female- Marge Piercy या कवितेच्या पुस्तकाचे पारायण करते आहे. एखाद्या कवितेबद्दल माझ्या मनात आलेले विचार
___
Cutting the grapes free poem ही कविता आज पारायण करताना अधिकच आवडली. या कवितेमध्ये द्राक्षाची दिवसगणिक मादक होत जाणारी वारुणी आणि प्रगल्भ होत जाणारी स्त्री असे रुपक आहे.
.
वसंतआगमनाच्या अगदी प्रारंभी एखाद्या क्रुसिफाय केलेल्या चेटकिणीच्या हडहडलेल्या हातापयांप्रमाणे दिसणार्‍या द्राक्षवेलीच्या काटकुळ्या शाखा, वसंतागमनानंतर हिरव्याजर्द सर्पिल दिसू लागतात आणि त्यांच्यातून कलिका फुटु लागतात. हळूहळू याच कळ्यांच्या जागी जांभळी, काळी , पिवळी बाळद्राक्षे जोम धरु लागतात. एखाद्या प्रियकराच्या ऊष्ण बोटांच्या स्पर्शने टरारुन आलेल्या स्तनाग्रांसम बाळद्राक्षे, पुरुषाच्या वृषणासम जांभळी, काळी टप्पोरी द्राक्षे. या द्राक्षांवरती दंश करुन, चावे घेऊन, कीडे, सुरवंट, फुलपाखरे त्यातील रस प्राशन करतात, जीभा लाललाल, जांभळ्या करुन घेत.
.

Now the grapes swell in the sun yellow
and black and ruby mounds of breast
and testicle, the image of ripe flesh
rounding warm to the fingers. The wasps
and bees drone drunken, our lips, our
tongues stained purple with juice and sweet

.
स्त्री ही तशीच वयात येताना रक्त सांडते, पहीला पुरुष चाखताना रक्ताळते, अपत्यास जन्म देताना एवढेच नाही तर जन्म दिला नाही तरी रक्त सांडते. हे जे तिचे प्रगल्भ होत जाणे आहे हेच मूर्तिमंत काव्य. हीच द्राक्षातील वारुणी. काल परवा तारुण्यात झिंग असणारी पण त्याहुनही कितीतरी अधिक पटींनी प्रगल्भ वयात नशा देणारी.
.

We bleed when we blossom from the straight
grainy pine of girlhood. We bleed when we taste
first of men. We bleed when we bear and when
we don't. Vine from my blood is fermented
poetry and from yours wine that tunes my sinews
and nerves till they sing instead of screeching

.
द्राक्षाची वेल- जसा मुसळधार पावसाचा मारा, गारपीटीचा तडाखा, दुष्काळाची झळ आणि गारठून टाकणारा हिमप्रपात सहन करुनही, योग्य वेळी प्रगल्भ झाल्यावर द्राक्षा-द्राक्षात रस टच्चून भरला जातो,तसेच स्त्रीचे फक्त वय वाढत नसून, पुस्तकी किंवा अनुभवगम्य ज्ञानाने ती परिपूर्ण होत जाते.
असे असतान, अमरत्वाची अभिलाषा कोण धरेल बरं? अमर तर दगडगोटे असतात. सृष्टी चक्राच्या तलावरती नाचत नाचत जी मादक वारुणी द्राक्षे धारण करतात, जी लोभस प्रगल्भता स्त्रीमध्ये येते ती अमर दगडगोट्यांच्या नशीबी कोठून! आणि म्हणूनच काळाच्या जुलमी रेट्याखाली माझ्या रंध्रारंध्रातून प्रवाहीत होत जाणारी रक्तवारुणी कोणीही चाखली नाही, तिचा आस्वाद घेतला नाही तर तिच्य नशीबी फक्त आंबट्ट व्हिनेगर होणे असते.
मला अमरत्व नको, मला चिरतारुण्य नको तर कालप्रवाहात वहात जात वारुणी होणं मला आवडेल.

The press of the years bear down
on us till we bleed from every pore
yet in our cells sun is stored in honey
ready to be spilled or to nurture.
Like wine I must finally trust myself
to other tongues or turn to vinegar.

'बिना आगरवाल' यांची 'सीता स्पीक' ही कविता आज वाचनात आली - https://ravana.wordpress.com/2008/05/05/sita-speak/
Sita, speak your side of the story,
We know the other too well.

क्या बात है!! विद्रोही आणि सच्ची कविता आहे.
The poets who wrote your story
Said: a woman is not worthy of hearing the Ramayana; like a beast she is fit only For being beaten Could such poetry ever bring you glory?
Yet, they spoke their verses without challenge and With such falsehoods got away.

-------------------------------------
मार्ज पियर्सी यांची ' A Work of Artifice' ही कविताही तशीच. बॉन्सायचे वर्णन करता करता स्त्रीला जखडणार्‍या परंपरा दाखविणार्‍या मग ते 'पाय बांधून' तिला खुजे करुन टाकणे असो वा मेंदूची वाढ खुंटुन टाकणे असो.
https://kristentwardowski.wordpress.com/2017/04/02/poetry-sunday-marge-p....
-----------------------------------------
निकी जिओवानी यांची 'वुमन' नावाची कविता - https://hellopoetry.com/poem/544494/w-o-m-a-n-nikki-giovanni/

https://www.cnn.com/2022/04/05/politics/oklahoma-abortion-ban-bill/index...
ओक्लाहोमामध्ये गर्भपात बंदी ची बातमी.

The Oklahoma legislature on Tuesday gave final approval to a bill that would make performing an abortion illegal in the state, making exceptions only in the case of medical emergencies. The bill, Senate Bill 612, would make performing an abortion or attempting to perform the procedure a felony punishable by a maximum fine of $100,000 or maximum 10 years in state prison, or both.

आणि हा म्हणे पुढारलेला देश!!!

Pages