पर्यायस्वातंत्र्य

Submitted by सामो on 23 September, 2019 - 11:49

द सब्बाथ ऑफ म्युचुअल रिस्पेक्ट - https://idealisticrebel.com/2014/12/04/the-sabbath-of-mutual-respect/

अमेरीकन समाज कितीही प्रगत वाटत असला, तरीही काही लोकांचे विचार हे प्रतिगामी आहेत हे देखील सत्य आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. विशेषतः विस्कॉन्सिन मध्ये 'रस्ट बेल्ट' भागातील एका खेड्यात रहाताना हे प्रतिगामी विचार अधिकच ठळकपणे लक्षात येत असत. उदा - गर्भपात करण्यास प्रतिबंध' असावा अशी एक विचारधारा मुख्यत्वे मला आढळली ती याच भागात. बसने जाता येता पोस्टर्स दिसत ज्याव अतिशय गोंडस , हसरं मूल/ कॅलेंडर बेबी चे चित्र असे व खाली लिहीलेले असे " तुम्हाला माहीत आहे काय माझ्या हृदयाचे ठोके कन्सेप्शनपासून, ३ र्‍या आठवड्या पासून चालू झाले." किंवा असेच अर्भकाचे गोड चित्र व खाली शीर्षक - " माझ्या कन्सेप्शनपासून, ५ व्या आठवड्यात मला स्मित करता येऊ लागले" - या आहेत अँटायअ‍ॅबॉर्शन संदेश देणार्‍या जाहीराती. एकदा बसमध्ये ४-५ टिनेजर मुलींचा एका मध्यमवयीन अगदी अशक्त स्त्रीशी मोठमोठ्याने वाद चाललेला ऐकला. इतक्या आवेशात त्या मुली तो वाद घालत होत्या की माझे लक्ष वेधल्याविना राहीले नाही. मुलींचा मुद्दा होता - 'गर्भपात हा समर्थनिय नाही. ते पाप आहे. एका लहान अर्भकाचा खून आहे.' ती स्त्री परोपरीने त्यांना सांगत होती की 'काही परिस्थितींत गर्भपात करणे टाळता येत नाही." शेवटी शेवटी तर त्या स्त्रीवर इतका शाब्दिक हल्ला होउ लागला - "मग तू केला आहेस का गर्भपात?" वगैरे. ती स्त्री उतरल्यावरती तो वाद थांबला. अमेरीकेत क्वचित प्रसंगी कुमारी मातादेखील पाहीलेल्या आहेत. ती आई स्वतःच एक लहान मुलगी असते आणि तिच्या कडेवर तिचे टॉडलर मूल दिसते असे दॄष्य पाहीलेले आहे.
.
खरे पहाता, स्त्रीला तिच्या शरीरावरती हक्क असलाच पाहीजे. 'मूल ठेवायचे की नाही' हा आयुष्यातील एक सर्वात मोठा निर्णय तिचा तिला घेता आलाच पाहीजे. सुदैवाने असे पुरोगामी किंवा समजूतदार विचार करणारेही लोक आहेत. या लोकांची विचारधारा ही 'प्रो चॉइस' म्हणजे 'पर्याय स्वातंत्र्य' म्हणुन ओळखली जाते. तर "पर्याय स्वातंत्र्य" या विषयावर वाचलेली माझी ही पहीली कविता जिच्याबद्दल मी काही मांडत आहे. इतक्या गंभीर विषयावर काव्यात्म टिप्पणी करणारी "द सब्बाथ ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट" ही मार्ज पियर्सी या कवयित्रीची कविता. "द मून इज ऑलवेज फिमेल" या पुस्तकातील बर्‍याच कविता आवडल्या. गर्भपाताचे समर्थन करणारी ही जास्त रोखठोक असल्याने समजली. मार्ज पियर्सी यांचे विचार स्त्रीमुक्तीवादी आहेत असे त्यांच्या बर्‍याच कवितांतून जाणवले. प्रसिद्ध कविंच्या , लेखकांच्या मतांनी, शब्दांनी समाज घडू शकतो. लोक त्यांचे साहीत्य वाचून विचार करतात. प्रसिद्धी हे समाजसेवेकरता उत्तम माध्यम बनू शकते.
.
"द सब्बाथ ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट" या कवितेची सुरुवातच पूर्वजांच्या पुण्यस्मरणाने होते.
In the natural year come two thanksgivings,
the harvest of summer and the harvest of fall,
two times when we eat and drink and remember our dead
under the golden basin of the moon of plenty.
थँक्स्-गिव्हींग हा सण सुगीच्या दिवसांत येतो. जेव्हा कणसे कापणीला आलेली असतात. दुकाना दुकानांमधून, कणसांचे घड विकायला येतात. बुजगावणी , तांबडे भोपळे यांची रेलचेल दिसून येते. काहीकाही धान्यांच्या ओंब्या टांगलेल्या व विकायला ठेवलेल्या असतात. तर हेमंतात दिसून येणार्‍या या सुगीच्या विपुलतेचे चित्रण पहील्या काही कडव्यात आढळते. कवयित्री पर्याय निवडीचे स्वातंत्र्य अगदी साध्या प्रसंगातून दाखविते. खाद्यपदार्थांची रेलचेल आहे व अनेक पौष्टिक पदार्थांतून आपण स्वतःला रुचणारे पदार्थ निवडतो. म्हणजे आपल्या शरीराला काय पौष्टिक असते ते आपण ठरवतो. हक्काने ठरवतो.
The blowing grasses nourish us, wheat
and corn and rye, millet and rice, oat
and barley and buckwheat, all the servicable
grasses of the pasture that the cow grazes,
the lamb, the horse, the goat; the grasses
that quicken into meat and cheese and milk,
the humble necessary mute vegetable bees,
the armies of the grasses waving their
golden banners of ripe seed.
विपुलताच आपल्याला निवडीचे पर्याय देते व आपण किती सहजतेने ते निवडतो. कवयित्री म्हणते, हॅबॉन्डिया ही समृद्धीची देवता. तिच्या कारकत्वाखाली जशी समृद्धी येते तसेच पर्यायनिवडीचे स्वातंत्र्यदेखील येते. पुढे कवयित्री हेच लहानसे स्वातंत्र्य विस्तारुन आयुष्यातील अतिमहत्त्वाचे व आयुष्याला कलाटणी देणारे निर्णय यांची तुलना करते, ते निर्णय सहजतेने घेण्याचे स्वातंत्र्य यावर टिप्पणी करते. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला विवाहामधून मूल जन्माला घालावेसे वाटेल तर कोणा स्त्रीला तिच्या "लेस्बियन" जोडीदाराबरोबर, मूल दत्तक घ्यायला आवडेल, तर अन्य कोणा स्त्रीला एकटेपण आवडेल. आपण निवडलेल्या पर्यायाहून अन्य कोणी दुसरा पर्याय निवडला तर त्याचा मान राखण्याचे भान ही कविता देते, तसा मान राखावा असे आवाहन करते.
In another
life, dear sister, I too would bear six fat
children. In another life, my sister, I too
would love another woman and raise one child
together as if that pushed from both our wombs.
In another life, sister, I too would dwell
solitary and splendid as a lighthouse on the rocks
or be born to mate for life like the faithful goose.
Praise all our choices. Praise any woman
who chooses, and make safe her choice.
मूल हवे असताना होऊ न देणे जितके यातनामय आहे तितकेच नको असलेले मूल प्रसविणे व वाढविणे त्रासदायक आहे ही जाणीव कवितेत बोलून दाखविलेली आहे.
To bear children unwanted
is to be used like a public sewer.
To be sterilized unchosen is to have
your heart cut out.
अनेक देवता - हॅबॉन्डिया, आर्टेमिस, दिती, इनाना, शिन मू इतकेच काय आपल्या पणजा, खापरपणजा यांनी त्यांचे जीवन, आराम सर्व त्यागून नवीन वाटा चोखाळल्या, आपल्याकरता नवीन वाटा बनविल्या. त्यांनी खंबीरपणे आपल्याला सोपविलेला इतिहास, वारसहक्क, जाणीवा, नवे हक्क व कर्तव्ये यांचा परीपाक म्हणजे आयुष्यविषयक निर्णय सहजतेने घेता येणे. आणि ते स्वातंत्र्य ही आपण स्त्रियांची खरी समृद्धी अशा आशयाची ही कविता आहे.
Praise our choices, sisters, for each doorway
open to us was taken by squads of fighting
women who paid years of trouble and struggle,
who paid their wombs, their sleep, their lives
that we might walk through these gates upright.
Doorways are sacred to women for we
are the doorways of life and we must choose
what comes in and what goes out. Freedom
is our real abundance.
मला या कवितेत काय आवडले तर - स्त्रीस्वातंत्र्याबद्दलचे मार्जचे विचार, गर्भपाताबद्दलचा तिने घेतलेली भूमिका व आवाहन याची काव्यमय अभिव्यक्ती आवडली. या विषयावर कळलेली ही पहीलीच कविता.

Group content visibility: 
Use group defaults

मुलगा आणि मुलगी समान आहेत असे विचार आपण दिवसरात्र
मांडायचे आणि मुलगा की मुलगी असा चॉईस असावा असे सुद्धा मत मांडायचे ( नक्की काय अर्थ घायचा).
एकादी जागा स्त्री साठी असुरक्षित आहे म्हणून मुलगी होवून न देणे हे लॉजिक समजण्याच्या पलीकडले आहे .
हा पर्याय असूच शकत नाही .
जोडीदार ह्या शब्दाचा अर्थ खूप गहन आहे ज्यांचे शरीर बरोबर मनाचे आणि विचारांचे सुद्धा मिलन होते तो जोडीदार .
अशी जोडी असेल तर मुल हवं नको ह्या प्रश्नांचे उत्तर एकच असेल .
काही विशिष्ट कारणांनी एकत्र आलेला जोडीदार असेल तर मतभेद होवू शकतात .

> कायदे हे कमकुवत ,कमजोर लोकांचे संरक्षण करण्यासाठी असतात.

काही नियमन करावच लागते आणि ते नियमन कायदा करतो फक्त तो लोकांच्या हिताचं असावा .
कायदा करताना चांगल्या वाईट परिणामाचा विचार केला जातो एकच बाजू न बघता सर्व बाजू नी विचार करून कायदे केले जातात .
जेणे करून कमजोर व्यक्ती वर अन्याय होवू नये . >

वरती स्वप्नीलने एक केस लिहिली आहे > माझ्या माहितीतील एका पुरुषाने दोन मुलींनतर मुलगा व्हावा म्हणून सहा वेळा बायकोचा गर्भपात केला होता. शेवटी तिची तब्येत ढासळली तेव्हा आम्ही लोकांनी दोघांना झापले. बऱ्याचदा स्त्रिया मुलगा नाही म्हणून दु:खी असतात, चान्स घेतात व अजून मुलीची भर पडते. > यात नक्की कोण कमजोर आहे? आणि कायद्याने त्याचे कसे संरक्षण केले आहेए सांगू शकाल का?

स्त्री नी कायद्याचा आधार नाही घेतला .
लिंग परीक्षण करणे कायद्या नी गुन्हा आहे आणि त्या साठी शिक्षेची तरतूद आहे .
स्वतः वर होणारे अन्याय प्रतिकार न करणे ह्यात कोणाचा दोष आहे .
तिच्या मनाविरुद्ध होत होते तर तीनी कायद्या ची मदत घ्यायला पाहिजे होती ती न घेणे ह्यात कायदा दोषी कसा

> स्त्री नी कायद्याचा आधार नाही घेतला .
लिंग परीक्षण करणे कायद्या नी गुन्हा आहे आणि त्या साठी शिक्षेची तरतूद आहे .
स्वतः वर होणारे अन्याय प्रतिकार न करणे ह्यात कोणाचा दोष आहे .
तिच्या मनाविरुद्ध होत होते तर तीनी कायद्या ची मदत घ्यायला पाहिजे होती ती न घेणे ह्यात कायदा दोषी कसा >

मागच्या पानावरचा तुमचा प्रतिसाद v

"समाजात स्वतःच्या इच्छेने निर्णय घेण्याचा अधिकार सर्व स्त्रियांना नाही .
काही स्त्रिया ज्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत ,स्वतःच्या अन्याय चा प्रतिकार करण्याची ज्यांची क्षमता आहे .
ह्याचा अर्थ हा नाही की सर्व स्त्रिया सक्षम आहेत"

हो
ह्या दोन्ही प्रतिसादाचा एकत्र अर्थ असा आहे .
जर कोणतीच रोखठोक न ठेवता गर्भपाताचा अधिकार दिला तर स्वप्नील च्या कथेत ज्या स्त्री चा उल्लेख आहे तिचे रक्षण कसे होणार .
तिला स्वतःचे रक्षण करण्याची इच्या असती तर तिनी गर्भपात विरोधी कायद्या आधार घेण्याचा पर्याय उपलब्ध होता .

ऋन्मेष आणि अ‍ॅमीशी सहमत आहे.
गर्भात दोष असेल, विवाहबाह्य संबंधांचं आउटकम असेल, ऑलरेडी चार मुलं असतील, पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही- अशा कोणत्याही कारणासाठी जर गर्भपात कायद्याने करता येतो तर मुलगी आहे म्हणून गर्भपात का करता येत नाही?
असे कायदे करुन समाज स्त्रियांसाठी सुरक्षित व न्याय्य बनवण्याची जबाबदारी झटकण्याची सोय आहे.

https://exceptindreams.livejournal.com/91327.html

त्याच पुस्तकातील, "Right to Life" ही मार्ज पियरसी ची अजून एक पर्यायस्वातंत्र्याच्या बाजूने बोलणारी कविता. ही तर खूपच टोकदार कविता आहे. सुरुवात सौम्य निषेधाने झालेली आहे पण इतक्या वेगाने ती प्रतिमांमधून उलगडत जाते. एक एक प्रतिमा, आपल्याला वेगाने कवेत घेते जाते.
.
स्त्री म्हणजे काही मूकपणे बहरून फळे देणारे, सफरचंदाचे झाड नाही अशी सुरुवात होते. कवयित्री म्हणते कि सफरचंदाचे झाडंदेखील एका वर्षी फळांनी लदबदते परंतु दुसऱ्या वर्षी तेदेखील विश्रांती घेतेच की. एखादे नारळ-पोफळीची झाडंदेखील फळ देतं पण त्याचे आकाशाकडे झेपावण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखूनच.
A woman is not a basket you place
your buns in to keep them warm. Not a brood
hen you can slip duck eggs under.
Not a purse holding the coins of your
descendants till you spend them in wars.
Not a bank where your genes gather interst
.
तुमच्या गुणसूत्रांवरती चक्रवाढ व्याजाने फायदा करून देणारी बॅंक म्हणजे स्त्री नाही. या एका वाक्यात ती फक्त स्त्रियांचे ऑब्जेक्टिफिकेशन च challenge करत नाही तर हे तर पुरुषांचा एकंदर युद्धखोरपणा पण अधोरेखित करत.
.
डोंगर कापून रस्ते बनविणे असो, की कोकरांना भरपूर खायला घालून , जाडजूड करून फक्त शेवटी स्वतः:च्या भुकेकरता खाटकाकडे ओढून नेणे असो, की पठारे खोदून कोळसा काढताना पाणी गढूळ झाल्याने मेलेले मासे असो. या सर्व प्रतिमांमधून ती दाखविते स्वार्थ, माणसाची स्वतः:ची न संपणारी क्षुधा आणि त्याकरता पृथ्वीवरती केलेला बलत्कार. आणि मग हे सर्व सांगताना त्याच श्वासात ती विचारते, पृथ्वीच्या खनिजांवरती जसा तुम्ही हक्क सांगता आणि ते पुरत नाही की काय, आता स्त्रीच्या शरीरातील खनिजे अर्थात (मिनरल्स ) वरही हक्क सांगता.
Now you legislate mineral rights in a woman.
You lay claim to her pasture for grazing,
fields for growing babies like iceberg
lettuce.

आता या क्षणी टेक्सस मध्ये कोणीतरी एका लग्न ना झालेल्या तरुण स्त्रीचा घरीच गर्भपात करत आहे का तर तिला गर्भपाताचा हक्क नाही त्यामुळे सुविधा नाही. आणि ती तरुण मुलगी ५ दिवसात दगावणार आहे.

दुसरीकडे आई-वडील त्यांच्या अनवॉन्टेड मुलाला शरीरात सुया खुपसून शिक्षा करतायत का तर ते मूल अनवॉन्टेड होतं, नकोसं होतं आणि आता सांभाळावत नाही. तेव्हा त्या मुलाला शिस्त लावायची म्हणून ....

प्रत्येक प्रतिमा इतकी धारदार आहे. ती धोका दाखवते - नको असलेली मुले प्रेमास पारखी होतात, त्यातून ती कशी गुन्हेगारीकडे वळतात, त्यांच्यामध्ये विकृती येऊ शकते, त्यातून ते अतिरेकी बनू शकतात, दहशतवादी बनू शकतात, मग एके दिवशी बॉम्ब टाकले जातात, कुठेतरी जग जळतं, बेचिराख होतं - हे सर्व सुरु कुठे होतं तर प्रेमाला पारखं झालेल्या, एक नकोशा प्रेगन्सीमधून आलेल्या मूलापासून. सारं काही ती एकेक फ्रेम बाया फ्रेम दाखवत जाते. आणि आपल्या अंगावरती ती भयाणता झेपावत जाते, मनात झिरपत जाते.
Every baby born
unloved, unwanted is a bill that will come
due in twenty years with interest, an anger
that must find a target, a pain that will
beget pain. A decade downstream a child
screams, a woman falls, a synagogue is torched,
a firing squad is summoned, a button
is pushed and the world burns.

शेवटचे कडवे तर ती ठामपणे सांगते की मी तुमचं शेत नाही ज्यावर तुम्ही पीक घेता ना तुमची युरेनिअमची खाण आहे की माझ्या शरीरावरती तुम्ही हक्क गाजवाल, मी एखादं वासरूही नाही ज्याला मेजावानीकरता म्हणून तुम्ही लठ्ठ करता, तुमचे ज्या कारखान्यात हिस्से आहेत अशी ना मी कारखाना आहे ना तुमच्या परसात दावणीला बांधलेली दुभती गाय.
My life is a non-negotiable demand.

पुरुषाचे स्पर्मच वेगवेगळे करता यावेत आणि फक्त मेल स्पर्म इंजेक्ट करून गर्भधारणा होऊ द्यावी. >> धोकादायक मार्ग वाटतो. सगळे मुलगा व्हायच्या मागे लागले तर आता चुकुन का होईना मुली होतात त्या पण होणार नाही.

> धोकादायक मार्ग वाटतो. सगळे मुलगा व्हायच्या मागे लागले तर आता चुकुन का होईना मुली होतात त्या पण होणार नाही. > म्हणजे आता ज्या मुली होताहेत त्या सगळ्या केवळ 'चुकूनच' होताहेत अस वाटतं का?
हे लोकांवर फारच अविश्वास दाखवणं आहे.

पर्यायास्वातंत्र्य दिल्यास काय होईल (माझा अंदाज)सांगते -
ते स्वप्निलच्या केस मधले जोडपे पहिलं मुल जेकाही व्हायचं ते होऊ देईल. दुसरं मुल विरुद्ध लिंगाचे निवडेल. लोकांना एक मुलगी चालते. काही केसमधे एकतरी मुलगी हवीच असते. दोन्ही मुलगेच असणारे लोकं म्हणतच असतात कि खरंतर आम्हाला मुलगी पाहिजे होती. त्या बाईला वारंवार गर्भधारणा- गर्भपात सायकल रिपीटला सामोरे जावे लागणार नाही.
===

जर लोकांवर एवढा अविश्वास असेल तर एक करता येईल.
एक ऑनलाइन लाइव्ह डाटाबेस बनवायचा.
पहिल्या मुलाच्या विरुद्ध लिंगाचे मुल निवडण्याचा पर्याय द्यायचा.
ज्यांना एकच मुल हवे आहे त्यांचा क्यू असेल. बिहारमधल्या गावातील एकाने मुलगा निवडला तर त्यापुढच्या एंट्रीने मुलगीच निवडावी लागेल. नाहीतर कोणीतरी मुलगी निवडेपर्यंत थांबावे लागेल.

Chitti and Nila सारख्या येऊ घातलेलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स नंतर गर्भ धारणा हां विषय खरंच महत्वाचा असेल की येणाऱ्या काळात क्लोन्स वरील भर वाढीस लागु शकतो ?

शेवटी गर्भ म्हणजे काय -- तर आपला वंश वाढवण्यासाठीचे एक साधन, ज्यात आपले (पेरेंट्स) जीनोम carry fwd होत असतील आणि नवीन पीढी (F१ ....to Fn) तयार होत राहते. ह्यमध्येसुद्धा आता विज्ञानाने नको असलेले जीन्स सप्रेस करून ठेवणे शक्य आहे, म्हणजे फक्त उत्कृष्ट गुणांचे वर्धन सिलेक्टीव्हली करणे शक्य असल्याने जगात सर्वच जर सुपर ह्यूमन बनणार असतील आणि / किंवा गर्भ धारणा करून नऊ महीने दवडण्यापेक्षा क्लोनिंगसाठी जास्त मतप्रवाह सक्रिय झाला तर काय करणार ? ( ह्या सर्व कविकल्पना निश्चितच राहिलेल्या नाहीत, येत्या काही वर्षात विज्ञानाची अनेक समीकरणे झपाट्याने बदलत जाणार आहेत हे नक्की)

चायनामध्ये वन चाईल्ड पॉलिसी झाल्यावर खूप लोकांनी मुलगे होऊ दिले. मुलींचं प्रमाण शून्य झालं नाही पण कमी झालं. याचा परिणाम ही मुलंमुली वयात आल्यावर असा दिसला की मुली कमी असल्यामुळे लग्नासाठी जोडे झिजवणे वगैरे प्रकार मुलगे व त्यांच्या आईबापांना करावे लागले. मुलींना भरपूर चॉईस उपलब्ध झाले .
भारतातही एखादी पुरुषांची पिढी अशाप्रकारे तडफडली ,वाया गेली तर कदाचित मुलींचं स्टेटस वधारेल. मुलाचं लग्न हा काळजीचा विषय झाला तर हुंडाबळीवगैरेंसारखे प्रकार होणार नाहीत.
थोडक्यात , सध्याचा स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा हा पुरुषांच्या सोयीसाठी आहे, बायकांच्या नाही. बाईला कोणत्याही कारणासाठी जबरदस्ती मूल जन्माला घालायला लावणं चूकच. असा कायदा न करताही जगातील अनेक प्रगत देशात लोक मुली जन्माला घालत असतात. पण भारतात मुळात मुलगी नकोशी का वाटते याची कारणं न दूर न करता जबरदस्ती सप्लाय लेव्हल स्टेडी ठेवण्याचा प्रकार चालतो. दोन महिन्यांच्या मुलीवर रेप होण्यापासून तुम्ही वाचवू शकत नाही पण तरीही पालकांवर मुलगी जन्माला घालायची सक्ती का?

टोकाची मत मुळे संतुलन बिघडते.
स्त्री आणि पुरुष एकमेकाचे क्षत्रु नसून साथी आहेत .
बलात्कार काही समाजात सर्रास होत नाहीत .
असे नाही नाही की सर्व पुरुष बलात्कारी आहेत .
मुलगी जन्माला घालणे पुरुषांच्या फायद्याचे आहे कसं?
आता च मुल होण्याचे वय १८ वरून ३५ वर गेले आहे .
Bp पासून मधुमेह पर्यंत सर्व रोग ३० chya आत मध्येच होण्याचे प्रमाण वाढले आहे .
६/७ मुलांवरून मुलांची संख्या १ वर आली आहे पुढे मुलच नको असा विचार करणाऱ्या लोकांची संख्या वाढू शकते .
सेक्स हा मुल जन्म देण्यास कारणीभूत नसता तर आज मानवी वंश पृथ्वी वरून नष्ट झाला असता .

पाश्चिमात्य देशात गर्भपात चा हक्क हवा ह्या विषयातील अर्धाच भाग इथे टाकला आहे .
त्याच पूर्ण भाग असा आहे गर्भपाताचा हक्क नसणे ही गोष्ट स्त्रियांच्या सेक्स करण्याच्या मूलभूत हक्कावर गदा आहे .
आंदोलन तिथे त्या साठी चालू आहे आणि नेहमी प्रमाणे चित्रतारका( संशोधक महिला नाही
बिझनेस वुमन नाही,अधिकारी महिला नाही ,जिथे कष्ट आणि बुध्दी लागते त्या क्षेत्र मधील नाही जिथे शरीर हेच भांडवल त्या क्षेत्रातील आहे) च नेतृत्व करत आहे

मुलगी नको असण्याची अनेक कारणे समाजात बघायला मिळतात. हरियाणा की कुठेतरी मुलगी जन्माला आली की उकळत्या दुधात बुडवून तिची हत्या करण्याची प्रथा होती. एकदा महाराष्ट्राच्या एका भागात गेलो असताना एकजणाला दुसऱ्या गावातील लोकांनी मारहाण केली तर या माणसाचा बाप म्हणाला "त्या गावातल्या एखाद्या बाईला नासवून आम्ही बदला घेऊ." म्हणजे स्त्री कधीही कुठेही अत्याचाराला बळी पडू शकते. ती परावलंबी असल्याने लग्न करून द्यावेच लागते व लग्नाचा खर्च झेपत नाही. खर्च करुनही सुखी होण्याची खात्री नाही. मुलगी पळून गेली, तिने जातीबाहेरच्या मुलाशी लग्न केले तर नाचक्की होईल अशी भीतीही असते. सून करताना समाजाला दुभती गाय, आखुडशिंगी बहुदुधी गाय हवी असते. मुल न होणाऱ्या, विधवा, परित्यक्ता स्त्रियांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते.

@ राजेश -
>>>>>>>>>> जिथे कष्ट आणि बुध्दी लागते त्या क्षेत्र मधील नाही जिथे शरीर हेच भांडवल त्या क्षेत्रातील आहे) च नेतृत्व करत आहे>>>>>>> आक्षेप! चित्रतारकांना फक्त शरीर लागते हा जावईशोध आहे. नीरीक्षाण, कष्ट, नको ती प्रसिद्धी व पुरुष सहकारी टाळण्याकरता लागणारा तल्लखपणा , परखडपणा - अनेक अक्षरक्षः अनेक गुणांची आवश्यकता असते.
अजुन एक बुद्धीमत्ता असे काही मोजके गुण नसतात. बुद्धीमत्ता, सर्जनशीलता अनेक प्रकारांनी व्यक्त होते. काहीजणांना पटापट भाषा अत्मसात करता येतात (Linguistic Intelligence), काही जण अतिशय तार्किक मुद्दे काढू शकतात (Logic Intelligence)
Kinaesthetic Intelligence. ...
Spatial Intelligence. ...
Musical Intelligence.
Interpersonal Intelligence. ...
Intrapersonal Intelligence. वगैरे वगैरे
गणितात्मध्ये एक विषय असतो ज्यात दिलेली विचित्र अशी त्रिमितिय वस्तू अमुक एका कोनातून वळवून मग पुढे त्या आकृतीसंदर्भात काही प्रश्न विचारलेले असतात. तो एक दुर्मिळ बौद्धिक ट्रेट आहे असे ऐकिवात आहे.
______________________
@सनव
>>>>>>>>>>सध्याचा स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा हा पुरुषांच्या सोयीसाठी आहे, बायकांच्या नाही. .................
भारतात मुळात मुलगी नकोशी का वाटते याची कारणं न दूर न करता जबरदस्ती सप्लाय लेव्हल स्टेडी ठेवण्याचा प्रकार चालतो. दोन महिन्यांच्या मुलीवर रेप होण्यापासून तुम्ही वाचवू शकत नाही पण तरीही पालकांवर मुलगी जन्माला घालायची सक्ती का?>>>>>>>>>>>>> खरच मस्त मुद्दा मांडलेला आहे.

@अ‍ॅमी>>>>>>>> बिहारमधल्या गावातील एकाने मुलगा निवडला तर त्यापुढच्या एंट्रीने मुलगीच निवडावी लागेल. नाहीतर कोणीतरी मुलगी निवडेपर्यंत थांबावे लागेल.>>>>>>>>> कोणीतरी म्हणजे? त्या गावातील कोणीतरी? हे तर फारच क्लिष्ट होतय. मग एक गाव का? पंचक्रोशी का नको? फक्त मुलगा हवा म्हणून, मी गाव बदलू शकते का?

सनव चा बलात्कार नको म्हणून मुलगी नको हा विचार १०० आणि १ percent चुकीचा आहे .
खरे कारण आहे मुलगी लग्न झाली की सासरी जाते
वंश चालवण्यासाठी मुलगा च हवा असतो कारण तोच वारस असतो.
मुलींना मर्यादा असतात मुलांना नसतात ( हा पॉईंट आता गैर लागू आहे )
ही कारणे आहेत.
जे आई वडील मुलीचे रक्षण करू शकत नाहीत ते मुलाचे रक्षण सुद्धा करू शकत नाहीत .
ते मुलाला जन्म देण्याच्या लायकीचे नाहीत

५ वर्षा च्या आतील मुल आणि मुली किती मस्त सहबंधनात बांधलेली असतात .
एकत्र खेळतात ,मस्ती करतात,मारामारी सुधा करतात कसलाच भेदभाव नाही .
अश्याच प्रकारची समता स्त्री आणि पुरुष ह्यांच्या मध्ये असावी कसलाच भेदभाव नाही .
आणि ह्यालाच स्त्री मुक्ती म्हणता येईल .
पुरुष विरोध करून समानता कधीच येवू शकणार नाही

> कोणीतरी म्हणजे? त्या गावातील कोणीतरी? >नाही गावातीलच कोणीतरी नाही. अख्ख्या देशातील कोणीतरी. पूर्ण देशाचा एकच लाइव्ह डेटाबेस आहे. पूर्ण देशात १:१ स्त्री:पुरुष गुणोत्तर ठेवायचे हे टार्गेट आहे ना सरकारचे? भविष्यातल्या प्रत्येक पुरुषाला एकेक बाई मिळालीच पाहिजे! (म्हणून वर्तमानकाळातल्या स्त्रीचे शरीर कंट्रोल करूयात!)
===

सनवचा प्रतिसाददेखील योग्य आहे.

पण विषय अनप्लॅन्ड गर्भधारणेनंतरचे पर्यायस्वातंत्र्य वरून प्लॅन्ड गर्भधारणेमधील पर्यायस्वातंत्र्य कडे नेला जातोय.
===

> Submitted by सामो on 27 September, 2019 - 00:10 > प्रतिसाद चांगला आहे. मूळ लेखातच ऍड केला तरी चालेल.
गंमत(?) म्हणजे सगळे मास किलिंगचे प्रकार पुरुषच करतात, त्याला देशभक्ती धर्म वगैरे आवरणाखाली झाकतात. पण तेच एका स्त्रीने स्वतःच्या शरीराविषयी निर्णय घ्यायला पाहिलं कि भ्रूणहत्या गर्भहत्या करत बोंब मारतात.

ते टेक्सससारखे कायदे करून गर्भपात रोखता येणार नाहीचेत फक्त ते अंडरग्राउंड जाणार, बेकायदेशीर असल्याने अस्वच्छ-शेडी जागी होणार, आणि बायका मरणार. शेजारच्या कॅनडाकडून शिका म्हणावं काहीतरी
Abortion in Canada is legal at all stages of pregnancy and is governed and funded by the Canada Health Act. While some non-legal barriers to access continue to exist, such as lacking equal access to providers, Canada is one of the few nations with no specific legal restrictions on abortion.
===

स्त्रीगर्भपात होऊ नयेत म्हणून जागरूकता अभियान चालवले जाणाऱ्या देशातील स्त्रीयांची स्थिती पहा
https://sameerbapu.blogspot.com/2019/08/blog-post_27.html
त्या फोटोत पार्श्वभूमीवर जी खुराडी आहेत ती बघा.

ए काय चर्चा ही?

१:१ का हवं प्रमाण? ह्यात गे आणि लेस्बिअन आणि दोन्ही आवडतात असे लोक धरले नाहीत की त्यांनी भिन्नलिंगी पार्टनर "च" शोधायचे?

जर मी केवळ मुलगेच जन्माला घातले तर एका क्षणी मुलावर बलात्कार, मुलाला छेडले, बढतीसाठी फेवर मागितले , एकतर्फी प्रेमातून जाळले, मनात नसताना जबरदस्ती स्त्री पात्र बनावे लागले, असे काही त्या मुलग्यांवर होणारच नाही की काय?आणि त्या मुलाला स्त्री जोडीदार उपलब्ध नाही म्हणून त्याच्या होणार्‍या कुचंबणेच काय?

सध्या उपलब्ध स्त्रिया संपल्या की पुढे काय? नुसतं क्लोनिंग? की मानवजात नष्ट?

मुद्दा गर्भपात कायदेशीर असावा की नको हा आहे ! स्त्री की पुरुष अपत्य, हा नाही!

धोकादायक मार्ग वाटतो. सगळे मुलगा व्हायच्या मागे लागले तर आता चुकुन का होईना मुली होतात त्या पण होणार नाही.
>>>>>

ज्यांना मुलीचा गर्भ असेल तर मारून टाकावासा वाटत असेल तर अश्यांच्या घरी मुलगी जन्माला न आलेलीच चांगले नाही का?

जर देवाने मला पुढचा जन्म मुलीचा दिला तर मला केवळ कायद्याच्या भितीने वा नाईलाजाने अश्या घरी जन्म घेण्यापेक्षा गर्भातच मरून पुन्हा लाईनमध्ये उभे राहायला नाही का आवडणार?

प्रत्येकाने स्वत:ला एकदा विचारून बघा हा प्रश्न !

म्हणजे आता ज्या मुली होताहेत त्या सगळ्या केवळ 'चुकूनच' होताहेत अस वाटतं का?
हे लोकांवर फारच अविश्वास दाखवणं आहे. >>>> अजिबात नाही. असे कसे म्हणीन? मुलीच्या गर्भपरिक्षेवरुन, मुलगा हवा या इच्छेचे लोक हा विषय चालुयेना? मग जनरल कसे लिहीन? मुलगाच हवा मुलगाच हवा म्हणत चान्स घेतात व मुलगी होते त्याबद्दल बोलत आहे.

ज्यांना मुलीचा गर्भ असेल तर मारून टाकावासा वाटत असेल तर अश्यांच्या घरी मुलगी जन्माला न आलेलीच चांगले नाही का? >> हा मुद्दा अयोग्य नाही पण याचे उत्तर देणे अवघड कारण मुलगा हवा असताना मुलगी झाली तर तिला प्रेमाने की त्रासाने वागवले जाईल हे ५०-५० टक्के असते. असे नक्की होत असेल की अशा मुलीवर नंतर पालकांचे अतिशय प्रेम बसले असेल. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला तरी उत्तर देता येणार नाही. जे यातुन गेलेत त्यांनी लिहावे.

सुनिधी, असतील ना अशीही लोकं. पण मग त्यांचा मुलीला विरोध ईतका टोकाचा नसावा की होतेय मुलगी मार तिला... मी अश्या टोकाच्या विरोधकांबद्दल बोलतोय. पुढे हे बदलतील अशी रिस्क घेणे म्हणजे ते असते ना मुलगा मवाली आहे पण लग्न झाल्यावर सुधारेल तो या आशेवर एका पोरीचा बळी देण्यासारखेच झाले.

मुलगी आहे म्हणून तिच्या वर अन्याय करणारी कुटुंब किती असतील
मोजकीच
त्याच्या वरून मुलगी आहे म्हणून तिच्या वर कुटुंब मध्ये सर्रास अन्याय होतो असा सरसकट निष्कर्ष काढणे चूक वाटत नाही का ?
माझ्या आजूबाजूला ,मित्र मंडळी मध्ये खूप लोकांना मुली आहेत आणि आई वडिलांनी त्यांना उच्च शिक्षण देवून
सक्षम केले आहे
त्यांचे सर्व लाड पुरे केले आहेत .
फक्त थोडी बंधन टाकली जातात पण ती काळजी पोटी.
एक माझा लहानपणीचा मित्र होता त्याचे विचार जरा मागास होते म्हणजे स्त्री ला जास्त किंमत द्यायची नाही ,पायातील चप्पल पायाताच बरी ह्या विचाराचा .
पण त्यांनी सुद्धा स्वतःच्या मुलीला उच्च शिक्षण दिले आहे .
मध्ये मला गावी गेलो तेव्हा भेटला बुलेट वर बापलेक कुठे तरी चालली होती .
आणि विशेष म्हणजे मुलगी गाडी चालवत होती आणि हा पाठी बसला होता .
मुलांच्या प्रेमापायी माणसं बदलतात

मुलगी आहे म्हणून तिच्या वर अन्याय करणारी कुटुंब किती असतील
>>>
तुमच्यामते अन्यायाची व्याख्या काय आहे?

व्यक्ती स्वतंत्र च्या अवास्तव विचारावर अन्यायाची व्याख्या जुळवून पाहाल तर जगात फक्त आणि फक्त अन्याय च होत आहे स्त्री वर कुटुंब कडून,समाजाकडून,पुरुषानं कडून
हे मान्य आहे

व्यक्ती स्वतंत्र च्या अवास्तव विचारावर अन्यायाची व्याख्या जुळवून पाहाल तर जगात फक्त आणि फक्त अन्याय च होत आहे स्त्री वर कुटुंब कडून,समाजाकडून,पुरुषानं कडून
हे मान्य आहे
>>>

ओके
तर स्त्री ला व्यक्तीस्वातंत्र्य नाकारणे हे अन्यायात येत नाही Happy
अवास्तव हा शब्द मी मुद्दाम टाळला. त्याचीही तुम्ही व्याख्या देणे अपेक्षित आहे.

Pages