Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशा या आपल्या आवडीच्या
अशा या आपल्या आवडीच्या अग्गंबाई ला उत्कृष्ट कार्यक्रमाचा झी गौरव पुरस्कार मिळवुन देण्यासाठी आपल्या (आणि अर्थात दुसर्यांच्याही
) मोबाईलवरुन या क्रमांकावर मिसड्कॉल द्या - ८०८००७३०७३
आज मधूनच सिरियल बघितली.
आज मधूनच सिरियल बघितली. आजोबा कधी एवढे सुधारले?
आज चक्क नातसुनेशी चक्क हसून, मस्करी करत बोलत होते. ह्यान्ची आणि शुभ्राची मैत्री कधी झाली? बबडया मात्र दुसरा गॅरी झालाय.
मुलगा "आहे" आणि सुनेला मुलगी
मुलगा "आहे" आणि सुनेला मुलगी "मानलंय" हाच तो फरक..
इकडे नवऱ्याचा जॉब गेलाय आणि
इकडे नवऱ्याचा जॉब गेलाय आणि त्या शुभ्राला नी स आणि राजेंच्या पॅच अप च पडलंय.
काल राजेंनी नी ससाठी जेवण आणलं होत मला वाटलं आता राजे प्रत्येक पदार्थ कसा बनवला ते एक्सप्लेन करतात की काय!
मला तर ही सिरीयल पेक्षा कूकरी शोच जास्त वाटतो
मागच्या वेळेस राजे नी सच्या विचारत बसले होते फोडणीचा भात कसा केला ते
आता त्याच भांडण मिटलं की सुरु होईल एकेक पदार्थ शिकवण /शिकणं..
फोडणीचा भात, फोडणीचं वरण, फोडणीची पोळी
चालू द्या..
(No subject)
फोडणीचा भात, फोडणीचं वरण,
फोडणीचा भात, फोडणीचं वरण, फोडणीची पोळी
चालू द्या.. >>>
माझी आई म्हणते घारगे कसे केले
माझी आई म्हणते घारगे कसे केले ते नीट दाखवलं नाही, तिला म्हटलं अगं हा कुकरी शो नाहीये
घारगे तूनळीवर बघ कसे करायचे ते, राजेंनीही तेच करायला हवं होतं. राजेंनी एवढा स्वयंपाक कधी केला, आसावरी म्हणाली जेवणं झालीयेत त्यांची, तरी हे काय वाढत होते वाढप्यासारखे, कोण आवरणार ते नंतर. असावारीचा राग लगेच गेला, म्हणे माझं आहे ते माझ्याकडेच येणार, सामाजिक चौकट वगैरे विसरली वाटतं. मैत्री आहे का दोघात फक्त, की त्यांच्यात प्रेमालाच मैत्री म्हणतात 
भिकार मालिका . फक्त मुर्ख
भिकार मालिका . फक्त मुर्ख लोकाना आवडु शकते.
वालाचं बिरडं (ती यडी असिस्टंट
वालाचं बिरडं (ती यडी असिस्टंट बरडं म्हणाली होती
) पण दाखवलं नाही नेम्कं कसं कराय्चं ते..
तेप्र अजूनही 'जवाबदारी' च
तेप्र अजूनही 'जवाबदारी' च म्हणते...
तेजशेरी चा एक डायलॉग उद्या
तेजशेरी चा एक डायलॉग उद्या आझी अंगळा गौर आहे.
कुलकर्ण्यांच्या घरात ’चपाती ’
कुलकर्ण्यांच्या घरात ’चपाती ’? कोण आहे डायलॉग रायटर?
कुलकर्ण्यांच्या घरात ’चपाती ’
कुलकर्ण्यांच्या घरात ’चपाती ’? कोण आहे डायलॉग रायटर? >>> हो आणि डाळ. वरण / आमटी नाही.
कुलकर्णी आडनाव बऱ्याच समाजात
कुलकर्णी आडनाव बऱ्याच समाजात आहे , तिथे चपाती म्हणतात. वरणाला डाळ म्हणत नाहीत मात्र.
कुलकर्णी आडनाव बऱ्याच समाजात
कुलकर्णी आडनाव बऱ्याच समाजात आहे , तिथे चपाती म्हणतात.>>>>हो पण ’हे’ ’्ते’ नाहीत ना!
हो पण ’हे’ ’्ते’ नाहीत ना!>>
हो पण ’हे’ ’्ते’ नाहीत ना!>> कशावरुन 'हे' "ते" नाहीत..??
आणि अभिजीत राजे दरवेळी
आणि अभिजीत राजे दरवेळी "दत्ता..." आपलं ते हे.... .. दत्ताजी........................ " असं का म्हणतात? हसणं अपेक्षित आहे का यावर?
कशावरुन 'हे' "ते" नाहीत..??>>
कशावरुन 'हे' "ते" नाहीत..??>>> घरातील चालीरिती, स्वयपाकातील मसाले, बोली भाषा, देवघर,पूजा, वरणभात, गुर्गुट्या भात...... वगैरे वगैरे वरुन. त वरुन ताकभात. बिरबलाने बहुभाषिकाची मातृभाषा कशी ओळखली? तस.
घरातील चालीरिती, स्वयपाकातील
घरातील चालीरिती, स्वयपाकातील मसाले, बोली भाषा, देवघर,पूजा, वरणभात, गुर्गुट्या भात...... वगैरे वगैरे वरुन. >> अस्सं कै नस्तं बर्का... हल्ली कोणी कोणाचे पण चालीरिती, मसाले, बोली भाषा, देवघर, पुजा, वरणभात, गुर्गुट्या भात करु श्कतो..
मान्य पण अधिक शक्यता व कमि
मान्य पण अधिक शक्यता व कमि शक्यता तर असतात ना
मला तर हे कुटुंब हायब्रीड
मला तर हे कुटुंब हायब्रीड वाटतं..! बोलणं एक आणि करणं एक..!!
किती फाल्तुपणा चालू आहे,
किती फाल्तुपणा चालू आहे, कशाचा कशाला मेळ नाही.
कालचा निजो बबडयाला त्याचा
कालचा निजो बबडयाला त्याचा लहानपणीचा प्रसन्ग सान्गते तो सिन आवडला. किती उन्च आहे हा बबडया!
कुलकर्ण्यांच्या घरात ’चपाती ’
कुलकर्ण्यांच्या घरात ’चपाती ’?>>>> ते कुळकर्णी आहेत.वालाचे बिरडे,गोडाचे आणते वगैरेवरून ते ,"हे" नाहीत.
ते आजोबा नेहेमी पूजा करताना
ते आजोबा नेहेमी पूजा करताना काहीतरी भ भ चे मंत्र म्हणत असतात मला ते ओम फट स्वाहा म्हणतील शेवटी असं वाटत राहतं
त्या बबड्याला एक ठेऊन
त्या बबड्याला एक ठेऊन द्यावीशी वाटत नाही कुणाला?
हो मला कालच फार इच्छा झाली
हो मला कालच फार इच्छा झाली होती. स्वार्थी आहे १ नंबरचा.
बबड्या काल काय म्हणत होता आसावरीला कसले मोठे चेक्स येत असतात. घारग्याच्या रॉयल्टीचे का
मालिका आता अगदीच अचरटपणाकडे
मालिका आता अगदीच अचरटपणाकडे झुकायला लागली आहे. काय ते सूनेच पाय मुरगळल्याच नाटक,काय तो झुंबा क्लास,ते अभिजित राजे तर कामधंदे सोडून इतर उद्योगच जास्त करत आहेत.
घारग्याच्या रॉयल्टीचे>>>>
घारग्याच्या रॉयल्टीचे>>>>
घारग्याची रॉयल्टी >>
घारग्याची रॉयल्टी >>
'हे' / 'ते' नेमकं काय आहे?? कुणी सांगल का? डोईवरुन गेलेत जोक्स असतील तर..
Pages