अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या भागात ते काय यान पाठवलं होतं राजेंनी. तसं उपकरण मी थ्री इडियट मध्ये बघितलं होतं. एका दिवशी राजेंच्या एवढ्या मुलाखती Uhoh आणि एवढे प्रसिद्ध राजे रोज प्रज्ञाच्या घरी जाऊन बसतात. प्रज्ञाचे पुढचे केस पांढरे दिसतात, ती एव्हडी लूक कॉशन्स दाखवली आहे तर हे टाळायला हवं होतं.

मलाही ती व्हायोलिन ची सुरावट आवडते.
काल तो बबड्या आणि प्रज्ञा दोघेही नव्हते त्यामुळे जरा बर वाटलं बघायला.
तरी नी. स. ते राजे स्वप्नात येतील म्हणून न झोपण्याचा वेडेपणा केलाच..

बालिश आहे सगळंच!

मस्त विषय मिळाला होता त्यांना. किती छान फुलवता आली असती कथा! पण नाही.

असावारीचं रात्री न झोपणं अगदीच बालिश होतं. आसावरी किती लाडे लाडे बोलते, जसे काही बेसनाचे लाडू ठेवलेत गालात. शुभ्रा आज्जीबाई आहे अगदीच, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी, फक्त स्वतःच्या नवऱ्याला सुधारू शकत नाही ती.

बालिश आहे सगळंच! मस्त विषय मिळाला होता त्यांना. किती छान फुलवता आली असती कथा! पण नाही. >>> + १२३४५६७८९

राजेंनी शब्द टाकला बबड्याच्या साहेबांकडे आणि बबड्याला जुनीच नोकरी नव्याने मिळाली. परत बबड्याने हे घरी सांगितलेलं नाही.
शुभ्राला असं टेन्शन आलंय जसं काय ती तिच्या लग्नाच्या आधीच सासूचं लग्न ठरवून आली होती आणि आता ही सासू नावाची ब्याद जात नाही की काय आजोबांच्या आणि सोहमच्या हेकेखोर स्वभावामुळे, असे तिच्या चेहेऱ्यावर भाव आहेत. वर्क फ्रॉम होमचा धागा काढलाय कुणीतरी, तिथे शुभ्राचा घरून काम करतानाचा विडिओ टाकायला पाहिजे. दरवाजाच उघड, फोनच उचल, आजोबांची हजार कामं, आलेल्या पाहुण्यांची ऊठ बस, हिची पण नोकरी जाणार बहुतेक लवकरच.
राजेंची हॉटेलची जागा बघून दिवा महाराष्ट्राचा या अवचटांच्या हॉटेलची आठवण आली, तेही असंच आहे कौलारू.
मॅडी कधी खूप हुशार दाखवतात तर कधी अति मंदं. पोस्ट ऑफिसच्या बाहेर उभं राहून कागदपत्र तपासतात आणि पोस्टातून पेन्शन येते Uhoh

ह्या मालिकेला तुफान awards मिळाली आहेत वाचलं, नि जो ला तर खूप. जोडी म्हणून पण आसावरी अभिजीत निवडले. रा खे चा वर लिंक टाकलीय बातमीची, रा खे चा ला पण खूप awards आहेत.

राजे खरच आति उतावीळ , पोरकट आणि आसावरी बावळट दाखवली आहे साधी दाखवण्याऐवजी. त्या दोघांपेक्षा सासू-सुनेचं नातं चांग्लं उलगडत गेलं आहे . कुल्कर्णींच्या घरातल्या दोन्ही पुरुषांन्ना अगोदर सरळ करायला हवं. आसावरीच्या नवर्‍याब्द्दल काहीच उल्लेख सुद्धा नाही कधी कुटुंबातल्या सदस्यांकडून .

खूप वर्ष झाली असतील आसाच्या नवऱ्याला जाऊन. सोहमला आठवत नसतील वडील आणि आजोबा असावारीला वाईट वाटेल म्हणून बोलत नसतील पण ती शक्यता कमीच आहे. किती खडूस असतात आजोबा, अक्षरशः छळतात तिला. खरंतर आईमुलाच किती छान नातं तयार झालं पाहिजे पण सोहम अगदीच रुक्ष दाखवलाय.

आजोबांचे डायलॉग अज्जिबात आवडले नाहीयेत. शुभ्राला पण एकदम टाकून बोलत असतात.
शुभ्रा वर्क फ्रॉम होम करताना पण एवढी आवरून बसते. ओढणीचे फलकारे मारत.
परत एकदा ऑल टाईम फे प्रेझेंटेशन आलेलं आहे.

हो हो, झीचं आवडतं प्रेसेंटेशन आलंच. आजोबा शुभ्राची अक्कल काढतात, आईने काही शिकवलं नाही म्हणतात, किती घाणेरडी विचारसरणी आणि भाषा. शुभ्राही ऐकून घेते. राजे आणि आसावरीची मैत्री कशी चालते आजोबांना. सोहम तर स्वार्थीच आहे, नोकरीसाठी राजेंना वापरून घेतलं. मदन आणि तो पावभाजीवाला यांना बघितलं आहे कशाकशात. शुभ्रा सासूचं लग्न झालं की आजोबांचं लावून देईल आणि पाठवून देईल त्यांना शेजारी. त्या कारखानिसांना कुणी काच का बसवून देत नाही चष्म्याची, थोडावेळ असा चष्मा घालायचा तरी किती त्रास. काहीही हं झी.

मला तर नॉर्मल वाटले आजोबा, या वयात असेच असतात बरेच जण. अन काही एपिसोड मध्ये दिसले की राग जरी करत असतील तरी सुनेवर खूप जीव आहे त्यांचा. उलट एकदा ते सौम्याला बोलले पण की तू चुकू शकतो माझ्या दोन्ही सुना नाही, त्या फार चांगल्या आहेत. अन जरी ओरडत असतील तरी आसावरीला करू देतात सगळे, हीच अति बावळट दाखवली होती

साधं घरातून कुठे जाण्यासाठी आसावरीला आजोबांची परमिशन का लागते - आठवा राजेंच्या नवीन जागेची पूजा - राजे सरळ सरळ लाईन मारतायत आणि ही बावळट मित्र मित्र करत्ये. इतकं गाणं म्हंटलं, सोसायटीत कोण्णा कोणणाला ऐकू नाही गेलं ??

हो ना, तसेही ते त्यांना बिलकुल शोभत नव्हते, मला मुळात ते राजेच आवडत नाहीत त्यामुळे अजूनच डोक्यात जाते.

आसावरीचे कसे वाटतेय मला की इतर कुणी तिला इतक महत्त्व देत नाही, त्यात नवऱ्याची सोबत खूप आधी सुटली त्यामुळे कदाचित नकळत एक रितेपण आले असेल अन त्यात पहिल्यांदा कोणीतरी म्हणजे राजे इतका भाव देतोय म्हणून हुरळून गेली असावी. खऱ्या आयुष्यात देखील होते असे बऱ्याच बायकांचे, लबाड पुरुष अश्या बायकांना बरोबर हेरून त्यांना गळाला लावून त्यांचा अन त्यांच्या पैश्यांचा वापर करतात पण या बिचार्यांना ते कळत नाही अन जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते

मन बावरे मध्ये तर नवरा बायको एकमेकांना मित्रा आणि मैत्रिणी म्हणतात, हात हातात घेऊ का म्हणून विचारतात, मैत्रीपूर्ण मिठी मारतात Wink
आजोबा आसावरीला जाऊ देत नाहीत पण जेव्हा शुभ्रा काहीतरी कारण काढून घेऊन जायला बघते तेव्हा ही बावळट आसावरी घराच्या बाहेर पडलेली असताना परत घरी येते, आजोबांची फसवणूक होईल म्हणून. आजोबा तिला किती फेऱ्या मारायला लावतात, तिला आराम मिळेल असं जराही बघत नाहीत.
मागे घरात गाणं म्हटलं होतं, आता रस्त्यावर पूर्ण बँड आणलाय राजेंनी, बघू यावेळी कितीजण ऐकतात आणि बघतात.

मला तर नॉर्मल वाटले आजोबा, या वयात असेच असतात बरेच जण. अन काही एपिसोड मध्ये दिसले की राग जरी करत असतील तरी सुनेवर खूप जीव आहे त्यांचा. >>>>>>> अगदी अगदी. मागे प्रज्ञाने आजोबान्ची सेवा करण्याच नाटक केल आसावरीसमोर. तेव्हा आजोबान्नीच सुनेच कौतुक करुन प्रज्ञाला हाकलल होत.

व्हीबी, तुम्हाला राजे लबाड का वाटतात? मला आवडला त्यान्चा कालचा प्रकार.

आजचा भाग आवडला. ते इतर मालिकांसारखे कटकारस्थानं, चिड चिड, भांडणे, मग एकेकावर क्लोज अप नेऊन reaction दाखवणे वगैरे प्रकारांपुढे आजचा हलका फुलका कॉमेडी असलेला भाग आवडला. आसावरी आणी शुभ्रा मस्त.

मला तर नॉर्मल वाटले आजोबा, या वयात असेच असतात बरेच जण. >>>>>>> असतील थोडे तापट, हेकेखोर पण भाषा बरोबर नाही वापरत असं वाटतं. नातसुनेच्या माहेरची अक्कल काढणे हे जरा अतिच वाटतं.
बादवे उत्सुकता वाटतेय फारच निजोच्या नवर्‍याचा एकदाही कसा उल्लेख येत नाही. वाईट, चांगलं काहीतरी आजोबा मुलाबद्दल बोलताना कधीच ऐकले नाहीये.

बादवे उत्सुकता वाटतेय फारच निजोच्या नवर्‍याचा एकदाही कसा उल्लेख येत नाही. वाईट, चांगलं काहीतरी आजोबा मुलाबद्दल बोलताना कधीच ऐकले नाहीये. >>> राखून ठेवले असतील झीने पत्ते. आ अ लग्न झालं की काढतील किंवा त्यावेळी काढतील.

निवेदिता जोशीला 'बेस्ट आई' चा झी गौरव पुरस्कार मिळाला... मुलांना स्वत:ची कामे स्वतः करायला न शिकवता त्यांना हवे ते सर्व हातात नेऊन लाडावुन बिघडवणार्‍या बाईला असा पुरस्कार देणे म्हणजे कहर झाला..!!

Pages