अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जातात की कॉफी प्यायला एकत्र. कानातले दिले तेव्हा मिठी मारली ना शुभ्राने बिल्डिंगखाली. शुभ्राची पैठणी आणि आधीची साडीपण छान होती. राजेंनी अशी वेशभूषा का केली होती फॅन्सी ड्रेस स्पर्धा असल्यासारखी. त्यान्च्याकडे माणसं नाहीत का काम करायला, जिथे तिथे स्वतःच जातात.

शुभ्राची पैठणी आणि आधीची साडीपण छान होती. राजेंनी अशी वेशभूषा का केली होती फॅन्सी ड्रेस स्पर्धा असल्यासारखी. >>>>>>>:+१. मस्त दिसते तेप्र.

या बाया फक्त पापीसाठी परत आल्या? असं वाचलं मी ते Wink पाणीपुरीसाठी नाही पण राजेंसाठी आल्या वाटते परत.

अभिजीत राजे ज्या पद्धतीने आसावरी च्या मागे आहेत; अगदी उठवळ वाटतं ते. दोघांमधलं नातं वयानुसार परिपक्व , सेन्सीबल , हळूहळू उलगडत जाणारं दाखवायला पाहिजे.

अगदी अगदी. हॉटेल काय बंद ठेवतात वेड्यासारखे. विशीत आहेत का राजे असा अव्यवहारीपणा करायला.

समजा तेप्र च्या आगोचरपणाला यश आले व अभिजीत राजे अन निजो चे लग्न झालेच तर सोम्यावर 'बधाई हो' म्हणण्याची वेळ नक्की येणार..!

Proud राजेंचा उत्साह बघता अगदीच शक्य आहे ते. शुभ्राने पाळणाही लिहिला असेल एव्हाना. असंही तिला स्वतःच्या संसारापेक्षा सासूच्या लग्नात अधिक रस आहे.

तेच तर.. अगोचर कुठली.. निघाली सासुचं लग्न लावायला..!

आज सासुचं लावतेय.. उद्या आजे सासर्‍याचं लावेल.. म्हणुनच म्हातारा पळाला काय की..! Uhoh

पण आजीचं वय सोम्याच्या आजोबांपेक्षा खूप लहान आहे. आजींची सून आजोबांच्या नातसुनेच्या वयाची आहे. आजोबा कायमचे गावाला गेले की कसे हे माहित नाही. लग्न लावायला यावं लागेल त्यांना कारण भटजी तेच होते प्रोमोत पण प्रोमोत दाखवलेलं प्रत्यक्षात होईलच असे नाही.

अरे काय जबरदस्ती आहे, नाही शिकवायचं तिला तर.

Mady आज मस्त बोलली प्रद्न्याला,पेपरमध्ये तर सर्कसचीही बातमी येते, मग तुम्ही जाता का लगेच सर्कस बघायला?

अरे काय जबरदस्ती आहे, नाही शिकवायचं तिला तर. >>> हो ना.

Mady आज मस्त बोलली प्रद्न्याला,पेपरमध्ये तर सर्कसचीही बातमी येते, मग तुम्ही जाता का लगेच सर्कस बघायला? >>> Proud

काल तो रिक्षावाला काहीतरी म्हणला ना की "इमान विकत नाही" मला वाटलं आसावरी म्हणेल "अगबाई हो का! तुम्ही विमान विकता का? रि़क्षा चालवता आणि विमान पण विकता" Lol

आग दोनो तरफ से लागलेली आहे , फक्त राजे "उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग" प्रकारात आहेत, आसावरी "लाजु बाई" मोडमधे आहे. तो मुलगा तर पक्का नालायक आहे, आजोबांची त्रास देण्याची उणीव तो भरून काढतोय.

सगळेच प्रतिसाद!! Biggrin Biggrin
आता सिरेल बघणं सोडुन दिलंय पण कमेंट वाचताना जॅम हसायला येतंय..

अधून मधून तर्कबुद्धी बाजूला ठेवावी. नाहीतर तर्ककर्कश होण्याचा धोका असतो. काही वेळा बिनडोक गोष्टींचा आनंद घ्यायचा असतो. मानसिक प्रकृतीला ते चांगल असत.फॅन्टसी म्हणजे वास्तव नव्हे. पण तरीही माणूस त्यात गुंगून जातो. बहुतेक कविकल्पना या वास्तव नाहीत. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी ... या कवितेची चिरफाड करुन शुक्र हा तारा नाही तो ग्रह आहे असे म्हणून त्याचे रसग्रहण होउ शकेल काय? रामसे बंधूंच्या भयपटांचे 'थ्रिल` एन्जॉय करणारे, दुरदर्शनच्या गूढ मालिकां गूढ एन्जॊय करणारे पण रसिक प्रेक्षक आहेत ना. आयुष्यातील रटाळ गोष्टी परत मालिकेत दाखवल्या तर लोक लांब पळतील. त्यात थोडाच लोकांना विरंगुळा मिळणार आहे? गॉसिपिंग म्हणल कि कान टवकारतात म्हणुन मालिकांत त्याला फार महत्व असते. उणीदुणी काढायची सुप्त इच्छा अनेकांच्या मनात असतेच. Happy

प्रकाश घाटपांडे यांच्या पोस्ट शी सहमत. ही सिरीयल मला बुआ सध्यातरी आवडते, म्हणून इथल्या नेगेटिव्ह कमेंट्स मी तरी नेगलेक्ट मारते. Happy

प्रकाश यांचे म्हणणे खरे असले तरी मालिकांचा दर्जा घसरला आहे हे कुणीही मान्य करेल आणि वरील चर्चा ही फक्त त्या दर्जाबद्दल आहे. प्रपंच नावाची झीची कौटुंबिक मालिका होती ज्यात गॉसिपला इतका वाव होता की ती मालिका अनेक वर्ष चालू शकली असती पण अतिशय तरल मालिका आणि कमी भाग तरी लोकांनी डोक्यावर घेतली होती आणि अजूनही ती लोकांना बघायला आवडेल. मनोरंजन दर्जेदार असू शकतं हे झीनेच दाखवून दिलं होतं. हेच कलाकार घेऊन अतिशय अर्थपूर्ण, परिपक्व मालिका होऊ शकली असती आणि तीपण लोकांनी बघितलीच असती.

प्रपंच नावाची झीची कौटुंबिक मालिका होती ज्यात गॉसिपला इतका वाव होता की ती मालिका अनेक वर्ष चालू शकली असती पण अतिशय तरल मालिका आणि कमी भाग तरी लोकांनी डोक्यावर घेतली होती आणि अजूनही ती लोकांना बघायला आवडेल. मनोरंजन दर्जेदार असू शकतं हे झीनेच दाखवून दिलं होतं >>> चंपा यांच्याशी सहमत, पण तेव्हा झी हे 'अल्फा' होते, म्हणजेच 'झी' या एका ब्रँड नेम साठी आणि फक्त TRP च्या गणितासाठी काहीही दाखवत नव्हते, त्यामुळे तेव्हा जरा कंटेंट बरा असायचा.. मात्र तेव्हाही अवंतिका सारख्या overhyped आणि नंतर नंतर रटाळ होत गेलेल्या वर्षानुवर्षे चाललेल्या मालिका होत्या म्हणा, पण त्या तुलनेने कमी असल्याने आणि प्रपंच, 405 आनंदवन, टिपरे, नायक , वादळवाट ( थोड्याफार प्रमाणात) सारख्या चांगल्या मालिका असल्याने 'अल्फा' बघावंस वाटायचं.
आता लोक सरळ सरळ ' झी मराठी' आपल्या पॅक मधून काढून टाकताना दिसत असूनही चॅनेल नं1 चा टेंभा कशाच्या जोरावर मिरवतयं हा एक प्रश्नच आहे !!!

आता लोक सरळ सरळ ' झी मराठी' आपल्या पॅक मधून काढून टाकताना दिसत असूनही चॅनेल नं1 चा टेंभा कशाच्या जोरावर मिरवतयं हा एक प्रश्नच आहे !!! >>> मी काढलं, अनेक महीने झाले.

प्रपंच, 405 आनंदवन, टिपरे >>> ह्या आणि पिंपळपान पण भारी होती. आनंदवन म्हटलं की मला मधुरा देव आठवते. अभिनयात ती मृणालच्या पुढेच खरंतर पण रमली नाही या क्षेत्रात जास्त. चांगलं करीयर करू शकली असती मनोरंजन क्षेत्रात.

असो अवांतर झालं खूप.

आनंदवन म्हटलं की मला मधुरा देव आठवते. अभिनयात ती मृणालच्या पुढेच खरंतर पण रमली नाही या क्षेत्रात जास्त. चांगलं करीयर करू शकली असती मनोरंजन क्षेत्रात >>>> हो ती छान काम करायची, ती मालिकाच मस्त होती एकदम, प्रपंच पण क्लास !!

राजेंना का आवडतय हे ध्यान..पर्समधे आजोबांची औषधं व बबड्याचा रूमाल घेऊन फिरणारं.दोघं काय सतत हिच्याबरोबर फिरत असतात का त्यांना गरज लागली की लगेच ती वस्तूपुढे करायला.

मॅडी छान आहे, तिचे दागिने युनिक असतात Proud आधीची मॅडी राजेंवर फिदा असलेली आणि सतत लाळघोटेपणा करणारी दाखवली होती. पात्र साकार करणारी कलाकार बदलली आणि स्वभावपण. ही थोडी मंद दाखवली आहे (हे का, एवढ्या मोठ्या शेफची पर्सनल assistnat अशी मंद कशी असेल). Youtube नाहीका राजेंच्या मोबाईलमध्ये किंवा आई, बहीण, काकू, मावशी, आत्या कुणीतरी असेल ना पारंपरिक मराठी पदार्थ येणारं, असावारीच का.

मी सिरीयल बघत नाही पण ती नवीन मॅडी भक्ती रत्नपारखी आहे, निखील रत्नपारखीची बायको. कॉमेडी शो करायची बहुतेक कलर्स मराठीवर. youtubeवर बघितलं हे.

आधीतर आसावरीला राजेंच्या स्वयंपाकघरात काहीच सुचत नव्हतं, आता सवय झाली वाटतं. मंदोदरी परबच्या ऐवजी ती कॅथॉलिक तरी दाखवायची, तिला वालाचं बिरडं माहित नाही Uhoh सोम्या अगदीच दहा वर्षाच्या मुलासारखा वागतो, खूप प्रेम आहे आईवर तर ते दिसत तर नाही कुठे वागण्यात. गुरु, सोम्या, आजोबा अशी पात्र दाखवणाऱ्या झीच्या लेखकांचे विचारही तसेच असतील का.

Pages