अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घारग्याची रॉयल्टी >> भारीच

'हे' / 'ते' नेमकं काय आहे?? कुणी सांगल का? >>>चपातीला पोळी न म्हणणारे ,वरण आमटीला डाळ म्हणणारे कुलकर्णी नक्की कोणत्या समाजाचे आहेत,यावर चर्चा आहे
बहुतेक तरी अमुक एखाद्या समाजात चपातीला पोळीच म्हटले जात असावे

आजच्या भागात राजे टिव्ही वर सुरळिच्या वड्याची रेसिपी सान्गत असतात त्यात साहित्यात पिठिसाखर घ्यायला सान्गितली?? आय मीन सुव मधे पिठिसाखर??? नक्की काय बनवाताय? वर क्रुतीत डाळिच पिठ भाजुन घ्या म्हणे? देवा!
बाकी सारखी काहितरॉ ये जा चालु होती मला काय चाललय तेच कळत नव्हत... झीची आणखी एक निरबुद्ध मालिका पण तरी पयला नबर " मानबा च"

झुंबा मधे राजे उगीचच यॅ यॅ करून ओरडत होते....... अंंजली,ते शाईन मारण्यासाठी आणि आसा ला जळवून तिच लक्ष वेधून घेण्यासाठी,पण ते कैच्याकै वाटत होत,हे मात्र खर.

अ राजेंना दात नाहियेत का? कि मलाच त्यांच्या तोंडाचे बोळके वाटते. पण त्यांना बघुन म्हातारचळ कशाला म्हणतात ते कळते. प्रज्ञा, आसावरी सारख्या महामुर्ख बायकाच असल्या माणसाच्या प्रेमात पडु शकतात. प्रज्ञा तर शोभतेच त्याला खास

Happy खरंच ते तोंडात दात नसल्या सारखे बोलतात आणि त्यांच्या कानाच्या पाळ्या कान हलतात मान हलवली की... ते खूप विचीत्र दिसते आणि मुळात त्यांच्यावर इतकं फिदा व्हावं तमाम स्त्रियांनी असं काये?

गिरीश ओक च्या जागी महेश कोठारे मस्त शोभले असते.
गुटगुटीत तरीही हँडसम!!! >> बिग नो

एवढे म्हातारे कशाला, हिंदीत कसे पस्तीशीची बाई पंचविशीच्या मुलाची आई असते, असा कोणी हवा होता

महेश कोठारे बोबडे बोलतात. अशोक शिंदे फिटनेस राखून आहे, तो असायला हवा होता. विलास उजवणेही चालला असतात, बाल्ड शेफ पराग कान्हेरेसारखा Wink

विलास उजवणे >>हो हे बरे आहेत, अशोक शिंदे फिट आहेत, पण ह्या रोलसाठी नाही असे मला वाटतेय.

मध्यंतरी एकाला बघीतले होते एका शिरेलित , त्याचे नाव आठवत नाहीये,

स्व जो पण बरा वाटला असता तसे

ओके, महेश निवेदिता जोडी जास्त बघितल्याचा परिणाम असेल Lol
मग अशोक शिंदे, शरद पोंक्षे, सचिन खेडेकर, तुषार दळवी, उदय टिकेकर हे ऑप्शन . अजून जरा जास्तच अंतर दाखवायचं झालं तर समीर धर्माधिकारी हे लोकही शोभले असते.
तुपारे लवकर संपवून सुभाही जरा जास्त केस पांढरे करून घेता आला असता.
मी महागुरूंना मात्र इमाजिन करत नाही, नाहीतर घारग्यांपासून मंगळागौरीच्या फुगडीपर्यंत स्वतःच कौशल्य दाखवत बसले असते. Wink
विक्रम गायकवाड ही त्यातल्या त्यात एक अनवट चॉइस. (माझा आवडता कलाकार)

तुपारे लवकर संपवून सुभाही जरा जास्त केस पांढरे करून घेता आला असता.>> असही त्याला ठोंब्या लोकांसोबत काम करण्याचा अनुभव आहे Proud

किल्ली Biggrin

जरा बजेट जास्त असतं, तर सरळ विकास खन्ना आणून बसवला असता! Wink

मला आज ह्या धाग्यावर मार बसणारे बहुतेक. गिरीश ओकला इतका विरोध का तेच कळत नाही इथे. ते सुद्दा इतकेच देखणे आहेत की. आजचा त्यान्चा अभिनय आवडला. अतिशय खट्याळ अभिनय केलाय.

मला ह्या रोलसाठी गिरीश ओक किव्वा अशोक सराफ फिट्ट बसतात.

रोमॅण्टिक ट्रॅक छान दाखवलाय दोघान्मध्ये. मला कुठे आचरटपणा दिसला नाही त्याच्यात.

तुपारे लवकर संपवून सुभाही जरा जास्त केस पांढरे करून घेता आला असता.>> असही त्याला ठोंब्या लोकांसोबत काम करण्याचा अनुभव आहे >>>>>> निजो कधीपासून ठोम्बी झाली? तिचा आताचा रागीट अभिनय पाहून मला पुर्वीची सिनेमातली डॅशिन्ग निजो आठवली.

ते ग्रीन गुलाबजाम मात्र कैच्याकै.

आपल्याला प्रज्ञा क्यारेक्टर जाम आवडल.नमुना आहे.>>>>>>> +++++++११११११११११

विक्रम गायकवाड > हेच ते ज्यांचे नाव आठवत नव्हते, हे पण बरे वाटले असते, त्यांचा अभिनयही चांगला असतो

अजिंक्य देव किंवा अशोक शिंदे जास्त परफेक्ट असते. मी गिरीश ओक हिरो आहे ऐकून मालिकेवर काट मारली.

विनायक गायकवाड छान आहे पण नि जो पुढे लहान आहे, वाटलापण लहान असता.

आणि त्यांच्या कानाच्या पाळ्या कान हलतात मान हलवली की... ते खूप विचीत्र दिसते >>>+१ टायटल साँग पाहिले का?
त्यात डोळ्यांवरची पट्टी काढल्यावर त्यांचा कान कसा हलतो... स्लो मोशनमुळे ते जास्तच विचित्र दिसते.

जरा बजेट जास्त असतं, तर सरळ विकास खन्ना आणून बसवला असता -- आपण contri करूया का, विकास खन्ना येणार असेल तर मी त्या माठाला सहन करायला आणि tv पाहायला तयार आहे

मुळात त्यांच्यावर इतकं फिदा व्हावं तमाम स्त्रियांनी असं काये?>>>> अगदी अगदी!
महागुरुंवरची कॉमेंटने तर हसून हसून मेले.

मला आवडतात गिरीश ओक. रुबाबदार दिसतात. त्यांना उल्लूच बनायला लावलंय तर ते काय करतील?
मला तेप्रसुद्धा आवडते. अभिनयात खूप सुधारणा आहे आणि सावळी(इतरांच्या मानाने)असली तरी क्यूट दिसते. काल झुंबा च्यावेळी छान दिसत होती जिमच्या पेहेरावात.

आपण contri करूया का, विकास खन्ना येणार असेल तर मी त्या माठाला सहन करायला आणि tv पाहायला तयार आहे>>>>>>
Lol

स्व जो Rofl आसावरीच्या मुलाचा रोल मागेल तो Wink आणि महागुरू त्याचे सावत्र वडील, परफेक्ट जोडी. सचिन खेडेकरने अजून पूर्ण लांबीची मालिका करायला सुरुवात नाही केली. शरद पोंक्षे आजारपणानंतर खूपच खराब (तब्येत) झाले आहेत, खूप वाईट वाटते त्याना बघून. विक्रम गायकवाड किती तरुण आहे, असावारीचा मुलगा शोभेल. ते कान हलतात ते नाही बघितलं अजून, उद्या बघेन नीट. तसे अविनाश नारकरच्या कानावरचे केस बघून मला ईई होतं नेहमी.

गिरिश ओक हँडसम आहेत . अभिनय पण चांगला करतात. मला आवडतात. तेजश्री पुर्वी कधी आवडली नव्हती ह्यात सुसह्य आहे. जरा बरा लेखक आणला तर अविस्मरणीय मालिकांच्या गटात जाउ शकते ही मालिका.

महागुरूंना मात्र इमाजिन करत नाही, नाहीतर घारग्यांपासून मंगळागौरीच्या फुगडीपर्यंत स्वतःच कौशल्य दाखवत बसले असते.>>>>>>>>>> हे भारी आहे. Lol
प्रज्ञाचा नवरा नाही का दाखवणार? बाई विबासं च्या मागे लागलीये> Lol अगदी हेच आलेलं मनात. असावरीचं ठीके पण हिचा नवरा आहे ना? अजुन दाखवला नाहीये ना पण? कुठे बाहेरगावी असावा.
गिरिश ओक चांगले आहेत. भुमिकेत शोभतात.

गिरीश ओक मलाही आवडतात. ऍक्टिंग छान करतात.
दिसायलाही छान आहेत की.
सगळ्यात चांगली ऍक्टिंग त्यांचीच असते.
नी. स सारखं ते बबड्या बबड्या करते ते फार बोर होत.
तेजश्री कधीच विशेष आवडली नाही. होसूमी मध्ये ती मला फार कधीच आवडली नाही.
सगळ्यात गंडलेलं कॅरॅक्टर तर तो बबड्या आहे.
ऍक्टिंग च्या नावानी शून्य. दिसायला तर महाबोर.
प्रज्ञा चा आचरटपणा अजून किती दिवस चालणारे??

नाहीतर घारग्यांपासून मंगळागौरीच्या फुगडीपर्यंत स्वतःच कौशल्य दाखवत बसले असते.>>>> Rofl

कुठे बाहेरगावी असावा.>>>>>>> दुबई ला असतो.

आज बऱ्याच दिवसांनी ही मालिका बघितली. बऱ्यापैकी निर्बुद्ध असली, तरी काही गोष्टी मला जाम आवडतात.
१. पार्श्वसंगीत - मस्त व्हायोलिनच्या सुरावटीत वाजतं. एक वेगळाच माहौल क्रीयेट करतं.
२. कलाकार - बबड्या, madi आणि प्रज्ञा सोडली ना, तर कुठलाही कलाकार डोक्यात जात नाही. मात्र तेही सह्य आहेत. तुपारे मध्ये मात्र रटाळमहामेरू इशा, स्नेहलताबाई, निमकरबाई इ. अशी संपूर्ण फौज उभी होती. (फौजेची गरज काय? इशाच काफी है.)
३. कथा - कथा खरंच छान आहे, आणि मांडणीही हलकीफुलकी आहे. कुठेही बोर होत नाही. आणि।विषय सोडून अजूनही कुठे भरकटली नाहीये.

Pages