अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी ८ वर्षाची मुलगी पाहते हि सिरीयल आणि खूप हसते ... मला म्हणते बाबा कसली कॉमेडी सिरीयल आहे हि...

आजकाल चला हवा येऊ द्या पेक्षा असल्याचं सिरिअल्स जास्त कॉमेडी आहेत

आसावरी इतकी vulnerable असेल तर कोणीही तिला सहज फसवू शकतं. लग्न झालेलं असून बाहेर सावज शोधत फिरणारे काही कमी नसतात.

सुनबै काय फक्त फुड टेस्टींंगला पुढे का? सासु स्वयंपाक मी करते म्हणाली की ही लगेच गायब.बाई वरची मदत तरी कर.

चव बघते तेही उष्टा चमचा वापरून, ईईई. दुनियेला शहाणपणा शिकवते आणि एकच चमचा वापरते वेगवेगळ्या भाज्यांची चव बघायला Uhoh तो तिचा कालचा ड्रेस साडीचा शिवल्यासारखा वाटत होता. एकच भाजी दोन वेळा बनवली आसावरीने, केवढं प्रेम.

इतर भंगार सिरियलपेक्षा ही सिरियल बरीच बरी आहे. वासरात लंगडी गाय शहाणी. सगळ्यांचा अभिनय चांगलाय. निवेदिता सराफ गोड दिसते.
मुख्य म्हणजे पुढे सरकतीये पटपट.

माहित आहे अंजली. तेच तर म्हणतेय मी. ती तिखट आमटी, भाजी आणि चटणी तर वायाच जाणार आहे. काल ते गोड आणायला जात होते तर रस्त्यावर लोक शूटींग बघत होते. परवा थरथराट लागला होता, निवेदिता तेव्हडीच गोड आहे अजून, वय फक्त वाढलंय. प्रेमाची कबुली लवकरच होणार असं दिसतंय.

गोड आणायला अशी घरची बाई पाहुण्यासोबत बाहेर गेली?
शुभ्राला पाठवायचं ना.
आणि सोम्यामाठ कुठेय? फुटलाका?
ती मॅडी अतिमॅड वागते. दिसते तर त्याहुन मॅड.
तिला जोडे खाणं म्हणजे माहित नाही? म्हणे जोडे खायला आलोय. Angry
वय काही कमी नाही म्हणजे शेफला जोडे हा पदार्थ नाही हे ज्ञान असायला हवं.

सध्यातरी या मालिकेत बबड्या सोडला तर फार निगेटिव्हिटी दिसत नाही,हलकीफुलकी चालू आहे.
पण एकंदरीत मँडी मँडमच कँरँक्टर ज्या पध्दतीने पुढे जात आहे ते बघता लेखकाने निगेटिव्हिटीची सोय करून ठेवलेली दिसते.साथ द्यायला प्रज्ञा आणि बबड्या आहेतच.
फक्त भक्ती रत्नपारखी निगेटिव्ह रोल्स करते का आणि करत असेल तर एकदम मँडीच कँरँक्टर निगेटिव्ह कस दाखवता येईल हा एक प्रश्नच आहे.

सोहमाठाकडे पैशाची चणचण आहे आणि आईसाहेब पक्वान्न तेही केशर(गरज नसताना) करून वाटताहेत. आधीचे केशर असेल कदाचित :डोमा

शुभ्राचा तो विडिओ स्मृती इराणी बाईंनी share केला आहे असे वाचले. तसे असेल तर छानच आहे. मिरचीचा सीन आधी कुठेतरी की बऱ्याच ठिकाणी बघितला आहे, आता आठवत नाही. सोहम घरी का असतो, काय प्रताप केले यावेळी त्याने.

हो..मिरची खायला घालणे प्रेमाच्या इनिशिअयल स्टेजेस मधे आवश्यक असते झी वर! आठवा: गवरी- शिव प्रकर्ण !
सोहमाठाला काढून टाकलं का नोकरी वरुन?

काल अभिजीत राजे सगळ्यांना फ्रेंडशिप बँड बांधत होते.
मला तर कुछ कुछ होता है ची आठवण झाली.
त्यातही शा. खा. राणी मुखर्जी ला फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणून फ्रेंडशिप केली आणि दुसऱ्यादिवशी फ्रेंडशिप डे ला बँड बांधत होता.
सेम टू सेम कॉपी.
आता काय ऊठसूठ आसवारीला बोलावणे पाठवेल अ. रा.

राजे आसावरीला 'अगं' कधी पासुन म्हणायला लागले?

बबड्याने मित्राच्या अपघाताचं कारण सांगून आईकडून पैसे घेतले होते..पुढे त्याचं काय? मला वाटलं detective शुभ्रा उघडकीला आणेल. आईला कळेल बबड्या क्या चीज है. पण तो विषय संपलाच.

आसावरी जरा अतिबावळट दाखवली आहे,ती मँडी एवढी सांगत आहे की हा फ्रेंडशीप बँड आहे तरी विचारते की द्रुष्ट लागू नये म्हणून बांधला आहे का?

यांच्याकडे एकच चॅनल लागतो का टीव्ही वर? बघावं तेव्हा अराचा शो चालू असतो. आजोबांना इतका राग आहे तर चॅनल बदलायला का सांगत नाही? परवा आजोबा नातसुनेवर पण डाफरत होते ते आवडलं नाही अजिबात ती औषध घ्यायला सांगते आणि हे काहीतरी अक्कल शिकवू नको म्हणतात. असे का लिहिले आहेत डायलॉग्स Angry

राजेंचा शो तर चालू असतोच पण तोही लाईव्ह शूट करतात वाटतं रोज कारण राजे त्या कार्यक्रमातून आसावरीशी निगडीतच काहीतरी बोलत असतात तिचं नाव नं घेता. उगीच नाही आसावरी एव्हडी पझेसिव्ह होत Wink आजोबा किती दादागिरी करतात, रिमोट त्यांच्याकडेच असतो, आसावरी त्यादिवशी राजेंची बायको बघायला धावत आली तर आजोबांनी टीव्ही बंद करून टाकला, किती दुष्टपणा.

हो ते स्पष्ट झाले आणि राजेंनी लग्न म्हणजे काय यावर बरेच मोठे भाषणही दिले. पेडणेकर ज्वेलर्सच्या बाहेर राजे रात्रभर थांबले होते, भरपूर वेळ आहे त्यांच्याकडे. असावारीची हलकी गुलाबी लिपस्टिक शेड मला आवडते. मॅडीच्याही ब्राईट रेड लिपस्टिक शेड छान असतात.

Boss लोक असे घरी येतात बोलायला employee च्या बायकोच्या सांगण्यावरून!! या असल्या ठोकळ्यावर (म्हणजे बबड्यावर) प्रेम केलं शुभ्राने?
लगे हात त्या boss ला राजेंचा दोस्तही करून टाकलं.

सुरुवात मिसली मी आज. सोहम का जात नसतो ऑफिसात. काय गडबड केलेली असते त्याने. बॉस घरी येत नाही पण काही बायका नवऱ्याला आणि काही पुरुष बायकोला घेऊन येतात ऑफिसात असं काढून वगैरे टाकलं तर किंवा काही गडबड केली तर इमोशनल ब्लॅकमेल करायला. लहान मुलं कशी पालकांना घेऊन येतात तसं बालिश वाटतं ते पण असतात असे लोक. सोहम फार स्वार्थी आहे, राजेंच्या ओळखीचा उपयोग करून घेतो आणि आई रडत असते तर साधं पाणी आणून देत नाही.

सोहमला काढून टाकलय office मधून.काम नीट करत नाही म्हणून वेळेवर,ओफिसला येत नाही म्हणून.

आजोबा आणि सोहम एकाच माळेचे मणी आहेत. आजोबाचा चिरका खरखरीत आवाज ऐकवत नाही.
निजोचा नवरा कसा होता देव जाणे.

Pages