अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेजश्री पुन्हा एकदा सून? तेजश्री, मृणाल दुसानीस ह्यान्ना सुनान्च्या भुमिका करुन कण्टाळा येत नाही का?

मला सासु हवी तसं मला सासरे हवे असं असणार. त्यात सासऱ्यांचे लग्न सून लावते पुढाकार घेऊन आणि यात सासूबाईचं लाऊन देते असं असेल.

मला सासु हवी तसं मला सासरे हवे असं असणार. त्यात सासऱ्यांचे लग्न सून लावते पुढाकार घेऊन आणि यात सासूबाईचं लाऊन देते असं असेल.>>>>>> आता ह्याची स्टोरी सुरु होईल ती मात्र तेजश्री प्रधान च्या लग्ना आधी पासुन

अरे आवरा या झी मराठीला , आधी "तुला पाहते रे" ने ४०+ च्या पुरुषांच्या मागे लागले,, आता "अग्गंबाई सासुबाई" सिनियर सिटीझनच्या मागे लागले. Happy

निवेदिता सराफ ने बहुदा बोटोक्स तत्रीतमेंत करून घेतली असावी, चेहरा फारच तुकतुकीत दिसतोय, त्यांच्याकडे पाहून काहे दिया..... च्या गौरी ची आठवण येते

पण सासरेबुवा गिरिश ओक असतील वाटत. >>> निवेदिताचा हिरो म्हणून तुषार दळवी, छत्रीवाली मधे हिरोचे बाबा आहेत तो असं कोणीतरी हवं होतं . गिरीश ओक नको होते.

वयस्कर लोकांच्या दुसर्‍या लग्नाची कथा असेल तर मी एकदम बघेन उत्साहानी. खरंच करतात काय अशी लग्ने? मलातर वाट्ते लग्न करायला गेले तर कोणीतरी म्हातारा गळ्यात पडेल आणी पैसे चोरून नेइल. आहे ती मनःशांती गायब स्वतःची. उगाच नसते खोड का बरे गळ्यात घालून घ्यायचे.
निवेदिता सराफ टा इप गोड बायांची होत अस णार दुसरी यशस्वी लग्ने. ये भी देखें गे.

अमा Lol

आमच्या शेजारच्या अजोबांना लग्न करायची म्हणण्यापेक्षा एका साथीदाराची गरज होती. एका गरिब बाईशी लग्न करतो, पुढे मी गेलो तर माझी पेन्शन तरी तिला मिळत राहील असे त्यांनी घरच्यांना सांगितलेही होते. पण तेव्हा ते कोणालाच पटले नाही Sad

अरे आवरा या झी मराठीला , आधी "तुला पाहते रे" ने ४०+ च्या पुरुषांच्या मागे लागले,, आता "अग्गंबाई सासुबाई" सिनियर सिटीझनच्या मागे लागले. >>>>>>> सॉरी नरेन, पण पटल नाही. हल्ली लग्नासाठी किव्वा प्रेमासाठी विशिष्ट वय असाव लागत नाही. २०१९ आहे हे. लग्न कुठल्या वयात करावा हा पर्सनल मर्जीचा प्रश्न असू शकतो त्या व्यक्तीसाठी हा, मात्र बालविवाह ( ४- १७ वर्षान्च्या मुलीन्ची केली जाणारी लग्ने) हा गुन्हा आहे आणि हे योग्य आहे.

त्यांच्याकडे पाहून काहे दिया..... च्या गौरी ची आठवण येते >>>>>>>>> सायली सन्जीवच्या एका इण्टरव्ह्युमध्ये तिला निवेदिताने आपली मुलगी मानलीये अस सान्गितलय.

सोनाली फार वाईट वाटल वाचून.

निवेदिताचा हिरो म्हणून तुषार दळवी, छत्रीवाली मधे हिरोचे बाबा आहेत तो असं कोणीतरी हवं होतं . गिरीश ओक नको होते. >>>>>>> गिरिश ओक नॉट बॅड. वरचे दोन्ही सुद्दा चालतील की. अशोक सराफ असते तर आणखी मजा आली असती.

सध्याचे प्रोमोज छान आहेत. स्पेशली नवरीला उचलायच तो प्रोमो भन्नाट होता. Biggrin रवी पटवर्धन ह्याना छोटया रोलसाठी का घेतलय ते मात्र कळल नाही. Uhoh

सॉरी नरेन, पण पटल नाही. हल्ली लग्नासाठी किव्वा प्रेमासाठी विशिष्ट वय असाव लागत नाही. २०१९ आहे हे. लग्न कुठल्या वयात करावा हा पर्सनल मर्जीचा प्रश्न असू शकतो त्या व्यक्तीसाठी >> बरोबर. नवीन नवीन बदल घडत आहेत आणि ते स्वीकारले पाहिजेत . सिनियर सिटिझन्स ना सुद्धा जोडीदाराची गरज असतेच . शारीरिक गरज संपली तरी मानसिक गरज असते कि . या विषयावर एक नाटक पण येऊन गेलाय ईला भाटे आणि गिरीश ओकचं होते असं वाटत . हे सगळे बदल नातवंडांनी /मुलांनी/ सुनांनी स्वीकारले पाहिजेत आणि घरातल्या सिनियर लोकांची साथ दिलीच पाहिजे असं वाटत . ज्यांना लग्न करावस वाटत असेल त्यांना करू दे कि . ज्यांना वाटत च नसेल तर राहील . कोणी जबरदस्ती थोडीच करत Happy

दोन्ही प्रोमो छान आहेत. दोघेही कसलेले कलाकार आहेत पण गिरीशने थोडे बारीक झाले पाहिजे, फार धिप्पाड दिसतात ते. अशोक शिंदेने स्वतःला फारच छान मेन्टेन केलंय म्हणून त्याला बघायला छान वाटतं.

थोडी शंका होतीच लिहीत असताना, जे लिहिले आहे ते विनोदी अंगाने घेतले जाणार नाही. जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील मी फार काही करू शकत नाही, कारण प्रोमो पाहिल्यावर जे वाटले ते लिहिले.

२१व्या शतकात संकुचित विचार ठेऊन समाजाची प्रगती होणार नाही. त्यामुळे कोण कुठल्या वयात प्रेम आणि लग्न करतो याबद्दल माझी काहीच हरकत नाही.

झी मराठीच्या मालिका पाणी घालुन वाढवलेल्या असतात, त्यामुळे या मालिकेचे वेगळे काय होईल हे सांगायला ज्योतिष्याची गरज पडणार नाही. झी मराठी वर एकाहून एक टुकार मालिका येत आहेत, सध्या तरी झी मराठीला दुरूनच नमस्कार.

नावातच पांचपणा ओतोप्रोत भरलेला आहे .... हे चॅनेल बंद का करत नाहीत हे लोक?

नवीन Submitted by उनाडटप्पू on 18 July, 2019 - 12:54

का चॅनेल का बंद करावं ???

पुढे मी गेलो तर माझी पेन्शन तरी तिला मिळत राहील असे त्यांनी घरच्यांना सांगितलेही होते. >>>> तेवढ्यावरच नाही हो रहात.घर,एफ्ड्या,आणि इतर मालमत्तेत मालकीहक्क येतो. अर्थात मृत्यूपत्रान्वये काही आर्थिक बाबी सुकर होतात.

माझ्याही ओळखीच्या बाई ऐन तरूणपणात विधवा झाल्या.दुसरा मिळाला,पण मुलाला विचारले तर नको म्हणाला.मग लग्न केले नाही.मुलगा मोठा झाल्यावर हे दोघे एकत्र सिनेमाला ,ट्रीपला जायचे.त्यालाही धाडस लागते.त्या,आईला,म्हणायच्या की अहो या मुलांच्या आवडी वेगळ्या आपल्या वेगळ्या.बरं,ही दोघे काही आपल्याला म्हणणार नाहीत की आई तूही नाटक-सिनेमाला चल म्हणून.

Ajnabi >>> कुठे आभाळमाया सारख्या सिरिअल्स आणि कुठे नवऱ्याची बायको सारखी तद्दन भिकार मालिका ..... इतका दर्जा घसरला असेल तर आणि गुणवत्ता वाढवता येत नसेल तर चॅनेल बंदच केलेला बरा नाही का ??

aabhalmaya ch Title song ... Jadto to jeev.. lagte ti aas. Devki Pandit... yani gaylele kharach khup sunder ahe..

Pages