अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंपा, राजे शेफ आहेत. त्यांना हे पदार्थ येत नसतील असं थोडच असेल .
त्यांना फक्त बहाणा हवाय नि.स.ला तिथे बोलवायचा.

प्रद्य्ना का जळतीये एवढी नि.स.वर.

आणि काय भयानक बरडं बनवलं निजोने.. Uhoh

ना मसाला वाटला.. ना फोडणी दिली.. नुसतं खोवलेला नारळ वालांवर टाकुन ते पातेलं गॅसवर झाकुन ठेवलं अन झालं..! कोणत्या पद्धतीने बनवलं काय माहित..!

समजा तेप्र च्या आगोचरपणाला यश आले व अभिजीत राजे अन निजो चे लग्न झालेच तर सोम्यावर 'बधाई हो' म्हणण्याची वेळ नक्की येणार..!>>लोल Lol

ते वालांचं बिरडं एकदम कसं काय उगवलं? की राजेंकडे नेहमीच सोललेले वाल तयार असतात? काही मिनिटं मला सीरियल पाहायला मिळाली नाही. तेव्हढ्यात वालांना मोड येऊन ते सोलून तयार!

बबड्याला अजून एक पायरी खाली ऊतरवलं.नि.स. व सुनबैंचा चांगुलपणा ठसवण्यासाठी.पोरगं लांबवणार आईचे पैसे व सुनबै डिटेक्टीवगिरी करणार.

तेव्हढ्यात वालांना मोड येऊन ते सोलून तयार!>>>> हीरा, अहो तुम्ही झीवाल्यांना अश आयडिया सुचवू नका.आधीच घारग्यांनी एक आठवडा खाल्ला.आता वाल पाण्यात भिजत घालणे,उपसणे,बांधून ठेवणे मग ते सोलणे अशा स्थितीत एक आठवडा सहज जाईल. Light 1

आज एक कल्पना सुचली. बबड्याचं लग्न ईबाळाबरोबर होणंच योग्य आहे. तेवढेच माठ भाव असतात त्याच्या चेहर्‍यावर. आणि अतिसामान्य संवादफेक.

शुभ्रा कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखते ना सोहमला. तो असा बंडल माणूस आहे हे एवढ्या वर्षात कळत नाही का तिला. किती पैसे दिले राजेंनी. ते घर असं का दिसत होतं नवीनच, सोफे आणि पडदे वगैरे कुठे होते आधी. आसावरी घार्गे काय डिशचं नाव Uhoh जिथे पिझा आणि पास्ता मिळतो, चायनीज मिळतं, तिथे घारगे आणि पातोळ्याही मिळतात, राजे सोहमच्या वरताण आहेत फेकाफेकी करण्यात. नवीन हॉटेलात आसावरीला नोकरी पक्की.

आई घरातच तर असते हे वक्तृत्व स्पर्धा टाईप भाषण चांगले होते पण मधेच ते धजावतेच कसे हे काय प्रकरण होते. मन धजावते की जीभ धजावते, त्या धजावतेला ना शेंडा ना बुडखा. हिम्मत कशी होते हे बरोबर होतं जास्त. मराठीची दैना मराठी कलाकारांकडून, दुर्दैव दुसरे काय.

आई घरातच तर असते हे वक्तृत्व स्पर्धा टाईप भाषण चांगले होते>> हो पण ही कल्पना फार पूर्वी पासून जाहिरातीत व साहित्यात वापरली गेली आहे. घारगे व पातोळ्यांची इतकी रॉयल्टी तर चिकन ६५ व बिर्याणीची मला किती मिळेल असा एक विचार चाटोन गेला मनास. पण त्यासाठी. वर्ल्ड्स ग्रेटॅस्त आचारी अब्ब्ब्ब्ब्ब्बिजित राआआआअजे ला कोण झेलेल. लंपट बुढढा मेला.

मी बघायचेच सोडले कारण झी अ‍ॅप वर ते डा लोच होईना. हँग होउन बसले आहे सोहमाठाच्या चेहर्‍यासारखे.

दर्जेदार संगीतकार अशोक पत्कींचा हा सोहम उर्फ अनिकेत वशिल्यानेच घुसलेला दिसतोय सिरीयल मध्ये. जबरी माठ आहे अभिनयात.

प्राचीन, ई बाळ Proud पण नको ते ई बाळ. तेजश्री प्रधान जो अभिनय करतेय त्यात निभावली जातेय सिरीयल. ई बाळ घुसले असते तर प्रेक्षक ई ई करत पळाले असते. Proud

निवेदीताचा चेहेरा फार पसरट होत चाल्लाय. आणी बबड्या काय सारखे? डबड्या म्हणायला हवे. Biggrin

मुळात चूक आईची पण आहेच. मुलाचे अति लाड आणि ऐतोबा बनवणं , आणि thankless बनवणं किंवा बनू देणं हे चूकच. सोहम आणि तो `का रे दुरावा ' चा हिरो यांच्यात मख्खपणाची स्पर्धा लावली पाहिजे!

डबड्या Rofl
नातसुनेच भाषण चालू असताना आजोबा मारे डोळे पुसत होते पण काल सिलिंडर नाहीये हे माहित असताना केवढा हेकटपणा. जराही समुजन घ्यायची तयारी नाही आणि दारू पिणार होते वाटतं दोघे म्हातारे Uhoh

तेजश्री प्रधानचा मेकओवर झालाय का? काल सन्सकृती कला दर्पण अ‍ॅवार्ड मध्ये वेगळीच दिसत होती.

डबड्या Lol
आई अजुनही हातात टूथब्रश देत असेल तर बबड्याकडून कामाच्या अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.

प्राचीन , एकदम भन्नाट आयडिया! तरी ईशाला पहाणे / ऐकणे नको.

बिर्याणीची मला किती मिळेल असा एक विचार चाटोन गेला मनास. पण त्यासाठी. वर्ल्ड्स ग्रेटॅस्त आचारी अब्ब्ब्ब्ब्ब्बिजित राआआआअजे ला कोण झेलेल. लंपट बुढढा मेला. >>> हसून हसून मेले मी.
निजोचे बबड्या आता डोक्यात जातेय.प्रथम ठीक होते.पण ही अजून सुधारत नाही का?
तेप्रला नवीन कपडे का नाहीत कितीतरी वेळा निळा ड्रेस आणि लाल ओढणीवरच असते.

कानातले बदलते ना Happy काल तर गोड गैरसमज एपिसोड होता. आसावरी राजेपेक्षा जास्त उतावीळ आहे. राजे मंदोदरीला का लाईन देत असतात, पर्याय म्हणून का, ती नाही मिळाली तर ही, चुकीचं आहे हे Angry

मला का कोण जाणे ती मॅडी आणि कपिल शर्मा शो म धला क्रिष्णा दोघांमधे खूप साम्य वाटते. क्रिष्णा बाई बनून आला की असाच दिसतो मॅडीसारखा.

राजेंबरोबर त्यांचा स्टाफही पडीक राहायला लागलाय आता कुलकर्णीकडे. काय ती चहा ओतायची पद्धत, शेफकडे कामाला आहे ना ही बाई Uhoh डबड्या नाहीये दोन दिवस झाले, कारखानिसांना बघून असा राग येतो, असं वाटतं दुसरी काचपण फोडून टाकावी चष्म्याची, अशी कारण नसताना लाचारी पत्करणारी माणसं डोक्यात जातात.

मला का कोण जाणे ती मॅडी आणि कपिल शर्मा शो म धला क्रिष्णा दोघांमधे खूप साम्य वाटते. क्रिष्णा बाई बनून आला की असाच दिसतो मॅडीसारखा.> >>>>. अगदी. मी पण हेच बोलले. सेम सपना. इन्फॅक्ट सपना जास्त चांगली मॅडीपेक्षा

ती मॅडी टोटली मॅड आहे पण धुर्त पण आहे. कोणी ईतका बावळटपणा कसे करु शकते, बरे हीला बावळट म्हणावे तर ते पण नाही, पक्की चालु आहे. आजोबांना थापा मारल्यात त्या राजेला कळु नये म्हणुन घाबरुन लपवते पण

मधले भाग मी मिसले. ती मॅडी राजेंची बायको असल्याचे का नाटक करतेय? तेप्र ने सांगितलेय का निजो ला जळवायला ?

Pages