अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घार्गे प्रकरण संपलं एकदाचं. राजे असावरीच्या मागेच लागलाय. शुभ्र घरी आल्यावर कपडे बदलतच नाही. लोळण्याऱ्या ओढणीसकट आणि केसांच्या लांब बटा सांभाळत स्वयंपाकघरातील हलकीफुलकी कामे करते. तीचं मुख्य काम असावरी आणि अभिजितचं जबरदस्ती जमवणे हेच आहे.

चं मुख्य काम असावरी आणि अभिजितचं जबरदस्ती जमवणे हेच आहे.>> सासूला घरातून कटवणे व सासरा पदरात घ्यायला शेजारीण आहेच समोरची. अभिजितच्याच प्रतिक्रिया जरा नैसर्गिक् वाटतात. सोम्या तर एक नंब र चम्या वाटतो सरळ केला पाहिजे त्याला स्पष्ट बोलून.

त्या शेजारच्या म्हातारीला असाचे साबा का बरे आवडत असावेत. ते एकतर खूप म्हातारे आहेत, मुख्य म्हणजे ते आपल्या सुनेला कसे वागवतात व त्यांचे विचार कसे आहेत हे माहीत नाही का त्या बाईला. शुभ्र (हे लीहिताच येत नाही) आणि सोहम एकांतात काहीतरी बोलत असतील ना आईच्या किंवा आजोबांच्या विषयावर, की सरळ सासूचे लग्नच लावून द्यायचे, नवऱ्याला काही समजावत का नाही शुभ्र, आणि तो बायकांना तुच्छ समजत असेल तर तसे काही दिसत नाही, कारण तो शुभ्रला घाबरतो. माडीच्या खऱ्या नावावरून किती तो गोंधळ. तिचे खरे नाव राजेंना माहीत असायला पाहिजे, पगार देतात ना ते तिला.

तो सोम्या पण आता बदलल्यासारखा वाटतो ना? आईला बोलत असतो सारखा. > हो ना. आधी मुखदुर्बळ वाटत होता. पण उपद्रवक्षमता भरपुर आहे बाकी काही कर्तृत्व नसलं तरी. माप ओलांडायला नकार देणार्‍या सूनबाई नवर्‍याला जागच्या जागी आणि वेळीच सरळ करताना मात्र कमी पडतात. घरात इत्के तमाशे होवूनही सूनबाईंची प्रतिक्रिया मात्र (स्क्रीप्ट आधीच माहीत असून या गोष्टी नायक-नायिकेला भेटवण्यापुरत्याच महत्वाच्य ) अतिशय उथळ आणि तोकडी .

नि.स ला ईतकही बावळट दाखवु नका..टु व्हीलर वरुन जाताना सामान जास्त झालं आता पोलीस पकडतील म्हणुन सुनबैंच्या माागे लपुन बसली होती.

माझा तर बघून बघून मेंदू वितळला. इतकी स्टुपिडिटी भरलेली आहे ह्या मालिकेत. निस ने चेहर्‍यावर बोटॉक्स केले आहे हे नक्की. पंचेचाळीशि पुढे डोळ्याखाली इतके अनैसर्गिक दिसत नाही. व गाल एकदम फिलर लावून भरलेले आहेत. अभिजित राजे इक्डून बाण सोडतात व ते निस पारच इग्नोअर करते. इतकी ती कशी आश्रम हरिणी आहे की हा बाप्या मागे लागला आहे ते समजत नाही. ती आजोबा व मुलाच्या सेवेत स्वत्व हरवोन बसली आहे असा मुद्दा असेल तर तो समजला आता हॅमरिन्ग करू नये प्लीजच.

सिरीअल मध्यील सर्व बायका यडचाप व पुरु श कशे त्यांना शिकिवनार सल्ला देणार राग वनार सर्व काही हु षा र ते पुरू षच. शेफ वर इतके मरणार्‍या इतक्या बायका एकाच सोसायटीत कश्या भरल्या आहेत. घर ते भाजी बाजार ते रेस्टो रंट. इतकीच फिरत राहते.अजोन करणार तरी काय

राजे भाजीवालीशी खेडवळ बोलायचा प्रयत्न करतात ते दयनीय आहे.

मी नेहमीच बघते झीमराठी च्या मालिका, डोकं बाजूंला ठेवून बघायच्या असतात. (चला हवा येऊ द्या, निलेश साबळे ने नागराज मंजुळे ची acting केलीये त्या धर्तीवर - मी बघतो बॉलीवूड चे picture डोकं बाजूला ठेवून बघायचे असतात)

हो ना. अगदीच बावळट आणि कणाहीन दाखवत आहेत असावरीला. बाजारात जातेना भाजी आणायला, अगदीच घराबाहेर पडत नाही असं नाही आणि शंभर वर्षाची नाही की कधी पोलिस बघितले नाहीत आणि फार जुन्या पिढीची आहे. हे मी काय लिहिलंय मलाही कळत नाहीये कारण माझं डोकं भिर्भिर्लय तो पोलिस प्रसंग बघून. काहीही.
मंगळागौर हे नवीनच प्रकरण ज्यात असवरीला कमीपणा दाखवायचा पुरेपूर प्रयत्न. कुठे असतं आता असं. शुभ्र किती ओढणी खराब करते लोळवून, घराच्या बाहेरही ओढणी लोंबतच असते. प्रज्ञा किती अती आहे, सगळीच पात्र अती आहेत, समतोल नाहीच, प्रत्यक्ष जीवनात कुठे असतं असं. झी मराठीवर काळी आणि पांढरी छटा असलेली माणसच फक्त दिसतात, अधे मध्ये काही नाहीच Angry

भाजीवालीच्या भाज्या कमी झाल्यात.मागच्या वेळी खुप भाज्या होत्या व ताीी पार वाकुन आत जाऊन बसली होती.
काल निवांत ऊभी होती तिच्या stallच्या आतमधे.

आणि ती रोजची ५० गिर्हाईकं बघत असेल.पण ह्यांना औळखु आली पाहिजे ना हिच ती मागच्या वेळी.तिने माझा मुलगा मोठा माणुस आहे वगैरे म्हंटल्यावर ह्यांना ती राजेंबद्दल बोलत.असेल अशी शंका यायला हरकत नव्हती.
तीने मुलाचं कौतुक लावल्यावर ह्या अगदीच नवख्यासारखं कोण कोण करायला लागल्या.

ण निवेदिता सराफ नी काम खूप छान केलयं>> आंवांजं बरिं क गेंगाणा आंहें किं नाईं बबड्याईचां करायला काम काय आहे?!

मला अभिजित राजे आवडतात. दिसतातही अगदी लख्ख लखलखीत. किचनमधल्या रिन, प्रिल, पितांबरी वगैरे सगळ्या स्वच्छकर्त्यांनी घासून काढल्यासारखे. मेक अप जरा जास्तच आहे, पण चालतंय.

मला अभिजित राजे आवडतात. दिसतातही अगदी लख्ख लखलखीत. किचनमधल्या रिन, प्रिल, पितांबरी वगैरे सगळ्या स्वच्छकर्त्यांनी घासून काढल्यासारखे.>>>> Lol

अमा Lol

अमा सॉलिड पोस्ट, दुपारी तीन एकोणीसची Lol

शुभ्र किती ओढणी खराब करते लोळवून, घराच्या बाहेरही ओढणी लोंबतच असते >>> Lol शुभ्रा का. मला आधी वाटलं शुभ्र म्हणजे पांढऱ्या रंगाची ओढणी मग लक्षात आलं, नायिकेचे नाव शुभ्रा आहे.

किचनमधल्या रिन, प्रिल, पितांबरी वगैरे सगळ्या स्वच्छकर्त्यांनी घासून काढल्यासारखे. मेक अप जरा जास्तच आहे, पण चालतंय. >>> Lol

असुस वरून काही काही शब्द नीट टाईप होतच नाहीत. एचटीसी मराठी कीबोर्ड खूप छान होता. काहीतरी उपाय शोधायला पाहिजे पण आळशीपणा होतोय.
राजेंनी मंदोदरीला छान सांभाळून घेतलं पण ते तिच्या मागे आहेत हे दाखवून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली का, तो मुलगाही काय लगेच हुरळून गेला ते ऐकून, राजे म्हणजे मोस्ट एलिजिबल बॅचलर आहेत जसे काही.

नाही, नाही.

https://www.google.com/inputtools/
या बद्दल बोलते आहे.

तुम्ही संगणक वापरता आहात असे समजून लिहिलेले आहे.

जर मोबाईल वापरत असाल, तर हे वापरू शकता.

https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi.keyboard.for.a...

ही मालिका बॅन करायला पाहिजे

नवीन Submitted by रेव्यु on 22 August, 2019 - 09:46
Pages>>>>>>

राहू दे ना ..... तुम्ही नका बघू (तुमचे स्पॉन्सरशिप नाही आहे ना या सिरीयलला), आम्हाला आवडते आम्ही बघतो.

मला ती तेप्र मंद वाटु लागली आहे आता..!
स्वतःचे लग्न झाले आहे तर नीट संसार करायचा सोडुन विधवा सासुचे लग्न लावायला निघाली आहे.. सासुची ब्याद घरात नको म्हणुन चांगला मार्ग निवडलाय हिने. निजो सारखी शामळी सासु सुद्धा बोचते की काय हिला..??

नुकत्याच लग्ना झालेल्या कपल्सचे काहीही रोमॅन्टिक मोमेन्ट्स नाही , फिरयाला जाण नाही की एकत्र बसून चेष्टा वैगरे पण नाही. बबड्या सतत घुष्यात आणि सुन्बाई साबाबरोबरच फिरतायत.

इथलं वाचून की काय..... पण दाखविलं ना ....ती त्याला कानातले घालायला सांगते त्याच्या हाताने...मग तो म्हणतो की मला या बदल्यात काय मिळणार...? मग ती अगदीच टिपीकल मराठी नायिके सारखी .. 'आजोबा.... सोम्या......' असे ओरडून पळून जाते..मग तो तिच्या मागे धावत जातो......

बस इतपत चालली यांची मजल!
Angry

पण ती दिसते खूपच फ्रेश. आणि दरवेळी नवीन डूल! मोठ्ठे मोठ्ठे.....! Happy
बाकी अभिजीत राजेंना तरी काय इतकं आवडतंय निवेदिता मधे? तिचं आवडतं गाणं वगैरे लावायला कॉलर ट्यून म्हणून?
आणि आजोबा कुठे गेलेत अचानक? बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा रवि पटवर्धन यांचा....चॅनेलसोबत!

Pages