माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु आप जित गयी, मस्त डोसे. मी लिहिलं होतंना, आता जिंकणार.

मी तुम्हाला व्यायाम मिळावा ह्या चांगला हेतु ठेवून सांगितले पण मी मात्र, एग बीटरने बीट करते. >>> Lol लय भारी.

मूग डाळ हलवा/शीरा बिघडला आहे
मिक्सरमधून डाळ एकदम मस्त पेस्ट केली आणि नंतर झाकणाच्या डब्यात घालून कुकर मध्ये २ शिट्ट्य दिल्या.
मग तो शिजलेला घट्ट ठोकळा फूड प्रोसेसर मधून काढला, तो वाटल्या डाळीसारखा कोरडा मोकळा झाला.
भ र पू र तुपात तो चांगला तास्भर भाजला.
पाणी न घेता दूधात शिजवला. केशर घालून कढत केलेलं दूध हळू हळू त्या डाळीच्या मिश्रणात घातलं. मग सरते शेवटी साखर घातली. हे नेहेमीच्या शीर्‍याच्या पद्धतीला अनुसरून.

तर ते प्रकरण चिकट् झालं आहे. मौ मोकळा हलवा नाही झाला. दताखाली चावावे लागणारे घट्ट कण येतात ते का मला काही केल्या समजत नाही. कुअकर मधून डाळशिजवून मग तासभर तुपात भाजून मस्त हलकी मौ का नाही? चिकन कसं जास्ती शिजलं तर्चिवट लागतं तसा प्रकार असतो का मूगडाळीचा? खरतर मूगडाळ किती पटकन गाळ शिजते.
मा का चु. ?
आणी आता ते तसच खाण्यावाचून काही उपाय आहे का?

जाणकार सांगतीलच. पण मला वाटतंय की पेस्ट नसते करायची. डाळ चांगली भिजली की पाणी निथळून काढून बारीक करायची. तशी कोरडीच दिसते. मी तरी या स्टेपनंतर थेट तुपावर भाजते. नंतर गरम दूध. पण मी बऱ्याच वर्षांत केला नाहीये मात्र. चुकीचं आठवत असू शकतं.

मी गेल्यावेळी तू म्हणते तसच केलं होतं. प्रेशर कुक नव्हतं केलं बारीक केलेले मिश्रण. तेव्हा पण जरा मधून मधून दाताखाली येत होतं पण ह्यावेळी जास्तीच टचटचीत लागत आहे शीरा/हलवा

डाळ पूर्ण फुलण्याआधीच साखरेमुळे आवळली असं वाटतंय. लिक्विड कमी पडलं. पाणी घालून प्रेशरकुक/मायक्रोवेव्ह करून बघायला हरकत नाही. हवंतर आधी थोडी तशी शिजवून बघ.

माझा पुरणाचा राडा झाला होता तसं वाटतंय. उकडलेली डाळ गोडात घातली की ती चिवट होते. तू मध्ये कुकर का इंट्रोड्यूस केलास? भिजवलेली मूग डाळ बिन कुकरची शिजते. भिजवलेली डाळ पेस्ट करायची, मग तुपावर भाजायची आणि दुधात शिजवायची. मग तूप सुटेपर्यंत परतायची. अशीच रेसिपी बघितली आहे

मी प्रेशर कुकर मध्ये अजून १ शिट्टी देउन बघते. आहे त्यापेक्षा वाइट तर नक्कीच नाही होणार. तसं करून बघते स्वाती. आत्ता एका बोल मध्ये ३ चमचे हलवा घेउन मायक्रोवेव केला लगेच खायसाठी पण तूप बदाबदा पडलय माझ्या हातून. ३ चमचे पण जात नाही.

सई, अगं मी पण मूगडाळ भिजवून तशीच सुट्टी शिजवते, आमटी/फोडणीचं वरण असं काही करायला. पण ही पेस्ट करून प्रेशर कुक करायची टीप बरेच ठिकाणी वाचली म्हणून प्रयोग केला. अर्थातच तो प्रयोग फसला.

दूध नाही पण डावभर हलवा अर्धं भांडं पाणी घालून सरसरीत केला आणी कुकर मध्ये लावला आहे. १ शिट्टी करीन.
होपफुली त्याचा परत दगड होणार नाही. नाहीतर तो परत फो. प्रो. मधून काढावा लागेल.
स्टे ट्यून्ड!

ॲक्चुयली शिट्टी करू नको पुन्हा गच्च व्हायची शक्यता. प्रेशर आलं की आच मंद करून पाच मिनिटं ठेव.
आणि पुढच्या वेळेस नेहमीच्या पद्धतीने कर. Wink

बॅकग्राउंडला काहीतरी गाणीबिणी लाव की. तेवढीच ट्यून्ड राहायला मदत. आणि आता हे निस्तरेपर्यंत पार्लरला जाऊ नकोस. Proud

ॲक्चुयली शिट्टी करू नको पुन्हा गच्च व्हायची शक्यता. प्रेशर आलं की आच मंद करून पाच मिनिटं ठेव.>> टू लेट. २ शिट्ट्या झाल्या. गॅस बंद केला. झाकण पडलं की रिझल्ट लागेल.

स्वाती Happy बरबर

कुकरचं झाकण पडेपर्यंत 'आमच्याकडे किनै अस्साच आवडतो हलवा' हे घोकत राहा. नंतर मोठ्याने म्हणायची वेळ आली तर गडबडायला होणार नाही. Proud

माझ्या माबोवरच्य अपोस्टी वाचून कोणी माझ्याकडे जेवायला यायला नकोच म्हणतील. गेल्या वेळी जमला म्हणून पदार्थ करायला जाते आणि मग तीच रेसिपी फॉलो न करता माझी प्रयोगशीलता उफाळून येते वर आणी मग मी तोंडघशी पडते. हा स्वभावदोष लक्षात आल्याने मी बेकिंग च्या वाटेलाच जात नाही. दर वेळी काहीतरी नविन किडे का करायची सुरसुरी येते कळत नाही.

आय अ‍ॅम इन्व्हॉल्व्ड नाऊ>>> इंव्हॉल्व्हमेंट्बद्दल मनापासून आभार Happy
पडलं झाकण. रिझल्ट फेवरेबल लागला. सुधारीत आवृत्ती तयार झाली. त्याचा परत दगड नाही झाला. आता उरलेल्याला पण असच रिप्रोसेस करते.
सर्वांचे आभार.

डाळ वाटून शिजवायाची स्टेप का केली? हे काहीच केल्या कळायला मार्ग नाही(अर्ध्या डाळीचे वरण व अर्ध्या डाळीचा हलवा असा प्लॅन होता का इंधन वाचवून?हुशार सुग्रणीचे लक्षण ?)

पण असो, वरची शेवटची पोस्ट( आताच) वाचली की गणपतीच्या कृपेने, तुमचा मूगाचा हलवा नीट झालाय.

शूम्पी, बिघडलेला पदार्थ पुन्हा खाणेबल बनवणे हे सुगरणपणाचेच लक्षण आहे. तेव्हा थम्स अप!

शूम्पी, बिघडलेला पदार्थ पुन्हा खाणेबल बनवणे हे सुगरणपणाचेच लक्षण आहे. तेव्हा थम्स अप! >>> अगदी अगदी.

शूम्पी, बिघडलेला पदार्थ पुन्हा खाणेबल बनवणे हे सुगरणपणाचेच लक्षण आहे. तेव्हा थम्स अप! >>> +1

दर वेळी काहीतरी नविन किडे का करायची सुरसुरी येते कळत नाही.
>>
Lol. Same pinch.
माझी पण हीच सवय आहे. पण एकदा जमलेले तसचं परत करण्यापेक्षा प्रयोगशीलता चांगली. त्यातून काही छान होऊनही जाते.

अरे चंद्रयानावर २४ पोस्टी व इथे पण म्हणून इथे आले बघायला. मंजुडी ह्यांची रेसीपी परफेक्ट आहे मूग डाळ हलव्याची.

तुमच्या प्रयोगाला शुभेच्छा हो. मी काय इत्के गोड खाउ शकत नाही व हा हलवा फारच मस्त लागतो. म्हणून आठवण येते मधूनच.

अरे बिघडून मग घडलेल्या हलव्याला चिक्कार टी आर पी मिळालेला दिसतोय.
अमा, मंजूडेची रेसिपी वापरूनच केला तिथेच प्रतिक्र्यांमध्ल्या टीपा वाचून ते प्रेशर कुक करणे ही स्टेप केली मी . पण असो, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल Happy

अस होत खर ! मी जनरलीच प्रयोग करत नाही पण यावेळेस २-३ फॅमिली येणार होते जेवायला म्हणून गाजर हलवा क्न्डेस्न्ड मिल्क घालुन मायक्रोव्हेव्ह मधे करायची बुद्धी झाली , हलवा बरा झाला पण प्रकरण शेवटच्या स्टेपपर्यन्त तुप घालुनही कोरड दिसायला लागल अस का व्हाव कळेना
जिची रेसिपि होती तिचे फोटो आणी हे प्रकरण काही साम्य वाटत नव्हत शेवटी नतर बघु म्हणुन बाकी सग्ळ आटोपल आणी शेवटच्या आवराआवरीत जेव्हा कन्डेन्ड मिल्कचा कॅन रिसायकल ला टाकु म्हणून बघित्ला तर फॅटफ्री होत ते प्रकरण त्यामुले हलवा नुसता कोरडा दिसत होता.
पाहुणे यायच्या आत दुध गरम करुन घेतल एका भन्ड्यात हलवा थोड्या तुपावर छान परतुन घेतला मग दुध घातल आणि हलव्याचा कायापालट झाला.चवही सुधारली, (कॅलेर्‍याही वाढल्याच असतिल ,पाहुण्याना आमचा घरचा आहेर)
असो एकदरित प्रयोग हे माफकच प्रमाणात आणी वेळ पाहुन करावे हे नक्की

काल मटार करंजी केली, तर आवरण नंतर मऊ पडले.
रवा मैदयाचे कडकडीत मोहन घालून घट्ट पीठ भिजवले होते.
माकाचु?

Pages